गेले काही दिवस आजोबांची मन:स्थिती ठीक नाही. जरा घुश्यातच आहे स्वारी. आज सकाळी पूजा करतानासुद्धा देवालाच दम दिल्यासारखे मंत्र म्हणत होते. मी बागेतून फुलं तोडली आणि परडी नेऊन दिली तर माझ्यावरच भडकले. 'हे काय? एकपण लाल फूल नाही? गजाननाला लाल फूल लागते असे किती वेळा सांगायचे? तुम्ही सगळे एक नंबरचे कामचुकार झाला आहात. आणि ह्या दूर्वा आहेत की काँग्रेस गवत उपटून आणलंयस? जरा निवडून आणायला काय होतं? आणि लगेच उंडारायला जाऊ नका. इथे बसा आणि गंध उगाळून द्या.' नाईलाजाने बसलो. मला गंध उगाळायला लागलं की झोप येते. उकिडवं बसून सहाणेवर चंदनाचं खोड गोल गोल फिरवताना, शेजारी आजोबांच्या खर्जातील आवाजात मंत्र ऐकताना एक प्रकारची गुंगी यायची. मागे एकदा असंच गंध उगाळताना डुलकी लागली आणि खोड सहाणेवरून निसटलं आणि मी पुढे पडलो ते थेट फुलांच्या परडीवर. आजोबा असे भडकले. केवळ मंत्र म्हणत होते म्हणून त्यांच्या तोंडून 'भ'काराची बाराखडी निघाली नाही. पण जे शब्दात व्यक्त करता आले नाही ते हावभाव आणि हातवारे यांनी पुरेपूर व्यक्त केले. तोंडात मंत्र आणि हातवाऱ्यांत व्यक्त झालेले तंत्र या सर्वांमुळे आजोबा फारच विनोदी दिसत होते. मी ख्याक करून हसलो. मग मात्र त्यांच्या संतापाला पारावार उरला नाही. त्यांनी मला फेकून मारण्यासाठी हाती काय येते ते पाहिले. संतापात मनुष्य नीट विचार करू शकत नाही असे ते नेहेमी सांगायचे. त्याचे प्रात्यक्षिक आता त्यांनीच करून दाखवले. त्यांच्या हाताला प्रथम फुलाची परडी लागली. मग त्यातील एक फूल घेऊन त्यांनी माझ्या दिशेने फेकले. आता खरं तर मी गप्प बसायला हवं होतं. पण मीही त्यांचाच नातू. अंगात खेळ फार. मी ते फूल उचलले आणि कोकणातले जुने बाले लोक लावतात तसे कानावर ठेवले आणि श्रीविष्णूप्रमाणे एक हात वर करून आशीर्वादाची पोझ घेतली.
हल्ली आजोबा असे का चिडतात गं? असे मी आईला विचारले पण होते. पूर्वी कसे छान होते. हापिसातून आले की माझ्या हातावर बदाम किंवा काजू ठेवायचे. परसात जाऊन हात पाय धुवून येईतोवर आजीने चांदीच्या पेल्यात उष्ण दूध काढून ठेवलेले असायचे. मग झोपाळ्यावर बसून ते संथपणे त्याचे घुटके घेत राहायचे. मला झोपाळ्यावर शेजारी बसवून घेत आणि अधून मधून शाळेतलं वगैरे काहीबाही विचारत राहत. आजोबा, आजी, काका, काकू, आत्या, आई, बाबा, भावंडं असं भरलेलं घर होतं ते. आजोबांचा दरारा होता, त्यांना मान होता. ते आले की सुना एकदम सावरून बसत. मोठ्या आवाजात बोलत असल्यातर एकदम शांतता पसरे. फक्त आजी त्यांच्याशी बोले, काही हवंनको बघे. असं असलं तरी आजोबांचं सगळीकडे लक्ष असे. कुणाला काही हवं असल्यास त्याची मागणी पुरवली जाई. जेवायला पानं वाढली की आजोबा येऊन बसल्याशिवाय पंगत सुरु होत नसे. स्वत:हून काही बोलत नसत. मग सणासुदीला आजीच विचारे,'ठिक्क झालंय का सगळं?' मग आजोबा माझ्याकडे मिष्कीलपणे पहायचे आणि म्हणायचे,'श्रीरामा! उत्तम झालंय रे सगळं!' मग एकदम सर्व बोलायला लागायचे, पदार्थ कसे झाले आहेत त्यावर चर्चा व्हायची. सणासुदीला सर्वांना नवीन कपडे शिवले जात. आजीला, आत्याला, सुनांना नवीन लुगडी व्हायची, क्वचित प्रसंगोपात एखादा दागिनाही व्हायचा. काका आणि बाबा आजोबांच्या शब्दाबाहेर नसत. पगार झाला की तो आजोबांच्या स्वाधीन होई. घरचा संपूर्ण खर्च आजोबा करत. तुमचे पैसे तुम्ही खर्च करायचे नाहीत अशी आजोबांची त्यांना सूचना होती. ते पैसे ते काका आणि बाबांच्या नावाने गुंतवत. एकदा काकाने हळूच काकूसाठी काहीतरी हवे होते म्हणून त्याच्या पगारातील पैसे वापरू का असे विचारले होते. त्यावर आजोबांनी तिला काय हवंय ते आजीला सांगून आणवण्यास सांगितले होते. असे सर्व असले तरी आजोबा हा एक प्रचंड वृक्ष होता. त्याच्या छायेत सर्व निश्चिंतपणे राहात होते. मी तो काळ घट्ट पकडून ठेवायचा प्रयत्न करायचो.
पुढे आजोबा रिटायर झाले. त्यांच्या ऑफिसमध्ये छानसा निरोपाचा कार्यक्रम झाला. बाबांनी मला नेलं होतं त्या कार्यक्रमाला. आजोबांनी छोटेसे भाषणही केले होते. आता वानप्रस्थाश्रमाची सुरुवात झाली, जरी मी नेहमी इथे येणार नसलो तरी मनानं मी तुम्हां सर्वांचा आहे. कधीही कुणीही कसलीही चिंता घेऊन माझ्याकडे या, मी माझ्या परीने तिचं निवारण करायचा प्रयत्न करीन, आता नवीन पिढीनं त्यांचा जोम घेऊन पुढे यावं वगैरे असं काहीसं प्रसंगाला साजेसं बोलले होते. त्यांनी अनेक उद्योगांत स्वत:ला गुंतवलं. ते उत्तम लेखन करीत. दासबोध, ज्ञानेश्वरी या ग्रंथांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. घरातील दिनचर्या तशीच राहिली. सर्व निर्णय ते स्वत:च घेत. यथावकाश बाबा, काका त्यांच्या त्यांच्या नोकरीव्यवसायात चांगलेच गुंतले. त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या. बाबांचा व्यवसाय प्रचंड वाढला होता. भरभराट होत होती. मीही आता कॉलेजात जाऊ लागलो होतो. हाताखाली ठेवलेली माणसं घरी कामं घेऊन येत. बाबांना भेटायला आलेली माणसं वडीलधारी माणूस म्हणून आजोबांशी आदरानं बोलत. पण त्यांचं काम बाबांकडेच असे. आजोबांना त्याचं वैषम्य वाटतं असं मला उगीच वाटे. मी तसं आईला बोलून दाखवलं तर उगाच काहीतरी सांगू नकोस म्हणून तिनं मलाच झापलं होतं. पण फरक पडला होता नक्की. पैशाचे व्यवहार आता बाबा पाहत होते. घरातलं सर्व हवं नको बघत होते. पण कुठलाही महत्वाचा व्यवहार आजोबांना सांगितल्याशिवाय करत नव्हते. त्यांचा योग्य तो मान ते अगदी कटाक्षानं ठेवत होते. पण आजोबा मनातून समाधानी नव्हते असं वाटायचं. बाबांना त्यांच्या धावपळीतून लक्षात आलं नसावं. पुढे बाबांच्या मेहनतीला यश आलं. शंभर एकर जमिनीवर प्रचंड कारखाना उभा राहणार होता. नुसताच नफेखोरीचा कारखाना नव्हता तो. त्यातून एक सामाजिक जाणीवपण दिसत होती. परिसरातील कच्चा माल आता इथेच खपणार होता, शेतकऱ्यांचा त्यात फायदाच होता. नवीन रोजगार उपलब्ध होणार होते. सर्व क्षेत्रांतून बाबांचं कौतुक होत होतं.
बाबांनी घरातील सर्वांना आजोबांच्या खोलीत बोलावून घेतलं. प्रथम आजोबांच्या पायाला स्पर्श केला आणि आपला नवीन कारखाना सुरु होतोय, तुमचा आशीर्वाद हवा असं सांगितलं. त्यावर आजोबांनी जरा तिरसटपणे,'तुम्ही आता मोठे झालात, स्वत:च्या कर्तृत्वावर कारखाना काढता आहात, आमच्या आशीर्वादाची काय गरज? माळावर बोंबलायला पाटलाच्या परवानगीची गरज नसते.' असे उद्गार काढले. सर्वजण एकदम स्तब्ध झाले. बाबा तर सर्दच झाले. ते कसेबसे म्हणाले,'अण्णा, काय बोलताय तुम्ही? हे माझं एकटयाचं कर्तृत्व नाही! या कारखान्याची पायाभरणी अनेक वर्षांपूर्वीच झाली होती, ज्यावेळी तुम्ही या कुटुंबाचा पाया रचलात. जिथे सर्वत्र उजाड जमीन होती, कसलंही पीक घेता येत नव्हतं त्या ठिकाणी तुम्ही एक स्वप्न पाहिलंत. अंगचा घाम गाळून तिथवर जाण्यासाठी रस्ता तयार केलात. आम्ही लहान होतो, पण त्या स्वप्नाची रोपणी आमच्या मनात तुम्हीच केलीत. मुरमाड जमिनीतून काही निघू शकतं याचा विश्वास तुम्हीच दिलात अण्णा! त्या विश्वासाच्या आधारावर मी इथवर येऊन पोचलो. हा रथ तुम्ही इथवर ओढत आणलात, तो पुढे नेणं हे मुलगा म्हणून माझं कर्तव्य नाही काय? मी जर तसं केलं नाही तर तुमचं आजवरचं कार्य वाया जाणार नाही काय? कार्य वाया जाईलच पण मलासुद्धा माझं आयुष्य वाया गेलं असंच वाटेल. प्रत्येक पिढीने आधीच्या पिढीच्या एक पाऊल पुढे जाणे हे आधीच्या पिढीचे सार्थक, त्या पिढीचे कर्तव्य आणि नंतरच्या पिढीचा पाया नाही काय? दीपस्तंभाकडे एक नजर लावूनच एखादा आपले जहाज समोरील अंधारात टाकू शकतो. चुकल्यास परत येताना तो दीपस्तंभ मार्ग दाखवील असा विश्वास असणे किती गरजेचे आहे. अण्णा, तुमचं केवळ असणं हे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आहे! तेव्हा अण्णा, कृपया असं जिव्हारी लागेल असं बोलू नका. या कार्याला पुढे तर जावंच लागेल, अनेकांची आयुष्यं त्यावर अवलंबून आहेत. पण त्या कार्याला त्याचे जनक म्हणून जर आशीर्वाद दिलात तर आम्हाला हजार हत्तींचं बळ येईल.' एवढं बोलून बाबा थांबले. त्यांचे डोळे भरून बनून आले होते. सर्वांचेच डोळे भरून आले. आजोबांचा चेहरा बदलला होता. तो मृदू झाला होता, डोळे भरून आले होते. ते म्हणाले,'बाळा, खरंच मोठा झालास रे तू. पुरुषाला त्याचं काम हे पुरुषार्थाचं असतं. पण ते काम त्याचा अहंकार होऊन जातं. त्यावर आपला मालकीहक्क वाटू लागतो. त्याला दुसऱ्या कुणी हात लावला की आपली मालकी आता संपली, आपण अडगळीत पडलेली एखादी वस्तू झालो असं वाटायला लागतं. मग ज्या उद्देशानं ते काम आपण सुरु केलं होतं तो उद्देश बाजूला पडून केवळ अहंकार जपणं चालू होतं. पण बरोबर बोललास. डोळ्यांत कुणीतरी अंजन घालायलाच हवं होतं. पूर्वजांनी उगीच नाही आश्रमव्यवस्था ठरवून ठेवली. योग्य वेळी तरुण पिढीकडे वसा देऊन आपण आशीर्वाद देणे हाच तर वानप्रस्थाश्रम. मी नुसतंच भाषणात बोलायचो. पण आता अर्थ कळतोय. यशस्वी भव!' आजोबांनी बाबांना जवळ घेतलं आणि मस्तकावर हात ठेवला. मी ते दृश्य मनात साठवून ठेवलंय.

No comments:
Post a Comment