"थांबा, आता मी माझी औकातच दाखवतो! कोण आहे रे तिकडे?" मी दचकून तुर्यावस्थेतून चातुर्यावस्थेत आलो. काडी कानात काय छान गेली होती. समाधीवस्था प्राप्त झाली असताना धन्यांचा क्रोधाने चिरकलेला आवाज कानावर पडला आणि समाधी भंग झाली. स्टुलावरून उठलो आणि सायबांच्या केबिनीमदी गेलो. भिंतीवर ढाल आणि त्यावर एकच तलवार लटकलेली. धाकलं धनी जेव्हा थोरल्या सरकारांबरोबर बेबंदशाही नाटकाचा अखेरचा प्रयोग करून "अखिल मुंबई उग्रसेन नाटक मंडळी"तून बाहेर पडले तेव्हा मोठ्या धन्यांबरोबर तलवारीवरून खूप वादावादी झाली. शेवटी लक्ष नाही असं बघून हळूच कपडेपटातून एक तलवार पळवून घेऊन आले. ढाल काय मिळाली नाही, शेवटी दिवाळीला परळच्या बाजारातून आणली. सांगू नका कुणाला असा दम सर्वांना दिला होता. आता ढाल आणि त्यावर एकच तिरकी तलवार अशी भिंतीवर लावली आहे. परवाच धन्यांना बोललो, "मालक, खालची तुमची खुर्ची जरा पुढं ढकला. ही वरची टांगती ढाल आणि तलवार कदी खाली येईल म्हाईती नाही". तर माझ्यावरच खवळले,"लेका, वाटच बघतोयस होय रे? दोन खिळे मार खाली. आयला हे पण मीच सांगू काय रे?" आता सायबांना काय सांगू शेवटचा खिळा त्यांनीच ठोकला होता. पण भिंतच जिथं पडायला झालेली, खिळा मारायला गेलो तर भिंत पण ऱ्हायची नाय. पण सायेब पेटले होते. तसे ते दररोज सकाळी सात वाजत पेटून सायंसंध्येचे आचमन झाले की विझतात. पण आज ज्वाला जरा जास्तच भडाकलेली दिसली.
सरकारांकडे चाकरीला होतो ते बरं होतं. थोरले धनी फोटोग्राफीत असायचे आणि धाकले धनी सरकारांबरोबर फोटोत असायचे. सरकार दोघांना कधी दम देत, कधी फटके देत, पण सांभाळून घेत. आपल्यालावर कधी सरकार भडकले नाहीत. धाकल्या मालकांनी घर सोडताना माझीपण उचलबांगडी केली. मला म्हणाले पांड्या, लहानपणापासून माझी नाडी तुझ्या हातात. तू जर नाही आलास तर आमच्या सुरवारीची नाडी आणि कमरेला शेला कोण बांधणार? मी म्हणालो मग थोरल्या साहेबांचं काय? त्यांची नाडीपण मीच बांधून देतो. तर म्हणाले, ते वर्षातून एकदा उभे राहतात शिवाजी पार्कावर, एरवी टेबलाच्या मागेच असतात. त्यांना नुसती वरती बाराबंदी असली तरी चालते. आणि शिवाय सरकार त्यांना आपल्या कफनीत दडवतात. इथे आम्हा रात्रंदिन युद्धाचा प्रसंग. मागे एकदा दगड फेकण्यासाठी हात मागे केला इतक्यात कमरेचा शेला सुटून भलताच समरप्रसंग झाला होता. आणि हे पत्रकार असले xxxxचे, नेमका तो फोटो काढण्यासाठी धडपडत होते. तेव्हापासून ठरवले आहे, शेंडी तुटो वा पारंबी, कमरेचा शेला आणि नाडी तुटता कामा नये.
"साहेब, बोलावलं काय?" मी हळूच विचारलं. "हो! आत्ताच्या आत्ता फोन लाव! माझी औकात काढता? दाखवतोच आता. लहानपणापासून हे अस्सच करायचा हा. खोड्या करायला, मारामारी करायला आम्ही पुढं, आणि नंतर बोलणी खाताना हा सरकारांच्या मागे लपून हस्तिदंती करणार. आम्ही शाळेत असताना एकदा मला म्हणाला आपल्या मागच्या गल्लीत "लाडू सम्राट" मध्ये जाऊया. तिथले कडक बुंदीचे लाडू फार छान असतात. तू मालकाला बोलण्यात गुंतव, मी हळूच थोडे लांबवीन. तुला पण देईन. मी केलं तसं. हा लाडू घेऊन पळाला. मी घरी जाऊन बघतो तर एकटाच खात बसला होता. मी भडकून विचारलं,"आणि मला रे?" तर मला म्हणतो तुझ्या वाट्याचे तिथेच विसरलो. आणि वर म्हणतो तुला कशाला हवेत? आधीच तुझे दात हलतायत, कडक बुंदीचे लाडू खाशील तर आजीची कवळी वापरावी लागेल. खी:खी:खी! अस्सा चिडलो, टेबलावर कॅमेरा दिसला, त्यातली फिल्मच बाहेर काढून टाकली आणि पळालो. गेला होता रडत काकांकडे, सगळे किल्ल्यांचे काढलेले फोटो गेले म्हणून. ते काही नाही! आता मी दाखवतोच त्याला. त्यावेळी नुसती फिल्म काढली होती, आता तर कॅमेऱ्याचंच खळ्ळखट्याक करून टाकतो. बसा मग बोंबलत. बरं, जरा एवढी नाडी बांधून दे."

No comments:
Post a Comment