म्हाराष्ट्राची औध्योगिक प्रम्प्रा पार जुनी आहे. किर्लुस्करवाडीला पैला पंप बनवला गेला आणि क्रांती झाली. जसं पंपातून पाणी बदाबदा ओतू लागलं, तशा तैलबुद्धीच्या म्हराटी लोकांच्या डोक्यातून अनेक गोष्टी येऊ लागल्या. पुढं सहकाराच्या योजना आल्या मग उध्योगच उध्योग सुरु झाले. प्रगतीच्या उच्चपथावर येकदा गेल्यावर मागे वळून बघता येत नाही. अशाच काळात पुण्याच्या पूर्व दिशेला येक क्रांतिसूर्य उगीवला. या सूर्यानं म्हाराष्ट्रात आसे काही शोध लावले की त्याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर आजून पाहिजे तशी घेतली गेली नाही याची खंत वाटते. न्यूटनबाबानं प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका लिहिला, संवेग आणि बल यांची प्रमेये मांडली खरी पण म्हाराष्ट्राच्या पक्षीय संवेग, बलाबल यांचे जे क्लिष्ट समीकरण होते ते काही त्यात बसत नव्हते. आमच्या क्रांतीसूर्याने जो बेरजेच्या राजकारणाचा जो सिद्धांत मांडला तो अभूतपूर्व होता. बहुतांशी सर्व मनुष्यप्राण्यात असलेला निर्लज्जपणा हा अंगभूत गुण हा आजवर सर्व राजकीय शास्त्रज्ञांना आकर्षित करत आला आहे. परंतु प्रासंगिक राजकीय समीकरणात तो एक अढळ राशि याखेरीज कोणत्याही उपयोगाचा नाही अशी त्याची फक्त नोंद करून ठेवली गेली होती. अशा दुर्लक्षित गुणाकडे केवळ आमच्या या गुणी गणितज्ञाचे लक्ष गेले आणि त्याने ही एक अढळ राशि नसून प्रसंगोपात तीमध्ये बदलही घडून येतो असे गृहीतक मांडून त्याचा प्रत्यक्ष वापर समीकरणात करून दाखवला. म्हाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे राजकारण त्यानंतर बदलून गेले. या थोर शास्त्रज्ञाला स्वत:च्या नावावर फारशी जमीन नसतानासुद्धा लोक शेतकरी म्हणून हिणवत असत. पण पैलू न पाडलेला हिरा हा बऱ्याच वेळा दगड म्हणून दुर्लक्षिला जातो. आपल्या सुदैवाने त्या काळात रत्नांची पारख असलेला एक जवाहिऱ्या आपल्याला गृहमंत्री म्हणून लाभला होता. त्याने या शास्त्रज्ञाला आपल्या पंखाखाली घेतले. या हिऱ्याने ज्या ज्या गोष्टी पाहिल्या त्यांचा त्याच्या संशोधनावर खोलवर परिणाम झाला. विशेषत: कृष्णेचे कऱ्हाडचे पाणी आणि सांगलीचे पाणी एकत्र आणण्याच्या ऐतिहासिक प्रयोगाचा (याला प्रीतीसंगम असे सांकेतिक नाव दिले गेले होते) त्याच्या कोवळ्या मनावर संस्कार झाला. त्यातूनच बेरजेच्या सिद्धांताचे बीज पेरले गेले असावे असा आमचा अंदाज आहे. पुढे त्याने कालव्याच्या आधारे हरितक्रांती हा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत इतका यशस्वी झाला की या सिद्धांताच्या आधारे एक थेंबही न सांडता मूळ स्त्रोतापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या जमिनीचा विकास करता येतो. आजही सभोवती अनेक गावात पाण्याचा टिपूस नसला तरी आमच्या या शास्त्रज्ञ शेतकऱ्याच्या गावात हिरवीगार शिवारं डोलत आहेत. इस्त्रायल या देशानंही याची नोंद घेतली म्हणतात. त्यांच्या देशातही पाण्याची गरज नसलेले असे अनेक भाग आहेत, त्यात पाणी वाया न घालवता कसे आणता येईल हे अनेक वर्षे त्यांना कोडे होते. पाईपमधून पाणी गळत गळत मुक्कामापर्यंत अगदीच थोडे पोहोचत असे. मग उगाच त्याला ठिबकसिंचन असे गोंडस नाव देऊन त्या कोड्याला शास्त्रीय शोध ठरवायचा प्रयत्न चालू होता. आमच्या एका शेतकऱ्याच्या मुलाने ते कोडे सहज सोडवले. जै म्हाराष्ट्र!
पुढं मग हाती घेतलेला प्रश्न जमिनीचा. लहानपणी शे दोनशे एकरपलीकडे स्वत:ची जमीन नाही याचे आत्यंतिक दु:ख वाटायचे. इतके दिवस ते दु:ख ठसठसत होते. पण त्याने खचून न जाता ही समस्या सोडवण्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यात अनेक विघ्ने आली, खोळंबे झाले. स्वार्थी लोक उगीच स्वत:च्या अन्न, वस्त्र, निवारा असल्या किरकोळ समस्या घेऊन येत आणि वेळ खात. पण मूळचा मृदू स्वभाव असल्यामुळे त्यांनी कुणाला दुखावले नाही. लोक माघारी जाताच वळून आपल्या कामात मग्न होत. अथक परिश्रमानंतर, स्वत:ची नसलेली जमीन विकासकाम करण्यासाठी कशी प्राप्त करून घ्यावी याचा सिद्धांत त्यांनी शोधून काढला. अशी बुद्धी असायला शारदेचीच प्रतिभा लागते. सर्वसामान्य प्रतिभेचे प्रतीक म्हणजे मोरावर हाती तंबोरा घेऊन बसलेली शारदा. यांची प्रतिभा एवढी असामान्य की ती शारदा हातात इलेक्ट्रिक गिटार घेऊन मोरावर उभी राहून हार्ड मेटल संगीत वाजवते आहे असा भास होतो.
त्या काळी वृत्तपत्रे हा एक ज्वलंत प्रश्न होता. कुणाचाही धाक नसल्याने ही वृत्तपत्रे कोणत्याही बातम्या बिनदिक्कत देत. मग त्यातून राजकीय, सामाजिक प्रश्न निर्माण होत. खरं तर राजकीय जास्त होत, मग वाईट वाटू नये म्हणून त्याला सामाजिकपण म्हटले जाई. शिवाय ही वृत्तपत्रे पद्धतशीर व्यावसायिक पध्दतीने चालवली जात नसत. जशा घटना घडतील तसे त्यांचे रिपोर्टिंग, संपादकीय लिहिले जाई. कसलाच धरबंद नव्हता. मग एक वृत्तपत्र ताब्यात घेऊन व्यावसायिक पध्दतीने चालवून कसे यशस्वी करून दाखवावे याचा एक प्रयोग किंवा उपक्रम हाती घेतला. आणि तो प्रचंड यशस्वी झाला आहे. या प्रयोगात छोटेछोटे लहान प्रयोगपण सामावले आहेत. त्या प्रयोगांद्वारा सध्या एक नवीन यंत्र बाजारात आणले आहे. सीएम मीटर असे त्याचे नाव आहे. हे यंत्र जनमानसाची चाचपणी अचूकपणे करते आणि राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण असेल याचे भाकीत करते. आर्टीफिशियल इंटेलिजन्स प्रणालीवर आधारित हे यंत्र यंत्रमानवाचे नियम पाळते. यंत्रमानवाप्रमाणेच हे यंत्र मालकाला इजा पोचू न देता काम करते. प्रसंगी इजा होणार असेल तर मुख्य कामच बंद करते. यंत्र अद्यापि प्राथमिक अवस्थेत असल्याने ते फक्त चाचपणी अचूक करते असे सांगण्यात आले. मुद्दा अचूकतेचा नसून संशोधकाच्या दूरदृष्टीचा आहे. हे यंत्र पूर्ण विकसित झाल्यावर निवडणुका घेण्याची गरज भासणार नाही असा आम्हाला विश्वास वाटतो. वृत्तपत्रातून समाजप्रबोधन कसे करावे याचे उत्तम शिक्षण आता या यंत्राद्वारे मिळेल. आतापर्यंत दुर्लक्षिलेल्या गेलेल्या अशा या संशोधकाला विज्ञानातील या उपेक्षित शाखेतील योगदानाबद्दल अजून नोबेल पारितोषिक मिळालेले नाही याची आम्हांस खंत आहे.

No comments:
Post a Comment