स्टेशनवरून घरी येताना भाजी घ्यावी म्हणून मंडईत थांबलो. मेथीच्या जुडीवर घासाघीस करत होतो तेवढयात काही अंतरावर गर्दी दिसली. जोरात कुठलेतरी गाणेपण चालू होते. कट्टर भारतीय बाण्याप्रमाणे गर्दी दिसली की उभे राहून पाहण्याचे कुतूहल वाटणे आलेच. थोडं पुढे गेलो तर गाणे ऐकू येऊ लागले. "आयी हुं मैं तुझ में ऐश भरने, रग रग में मस्ती की प्यास भरने…". छान डॉल्बीवर दणका लावला होता. निळे झेंडे फडकत होते. स्टेज लावले होते. म्हटलं नेहमीप्रमाणे कसली तरी सभा लावली आहे. स्टेजच्या पुढे आमच्या एरियातली सगळी अन्या-बाळ्या-पक्या-दिल्या टाईप मंडळी बेभान होऊन नाचत होती. मी नेहेमी पाहतो, ही मंडळी गणपती असू द्या, लग्नाची मिरवणूक असू द्या, राजकीय सभा असू द्यात कसल्या तरी अनिर्वचनीय आनंदात न्हाऊन नाचत असतात. मी बारकाईने निरीक्षण करत आलो आहे. बहुतेक वेळेला त्यांचे प्रेरणास्थान स्टेजमागे दडलेले असते अशा निष्कर्षाप्रत मी आलो आहे. नाचता नाचता अचानक दोघे तिघे फुटून स्टेजच्या मागे जातात आणि पाचदहा मिनिटांत बाहेर येऊन दुप्पट उत्साहात नाचतात हे माझ्या लक्षात आले होते. माझे कुतूहल मला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून एकदा मी हळूच स्टेजमागे जाऊन पाहिले आणि उलगडा झाला. त्यांच्या उत्साहाचा आणि आनंदाचा परिपाक आठ इंचाच्या छोट्याशा बाटलीत साठवलेला होता. मी गेलो तेव्हा दोनतीनजण तिघांत मिळून एका बाटलीतून तो आनंद लुटत होते. त्यांना मी पण त्यांच्यापैकीच वाटलो आणि एकाने मग बाटली माझ्यासमोर धरून ,"हां, चल लाव पटकन" असेही म्हटले. मीपण कसला झंपड, बावळटासारखं "अहो, सोडा तरी आहे का?" असे विचारून बसलो. त्यावर तिघांनीही चमकून माझ्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून गवा रेड्यांच्या कळपात उभा राहिल्यासारखे भाव माझ्या मनात येऊ लागले. मग कुणाच्या तरी मातृसत्ताकाचा सौम्य शब्दात सत्कार झाला आणि ती बाटली माझ्या हातातून हिसकावून घेतली गेली. मी घाईघाईने स्टेजमागून बाहेर आलो. जाता जाता "आयला ही बामणं…काही तरी सोडा की रे आमच्या साठी…" असे काहीसे शब्द कानी पडलेच. नाहीतरी ते पेय ओपन कॅटेगरीत येत नाही अशी फालतू कोटी करणार होतो, पण त्यांचे तांबारलेले डोळे पाहून विचार आवरला. न जाणो हातापाईत कपडे फाटून आपण नको त्या ओपन कॅटेगरीत येऊ.
गलका एकदम वाढला आणि पोरं जरा जास्तच उत्साहात नाचू लागलेली पाहून म्हटलं आज जरा कायतरी वेगळं आहे. निरखून पाहिलं तर साक्षात बुद्धस्मरणीय रामदासजी त्या घोळक्यात पोरांच्या वरताण नाचत होते. त्याचं हे रूप नवीन होतं. म्हणजे तसं नाचणं त्यांना नवीन नाही. आज राष्ट्रवादी संतांच्या टोळक्यात मागं झांज धरून, उद्या शिवफौजेत पुढं धनुष्यबाण घेतलेले सैनिक आणि हे मागं बाणांचा भाता घेऊन असं, तर परवा अर्धीचड्डी काळीटोपी संचलनात घोषात ट्र्यँगल वाजवत, असं ते नाचत असतातच. लोक नुसतं नाचून घेतात, पण बिदागी द्यायच्या वेळेला ब्यांडवाल्यांसारखी वागणूक देतात अशी तक्रार ते करत. पण आज ते स्वत:च्याच तालावर नाचत होते. त्यांच्या दाढीधारी मर्दानी देखण्या चेहऱ्यावर घर्मबिंदू चमकत होते. नीट पाह्यलं तर ते गाण्याच्या ओळी स्वत:ही जोरजोरात म्हणत होते. "आयी हुं मैं तुझ में ऐश भरने, रग रग में मस्ती की प्यास भरने…सैंया जवानी की बँक लूट ले…". बँक लुटणे वगैरे शब्द ऐकून मी दचकून इकडे तिकडे पाहिले. वास्तविक राष्ट्रवादी संतांच्या टोळक्याचे किंवा कोकणातील स्वयंघोषित राजांचे हे ब्रीदवाक्य असायचे ते इथे कसे काय आले बुवा? पक्षाचा काही नवीन कार्यक्रम वगैरे जाहीर झाला आहे की काय? "व्होटबँक" या शब्दाखेरीज "बँक" या शब्दाशी रामदासजींच्या पक्षाचा कधी फारसा संबंध आला नाही. म्हणून हा उपाय काढला असावा असे उगाच वाटून गेले. पण काही म्हणा, रामदासजी छानच नाचतात. डीआयडी वर गेले तर नक्कीच क्या बात, क्या बात, क्या बात!" घेतील. पण ते लोक तिथंही यांच्याकडून नुसतं नाचून घेतील. सोनेरी टोपी लांबच, नुसतीच टोपी घातली जाईल. काय एकेक माणसाचे नशीबच असते ना? टीव्हीवरच्या शोजमध्येसुद्धा आरक्षण आणले पाहिजे असा एक क्रांतिकारी विचार मनात आला.असं विचारात गढलो असतानाच पुन्हा गलका वाढला. पाहिलं तर, एक रिक्षा येऊन थांबली. आणि अहो आश्चर्यम! त्यातून साक्षात राखी सावंत (आंतरराष्ट्रीय आयटम नृत्य कलाकार, रिटायर्ड) यांची सौम्य सात्विक मूर्ती अवतरली. उतरल्या उतरल्या बाईंनी गाणे ऐकले आणि रामदासजींच्या जवळ जाऊन अत्यंत शास्त्रशुद्ध पध्दतीने पदलालित्य दाखवायला सुरुवात केली. योग्य ठिकाणी चेहऱ्यावर मुरके, अतियोग्य ठिकाणी कमरेचे लचके तर होतेच, पण संशयाला काही जागा नको असे हातवारेसुध्दा त्या करून दाखवत होत्या. ते पाहून रामदासजींसकट सगळे आपले नृत्य विसरून श्रीमती सावंत यांचे एकूणच कौशल्य पाहण्यात मग्न झाले. ते पाहून श्रीमती सावंत कडाडल्या,"बघता काय मेल्यांनो, इथं काय आयटम डान्स चाललाय का?" काय पण म्हणा, एरवी कुणाला न ऐकणारी पोरं, बाईंचं मात्र निमूटपणे ऐकून घेत होती.
मग रामदासजी आणि श्रीमती सावंत स्टेजवर जाऊन बसले. रामदासजींनी बाईं आणि आपल्याबद्दल गोड बातमी देणार असल्याचे सांगितले. ते झकासपैकी लाजलेले पाहून माझ्या शेजारी उभे राहिलेल्यांपैकी एक जण म्हणाला, "आयला, लगीन झाल्यालंबी म्हाईत न्हाई आन लगेच गोड बातमी?" रामदासजी कसेबसे एवढेच म्हणाले,"श्रीमती सावंतांमुळे तरुण, युवावर्ग पक्षाकडे आकर्षित होईल. वास्तविक हे मी सांगायची गरज नाही. आज इथं जमलेले तरुण, हे सभेच्या सुरवातीला पार मागे उभे होते ते आता इथं स्टेजजवळ उभे आहेत यातच सगळं आलं."
रामदासजी एवढे बोलून उगाच "लाजते, पुढे सरते" करत उभे होते. श्रीमती सावंत मुळीच लाजल्या नव्हत्या. त्यांनी माईक स्वत:कडे ओढला आणि खणखणीत आवाजात म्हणाल्या,"अहो तुम्ही कशाला लाजताय हनीमूनला आल्यासारखं? आणि तुम्ही लोक, टाळ्या कशाला वाजवताय? गोड बातमीसाठी काय लग्नच व्हायला पाहिजे?"
"हां, हे मात्र खरं हां." पुन्हा तोच माझ्या शेजारचा.
श्रीमती सावंत पुढे बोलू लागल्या,"सग्गळे अनुभव घेऊन झाले." इथं टाळ्यांचा कडकडाट!
"मेल्यांनो, पुरतं ऐका तरी! आंबटशौकीन कुठचे! हां, तर सगळे अनुभव घेऊन झाले. राष्ट्रीय आम पक्ष काढून झाला, त्या नुसत्याच आम पक्षालापण ऑफर देऊन झाली. मेल्यांना नुसतंच माझ्याकडे बघायला हवं असायचं. जसं काही मी एखादी वस्तूच आहे. मीही देशाचं काही देणं लागते. मलाही फेडावंसं वाटतं…" बाईंनी गळ्यातील शबनम पिशवी काढून बाजूला ठेवली.
इथे सर्वत्र शांतता पसरली. माईक, स्पीकरवालेसुद्धा आतुरतेने स्टेजपाशी येऊन उभे राहिले.
"मलाही फेडावंसं वाटतं समाजाचं ऋण." इथे सभेतून अपेक्षाभंगाचा एक पुसटसा नि:श्वास ऐकू आला.
"म्हणून मी ठरवलं आहे. मी रामदासजींच्या हातात हात घालून माझं सर्वस्व अर्पण करणार आहे."
इथे सभेतून एकदम घोषणा झाली,"राखीजी तुम आगे बढो, हम तुम्हारे पीछे है!"
श्रीमती सावंत म्हणाल्या,"हां, मेल्यानो, तुम्हाला मी काय आजच ओळखत नाही. तुम्ही नेहमीच माझ्या पीछे उभे असणार. पण रामदासजींचा हा पक्ष अन्यायाविरुद्ध लढणारा आहे, पक्षात पारदर्शकता आहे. पारदर्शकता आणि मी हे समीकरणच झाले आहे. मला कसलीही लपवालपवी आवडत नाही. जे काय आहे ते स्वच्छपणे जनतेसमोर मांडायला मला आवडते. आणि जे काही मांडले आहे ते जनतेने निरखून, पारखून, सूक्ष्मदर्शकाखाली धरून निरीक्षण करावे. आजच्या तरुणांपुढे अनेक समस्या उभ्या आहेत. म्हणून आज मी इथे उभी आहे. अगदी मध्यरात्री माझ्याकडे आलात तरी आपल्या समस्यांचे समाधान करण्याची मी हमी देते." या वाक्यावर सर्वांनी जल्लोष केला. माझ्या शेजारचा तो म्हणाला,"आता एकपण सभा चुकवणार नाही आपण तरी!"

No comments:
Post a Comment