७ नोव्हेंबर - नेहेमीप्रमाणे प्रात:समयी ५ वा उठलो. नाकधौती, कपालभाति इत्यादिक आन्हिके उरकली. सौभाग्यवतींनी नेहेमीप्रमाणे "अहो, काय हे सकाळी सकाळी भयानक आवाज काढता आहात?" अशी तक्रार केली. तिला "नाक, तोंड आणि घसा ही आमची शस्त्रे. घासून पुसून तयार ठेवलीच पाहिजेत. योग्य त्यावेळी खोकला आणि नको त्यावेळी शिंकता येणे आवश्यक असते." असे सांगितले. "कराग्रे वसते लक्ष्मी" हा श्लोक म्हणत होतो तर सौ "तोंड बघा लक्ष्मी आणणाऱ्याचं" अशा आविर्भावात मान हलवत होती. पतीचा तेजोभंग करणे हा जणू पत्नीचा अधिकारच असावा. मी दुर्लक्ष केले. ७ वा कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती, शिंचे ८ वा उगवले. मग ७ ते ८ शवासन केले. परत कसले झोपता असे ही म्हणालीच. तिला बिचारीला काय कळणार, धरणे धरताना याच सिद्धीचा उपयोग होतो ते. बैठकीत निवडणुकीचा अजेंडा ठरला. वीज मोफत देण्यावर चर्चा झाली. फुकट कशी काय देणार असे एकाने विचारले. भाजपने आमच्या कार्यकर्त्यात काही जण घुसवले आहेत असा मला दाट संशय येतो आहे. वीज कंपन्या जास्त दर लावून कॉंग्रेस आणि भाजपची धन करतात. आपण त्यांच्यावर ऑडिट काढू आणि दर कमी करू असे सांगून त्याला चूप केले. वास्तविक ऑडिटचा उपयोग होऊन दर कमी होईल की नाही याची मलाही शंका आहे, परंतु सगळे ठीक होईल असे स्वत:ला बजावले.
१० नोव्हेंबर - कॉंग्रेसवाले सकाळपासून फोन करताहेत. मी उचललाच नाहीये अजून. करू देत थोडा वेळ. पण हे नक्की की भाजपपेक्षा काँग्रेसवाले परवडले.मान्य केलेले देतील तरी. पण भाजपवाले माझा फोन का उचलत नाहीयेत? भाजपला जास्त जागा मिळतील असा माझा अंदाज आहे. त्यांच्याबरोबर सरकार बनवायला हरकत नाही, पण मग आपले वेगळेपण काय? असा एक विचार कार्यकर्त्यांमध्ये आहे. मी फेसबुकवर लोकांचे मत घ्या असे सांगितले आहे. पाहू. सध्यातरी आम्ही कोणालाच पाठिंबा देणार नाही, विरोधातच बसणार, असा पवित्रा घ्यावा. रात्री बारा वाजता परदेशी कार्यकर्ते/गुंतवणूकदारांबरोबर स्काईपकॉल आहे. दुपारी मला वेळ होता, तर म्हणाले आमच्या झोपेच्या वेळेला जमणार नाही आणि रविवारी कुणी सकाळी १० पर्यंत उठत नाही. काय करणार, निधी तर आवश्यक आहे. म्हटलंच आहे, अडला हरी..
१२ नोव्हेंबर - फेसबुकवर लोकांचा पाठिंबा वाढतो आहे. कार्यकर्त्यातउन्माद उत्साह वाढतो आहे. त्यांना समजावले पाहिजे. अजून दिल्ली दूर आहे. चिरंजीव विचारत होते, बाबा तुम्ही मुख्यमंत्री झालात तर मला एक्सबॉक्स घेऊन द्याल का? हो असे म्हणणे अगदी तोंडावर आले होते. पण तोंड आवरले. संयम दाखवणे जमले पाहिजे. मोठ्या बंगल्यात राहणे, विमानातून प्रवास करणे, आलिशान गाड्या वापरणे कुणाला नको असते? पण आपले वेगळेपण टिकवण्यासाठी "सोने नाणे आम्हा मृत्तिकेसमान" असेच दाखवले पाहिजे. मोह फार वाईट असतो याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आहे. तुकारामांचे बरे होते, धंद्याचे दिवाळे काढले होते, सोने नाणे येण्याची शक्यताच नव्हती, मग काय होते म्हणायास? सत्तेत आल्यास सरकारी बंगला, गाडी घ्यावी का? फेसबुकवर लोकांचे मत घ्यायला हवे. शिंचे नेमके नको म्हणतील.
१५ नोव्हेंबर - अजूनही भाजपवाले फोन उचलत नाहीयेत. कार्यकर्ते म्हणत होते, मरुदेत, आपण त्यांच्याबरोबर सरकार बनवणार नाही अशी भूमिका घ्यावी म्हणजे चट सरळ येतील. आता कॉंग्रेसवाले वेगळ्याच नंबरवरून फोन करताहेत. त्यांना काय वाटलं, आम्हाला कळणार नाही? काही वात्रट कार्यकर्त्यांनी मग त्या नंबरवर निनावी फोन करून "शीला है क्या? बर्थडे पार्टी के लिये डान्सर बुक करना है. मुन्नी बदनाम हुई डान्स चाहिये." असे विचारले. मी त्यांना वाईट झापले. असे केलेत तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक असे मी म्हणालो. आता कॉंग्रेसनेही आपले कार्यकर्ते आमच्यात घुसडले आहेत असा संशय येतो आहे.
१६ नोव्हेंबर - अमेरिकेतील कार्यकर्त्यांनी शेवटी अनुदान पाठवले. सर्वात प्रथम कार्यालयाचे थकलेले भाडे द्यायला हवे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यावर नको. तो लेकाचा चहावालाही तगादा लावून आहे. हे सगळे चहावाले माझ्या राशीला का बसले आहेत? म्हणतो तुमचे कार्यकर्ते नुसते सामोसे आणि चहाबाज आहेत. आगाऊ लेकाचा! एका महिन्याचे बिल सात हजार रुपये? उडालोच! आता भाजप आणि कॉंग्रेस दोघांचे कार्यकर्ते आपल्यात आहेत हा संशय दृढ झाला. कोण कोण सामोसे खातो आहे त्यावर नजर ठेवण्यास सांगायला हवे. एक चांगली बातमी म्हणजे पक्षाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळण्याची चिन्हे आहेत असा सर्व्हे आला आहे. त्यावर अमेरिकेतील एक कार्यकर्ता म्हणाला, पण बहुमत मिळाले तर काय? या सगळ्या गडबडीत तसे झाले तर काय करायचे याचा विचारच झाला नव्हता. थोड्या जागा मिळवून विरोधात बसणे केव्हाही चांगले. विरोधकांकडून लोकांच्या अपेक्षा काही करण्याच्या नसतात, उलट काही घडू न देण्याच्या असतात. तेच बरं. काही तरी मार्ग काढला पाहिजे. बैठकीत ही शक्यता बोलून दाखवली तर सर्व स्तंभित होऊन एकमेकाच्या तोंडाकडे पाहत बसले. देव करो आणि तसं काही न होवो. सरकारी नोकरी सोडण्याची अवदसा का झाली असेही एकदा वाटून गेले.
८ डिसेंबर- शेवटी ज्याची भीती होती तेच घडले. पक्षाला २८ जागा मिळून अभूतपूर्व (पहिलीच निवडणूक होती म्हणा, पण शब्द भारदस्त दिसतो) यश मिळाले. कार्यकर्त्यानी जल्लोष केला. मी नको म्हणत होतो तरी गुलाल उधळला. मला धुळीचा त्रास होतो हे मी वारंवार सांगत होतो, पण ऐकले नाही. . सर्वात प्रथम कॉंग्रेसच्या कार्यालयासमोर विजयनृत्य झाले. पण आत सामसूम होती त्यामुळे अपेक्षित तसा आनंद मिळाला नाही. कुणीतरी भाजपच्या कार्यालयासमोर जाऊन नाचण्याचा बूट काढला, पण असे कळले की भाजपला ३१ जागा मिळाल्या आहेत, मग तो बेत रद्द झाला. न जाणो आमच्या ब्यांडवाल्यांच्या बरोबर आमच्याच खर्चाने स्वत:चीही फुकटात मिरवणूक काढून घ्यायचे. खूप दगदग झाली. आता बेनाड्रिल लावून पडलो आहे. मफलर गुंडाळून, कानटोपीही घातली आहे. सौ आणि आमची दोन्ही कार्टी माझ्या अवताराकडे पाहून दात काढत आहेत. मी मात्र आता सरकार बनवावे लागणार की काय या चिंतेत आहे.
(क्रमश:)
(आचार्यांची वासरी टप्प्या टप्प्याने प्रकाशित करण्यात येईल. वाचकांनी कृपया संयम बाळगावा. - संपादक)
१० नोव्हेंबर - कॉंग्रेसवाले सकाळपासून फोन करताहेत. मी उचललाच नाहीये अजून. करू देत थोडा वेळ. पण हे नक्की की भाजपपेक्षा काँग्रेसवाले परवडले.
१२ नोव्हेंबर - फेसबुकवर लोकांचा पाठिंबा वाढतो आहे. कार्यकर्त्यात

No comments:
Post a Comment