आमच्या फाइव्ह-डाऊन प्लेयर खाजिया फिल्मी यांनी आम्ही कटाप जा असे म्हणत आपली ब्याट घेऊन घरी प्रयाण केल्याचे वृत्त कानी आले आणि वाटले बोहारणीला चांगली दोन लुगडी देऊन घेतलेला डबा सहाच महिन्यांत पिचकावा? कॅप्टन चिकीखाऊ निघाला, सगळी टीम आपल्या विरोधात होती असे फिल्मी म्हणत होत्या. वास्तविक टीम जॉईन करतानाच आपल्याला बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग काही येत नाही हे आपण सांगितले होते, यांना केवळ माझ्याकडे असलेली बॅट पाहिजे होती असे त्या म्हणाल्या. कट करून मलाच बॅटिंग, फिल्डिंग करायला लावायचे हे लोक. खास करून दुसऱ्या टीमचा बॉलर खतरनाक असेल तर हे सर्व मला ओपनिंग बॅटिंगला पाठवत होते. त्या धरण होऊ नये म्हणून धरणं धरणाऱ्या त्या फाटकर, त्यांना का नाही पाठवत ओपनिंगला? त्यांना मात्र चीअरगर्ल केलं आहे. पण त्यांनाच व्हायचं होतं म्हणे. काय पण चीअरगर्ल. तोंड बघा चिअरिंग करणाऱ्याचं. साडीला साधी मॅचिंग पर्सपण नसायची. नाचणं सोडा, उभं राहण्यापेक्षा जमिनीवर बसकण मारण्याची आयुष्यभर सवय, यांना काय नाचता येणार आहे? बरं नाचल्या अगदी ओढून ताणून, तर चीअरपेक्षा फीअरच जास्त निर्माण होणार. त्यात आमच्या टीमकडे पॅडस नाहीत, ग्लोव्हज नाहीत. नको तिथे बॉल लागून कायम सगळे जखमी. मेलं टीमचं नाव तरी काय तर दिल्ली बेअरडेव्हिल्स अर्थात उघडेबंब इलेव्हन. यांची मॅच जिंकायची स्ट्रॅटेजीच वेगळी. स्टंपवरच का बॉल टाकता म्हणून हटून बसायचे, बॉल टाकलाच तर एकदम बाजूला होऊन सोडून द्यायचा. बोल्ड झालं तर मी तो बॉल खेळलोच नव्हतो असं म्हणून बॉंल डेड करा म्हणून आग्रह धरायचा. तोच सोडलेला बॉल चुकून बॅटच्या कडेला लागून फोर गेली तर मला तसाच मारायचा होता म्हणायचं आणि विजयनृत्य करायचं. आऊट दिलं की अंपायर चिकीखाऊ म्हणत बॅटसकट पीचवर बसून राहायचं. कैच्याकैच. पूर्वी घरी बसून चांगली टीव्हीवर मॅच बघत होते तर काय अवदसा आठवली आणि ही टीम जॉइन केली कुणास ठाऊक.
नुकत्याच झालेल्या टुर्नामेंटमध्ये उघडेबंब इलेव्हन साफ उघडी झाली. लज्जेपुरता लंगोटसुद्धा टिकला नाही. आम्ही स्वर्गीय नाथनंगेमहाराज यांच्या पंथातले, आम्हांस कपड्याचे भय कसले दाखवता असे कॅप्टन स्वामी बं भोले केजरूनाथ (पतियाळावाले) यांचे स्वच्छ मत पडले. स्वत: बं भोले शून्यावर आऊट झाले. तळातील एकदोन प्लेयर्सनी दोनचार धावा काढल्या. ते प्लेयर्स कोण हेसुद्धा बंभोलेना आठवत नव्हते. प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार गेले तेव्हा स्वामी शीर्षासन करत होते. त्याच अवस्थेत त्यांनी उत्तरे दिली. पत्रकार गुडघ्याकडे पाहून प्रश्न विचारीत व उत्तर ऐकण्यासाठी खाली पायाशी नजर लावत. बं भोले म्हणाले, आम्ही शून्यावर आऊट झालो हे सत्य आहे, परंतु पहिल्याच चेंडूवर नाही हे आमचे यशच आहे. आम्ही पूर्ण एक षटक खेळून काढले. उलट एकदाही चेंडूचा स्पर्श आमच्या ब्याटीस होऊ दिला नाही, हे गोलंदाजाचेच अपयश नाही काय? तुम्ही आमचे यश पाहण्यापेक्षा गोलंदाजाचे अपयश का पाहत नाही? शिवाय अंपायर, प्रेक्षक हे सगळे आमच्या विरोधात होते. आम्हाला तर आता आमच्या स्वत:च्या प्लेयर्सचापण संशय येतो आहे. स्वत: आम्ही जगातील कोणत्याही गोलंदाजास घाबरत नाही. आमचे जाहीर आव्हान आहे, कोणीही आम्हास गोलंदाजी करून आमच्या ब्याटीस चेंडू लावून दाखवावा. अशा नियमावर मॅच खेळली जावी अशी मी मागणी करतो. त्यावर पत्रकारांनी अहो तुम्हांलासुद्धा गोलंदाजी करावी लागणार तेव्हा कसे होईल असा प्रश्न केला असता बं भोले यांनी शीर्षासन थांबवून पवनमुक्तासन करण्यास सुरुवात केली. वार्ताहरांनी ताबडतोब परिसर रिकामा केला. आता तुम्हीच सांगा काय भविष्य आहे आमच्या संघाचे? श्रीमती फिल्मी खूपच निराश दिसत होत्या.
संघाच्या (पक्षी : टीमच्या) या अपयशाचे कारण काय असे विचारले असता श्रीमती फिल्मी व्यथित झालेल्या दिसल्या. आमचे कॅप्टन हे नक्को त्या प्लेयर्समध्ये घेरले गेले आहेत. टीमची स्ट्रॅटेजी हे प्लेयर्स ठरवतात. आत्ताची हरलेली ही स्पर्धा ओव्हरआर्म आहे हे माहीत असूनही आम्ही अंडरआर्मची प्रॅक्टिस करत होतो. बॉडीलाईन खेळायची सवय नसलेले आमचे बं भोले, त्यांना पुढं करून नाकावर बॉल आदळून घ्यायला लावले. बं भोलेना सुद्धा स्वत:च्या जखमांचं कौतुक करून घ्यायचं असतं, मग तेही चेवाचेवाने थोबाडून घेतात. आम्ही बायका सुद्धा असली नाटकं करत नाही हो! तुम्ही आमच्या ड्रेसिंग रूम मध्ये येऊन पहा एकदा, क्रिकेट टीमची ड्रेसिंग रूम की बिग बॉसची असं वाटेल तुम्हाला. बाई बाई बाई! कंटाळा आला अगदी! आमच्या टीव्हीक्षेत्रातही नाहीत हो असली पात्रे! हे पुरुषच इतकी नाटकं करत असतात इथं तर आम्हां बायकांना कसला वाव मिळणार? ठरवलं मग, इथं राहायचंच नाही. मग आता काय करणार आहात असे विचारले असता त्या म्हणाल्या, ही टीम सोडली म्हणजे दुसऱ्या टीमकडे जाणार असे नाही. पण कुणी ऑफर दिलीच तर नाकारणार नाही हं. जिंकलेल्या टीमच्या कॅप्टनबद्दल आपले काय मत आहे असे विचारले असता त्या झकास लाजल्या. इश्श! माझं काय मत असणार? त्यांनी बोलावलं तर कित्ती कित्ती छान. शिवाय सिंगलसुद्धा आहेत ते. त्यांचे इल्मी डोळे लाजिया लाजिया झाले. पण भानावर येऊन त्या म्हणाल्या, तोवर "उघडेबंब इलेव्हन - 'आप'ला आक्रस्ताळेपणा 'आम'च्यात " - अशा विषयावर एखादी डॉक्युमेंटरी करावी असं मनात आहे. मग हसत म्हणाल्या,"तुम्ही माझा हा इंटरव्ह्यू घेताहात असं तुम्हाला वाटतंय ना तो माझ्या डॉक्युमेंटरीचाच भाग आहे. तो पहा त्या पडद्यामागे आमचा कॅमेरामन! हो त्या स्टिंगनंतर मी खूप शिकले. आपलं स्टिंग व्हायच्या आधी दुसऱ्याचंच केलं की आपलं होत नाही."

No comments:
Post a Comment