छगन - प्रतिक्रिया कसली घेता? आं? इथे काय कुणी नागवं नाचतं आहे का? निघा इथून!
नारू राणे - आवशीक xxऱ्या! तुका काय वाटला माजो वट कमी झालो?
निळू राणे - बापाशीक xxऱ्या! तुका काय वाटला माजो वट कमी झालो?
नितु राणे - भैनीक xxऱ्या! तुका काय वाटला माजो वट कमी झालो?
विश्वजित कदम - हा आमच्या सॉफ्टवेअर टीमचा पराभव आहे. व्होटिंग मशिन्स फॉंल्टी निघाली, आमचा प्रोग्राम चाललाच नाही. जेव्हा माझ्या नावासमोरचं बटण दाबलं गेलं तेव्हा दोन मतं शिरोळेंना मिळत होती.
जाणता राजा - हे भाकीत आम्ही केव्हाच केले होते. तेव्हापासून आम्ही कॉंग्रेसची कास सोडून मोदीचा कासोटा धरला होता तो काय उगाच? शिवाय आमचं सुप्रिया, आपलं, महिला धोरण..
दादा(गिरी) पवार - मग? आमी काय करायचं त्याला? तुम्ही कुणाला 'उचलू' देणार नाही, आमाला धरणाच्या दिशेनं जाऊ देणार नाही, मग आता आमचा करंगळी कार्यक्रम आमी काय व्होटिंग बूथवर जाऊन करायचा का?
दिगू - आं? काय म्हणता? कधी? असं? च्यायला! अरेरे! ओ! येस, कमिंग अमृता डीअर! सॉरी हं, मी जरा घाईत आहे. अहो म्हणजे बाहेर जायच्या घाईत! तुम्ही पत्रकार म्हणजे…
केजरू - हो हो, ते सर्व ठीक आहे. पण अरे मला शून्यापेक्षा जास्त मतं मिळाली रे, ते तरी म्हणा.
एन डी तिवारी - मरुदे! सध्या मी दुसऱ्याच चिंतेत आहे. बायकोनं हनीमूनला जायचा बूट काढला आहे. मी म्हणतो मी काय करणार जाऊन? तिला म्हणालो आहे केसरी ट्रॅव्हल्सच्या टूरबरोबर तूच जाऊन ये.
पप्पू - इट्स ओके! रीपीटर तर रीपीटर. मी नेहेमीच ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा देत आलो आहे. त्यावेळी सगळे गणंगच असतात.
प्रियांका - सॉरी अंकल! तुम्ही खरंच मला वडिलांच्या ठिकाणी आहात. रॉबर्ट तर कित्ती कित्ती मानतो तुम्हाला! आज सकाळपासून तुमच्या फोटोसमोर हात जोडून उभा आहे. जावई ना तुमचा तो? प्लीज प्लीज ही प्रतिक्रिया टीव्हीवर दाखवा हो.
ममता - अहो, आत घेणार नाही असं कुठे म्हटलं होतं मी? मी म्हटलं होतं यायच्या आधी जरा सांगा, म्हणजे जरा झाडलोट करून ठेवता येईल. बरं ते काही माछबिछ खात नाहीत, निदान चमचम बनवायला दूध नासवण्या-आपलं-फाडण्यासाठी तरी वेळ मिळायला हवा ना?
मौनमोहन - म्याडम नाहीयेत म्हणून सांगतो, सतरा ठिकाणी ठिगळं लावलेली प्यांट घालायची म्हणजे कठीण असतं हो. चालण्यापेक्षा नको तिथे फाटत तर नाही ना हे बघण्यातच जास्त वेळ जातो. शुभेच्छा!
म्याडम - राहुल! घर चलो! कितनी बार कहा है पढाई पे ध्यान दिया करो. नाऊ यू आर गोइंग टू गेट अ टाईमआऊट. टीव्ही नही, एक्स बॉक्स नही कुछ नही. हां भई. क्या रिएक्शन? हमने एक्शन किया लोगोंने हमे रिएक्शन दिया.
लालकृष्ण - हुशार आहे हो तो! वादच नाही. पण आम्ही म्हणतो वडिलधाऱ्या माणसांना निदान नमस्कार तरी करा! केव्हापासून बूट काढून बसलो आहे. पावले थंड पडतात आमची.
सुषमा - हं! रात्र रात्र बसून आम्ही सबमिशन्स करायची यांची आणि वर हे पहिले आले की अभिनंदनाला पण जायचे. आमचंच नशीब! बरं, अभिनंदन आणि काय…
उद्धवस्वामी - येस्स! आता आमची इच्छा पूर्ण होणार. मोठ्या हौसेने आम्ही पूर्ण भगवा ड्रेस शिवून घेतला होता, चड्डी बनियन पण भगवी. आता आम्हाला तो घालायला मिळणार. आणि बरं का, 'तो' फोन आम्ही स्वत: लावणार आहोत आता.
उद्धटस्वामी - प्रतिक्रिया घ्यायला आलात हे खरंच तुमचं धाडस आहे. आं? क्यामेरा दगडप्रूफ आहे? अस्सं काय? ठीक आहे मग. आता अभिनंदन. पुढील काही दिवस दगडप्रूफ प्यांटशर्टपण घालून फिरा.
अम्मा - अमने पैलेही बोला ता, अमारा भाई जितेगा. हां, तब मनमें बोला ता, लेकीन अब खुला बोलती हुं, अब की बार मोदी सरकार. अमारा सपोर्ट नई लिया तो क्या, दोसाई काने को कबीबी आ जाव!
मोदी - धन्यवाद! सरकार चालवायचं नाही, तर राष्ट्र चालवायचं आहे! तुम्ही इथे उभे का? आता कुणी कामचुकारपणा करताना दिसला तर फटके देऊ! चला निघा इथून!
जनता - नमो! नमो!
आम्ही - गड आला पण 'आम'चा शिंव्ह गेला. केजरूस्वामी पडले याचे दु:ख होते आहे. विनोदाचा मोठाच स्त्रोत आटला.

No comments:
Post a Comment