च्यामारी! हे शिक्षनाचं लफडं कशापाई काढावं बरं? शिक्षनानं कुनाचं भलं झालंय व्हय? मानूस आपल्या कर्मानं मोठा होत आसतो आसं आमचं सातवीतलं गुर्जी आमाला सांगायचं. तवा मी विचारलं होतं,'पर गुर्जी तुमी आसं काय कर्म केलं हुतं म्हनून गुर्जी झालाय?" आता यात आमचं काय चुकलं? पन उत्तर म्हनून एक लाफा भ्येटला शिवाय घरला निरोप, बाला घिऊन ये म्हनून. वर "ह्यो तुमचा पोरगा काय धावीच्या वर जात नाही बघा" आसा आमच्या बाला आशीर्वाद भ्येटला. बा गरीब हो आमचं, गुमान ऐकून घेऊन घरला आलं. एवढंसं तोंड करून मायला सांगताना मी त्याला ऐकलं हुतं. माय काळजीनं घिरली होती. बा म्हणत होता,"काय पोरगं फुडं जाऊन काय राजकारणात पडतंय का काय आता." गुर्जीनी मग माज्यावर डूकच धरला. सगळ्या चाचणी परीक्षेत भोपळाच भ्येटू लागला. मंग आपन एक आयडिया काडली. तडक गुर्जींचाच क्लास लावला. आपल्याला मार्क पडण्याची जबाबदारी तेंच्यावरच टाकली आन मस्त राह्यलो. वार्षिक परीक्षेत पास होऊनच दावलं. न मार्क दिऊन सांगतंय कुणाला. बा म्हनला, पोरा, उगाच टक्कूरं शाळंत वाया चाललं तुजं. मंत्री न्हाई पन किमान झेडपीत तरी जाशीलच बग. पन आमचं गुर्जीसुद्धा दूरदृष्टीचं. आपन नववीत दोन आन दहावीत तीन वर्षांचा आणभव घेऊन बाहेर पडलो. दहावीत आसताना येळ काढून आपन समाजकार्य करत होतो. गावात बाजारसमितीच्या निवडणुकीत लई कार्य करून सोडलं. समितीची मेंबरं धरून मतदानाला आणायची जबाबदारी आपली होती. विरोधी गटाचा त्याला विरोध हुता. मग त्या विरोधाला विरोध करण्याची कामगिरी आपन आशी पार पाडली, की चेरमन आबासो सोता पोलिस स्टेशनात येऊन शाबासकी देऊन ग्येले. म्हणले तुज्यासारक्या कार्यकर्त्यांची आपल्याला, पक्षाला गरज हे. मग आपन सर्व वेळ समाजसेवेला आर्पन करायचं ठरवलं. शिक्षनापरीस समाजसेवा म्हत्वाची. शिवाय आपल्याला तडीपारीबी लागली हुती. मंग शाळेत जाणंबी शक्य नव्हतं. मंग थितुन आपन मागं पाह्यलंच नाही. एकाच वर्षात पहिल्या फळीच्या कार्यकर्त्यापासून तडक वॉर्डप्रमुख झालो. कुणीही आगदी मध्यरातीला येऊन चायनीज स्टॉल परवानगी म्हणा, भाजीची गाडी परवानगी म्हणा कसलंही काम घेऊन या, आपण अगदी ष्ट्यांडर्ड रेटमदी करून देनार. सगळ्यात जास्त पक्षनिधी (म्हंजे लोकांनी पक्षकामासाठी दिलेला निधी) आपल्या वॉर्डातून पक्षाला जात होता. आपलं काम बगून आपल्याला आबासाहेबांनी झेडपीवर जानार का आसं विचारलं. म्हंजे आपलं प्रमोशनच झालं म्हनायचं. पन आपन आपले पाय काय जिमिनीवरून सोडले नाहीत. परवाच्याला सोता गुर्जीच समोर आले. मला पघून चाट पडले. म्हनतात, तू इकडं कसा काय. तेंना बोललो तुमच्याच आशीर्वादानं. पेन्शनचं काम हुतं. म्हणलो तुमी काळजीच करू नका गुर्जी. मीच सही करनार हाये. तुमच्या कृपेनं सही तेव्हडी नीट शिकलोय.
आमच्या पक्षात सर्वे मंडळी आशीच. जास्तीत जास्त धावी झाल्याली पन समाज्कार्नात एकदमच उच्च म्हणजे पार पंधरावी गाठलेली. तशी हायेत एक दोन पार तिकडं कुटं इंग्लंड अमेरिकेला शिकल्याली. पन कसलं शिक्शान हो ते? तोंड उघडून चार शब्द बोलायची मारामार. आमच्या म्याडम बोलत आसल्या की देवळात भजनकीर्तन ऐकत आसल्यावानी डोळे बंद करून ष्टेजवर बसनार. येकदा पक्षाच्या बैठकीत मी आमच्या बाब्याला म्हटलं पन, ते बग बाबाजी झोपलाय कसा, आता म्याडमनी बगायला आन हे डबदिशी फुडं पडायला एकच गाठ पडायला पाह्यजे. आमी धावीवाल्यांनी सगळं म्यानेज करायचं, समाजकारन करायचं, कशीबी मतं आणायची, आन उच्च शिक्षित हे ष्टेजवर बसनार आन झोपा काडणार. कसलं उच्च शिक्षित रं हे, हुच्च शिक्षितच म्हनायला पाह्यजे. आन त्यो बिनपगारी फुल अधिकारी आयआयटी की आयटीआय शिक्षित कलेक्टर, त्याची आणखीच तरा. पेन वापरायची संधी सोडून दिली आणि झाडू घेऊन फिरतोय. या विलेक्शनमदी पक्ष नापास झाला. आता या परीक्षेनं आमचं शिक्शान बगून आमाला नापास नाय केलं. तसं जालं आसतं तर सगळेच नापास झाले नसते. एक दोन पासपण झाले आसते आन कमळाबाईचेपन काही नापास जाले आसते. म्हनून आता कमळाबाईचं शिक्शान काडायला लागले हायेत. आसो. आता पुन्ना पहिलेपासून सुरुवात करावी लागनार. म्हंजे पुन्ना बाजारसमितीच्या इलेक्शनची वाट पाहणं आलं. पन ते परवडलं. आमचे जे अंगठाछाप पास झाले ते आता इरोधी पक्षाच्या बाकावर बसून शुद्दलेखण करनार. सवय सुटली आता. सत्ताधारी असताना बाकावर बसून झोपा काडणं सोपं होतं. बाकीचे इतर ज्यांना लोकसभेत अॅडमिशनपन भेटली नाही त्यांना म्याडमनी प्रौढ साक्षरता वर्ग जॉइन करा आसा आदेश दिला आहे. ते ऐकून काही जन "खास प्रौढांसाठी" वर्ग म्हनून लैच खुश झाले आहेत.

No comments:
Post a Comment