सायबांनीच सांगून टाकलं ह्ये बरं झालं. आपन काय संतांची टोळी आहोत? जब्बरी डायलॉक मारला सायबांनी. पन संतांची टोळी आसते? आपल्याला फक्त गुन्हेगार टोळी किंवा सोनेरी टोळी आसते आसंच वाटायचं. आयला आपन आता छाती फुडं काढून फिरणार. सभेत साधूगिरी आनि वॉर्डात भाईगिरी करून करून डोकं कामातून गेलं होतं. माणसानं कसं जसं आसल तसं वागावं, उगाच ज्ये न्हाई त्याचं सोंग आणू नये आसं आमचे ठाण्याचे संत टोळभैरवमहाराज उर्फ जितेन्द्रानंदानंद सांगत आसतात. म्हाराज स्वत: सोभावाने कोपिष्ट आसून, न्हाई त्या वेळेला (संध्याकाळी सातनंतर) भ्येटायला गेलं तर आयमायवरनं शिव्या देतात. पन भक्तिभावानं शिव्या ऐकत टिकून राह्यलं तर तीर्थप्रसादाला थांबवून घेतात. कालच गेलो हुतो. तीर्थप्रसादाला. आपल्याला नाक्यावरच्या मोसंबी नारिंगीची सवय, आसल्या विलायती तीर्थानं काय हुतंय. म्हाराजांनी चारपाच वेळा तीर्थ दिलं तरी माझी गाडी आपली फर्ष्ट गियरमदीच. म्हाराज सोता डुलत होते. आपनच मग तेनला काय तरी खावन घ्या म्हाराज आसा आग्रह करूण मुर्गीची येक तंगडी खायला लावली. मग म्हाराजांनी सत्संग सुरू केला. किशोरकुमारची सगळी दुखभरी गाणी गाऊन झाली. सारकं छगनबाप्पांच्या मिशीला हात लावून,"मूछे हो तो नत्थूलाल जैसी" म्हणत होते. छगनबाप्पा "आयला, ह्यांडल होत नाय तर पिता कशाला रे साल्यो!" आसं म्हाराजांवरच डाफरत व्हते. हितं आसं सगळं. आन सभेला दुसरीच तऱ्हा. बगळ्यासारकी शुभ्र कोटजाकिटं घालून ष्टेजवर बसनार. चेहऱ्यावर भाव आसे की लोकांच्या कल्याणाची चिंता तेंच्यापेक्षा हेन्लाच पडली आहे. लोकान्ला ते वाटतं खरंच वाटतं, आन मग आपल्याला वॉर्डात भाईगिरी करायची पंचाईत. लई तरास होतो त्याचा. हितं पक्षनिधी पाह्यजे तर वॉर्डात वट पाह्यजे. भाईगिरीशिवाय पक्षनिधी भेटत नाही. शिवाय हे सारखं येका कॅरॅक्टरमधून दुसऱ्या कॅरॅक्टरमध्ये घुसणं फार कठीण आसतं. येकदा आसंच न्हेमीच्या ड्रेसमदी फिरत होतो. येकदम सायबांचा फोन आला. म्हनले आत्ताच्या आत्ता सभा लावा, गाड्या सोडा, गावाकडनं न्हेमीची आपली गर्दी आणून बसवा. गर्दी आनायचा वांधा नाय, पन आपलीच पोरं या टायमाला साली आपापल्या सामानाबरोबर कुटं कुटं उधळलेली. लई कुटाणा. बरं सभा तरी लावून दावली. ऐन टायमाला सायबांनी सोता मला ष्टेजवर बोलावलं. म्हनले शंकर, तू आज हितं ष्टेजवर पायजेस. आपण ष्टेजवर गेलो आन सायबांचे पाय शिवायला खाली वाकलो तर मायला शर्टाच्या बाहीतून आपली "वस्तू" एकदम बाहेर पडली. आयला थेट बिहारमधून मागवलेला आठ इंची रामपुरी तो. बघून सायेबच धडपडत मागे सराकले. छगनबाप्पा तर ष्टेजवरून थेट खाली उडी मारून तेंच्या गाडीपर्यंत धावत गेले होते. दादा तेव्हडे निर्विकार बसून होते. तेनला रामपुरी काय शितापुरी काय सगळीच हत्यारं म्हाईत. त्यात हजाराची सभा समोर. आपला पार अरुण गवळी झाला राव. सॉरी म्हणून कसाबसा उचालला रामपुरी आन खाली मान घालून सायबांच्या मागच्या खुर्चीवर बसलो. हे आशी डबल कॅरॅक्टरची फिल्म सगळी. आपल्याला माहीत हे की आपन काय साधू नाय, कशाला साधूच्या कॅरॅक्टरमदे घुसायचं नाटक पायजे?
तेव्हा सायबांनीच आता खुल्लमखुल्ला सांगून टाकलं ते फर्ष्टक्लास काम झालं. मी येकदा तसं दादांना बोलून पाह्यलं होतं, आपन हे निवडणुका असल्या भांजगडी का करतो? तुमी निस्तं सांगा, आशी येवस्था करतो की, येक मानूस घराभायेर पडनार न्हाई. तुमी डायरेक्ट राज्यच करा. तवा म्हनले, आरे ही लोकशाही आहे. हितं लोकांनी मत द्यावं लागतं, कुनीच न्हाई भायेर पडलं तर कसं व्हईल? पन काम सोपं आहे. जे आपल्याला मत देणार न्हाईत हे म्हाईत आहे फक्त तेंनाच भायेर पडू दिऊ नको म्हंजे झालं. दादाचं टक्कुरंपण भारीच चालतं. सायेब सोतापन काय कमी न्हाईत. येकदा साताऱ्यात मतदान, थितुन परत मुंबईत येऊन डब्बल मतदान ही आसली आयडियेची कल्पणा सुचणं हे काय सामान्यपणाचं लक्षण न्हाई. तेला मुळातच भेजा तसा लागतो. आसा तर्राट भेजा फार कमी लोकान्ला आसतो. आसले भेजावाले आपल्याला एकदाच भेटले होते. आपन दोन वर्षं सजा काटली येरवड्याला. तिथं आसे एकापेक्षा येक हुते. पन तेनला भुरट्या गुन्ह्यांची आवड. तेनला मी बोलायचो, साल्यो, मोटा विचार आसू द्या. किती दिवस हे आसं दरोडे घालणार, सुपाऱ्या घेनार? पैशे भेटून भेटून किती भेटनार? शिवाय पोलिस कायम मागं लागलेले. हा भेजा आसा वाया घालवू नका, आमच्या पक्षात या, मोठ्ठी कामं करा. सायबांना तुमच्या गुणांची कदर हाये. वाया जाऊ देणार न्हाईत. आज पोलिस मागं घिऊन फिरताय, पक्षात या, हेच पोलिस तुमच्या फुडं फिरतील. तर ते लोक बोलायचे आपल्याला लोकांच्या तोंडावर हासून, गोड बोलून, त्यांच्या मागं मर्डर, दरोडे, चोऱ्या करायला आवडत न्हाई. गुन्हेगारला पन एक उसूल आसतो. ते आयकून आपन चीप बसलो होतो. खूप टॅलेंट वाया जानार याचं दु:ख झालं होतं. मंग फुडं "भायेर" आल्यावर येकदा सायबांना बोलून पन दावलं होतं. तेव्हा न्हेमीप्रमाणे सायेब गूढ हासून म्हणाले होते, शंकर, येईल, तो दिवस लवकरच येईल. आन आज तो दीस खरंच आला राव. कमळाबाईनं धोतरं फेडली सर्वांची, आन सगळ्यांना आपले मूळ धंदे आठवले. पन बरंच झालं, मानसाने आपला सोभाव कशाला बदलावा? आता मोकळेपनाने कार्य करू. येकदा आता येरवड्याला जाऊन येतो. भाईलोकांनला सांगतो, जसे आसाल तसे या, आन जसे आत्ता काम करता तसंच करा. तुमच्या उसूलाला आता ढका लागनार न्हाई. पक्षाचंबी काम हुईल.

No comments:
Post a Comment