निवांत कमळावर बसलो होतो. विश्वनिर्मिती करून आत्ताच कुठे काही युगे उलटली होती. म्हटलं जरा डुलकी काढावी. म्हणून कमलदल जरा मिटून घ्यावं या विचारात तेवढ्यात हा नारद हजर! आला की समजावं डोकेदुखीची निश्चिंती. चहा घेऊन झाला तरी उठत नाही. झोपलो आहे असं दाखवावं तर लेकाचा त्रिकालज्ञानी. "गुरुदेव! पुरे झालं सोंग" असं म्हणायला कचरत नाही. परत सडाफटिंग. एक तंबोरा टाकला गळ्यात की निघाला. आधी फोन करेल, पत्र पाठवेल, काही नाही. शिवाय "नारायण! नारायण!" असे शब्द ऐकून सध्या आम्हास खिन्नता प्राप्त होते. सध्या भूतलावरतीसुद्धा असाच एक कळीचा नारायण कॅलिफोर्निया होऊ घातलेल्या कोकणाचं पुन्हा कोकण करतो आहे असे आमच्या डावीकडच्या मस्तकाने सांगितले. त्यावर आमच्या उजवीकडील मस्तकाने नि:श्वास टाकून नारूची लागण वाईटच असे उद्गार काढले. महाराष्ट्र सरकारने "पाणी गाळा नारू टाळा" च्या घोषणा करूनही काही उपयोग झाला नाही असे दिसते असे मी गमतीने म्हणालो. त्यावर "हे जीवजंतूही आपलीच कृपा." असे काहीसे लागट उद्गार नारदाने काढले आणि आमची तिन्ही तोंडे चूप केली. हा नारद म्हणजे असून अडचण नसून खोळंबा. दुरुत्तर करून निरुत्तर करण्यात पटाईत.
"बोला का येणे केलेत?" अवेळी असे म्हणणे टाळले. नारद वेळ अवेळ यांच्या पलीकडे आहे. "पृथ्वीवरील बातमी आहे, हे जगतस्वामी." एवढी विश्वनिर्मिती केली, पण मालाबद्दल तक्रारी जेवढ्या भारतवर्षातून येतात तेवढ्या कुठूनच येत नाहीत. "आता काय झालं? दानव वगैरे तर त्रेतायुगातच संपले. आता काय?"
"ते दानव परवडले, कलियुगातील हे महानुभाव पाहिले तर दानव म्हणजे स्काऊटमधील परोपकारी मुले वाटतील. आता तर डायरेक्ट तुमच्या आसनाला धोका आहे देवाधिदेवा."
"अरे असा कोड्यात बोलू नकोस बुवा. काय ते नीट सांग. कोण आमच्या कमळाला पाण्यात पाहते आहे?" आम्ही जरा विनोद केला. "देवा, ही वेळ विनोदाची नाही. कृपया सिरीयस व्हा."
या नारदाने एक वेगळीच चिंता आज आणली खरी. आम्ही पाऊस पाडला, धरणे ओसंडवली, एवढंच काय आम्ही प्रत्यक्ष प्रगटलो तरी एका ग्रामात पाणी पोचणार नसल्याची खात्री एका नरपुंगवाने दिली आहे. ते ऐकून आमची तिन्ही तोंडे आश्चर्याने काही काळ मिटली नाहीत. लगेच भानावर येऊन अंतर्ज्ञान शोधू लागलो. लगेच सत्य जाणले. आमची चर्या थोडीशी मवाळ दिसत असणार. नारद म्हणाला,"देवा, तुम्हाला क्रोध आलेला दिसत नाही. माझी वारी फुकट जाणार की काय?" त्याला म्हणालो "हे मुनिश्रेष्ठ, हा नरश्रेष्ठ, आजवरचा सर्वोत्तम बंधु म्हणून गणला जाईल. हे त्याने केलेले वक्तव्य केवळ भगिनीप्रेमातून प्रकटले आहे. आजवर जेवढे बंधु झाले, त्यांनी स्वभगिनींचे संरक्षण करणे तर सोडाच, उलट भगिनींनाच त्यांचे संरक्षण करावे लागत होते. बालपणी आईबापांच्या क्रोधापासून तर मोठेपणी सर्वांच्या कोपापासून. पण हे बालक वेगळे निपजले. आपला राज्याभिषेक होणार नाही, भगिनीचा होणार हे माहीत असून सुद्धा तिच्या विजयासाठी रात्रंदिवस ते राबते आहे. हे म्हणजे एखाद्या एडक्याने आपल्यासाठी कसायास योग्य भाव मिळेल की नाही याची चिंता लागून, स्वत:च गिऱ्हाईक शिंगाने ढोसत आणल्यासारखे आहे. तेव्हा मुनिश्रेष्ठा, त्याच्या अंतरीचा भाव पाहा, बाजारातील भाव नको."
मुनिश्रेष्ठ म्हणाले,"देवा, मला त्या एडक्याची चिंता नाही. चिंता आहे ती ज्या गिऱ्हाइकाला हा एडका ढकलत आणतो आहे, त्याची. त्याचे द्रव्य तर जाईलच वर मांसही मिळणार नाही. हा एडका देवा, आपल्यालाच अर्पण केल्यासारखा गावातून खुरांनी माती उकरत, नाकातून फुस्कारत फिरत असतो. हा जिथून जात असेल तिथून देवा, लोक जाणेही टाळतात. कधीही ढुशी देऊन कुणालाही पाडतो, जायबंदी करतो. हे सारे त्याच्या जमीनदार मालकाच्या पथ्यावर पडते. या एडक्याच्या उपद्रवाला कंटाळून किंवा घाबरून जन ग्राम सोडून जातात आणि त्यांची घरे, जमिनी हा जमीनदार बळकावतो. असे हे सगळे दुष्टचक्र चालले आहे. आता तर हा एडका आपणास आव्हान देऊ लागला आहे. स्वत:स देवा, तुमचा बाप समजू लागला आहे. अर्थात त्याचे तुम्हाला आव्हान म्हणजे मूत्रविसर्जनाने धरण भरण्याचे आश्वासन देण्याइतकेच मूर्खपणाचे आहे. पण त्यात जो मद भरला आहे तो ध्यानी घ्या. त्याने प्रजा गांजून गेली आहे. तेव्हा आपण काही तरी करा. निर्मिती करून आता निद्रेत जाऊ नका. अवतार घ्या. तुम्हाला वेळ नसेल तर विष्णूदेवांना विनंती करा. ते यदा यदा हि धर्मस्य वाले ना? ती ग्लानि भारतवर्षावर आली आहे म्हणावे. तेव्हा कसेही करा, या एडक्याला आवरा , त्याच्या मालकाला आवरा."

No comments:
Post a Comment