परमेश्वराचे अस्तित्व हा विषय इतका आदिम आहे की तो फारसा कुणी मनावर घेत नाही. परंतु मोठी मोठी माणसे देव, परमेश्वर यांच्याबद्दल बोलू लागतात तेव्हा त्याकडे लक्ष देणे आवश्यक ठरते. ते बरेच आहे म्हणा. त्यानिमित्ताने थोडासा विचार करता येतो. मध्यंतरी उत्क्रांतीवादी बिल नाय आणि निर्मिती/निर्माणकर्तावादी केन हँम यांचा वादविवाद प्रसारित झाला होता. एक प्रखर शास्त्रज्ञ आणि दुसरा पराकोटीचा बायबलवादी. एक निरीक्षणाने सिद्ध झाल्याशिवाय काहीही न स्वीकारणारा तर दुसरा डोळे झाकून प्राचीन लिखाणावर विश्वास ठेवणारा. उत्क्रांती झाली हे निर्विवाद सत्य आहे. पुरावे, निरीक्षणे यांनी ते सिद्ध होते. ज्या नियमाच्या अनुसार एखाद्या निरीक्षणात न आलेल्या गोष्टीचे भाकीत करता येते आणि त्यानंतर प्रत्यक्ष निरीक्षणाने ते सिद्ध करता येते असे नियम म्हणजे विज्ञान. डार्विनने फूटभर निमुळत्या दांड्याचे एक फूल पाहिले. त्या दांड्याच्या तळाशी मध होता. त्याने असे भाकीत केले की ज्याला हा मध सहज काढता येऊ शकेल असा अत्यंत लांब तोंडाचा एखादा प्राणी या परिसरामध्ये अस्तित्वात असलाच पाहिजे. आणि पुढे काही वर्षांनी खरोखरच एक फुटभर लांब शोषनळी असलेला पतंग त्या परिसरात आढळला.
जीव किंवा जीवसंस्था यांची जी काही उत्क्रांती झाली त्याचे एक सरळ साधे सूत्र होते. हे जे काही आहे ते टिकाऊ आहे का? भवतालच्या परिस्थितीत, पर्यावरणात, इतर जीवांच्या सान्निध्यात टिकू शकते का? टिकणे याचीसुद्धा एक सरळ व्याख्या करता येईल - अस्तित्व आणि गुणाकार. या दोन मूलभूत गोष्टींसाठी गुणसूत्रांत छोटे छोटे बदल करून एकाच जातीचे पण थोडेसे वेगळे दिसणारे, अथवा किंचित वेगळा गुणधर्म असलेल्या प्रजाती निर्माण झाल्या. म्हणजे ही प्रक्रियासुद्धा निरुद्धेशी (मुद्धाम एखादा उद्देश नसलेली). मग त्यातील एखादी प्रजाती टिकाव धरते, बाकीच्या आपोपाप नाश पावतात. थोडक्यात गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली असेच या प्रक्रियेचे वर्णन करता येईल. चला, विज्ञानाने नियम तर शोधून काढला. अश्म सापडले आहेत, त्यांचे कार्बन डेटिंग करून काल निश्चिती झाली आहे. ठीक आहे. सर्व पुरावे उपलब्ध आहेत. उत्क्रांती झाली, त्यातून सर्व प्राणिमात्र जन्माला आले. इथपर्यंत विज्ञानाबरोबर राहता येते. पण या निरुद्धेशातही एक अर्थ असणारा उद्देश दिसतो. मुळात गुणसूत्रात बदल व्हायला काय कारणीभूत ठरले? प्राणिमात्राची जगण्याची आस, वंश सुरु राहावा यासाठीची धडपड, याची प्रेरणा कुठून आली? विज्ञानाने जीवाची व्याख्या जरूर केली, पण प्राण म्हणजे काय? मुळात पृथ्वीवर आदिमकाळात प्रथम जे सेंद्रिय द्रावण (ऑर्गानिक सूप) होते त्यात अशी कोणती ठिणगी पडली ज्याने त्यात पहिला प्राण "ओतला"? पृथ्वी ही पूर्ण लोखंडाचा गोळा होती. त्यावर हे पुढील प्राणिमात्रांचे मूळ ठरलेले ऑर्गानिक सूप आले कुठून? विज्ञान कारण शोधते, तत्वज्ञान मूळ शोधते. दुर्दैवाने तत्वज्ञान आता धर्माशी निगडित झाले आहे. धर्माचे खरे उद्दिष्ट जर सत्यशोधन असेल तर विज्ञान आणि धर्म हे दोन्ही परस्परपूरक व्हायला हवेत. तत्वज्ञान म्हणजे थिअरीचे पुस्तक, तर विज्ञान म्हणजे ते पडताळून पाहण्याची प्रयोगशाळा.
आता एक नवीन विचारधारा येत आहे, की एखाद्या अशनीपाताने हे सेंद्रिय द्रव्य पृथ्वीवर आले असावे. या विश्वाच्या पसाऱ्यात पृथ्वीसारख्या धुळीच्या कणाला नेम करून अशा सगळ्या घटना घडणे जरा कठीण आहे. मग अशा घटना विश्वात सामान्यपणे सर्वत्र होत असल्या पाहिजेत. म्हणजे धूमकेतू, अशनी ही अशा जीवपोषक द्रव्यांची वाहतूक करणारी साधने, त्यांची ऑर्बिट्स ग्रहांप्रमाणे सर्वसामान्य नसतात पण अतिस्वैरपण नसतात. थोडक्यात ते ग्रहमंडळातून का होईना स्वैरपणे संचार करायला मुक्त असतात. पृथ्वीसारखे ऊर्जास्त्रोतापासून सुरक्षित योग्य अंतरावर असलेले लाखो ग्रह नुसत्या आपल्या आकाशगंगेत आहेत. मग ही सगळी व्यवस्था अशी अनिश्चित तत्वावर चालली असेल? केवळ पृथ्वीवर अशी कृपा होत असेल असे धरून चालणार नाही. शक्याशक्यतेचा विचार केला तर अशी सर्व रचना सर्वत्र कार्य करीत असण्याचीच शक्यता जास्त आहे. जर असे असेल तर मग पुन्हा मोठा प्रश्न उभा राहतोच. का? या "का"चे उत्तर विज्ञान देत नाही. विस्कळीतपणात एकसूत्रता कोण आणतो आहे? मुळात आपण ज्याला "शास्त्रीय नियम" म्हणतो त्यांचे नुसते "असणे", त्यांचे अस्तित्वच काहीतरी सुसूत्रता आहे याचा पुरावा नाही काय? केपलरने सूर्याभोवती एक भ्रमण पूर्ण होण्याचा काल आणि ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर यांच्यातील गणित शोधून काढले. हे गणित सर्व ज्ञात विश्वालातरी लागू होते. पण मुळात हे सूत्र कोणी "रचले"?
इथे सर्व ठिकाणी मी "कोणी" किंवा मनुष्यरूप दर्शवणारा शब्दप्रयोग करतो आहे कारण मला दुसरे काही माहीत नाही. आपल्या कुणालाच माहीत नाही. आपले सर्व ज्ञान हे पृथ्वी आणि फारतर दृश्य अशा अवकाशापुरते मर्यादित आहे. अनेक गोष्टी केवळ आपल्या आकलनापलीकडे असतील नव्हे, असणारच. कार्ल सागानने आपली आकलनशक्ती कशी मर्यादित असू शकते त्याचे एक उत्तम उदाहरण दिले आहे. तो म्हणतो समजा विश्वात कुठेतरी एखादी द्विमितीमध्ये मर्यादित असलेले जीवमात्र आहेत. त्यांच्या जगात फक्त एक्स आणि वाय अशा दोनच मित्या आहेत. त्यांचे फिरणे, जगणे, वस्तू सर्व दोन मित्यांत सामावलेले आहे. त्यांचे जग त्रिमितीत सामावलेले जरी असले तरी त्यांना त्रिमितीची जाणीव नाही आणि ती होऊ शकेल अशी त्यांची रचनाही नाही. तर अशा जगामध्ये समजा एखादे यान "तिसऱ्या" मितीतून उतरले, तर त्यांना त्याचे पूर्ण आकलन होणे शक्यच नाही. किंम्बहुना ते यान उतरतानासुद्धा त्यांना दिसणार नाही. अचानक एक रेघ त्यांच्या जगात "अवतीर्ण" होईल. आपण कितीही प्रयत्न केला तरी त्यांना पूर्ण आकलन होऊच शकत नाही. हीच संकल्पना पुढे नेल्यास आपण त्रिमितिवालेसुद्धा किती मर्यादित असू शकतो याची कल्पना येते. परंतु आपल्याला सर्व कळू शकत नाही याची जाणीव होणे हेसुद्धा मोठे ज्ञानच म्हणावे लागेल.
असे जरी असले तरी मनुष्यप्राण्याला "गूढ, अनाकलनीय" या शब्दांची भीती आहे. अनाकलनीय म्हणजे भौतिक स्वरूपाने अथवा कार्यकारण स्वरूपाने ज्याचे आकलन होत नाही असे काही तरी. याचा दुसरा अर्थ "धोका, पर्यायाने मृत्यू", किंवा "अन्न, पर्यायाने जीवन" हे ठरवता येत नाही असे काही तरी. असे काही अनाकलनीय असणे आपल्याला अस्वस्थ करते. आपण आपल्या मर्यादित बुद्धीनुसार त्याचा अर्थ लावत राहतो. मग तो जेव्हा लागत नाही तेव्हा ते अनाकलनीय हे "अमानवी" होऊन जाते. हे जगड्व्याळ यंत्र नियमानुसार चालवणारे, मानवी ताकदीच्या पलीकडील घटना घडवण्याची क्षमता असलेले असे ते "गूढ अनाकलनीय" मग ईश्वर बनून जाते.

really admirable, advocating your thoughts that too in fairly simple marathi is brilliant.
ReplyDeletenone the less i don't have to agree with you when you talk about soul and faith.
I am so sorry but i still don't believe life as we know it today is just a co-incidence and a spectacular example of chemistry and physics.
but then again what we humans think of universe doesn't affect universe in any way what so ever.
I think I didn't come across clearly. I said, when science stops at coincidence and chemistry, it does not explore, what is it that must be there that is driving the whole universe according to known laws, not just life. That might be something "Unknown", some people may call it God
Deleteअतिशय समर्पक उदाहरण देऊन आणि अभ्यासपूर्ण मुद्दे लिहिलेत
ReplyDeleteहे अनाकलनीय गूढ जर देव असेल किंवा अजून काही असेल ;पण ते तुमचे पाय जमिनीवर ठेवायला मदत करते अस वाटतं