काळापहाड सरकार आज बहुत खुषीत होते. त्यांनी आज त्यांचा आवडता काळा चष्मा
कपाळावर सरकवला होता. वास्तविक गेल्या एक महिनाभरात वाड्याची वाताहत झाली
होती. भिंतींचे पोपडे निघाले होते. एके काळी संगमरवरी असलेल्या फरशीला
जागोजागी तडे जाऊन ती भकास झाली होती. बिल थकल्याने वीज मंडळाने वीज तोडली
होती. मग छोटू आणि सरकारांनी स्वत: खांबावर चढून तारेचा कात्रज करून
मंडळालाच चकवले होते. यंदा छपराची शाकारणी न झाल्याने ते ठिकठिकाणी गळत
होते. जिथे गळत होते तिथे खाली वेगवेगळी भांडी ठेवल्याने दिवाणखान्याला
राजा केळकर म्युझिअमचे रूप आले होते. या सर्वाचा उबग येऊन राणीसाहेब माहेरी
निघून गेल्या होत्या. मुदपाकाची रसद अशा प्रकारे तुटल्याने काळापहाड
सरकारांनी शेवटी समोरच्या बटाटेवडेवाल्यालाच घाऊक कंत्राट दिले होते.
पूर्वी कुठलीही गाडी उभी करायची असल्यास सरकारांना नजराणा गेल्याशिवाय
परवानगी मिळत नसे. आता काळ उलटला होता. सरकारांनीच वडेवाल्याकडे "वही"
ठेवायची वेळ आली होती.
आज वडे बांधून आलेल्या कागदात सरकारांना त्यांची खुषी सापडली होती. आजकाल सरकारांना बातम्या अशाच कागदातून मिळत. पेपरवाल्याचे बिल थकल्यावर त्याने पेपर टाकणे कधीच बंद केले होते. सरकारांनीसुद्धा, मरूदे, नाही तरी स्वत:चे पैसे घालून आमचीच तडफड, जळजळ वाढवणाऱ्याच बातम्या वाचायच्या ना? शिवाय तेवढ्या पैशात एक बटाटेवडा आणि बोनस म्हणून त्याबरोबर कागदपण येतो. आज बटाटेवडा खाऊन झाल्यावर सरकारांनी तो तेलकट कागद हाताने सपाट करून तो वाचता येण्यापुरता सरळ केला. "हं:! हॅ:! गेले दोन आठवडे सगळीकडे नुसत्या त्याच बातम्या. नमोंनी अस्से केले नि तस्से केले. काय वाचायचं त्यात? आं? हे काय?". ते खुर्चीत पसरले होते ते एकदम उठून सरळ बसले. त्यांनी नीट निरखून ती बातमी वाचली आणि त्यांच्या चेहऱ्यावर मिष्कील खुशीचे हसू पसरले. "छोटू! ही बातमी वाच. वा! आमचा दिल एकदम खूष करून टाकला नमोंनी. आम्ही नागवे झालो म्हणून काय झालं, शंभूराजेंची बोळवण लंगोटीवरच झाली शेवटी! आत्तापर्यंत अवघड उद्योग करत आलात, आता घ्या म्हणावं अवजड उद्योग उरावर." आणि अतिखुषीत ते चक्क गाऊ लागले, "पाऊल थकले, माथ्यावरती, जड झाले ओझे… शंभूराजेsss!!"
"१६ मे पासून आम्ही त्यांना दिसतसुद्धा नव्हतो. फोन करतील म्हणून दोन दिवस इथे अस्सा बसून राहिलो होतो. पण विजयनृत्य आणि विजयवल्गना करण्यात भावाची आठवण कशी येणार? नमोलाटेत वास्तविक आम्ही दोघांनीही गटांगळ्या खायच्या. पण यांच्या हातात फळकूट लागले आणि हे तरले. आम्ही मर्द म्हणून छाती पुढे काढून लाटेला सामोरे गेलो. आता वाटतं उगाच गेलो. छोट्या, लाट जबरी होती रे, आम्ही कधी आज्जात उचलेले गेलो आणि दाणकन किनाऱ्याला येऊन आपटलो कळलंच नाही. पार्श्वभाग सडकून निघाला अगदी. त्यावेळी हे नौकानयन करीत असलेल्या कसबी कप्तानाच्या थाटात फळकुटावर उभे राहून किनाऱ्याच्या दिशेने कूच करण्याचा आदेश देत होते. आपण उभे असलेले फळकूट ही नौका नसून, साधी फळी आहे अन ती पाण्यात तरंगणे सोडाच, पण आयएनएस कमळाबाई या अवाढव्य अशा पाणबुडीवर ती टेकली आहे याची जाणीव त्यांना झाली नव्हती. आता ती पाणबुडी हळूहळू वरती आली आणि तिच्या भव्यतेचा साक्षात्कार झाला असेल."
"शंभूराजे, अभिनंदन!"
"हं. कोण?"
"अस्सं! कोण काय? मी काळापहाड!"
"बरं. मग?"
"कळलं आम्हाला. जरा जडच आहे प्रकरण."
"तुम्हाला जड असेल, आम्हाला अवघड नाही."
"अवघड नाही पण अवजड आहे. खी:खी:खी:!"
"असेल. तुम्हांला त्याचं काय? निदान आम्हाला काम आहे. तुम्ही चालू ठेवा तुमची हेरगिरी."
"शंभूराजे! कळतात आम्हाला हे टोमणे. आम्हाला हौस का होती? संपली आता आमची हेरगिरी. आपण फोन कराल असं वाटलं होतं. शेवटी बिल न भरल्यानं फोनही कट झाला. पब्लिक बूथवरून बोलतो आहोत. शंभूराजे, आमचं चुकलंच. खूप हाल चालले आहेत. आम्हाला बघा ना अवजड उद्योगात लावता का कुठं. तसे फार अवजड उचलायचा अनुभव नाही, पण रस्त्यावरचे दगड उचलायचा नक्की आहे. एवढं करा आमचं काम."
"तुम्ही आमचे बंधू. माफी मागता आहात तर आम्हीही उदार मनानं माफ केलं तुम्हाला. उद्या सदरेवर या."
"खी:खी:खी:! अहो शुंभराजे! आम्ही आणि माफी मागणार? इतका वेळ बोलत होता तो छोटू! आम्ही नाही काही! बुद्धीही अवजड झालेली दिसते! खी:खी:खी:!"
"खी:खी:खी:! आम्हीही काही शंभूराजे नाही! मी धनाजी बोलतोय! खी:खी:खी:!"

No comments:
Post a Comment