(खाबुराव सुरनाळकरांच्या आगामी "तेलकट बटाटेवडा आणि तैलबुद्धीचे गुप्तचर्य" या लघुरहस्यकथेतून घेतलेले एक प्रकर्ण. खऱ्या घटनांवर आधारित परंतु पात्रे कपोलकल्पित. साधर्म्य आढळलयास केवळ योगायोग समजावा.)
मुदपाकखान्यातून वर्दी आली, भोजन तयार आहे. शंभूराजे उठले, सेवकास शेला, सुरवार आणायास सांगितली आणि गवाक्षात उभे राहिले. समोर नगराचा विस्तार दिसत होता. प्रासाद नगरीबाहेर एका उंच डोंगरावर वसलेला होता. भोवती नीट निगा राखलेली दाट वृक्षराजी होती. पक्ष्यांचा आवाज वगळता शांतता असायची. नगरीतील कोलाहल इथे ऐकू येत नसे आणि प्रासादातील बुद्धी,नृत्य विलास नगरीपर्यंत पोचत नसे. आबासाहेबांनी उभे केलेले हे साम्राज्य. त्यांच्या काळात प्रासादात गजबज असायची. प्रजेला थेट प्रवेश असायचा. सेवकवर्गही निष्ठावंत आणि जिवाला जीव देणारा होता. आबासाहेबांच्या कारकीर्दीत नृत्यक्रीडा, छचोर गायन, विदूषकी नाट्यछटा यांना मज्जाव होता. आबासाहेबांना फक्त एकाच गोष्टीचा षौक होता. बटाटेवड्यांचा. दर रविवारी थेट कर्जतला खास दूत पाठवून मागवलेले बटाटेवडे आणि कषायपेय यांचा आस्वाद घेणे हा एक नेमच झाला होता. मोहिमेवर निघताना सुद्धा बाजारबुणग्यात खास बटाटेवडा बनवणाऱ्या खानसाम्याची तजवीज असायची. शंभूराजेंना बटाटेवडा पचत नसे. ते नेहमी दूध आणि मनुका खाऊन राहत. त्यांना आम्लपित्ताचाही त्रास होता. उन्हातानांत फिरून त्यांना पित्त होत असे, मग अशा वेळी खास जिरं लावलेलं कोकमसरबत पीत वाळ्याच्या पडद्याखाली ते पडून राहत. राज्य करणे म्हणजे एक पीडाच असे त्यांचे मत होते. आबासाहेबांनी नक्को ती पीडा आपल्या गळ्यात टाकली असे ते खासगीत धनाजीस बोलून दाखवीत. धनाजी हा त्यांचा अत्यंत विश्वासू कारभारी. किंबहुना तो हवे ते कारभार तर करायचाच पण नको तेही करायचा. धनाजीही मग त्यांना सांगे, शंभूराजे तुम्ही राज्याची काळजी सोडाच, पीडाच ती, ती मी माझ्या डोक्यावर घेतो. मग शंभूराजे निर्धास्त होऊन कोकमसरबताचा घुटका घेत वैद्य शतघ्नेबुवा यांचा "पित्त - कारण आणि निवारण" हा ग्रंथ उशाशी ठेवून बसून राहत. त्यांनी तो ग्रंथ एकदा वाचायचा प्रयत्न केला होता. पण "सर्वसाधारणपणे क्षीण प्रकृतीबुद्धीच्या मनुष्यांस पित्तप्रकोप नेहेमी प्राप्त झालेला असतो" असे पहिलेच वाक्य वाचल्यावर पुढे वाचण्याचा नाद सोडून दिला होता. सर्वसामान्यांत वैद्यबुवांच्या ज्ञानाविषयी दुमत होते, पण शंभूराजेंचा त्यांच्यावर विश्वास होता. "राजे.. " नम्र आवाजात सेवकाने आपण आल्याची जाणीव करून दिली. शंभूराजे मुदपाकखान्याकडे निघाले. सेवकाने पुन्हा हाक मारली,"राजे, शेला सुरवार आणली आहे, परिधान करून गेल्यास बरे होईल." "हा! तव मातरम! पुन्हा विसरलो का आम्ही?" असे अल्प गालिप्रदान करून राजेंनी वस्त्रे परिधान केली. दिवस असाच निवांत जाणार होता.
मुख्य प्रासादापासून थोडेसे दूर असा दुसरा प्रासाद होता. ही धाकटी पाती. इथे राजे इंद्रवदन उर्फ "काळापहाड" यांचे वास्तव्य होते. शंभूराजे त्यांना उंदीरवदन म्हणत ते त्यांना आवडत नसे. मग तेही शंभूराजांना शुंभराजे म्हणत. एक काळ असा होता की इंद्रवदनराजेंशिवाय आबासाहेबांचे पानही हलत नसे. चुलत असले तरी आबासाहेब त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करायचे. आपल्या बटाटावड्यातील अर्धा त्यांना द्यायचे. परंतु पुढे शंभूराजे गादीवर बसणार अशी चिन्हे दिसू लागल्यावर इंद्रवदनराजे बाहेर पडले आणि वेगळे राहू लागले. पण त्यांच्यातील "काळापहाड" त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. काहीतरी काळेबेरे आहे असे ते बहिर्जी उर्फ छोटूला म्हणाले होते. बहिर्जीने मग आपला एक विश्वासू हेर मोठ्या वाड्यात मोठ्या हुशारीने पेरला होता. तो बित्तंबातमी देत असे. आबासाहेबांच्या मोहिमेच्या खलबतांपासून ते शंभूराजेंच्या आबासाहेबांकडे केलेल्या नवीन कॅमेरा घेऊन देण्याच्या हट्टापर्यंत सर्व बातम्या "काळापहाड" पर्यंत पोचत. काळापहाड आणि छोटूच्या रात्री गुप्त बैठका होत. अशा वेळी काळापहाड आपला उन्हाचा काळा चष्मा लावून बसे. काळ्या चष्म्यामुळे राजे कुठे पाहत आहेत याची कल्पना छोटूला येत नसे. आजवर कित्येक वेळा आपला गुढघा खुर्चीवर आदळला आहे, असे असताना रात्रीच्या वेळी काळा चष्मा का लावता राजे? असे छोटूने एकदा त्यांना विचारलेही होते. त्यावर "सर्व श्रेष्ठ गुप्तहेर असा चष्मा लावतात" असे त्यास बजावण्यात आले होते. पूर्वी ते छोटूबरोबर वेषांतर करून प्रजेत मिसळत असत. पण अलीकडे एक दोन वेळा काही दुष्ट नगरजनांनी त्यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेऊन वर परत डोळे मिचकावत "काय, आहे की नाही बरोबर?" असे विचारून टाळीसाठी त्यांच्यासमोर हात पुढे केला होता. त्यांनाही मग नाईलाजाने चडफडत टाळी द्यावी लागली होती. तेव्हापासून वेषांतराची भानगड अजिबात नको असे त्यांनी छोटूला बजावले होते.
दोन महिन्यांपूर्वी अशीच एक गुप्त बैठक झाली होती.
काळापहाड:-"छोटू, बातमी खरी आहे?"
छोटू: होय सरकार, हेराने गळ्याला चिमटा काढून "आईशप्पत खरे" असे म्हटले होते.
काळापहाड : मग नक्कीच खरे. नाही तर आमच्यासाठी कोण अशी मातोश्रींची शपथ घेईल? पण हे जर खरे असेल तर कट आणखीच गंभीर आहे.
छोटू: होय सरकार, हेर गेली महिनाभर कचराकुंडीवर नजर ठेवून आहे. दररोज न चुकता तेथे पडलेल्या चुरगाळलेल्या वृत्तपत्राचा बोळा उलगडून पाहतो. सरकार, तो बोळा तेलात माखलेला असतो! एका बैलगाडीचे वंगण होईल एवढे तेल त्या बोळ्यात असते!
काळापहाड: घात! अपघात नव्हे विश्वासघात! आबासाहेबांना वैद्यांनी तैलपदार्थ एकदम वर्ज्य असे सांगितले असताना हा कट?
छोटू: हेरानं असंही सांगितलं की बटाटेवडा आणायला जो दूत जातो त्याच्या कानाला लागून शंभूराजांनी काही गुप्त सूचनाही दिल्या.
काळापहाड: आं? शंभूराजे! कुठं फेडाल हे पाप? ते काही नाही! छोटू आता असं कर, अस्साच आपल्या मुदपाकात जा. म्हणावं आम्ही कुक्कुटकाढा तयार करण्यास सांगितला आहे. कोकणातून आपले नारो राणाजी खास स्वत: पकडलेले कुक्कुट पाठवतात. तो काढा घेऊन आपल्या हेराकरवी आबासाहेबांकडे पोचवा. आणि हो, मुदपाकात जरब दे, म्हणावं काढा चवीला अगदी बटाटेवड्यासारखाच हवा. आबासाहेबांना जरासुद्धा संशय येता नये. आणि हे पहा, शंभूराजांनी काय सूचना दिल्या होत्या याची माहिती काढा. योग्य वेळेला ती माहिती वापरता येईल. कट करता काय? पहाच हा काळापहाड काय करतो ते.
छोटू : होय राजे. तशा सूचना देतो.
आज छोटूने काही तरी महत्वाची बातमी आणल्याची वर्दी दिली होती. त्यामुळे इंद्रवदनराजेंचे आज कामकाजात लक्ष लागत नव्हते. कारभारी सांगत होते,"पुण्यनगरीहून खबर आहे, आपल्या मर्द जवानांनी रात्रीच गनिमी काव्याने हल्ला चढवून रस्त्यावर जिझिया कर वसूल करणारी ठाणी उध्वस्त केली आणि प्रतिहल्ला व्हायच्या आत पलायन केले. दोन लक्ष होनांची प्राप्ति झाली आहे राजे." इंद्रवदनराजे विचारात होते,"हं, हं.. दोन लक्ष होन काय? देऊन टाका. ती जमीन आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच!" मग भानावर येऊन म्हणाले,"बरं, बरं! छान! आता पुढील हल्ला कधी? पायात चपला वगैरे घाला रे बाबांनो. काचाबिचा पायात घुसतात. आम्ही आलो असतो, पण आज एकादशी. आम्ही स्वत: तोडफोड करणे योग्य नाही. शिवाय आज फराळास साबुदाण्याची खिचडी आहे अशी वर्दी आहे. या तुम्ही आता." त्यांनी इशाऱ्यानेच कारभाऱ्यांना निरोप दिला. तेवढ्यात बहिर्जी उर्फ छोटू सदरेत आल्याची वर्दी मिळाली. त्याला खलबतखान्यात पाठवा अशी आज्ञा करून राजे घाईघाईने आपल्या महालात गेले आणि काळा चष्मा चढवून तसेच खलबतखान्याकडे निघाले.
"हं, कुठे आहेस छोटू? काय खबर आहे?" चाचपडत खुर्चीचा अंदाज घेत, अंधारलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत राजेंनी प्रश्न केला.
"राजे, मी इथे आहे तुमच्या समोरच. धक्कादायक अशीच खबर आहे."
"वा! शुंभराजे, कसे सापडलात आता! आबासाहेबांना तेलकट बटाटेवडे देऊन दगाफटका करण्याचा कट? कुठं जाल आता?"
"अं.. राजे, थांबा. शंभूराजेंना त्यातील काहीच माहिती नव्हती. "
"आं!!?"
"होय राजे. तेलकट बटाटेवड्यांचा आग्रह हा आबासाहेबांचा स्वत:चाच हट्ट होता! शंभूराजे पित्त होते म्हणून मुदपाकात जाऊन स्वत:साठी शेंदेलोण आणि हिंग घातलेले ताक बनवायास सांगत असत."
"अस्सं! आणि मग त्या दूताच्या कानाशी लागून काय सांगत असत?"
छोटू इथे शरमला आणि चूप राहिला.
"छोट्या! खरं सांग काय ते!"
"राजे, कसं सांगू! आबासाहेब त्या दूताला बटाटेवड्यांसाठी रोख रक्कम देत असत. शंभूराजे त्या दूताला उरलेली चिल्लर परस्पर आम्हाला आणून दे अशी ताकीद देत! आबासाहेबांनी त्यांचा तनखा बंद केला आहे म्हणे."
"अरेरे! आपली सगळी मेहनत पाण्यात. हा शंभ्या असाच शुंभ पहिल्यापासून. आणि आम्ही पाठवत होतो तो कुक्कुटकाढा? त्याचं काय? आबासाहेबांनी तो तरी घेतला की नाही?"
"राजे, तो काढा आबासाहेबांपर्यंत पोचतच नव्हता. मधल्यामध्ये धनाजीरावच तो पिऊन टाकत होते!"
इंद्रवदन राजे उर्फ काळापहाड खिन्नपणे खलबतखान्यात बसून राहिले. पण निदान रहस्याचा उलगडा केल्याचा माफक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होता.

No comments:
Post a Comment