आमच्या म्याडम कित्ती गोऱ्यापान! तरी नेटिव्हांच्या शाळेत कित्ती आपलेपणाने शिकवतात ।।धृ।।
म्याडमनी आमच्या अ वर्गाची एक टीम बनवली आहे. त्या टीमचे तीन एक्के (म्हंजे मॉनिटर) आहेत. कपिल उर्फ कपि , दिगू उर्फ दुष्यंत आणि मी. म्याडमनी सांगितले आहे जास्तीचे मार्क पाहिजे असतील तर काही तरी जास्त करा, उगाच पहिल्या बाकावर बसून पेंगायचे असेल किंवा सांगकाम्या बनायचे असेल तर आपले मौनीबाबा आहेतच. उगाच गर्दीपण जमवू नका. ते काम ब तुकडीतील एक्का प्रतिगाडगेमहाराज उर्फ प्र.गा.म. करतो आहेच. म्याडमचे आणि आमच्या पीटीच्या सरांचे जमत नाही. पीटीसर कडक शिस्तीचे आहेत, मुलांनाही शिस्तीने वागायला लावतात, पण कॉपी केली तरी तिकडे काणाडोळा करतात. त्यामुळे त्यांच्या वर्गातील मुले त्यांचे ऐकतात. पण म्याडमच्या तासाला मात्र त्यांची पाठ वळली की त्यांना बाण मारतात. तसं म्याडम कॉपी करायला नको म्हणत नाहीत. कॉपी करणं हा गुन्हा नाही, पण करताना सापडणं हा गुन्हा आहे असे त्या म्हणतात. त्या स्वत:सुद्धा लिहून आणलेले हळूच बघत शिकवतात. पीटीसर पूर्वी इतिहास आणि भूगोलपण शिकवायचे. पण खरे प्रेम शिस्तीवर. औंध संस्थानाचे पंतप्रतिनिधी त्यांचे आदर्श. साष्टांग नमस्काराचे अतिवेड. फक्त साष्टांग नमस्कार मात्र स्वत: घालायचे नाहीत, मुलांकडून स्वत:ला घालून घ्यायचे. हेडसर आले तरी खुर्चीतून उठायचे नाहीत. हेडसर बिचारे तास संपेपर्यंत तिष्ठत उभे असायचे. पण पुढे पीटीसर इतिहासाच्या तासालाही कवायत करून घ्यायला लागले. (खरी गोष्ट अशी की त्यांना स्वत:ला इतिहासाचे फारसे काही कळत नाही असे त्यांच्याच काही पट्टशिष्यांनी सांगितले) भूगोलाच्या तासाला म्हणायचे नकाशावर जसा दिसतो तसा भूप्रदेश प्रत्यक्षात कधीच नसतो. हिंदुभूमीचा, (सॉरी हं, या शब्दाने म्याडम लैच खवळतात), भारताचा नकाशा फळ्यावर टांगायचे आणि औद्योगिक क्रांतीवर रटाळपणे बोलत राहायचे. अशा वेळी मी, दिगू आणि कपि छान झोपायचो. पीटीसरांची मर्जीतील मुले मात्र झोप आवरत ते ऐकायची. याउलट आमच्या म्याडम कित्ती छान शिकवतात. कित्ती गोऱ्यापान आहेत त्या. थेट फ़ॉरेनरच. काय बोलतात ते कळत नाही पण ऐकायला आवडतं बुवा. परवा पाणी योजना शिकवताना "अब हम नर-मादा योजना शुरू करेंगे" असे सांगत होत्या. तर दिगू ताडदिशी हात वर करून उभा राहिला. मुलींच्या दिशेने पाहत म्हणाला,"म्याडम, म्याडम! मला करा मुख्य, वाटेल ते करून योजना यशस्वी करतो." म्याडम भडकून लालबुंद होऊन पाहू लागल्या. कपिने दिगूचा शर्ट ओढून त्याला खाली बसवलं आणि सांगितलं,"तुला ना, एक दिवशी भरपूर चोप मिळणार आहे. नर्मदा योजना असं म्हणायचं आहे त्यांना!" आमच्या म्याडम कित्ती कित्ती… ।।धृ।।
प्र.गा.म. पीटीच्या तासाला ग्राउंडवर कधीच नसायचा. व्यायामाचे आणि त्याचे वाकडे होते. मागे एकदा वजन उचलण्याच्या स्पर्धेत उतरला आणि पंधरा किलो वजन उचलताना पार आडवा झाला. वर आणि आमच्यावरच चिडला, म्हणाला तुम्ही इतकं जड असेल असं आधी का नाही बोललात? आता आम्ही त्याला भरीला पाडलं होतं हेही खरंच. म्याडमनी त्याबद्दल आम्हांला शाबासकी दिली होती. तर, तेव्हापासून आता तो थिअरीवर भर देतो, प्रत्यक्ष उचलायला जात नाही. कुणी वजन उचलत असेल तर तिथे जाऊन मसलमास, वेट, ग्राव्हीटेशनल एक्स्लरेशन, सेंटर ऑफ ग्राव्हीटी, ब्लड प्रेशर असलं काही तरी अगम्य बोलत राहतो. पण तो इतिहासाच्या तासाला मात्र न चुकता हजर राहायचा. हातात पुस्तक घेऊन पीटीसर कुठे चुकतात त्याची वाट पहायचा. चुकले की लगेच उभा राहून ते सांगायचा. पीटीसर दुर्लक्ष करून बोलत राहिले की चिडायचा, माकडटोपी काढून बाकावर आपटायचा. फक्त ग्यादरिंगला नाटक बसवायचे असेल तेव्हा मात्र अत्यंत उत्साहात सकाळी सहा वाजताच रिहर्सलला हजर असायचा. स्वत:चेच नाही तर सर्व पात्रांची भाषणे पाठ करायचा. त्याला हवी ती भूमिका मिळाली नाही तर नाटक पाडण्याच्या धमक्या द्यायचा. मग एकदा म्याडमनी त्याला सांगितले, वर्षभर काम करायला मिळेल अशी भूमिका देते, फक्त माझ्या तासाला दंगा करायचा नाही. पीटीसरांचा तास सुरु झाला की मी सांगते काय करायचं ते. प्र.गा.म. काही बोलला नाही, नुसतेच नाकातून उष्ण फूत्कार टाकीत खिडकीबाहेर पाहत होता. पण आमच्या म्याडम अज्जिबात रागावल्या नाहीत. त्यांना प्राण्यांना माणसाळवणे छान जमते. या कपिचंच पहा ना. हल्ली साखळीपण लावत नाहीत त्याला. आमच्या म्याडम कित्ती कित्ती… ।।धृ।।
ऐन परीक्षेच्या दिवस आहेत. सरांनी उजळणी सुरु केली आहे. त्यात आता प्र.गा.म. आणि त्याची ग्यांग कधीही पीटीसरांच्या कुठल्याही तासाला जाऊन म्हणतात आम्हाला आत्ताच्या आत्ता वर्ग झाडायचा आहे. तास संपल्यावर करा म्हटले तर ऐकत नाहीत. तोंडाला फडकी बांधून खराट्याचा प्रचंड आवाज करीत एका कोपऱ्यातील धूळ झाडायला सुरुवात करतात. त्याचे ग्यांगवाले मोठे मोठे बोर्ड घेऊन घोषणा देत उभे राहतात. पाच एक मिनिटांत सगळीकडे धुरळा उडाला की अचानक हे सगळे काम तसेच टाकून दुसऱ्या वर्गाकडे धावतात. वर्गातील धूळ फक्त एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याकडे गेलेली असते. म्याडमची मुलगीपण आमच्याच वर्गात आहे. तिचे खूप नखरे असतात. आपली आई शिक्षक आहे म्हणजे आपण नापास होणारच नाही असं तिला वाटतं. कधी वह्यापुस्तकंपण नसतात तिच्या हातात. ती पीटीसरांच्या तासाला आयटम सॉंग गुणगुणत बसते. ते ऐकून कपि आणि दिगू खिदळत राहतात. पीटीसरांनी मग तिला एकदा सांगितलं, हे बघ, तू माझ्या मुलीसारखी आहेस म्हणून सांगतो, ही असली छचोर गाणी म्हणत जाऊ नकोस. त्याने मला त्रास होणार नाही तर तुझी स्वत:ची लायकी निघेल. तर फणकाऱ्याने म्हणाली अडलंय माझं खेटर तुमची मुलगी व्हायला. आम्ही काय तुमच्यासारखे गाववाले नाही. माझी आई, माझे बाबा फ़ॉरेनच्या देशात राहून आलेले आहेत. शिवाय माझे बाबा छान गुळगुळीत दाढी करत होते. त्यांची दाढी काही तुमच्यासारखी मोरी घासायच्या ब्रशसारखी खरखरीत नव्हती. माझा भाऊ तर थेट फ़ॉरेनमध्ये नापास होऊन आला आहे. आता गेली चार वर्षं तो इथंच दहावीत आहे. आता या परीक्षेनंतर ममा त्याला इथंच टीचर म्हणून घेणार आहे. तुम्ही बसा कवायती करत. मी आणि दिगू एकमेकांकडे पाहत राहिलो. तिच्या वाटेला जाऊ नका असा आम्हाला म्याडमनी दम दिला आहे. कपि तर तिचं दप्तरपण उचलून घरापर्यंत नेतो. त्याबद्दल म्याडम त्याला रोज एक केळं देतात. तिच्या भावाचंपण दप्तर आणलंस तर आणखी एक देईन असं त्या म्हणाल्या आहेत. ती (म्हंजे म्याडमची मुलगी) पार हाताबाहेर गेली आहे असं दिगू म्हणतो. हाताबाहेर गेलेल्या मुली या विषयावर दिगूचा प्रचंड अभ्यास आहे. लेकाचा नेहमी कुठल्या तरी मुलींना चिठ्ठ्या लिहून पाठवत असतो. त्याही टवळ्या त्याला उलट चिठ्ठ्या लिहितात याचे मला आणि कपिला वैषम्य वाटते. हा दिग्या लेकाचा घरून श्रीमंत आहे म्हणून, नाही तर आपण काय कमी देखणे आहोत? असे कपि मला म्हणाला होता. तुझे सर्व देखणेपण तुला शेपूट नसण्यात सामावले आहे असे मी म्हटल्यावर प्रचंड भडकला. मला म्हणतो अरे जा रे तिवाऱ्या, म्याडमनी मॉनिटर केलं म्हणून जास्त शेफारला आहेस तू. मी म्हणालो, मग? केलंच आहे मुळी. आमच्या म्याडम कित्ती कित्ती… ।।धृ।।
या सगळ्या गदारोळात आमच्या शाळेचा बारावीचा निकाल किती टक्के लागणार? मागील परीक्षेत सगळेच काठावर पास झाले होते. अनेकांना ग्रेस मार्क देऊन वरच्या वर्गात ढकलले होते. म्याडम म्हणतात काही करा, शाळेचा पार निक्काल लागला तरी चालेल पण पीटीसरांच्या आवडत्या मुलांना जास्त मार्क पडता कामा नयेत. तुम्ही नाही तरी गेली काही वर्षं बारावीतच आहात, आणखी काही वर्षं राहिलात तर काही बिघडत नाही. दिगूला तर ते हवंच आहे. त्याची सध्याची फ्लेम नववीच्या वर्गात आहे म्हणे. त्यामुळे याला कॉलेजमध्येच जायचं नाहीये. प्र.गा.म. म्हणतो ही शाळाव्यवस्थाच मला आवडत नाही, मला डायरेक्ट हेड मास्तर करा, मी सगळं बदलूनच टाकतो. म्याडमनी त्याला चुचकारलं आहे. त्याला दंगा करायला मिळतो त्यात तो आनंदी, त्याच्या दंग्याने पीटीसरांचे विद्यार्थी फार काही अभ्यास करू शकणार नाहीत या विचाराने म्याडम आनंदी. एकाच्या ऐवजी दोन केळी मिळणार म्हणून कपि आशाळभूत आनंदी, आपण बारावीतच राहणार म्हणून दिगू अत्यानंदी आणि अभ्यासच करायला लागणार नाही म्हणून मी परमानंदी. असा सर्वत्र आनंदीआनंद आहे. आमची शाळा ग्रेटच आहे. मला फार आवडते. म्याडम पण आवडतात. मी याच शाळेत राहणार कायम. आमच्या म्याडम कित्ती कित्ती… ।।धृ।।

No comments:
Post a Comment