आमचं ते कर्नाटकचं नंदन निलेकणी म्हटलं तर थोरच की हो! येवढं स्वत:ची गाडी असून, चक्क बसमधून फिरलं की हो. आता बसमधून फिरायचं म्हंजे साधं काय हो ते? गर्दी गिर्दी असणार, लोक धक्का मारणार, पाकीssट मारणार, बाईमाणूसला चुकून धक्का बसलं तर पब्लिक आपल्याला मारणार, नक्कोच हो, थू:! हे काssय अवदसा आठवलं म्हणतो मी? गाडी गिडी आपल्या नशिबी कुठली हो? आमचं मामा लोक गाडी ठिऊन असायचं. शाळंला सुट्टी झाली की मामाच्या गावाला जायचं म्हणजे ते एक आकर्षणच असायचं. मामासुद्धा आमचा भारीच हो, एकदाच फिरवून आणायचं आम्हाला. बाकी सुट्टीचे सगळे दिवस आम्ही पार्क केलेल्या गाडीतच बसून तोंडानं आवाज काढत गाडी चालवायचो. ते आमचं सोडून सोडा हो, आम्ही बसप्रवासच करतच जल्म काढला. पण हितं ज्याच्या बुडाला कद्दी येष्टी बसच्या शिटाचा स्पर्शेसूधा झाला नाही त्यानं बसमध्ये प्रवास करणं… पाsssप, त्या बुडाची कथा गंभीरच की हो! निवडणूक ऱ्हातीय बाजूला, पुढं दोन दिवस उशीवर बसूनच काढतोय बघा. आणि नाश्त्याला सांबार आणि इडली खाल्लं होतं म्हणे बापडा. आता बस लागली म्हणजे कुणाची लॉटरी फुटेल काय की. एक थोडं आल्याची वडीतरी जवळ ठेवायची म्हणतो मी!
बरं, माणूस वट्टात हुशार बघा. आयटी मध्ये जल्म काढलं ते काय उगीच काय ते? नारायण मूर्ती स्वत्ता इंटरव्ह्यू घेतलं होतं म्हणे त्याचं. काहीतरी नीटच बोललं असेल की हो. उगाssच घेतलं काय त्याला? कंपनी पण चांगली चालवला की हो. आमची मुलगा पण तिथंच काम करतंय. आमच्या बंगळुरात फ्ल्याटचं किमती लाखात होतं ते कोटीमध्ये गेलं, ते प्रगती नव्हे काssय? आम्ही पण आमचं चांगलं गावातलं घर विकून टाकलो बघा आणि इथं फ्ल्याट घेऊन सोडलो. आता गावात जायचं म्हणजे लांब पडतंय पण प्रगती करायची म्हणजे हे आलंच की हो. आणि एक बरंच बघा - पूर्वी आमचं सगळं ते नातेवाईक, बंगळुरात आलं की आमच्या इथंच हो! गावात घर, जवळ पडतंय सगळं. आलं की पंधरा दिवस हलत नव्हतं. आता इथं बंगळूरच्या बाहेर तीस फर्लांगावर कशाला कोण येतंय? किमती वाढल्या ते बरंच बघा.
तर असं एवढं हुशार ते, काय झालं एकदम काय की! उठलं आणि म्हणलं आता राजकारणातच जातो! ते मनमोहनसिंग बोलावलं म्हणं. ते बोलवेल मस्त, आपल्याला अक्कल नको काय म्हणतो मी? राजकारण म्हणजे कंपनी काssय ती! कंपनीत हाताखालच्या लोकांना बोलावून सांगशिला हो, हे करा आन ते करा, ती मुकाट करतात. हितं येकटं निर्णय घ्यायचं म्हणजे हरिदासाची कथाच की हो. दोन दोन वर्षं फिरून परत मूळपदावर. पुन्हा काही लोक म्हणणार आमच्यावर अन्याय झाला, आम्ही आता आंदोलन करणार, धरणं धरणार, गाड्या फोडणार. कष्टच की हो! ते आधार कार्ड असंच बोंबललं की. ओळखपत्र म्हणजे खुळेपणाच हो! आपल्या देशात काम करून घ्यायचं म्हंजे ओळख लागती, ओळखपत्र नाही. आमची ते रेशन कार्डावरचं साखर आणि राकेल आमचं मोलकरीण गेली कित्तेक वर्षं घेतंय, आता ओळखपत्र दाखवा आणि घ्या म्हटलं तर ते गरीब कुठं जाइल हो? माणशी पाच लिटर राकेल एका कार्डावर म्हटलं तर तिच्या घरचं बंब तरी पेटतो काय हो? उगाच आपलं नाटक कशाला म्हणतो मी! निवडणूक जिंकायचं म्हणून काहीही हुच्चपणा करतंय हो. ते राहुल गांधी, केजरीवाल मेट्रोतनं, लोकलमधनं फिरलं, हे बसमधून. लोकांचे कष्ट कसे असतात, म्हणून बस मध्ये फिरून बघतात, येकदा फक्त रेशन कार्डावर महिना काढून दाखवा की हो. ते मोदी तेवढं हुशार निघालं, विमानातनं फिरतंय, ट्रकमधनं माणसं आणणं सोडाच, उलटं लोकांवरच तिकीट लावतंय भाषण ऐकायला. शेवटी वाणी हो, धंद्याला तयार बघा. सडका तांदूळ बासमती म्हणून तर विकणारच, वरती कॅरीब्यागचंपण किंमत द्यायला लावणार. आणि हे आमचं ध्यान बसतंय बघा बसमधनं फिरत. ते भाजपचं अनंतकुमार आधीपासूनच ओरडतंय, डब्बल वजनाचं पार्सल म्हणून डब्बल तिकीट लावा. आधीच कॉंग्रेसचं तिकीट, त्यावर हे बसचं डब्बल तिकीट, महागात पडतंय घ्या. त्यापरीस विदाऊट तिकीट असलेलं काय वाईट?

No comments:
Post a Comment