२० जानेवारी २०१४ - आम्हाला ज्याचा संशय (खरं तर खात्री) होता तेच घडले. छत्तीस रोगांवर बहात्तर गुणकारी असे आमचे लोकपाल बिल हे लोक मांडायलासुद्धा देत नाहीत! हाच तो एकनाथ महाराजांचा देश? जिथे एका पैशाच्या तुटीसाठी त्या महात्म्याने रात्र जागून काढली? आमचे कुटुंब आजसुद्धा ऑफिसमधून घरी गेलो की दिवसखर्चासाठी दिलेल्या पैशाचा हिशोब मागते. मागे एकदा ऑफिसमधून परत येताना उसाचा रस प्यालो होतो. आता रसवंतीगृहात कसली आली आहे पावती? पण त्या ५ रुपयांच्या तुटीवरून आम्हाला अनैच्छिक उपोषण घडले होते. पुढच्या वेळेस चरकातून काढलेला उसाचा चोथा पुरावा म्हणून घेऊन यायचा ठरवले आहे. झाडूचे हीर एक आठवड्यातच परत पार मोडले. तीन आठवड्यात हा तिसरा झाडू. उद्या नवीन आणला पाहिजे. टोप्या आणि झाडू यांच्यावरच जास्त खर्च होतो आहे. त्यात हे परदेशातील कार्यकर्ते देणग्या देतात आणि टोप्या फुकट मागतात. इथे आम्हाला एकच टोपी वापरावी लागते. निदर्शनात रस्त्यावर झोपणे भाग असते. त्यात ती मळते. मग घरी येऊन स्वत: धुऊन ठेवावी लागते. बऱ्याच वेळा सकाळी ती वाळलेली नसते. मग आमची ही पाणी तापवायच्या बंबावर ठेवून वाळवते. तरी दमट असते. आधीच सर्दी झालेली, त्यात ही ओली टोपी. लोकांना आमचे हे आम कष्ट दिसत नाहीत.
२२ जानेवारी २०१४ - अरे वा! लोकपालचा गळा हे खांग्रेसी आणि कमलदलदल आवळताहेत खरं पण लोकांची सहानुभूती आम्हाला मिळते आहे. आता वाटते या लोकांनी ते पाडावेच. कटकट नको. दररोज झाडू काखेत घेऊन फिरावं लागतं ते तरी बंद होईल. पण भूषण म्हणतो, पडूदे, आपण राजीनामा देऊ. परत निवडणुका होतील. लोक आपल्याला डोक्यावर घेतील, मग काय बहुमतच बहुमत. हा भूषण आहेच वकिली डोक्याचा. हे माझ्या लक्षात आले नव्हते. पण एक गोष्ट आता लक्षात आली की पूर्वीसारखे कोऱ्या लेटरहेडवर सही करून द्यायचे नाही याला. पूर्वीतरी कशाला घेत होता कुणास ठाऊक. माळावर बोंबलायला पाटलाची परवानगी कशाला हवी?
२२ जानेवारी २०१४ - आज आमच्या सरकारस्थापनेला एक अखंड महिना झाला. कार्यालयात गेलो तर सर्वत्र सामसूम दिसली. बाहेर कॉम्प्युटरशेजारी काला जामुनच्या रिकाम्या प्लेटापण दिसल्या नाहीत, म्हणजे सोमनाथ काल झोपायला ऑफिसमध्ये आला नव्हता. हा रात्री जागून कुणाला एवढ्या ईमेल्स पाठवत असतो देवाला माहीत. एकदा हळूच पाहिले तर इनबॉक्स मध्ये पाच ईमेल्स, सेंटमध्ये पाचहजार! गूढ आहे हा मनुष्य. मनात पाल चुकचुकली. माझा कात्रज करून ही मंडळी समोर खान्ग्रेस भवनातल्या कॅन्टीनमध्ये मिसळ चापायला तर नसतील ना गेली? तंद्रीत ऑफिसमध्ये शिरलो, टोपी काढून, माझ्या खुर्चीमागे भिंतीवर लटकावलेल्या झाडू आणि प.पू.ह.भ.प. (सोमनाथ हभप म्हणजे हळूच भलतीकडे पाहणारे असं म्हणतो. त्याला कुणाबद्दल आदर म्हणून नाही) अण्णामहाराज गाळणसिद्धीकर यांच्या फोटोला नमस्कार करून मागे वळलो तर.. हे सगळे लोक पडद्यामागून बाहेर आले आणि खच्चून "सरप्राईज!" असं ओरडले. मी मटकन खुर्चीत बसलो. आमचे चिरंजीव अचानक मागून येऊन "नमो नमो" असं ओरडतात तेव्हाही एका सेकंदात माझ्या हृदयाचे ठोके ७० वरून २४०वर जातात. इथे तर अखंड सोमनाथ त्याच्या तसल्या त्या गटाण्या डोळ्यांनी माझ्या नाकापासून ६ इंचावर. प्रचारफेऱ्यांपासून ते शपथविधी आणि शपथविधी ते आज सकाळी उप्पीट खाल्ले होते तिथपर्यंतचा सगळा कालावधी क्षणात डोळ्यासमोरून येऊन गेला. वाटले, संपलं आता, लोकपालाच्या विसर्जनाआधी आपलंच आधी बहुधा. सुदैवाने स्मेलिंग सॉल्टची बाटली खिशात होती. हुंगल्यावर जरा बरे वाटले. यादवने त्याच्या घरच्या म्हशींच्या दुधाचं लोणी घालून केलेला केक आणला होता. टोपीच्या आकाराचा. त्यात प्लास्टिकचा झाडू तिरका खोवलेला. टोपी कापताना कसेसेच झाले.
८ फेब्रुवारी २०१४ - राजीनामा! राजीनामा! राजीनामा! हलके वाटते आहे. घरी जाऊन निवांत टॉम आणि जेरी पहात बसलो.
८ एप्रिल २०१४ - प्रत्यक्षात आयुष्य प्रचंड बिझी झालंय. राजीनाम्याच्या पुण्यसंचयावर लोकसभेची मोक्षप्राप्ती होईल का याचा अदमास घेण्यात बराच वेळ गेल्यावर शेवटी लढायचे ठरले. कमळाची एक पाकळी जरी तोडण्यात यशस्वी झालो तरी ते यशच. पण आजच्या घटनेने मन जरा साशंक झालंय. एवढा वाक्ताडनयोग असलेला मी, पण आज नशिबात ताडनयोग होता. आम्ही नेहेमीप्रमाणे चातुर्याचे वक्तव्य करीत असताना एका माथेफिरुने आमच्या मुद्द्यांचे गुद्द्यांनी व्यवस्थित खंडन केले. वर मुखशुद्धी म्हणून एक तडाखा कानशिलावर लगावला. इतके दिवस मी आमच्या दिवट्याला म्हणत असे, ऐकले नाहीस तर देईन एक ठेऊन, मला कल्पना नव्हती ठेऊन दिलेली एवढी लागते. पण एक झाले मात्र, जेवढ्या आमच्याकडून विस्मरणात गेलेल्या गोष्टी त्या सर्व एकदम खणखणीत आठवल्या. राजीनामा दिला ती चूकच झाली असे जरासे वाटू लागले आहे. आज रात्री झोपताना व्हिक्स बरोबर आयोडेक्स लावणे प्राप्त आहे.
९ एप्रिल २०१४ - आज नशिबात घबाडयोग होता. थोडा त्रास सहन करावा लागला. अजून कानातून गूं गूं असा बारीक आवाज येतो आहे. खाताना डाव्या जबड्यातून थोडी कळ येते आहे. पण शुद्ध खतापोटी फळे रसाळ गोमटी. आणि फळ गोमटी पाहिजे असतील तर खताचा वास सहन करावाच लागतो. इथे खतही "आम"चे, फळही "आम"चेच. असा विचार करून जरा बरे वाटते तोवर पण येथे कानशील मात्र खरोखरच आमचे होते हा विचार खिन्न करून गेला. भूषणला फोन करून समुपदेशन घ्यावे असा एक विचार मनात आला. त्याला याचा अनुभव आहे. पण तो वकील आहे, कानफटीत खाणे त्याला नवीन नसावे. तर त्याने अफलातून सल्ला दिला. म्हणाला ज्याने हाणली त्यालाच भेट द्या. टीव्हीवाल्यांना पाठवायची सोय मी करतो. त्याचे डावपेच मला खरंच काहीकाही वेळा कळत नाहीत. भेटीनंतर सहानुभूतीचा धबधबाच आमच्या अंगावर पडू लागला. तब्बल ८७ लाख रुपये पार्टीला मिळाले! ८७ वर पाच पूज्यं! निदान अर्ध्या खासदाराची सोय झाली! अर्ध्या खासदाराला एक थप्पड, सौदा तसा सस्त्यातच पडला. पण सारखा सारखा मी नाही खाणार बुवा. निदान उरलेल्या अर्ध्या खासदाराची सोय आता सोमनाथने करायला हवी. पार्टी काय फक्त माझीच आहे की काय? शिवाय मला आता दुसरीच शंका येते आहे. मला थप्पड देण्याची आयडिया ही या लोकांचीच तर नव्हती?
(क्रमश:)

No comments:
Post a Comment