स्थळ - भूतपूर्व काँग्रेस कचेरी
वेळ - अर्थातच शोकाची
(पडदा उघडतो तेव्हा काही शुभ्र वसनांकित टोपीधारी, एक शुभ्र वस्त्रे धारण केलेला खुरटी दाढीधारी युवक, आणि दु:खाची पोझ घेऊन बसलेल्या मायलेकी, अर्थातच शुभ्र साडीधारी, असे खाली सतरंजीवर बसले आहेत. मायच्या चेहऱ्यावर दु:ख तर लेकीच्या चेहऱ्यावर भीती आहे. दाढीधारी युवकाच्या चेहऱ्यावर बालकाचे निर्व्याज खेळकर हास्य विलसते आहे. मधोमध सारवलेल्या जमिनीवर रांगोळीने हाताचे चित्र काढले आहे त्यावर एक कणकेचा दिवा तेवतो आहे. भिंतीवर बाबा, पणजोबा, आजी यांचे हार घातलेले फोटो लावले आहेत. एक भारताचा नकाशाही लावला आहे. दाढीधारी युवक हातातील सेलफोनवर क्यांडीक्रश खेळतो आहे. आणखी एक वृद्ध दिग्विजयी युवक आयफोनवर कुणा बालिकेशी चोरून फेसटाईमवर दबक्या आवाजात बोलतो आहे. एक पगडीधारी सरदार निर्विकार चेहऱ्याने शून्यात पाहत आहे.)
दाढीधारी युवक (मूठ वळून हवेत फेकतो)-येस्स्स! ममा, ममा! बघ ना आय गेव्ह अ लाईफ! क्यान आय शेअर माय अचिव्हमेंट ऑन फेसबुक?
शुभ्र साडी (खिन्न मुद्रेने) - बाळा, तूच काय, आम्ही सर्वांनीच गमावलीत आमची आयुष्यं तुला पुढे आणण्याच्या हट्टापायी. आणि त्याचे झेंडे आम्हाला न विचारताच लागले फेसबुकवर. कर बाबा काय हवं ते शेअर.
लेक (चेहऱ्यावर भीतीयुक्त काळजी) - ममा, रॉबर्ट सारखा टेक्स्ट करतोय, किती दिवस लपून राहावं लागेल ते विचारतोय. काय सांगू ममा त्याला?
शुभ्र साडी - अगं, इथं माझंच तिकिट कधी निघेल याचा भरंवसा नाही, मी त्याचं कसं सांगू? सांग, म्हणावं पाचदहा वर्षं तोंड काळं कर.
लेक(हबकून) - काय? पाचदहा वर्षं? आधीच महिना महिना घरी येत नाही तो. कुठं मसणात जात असतो कुणास ठाऊक. आता मीच पाच दहा वर्षं जा म्हटलं तर त्याला काय गं, बरंच आहे. उड्या मारीत जाईल तो. स्वत:चं 'विल' पण करतो करतो म्हणत केलं नाहीये. उलट माझं मात्र त्याच्या नावावर करून घेतलंयन.
दाढीधारी युवक - दीदी, केजरीअंकलनी कसं खेरअंकलना ट्विटरवर ब्लॉक केलं तसं तू त्याला ब्लॉक कर ना. मग कसा टेक्स्ट करेल?
दिग्विजयी युवक - हां हां, जानू, बस एक दो घंटे में आ जाऊंगा. बस, अब इसमें रोनेवाली कौनसी बात हो गई? मैं बोल रहा हुं ना. बस चल अब बंद करता हुं, म्याडमजी देख रही है. (लाचार हसून) ही: ही: ही:! कुछ नही म्याडम, घरवाले ऐसेही परेशान कर रहे थे. फोन सायलेंट पर रखा है अब.
मिश्रा (तुपाळ चेहऱ्याने) - म्याडमजी, आप शोक ना करें. ये हाथ फिरसे उठेगा. (गडबडून) मेरा मतलब, गिरनेवाला फिरसे नयी ताकतसे उठ जाता है. अपने देश में लोग हाथ का उपयोग दो चीजोके लिये करते है. खाने के लिये या तो धोने के लिये. कमसे कम अपना हाथ दाया हाथ है, लोगोंने धोने के लिये तो इस्तेमाल नही किया ये बहुत पॉझिटिव्ह बात हुई ना?
शुभ्र साडी (किंचित हसून) - मिश्राजी, आप भूल गये. लोग हाथ का उपयोग एक और चीज के लिये भी करते हैं, थप्पड लगाने के लिये. केजरीवाल तो सस्ते में छूट गये, एक दो बारही पडी उन्हे. हम सब को ऐसी पडी है की हम गाल महसूस भी नही कर रहे हैं.
(इतक्यात एक साधारण नव्वदीचे गृहस्थ शक्य तेवढ्या लगबगीने प्रवेश करतात. हातात पुष्पगुच्छ आणि गुढघ्याला बाशिंग आहे. सर्व जण आ वासून बाशिंग पाहतात. शरमून ते गृहस्थ गडबडीने ते काढून टाकतात. पुष्पगुच्छ म्याडमना देऊ लागतात. सर्व जण पुन्हा अविश्वासाने आणि म्याडम लालबुंद होऊन त्यांच्याकडे पाहतात. पुन्हा भानावर येऊन ते गृहस्थ शरमतात आणि गुच्छ कोपऱ्यात ठेवून देतात.)
तिवारी - म्याडमजी, जैसेही पता चला हम दौडते चले आये. हमरी सादी बहुतही अचानक तय हो गई. आपको न्यौताभी नही भेज सके. बच्चोने बहुत जिद ली थी. अब बच्चे चालीस साल के हो गये फिर भी बच्चे ही है ना. हम ठहरे उनके बापू. उनकी जिद तो हमेही पूरी करनी है. लेकिन म्याडम आपके होते हुए और 'आप' के होते हुए ये सब कैसन हुआ? जैसनही पता चला, हम हनीमून जा रहे थे, वहीसे गाडी घुमाईके सीधा इहा पहुंच गये. हनीमून तो होता रही. अगर हम चले जाते और बाद में पता चलता तो पूरा हनीमूनमें, म्याडम, हम आपही को तनमनमें रख देते.
शुभ्र साडी (दुर्लक्ष करीत) - ठीक है तिवारीजी. आप सांस ले लिजिये. तंदुरुस्ती रखें. ऐसे और भी कई हनीमून आपको निभाने हैं.
पगडीधारी सरदार (एकदम खोल आवाजात) - लोकांना असं कां करावसं वाटलं याची जरा चर्चा करूया का?
दाढीधारी युवक (आश्चर्याने किंचाळत) - ममा!! अंकल बोलले! तू काय सांगितलं होतंस मग मला की ते लहानपणापासून मुके आहेत म्हणून? खोटं खोटं सगळं ना? आता मी तुझं कध्धीच ऐकणार नाही. तू नेहमी अस्संच करतेस. दीदीला काय करायचं सांगतेस, ते अंकल मुके म्हणून त्यांच्याऐवजी तूच भाषण करतेस, मला रात्री आठनंतर टीव्ही बघू देत नाहीस, जीजूंनी मात्र काही केलेलं चालतं. मागे एकदा त्यांना मारायला काही लोक आले होते तर मी खरंखरं सांगितलं, जीजू आत पलंगाखाली लपले आहेत म्हणून, तर तू मलाच रागावलीस. नेहमी खरं बोला असं मला शाळेत शिकवतात आणि घरी तू उलटं शिकवतेस. मी आता फक्त क्यांडी क्रश खेळणार जा!
शुभ्र साडी - तू चूप बस! आधीच डोकं उठलंय.
(एकदम गलका सुरु होतो)
सरदार - पण आपण चर्चा…
लेक - ममा सांग ना, रॉबर्टचं…
तिवारी -खामखां हनीमून…
दिग्विजयी युवक - हां हां, निकलही रहा हुं… म्याडम, जरा एक जरुरी कामसे…
मिश्रा - म्याडम, आरएसएस पे डाल दे इसकी जिम्मेदारी?
शुभ्र साडी - पगला गये क्या? ये आरएसएस की जीत है. काहे की जिम्मेदारी डाल रहे… राहुल! मेल्या उठ आधी आणि प्रथम अभ्यासाला लाग! आता निदान कॉलेज तरी पुरं करा!
(सरदार खिन्नपणे भारताच्या नकाशाकडे पाहत असताना पडदा पडतो)

No comments:
Post a Comment