आयन्याच्या बायना, घेतल्याशिवाय जायना…
धुळवड सपली. आता खरो शिमगो. कोकण आता काय पूर्वीसारका रवाक नाय. पूर्वी काय्येक वांधो नाय होतो. सरळ जांवचा, इलेक्शनचो फॉंर्म भरुचो आणि मगे सुशेगात रावचा. बिनविरोध निवडून येवंचा. माज्या विरोधात कोण उबो रवतंलो? फक्त लोकांका सांगूक लागता, गांववाल्यानू, सध्या मी वांयच कॉंग्रेसात इलय हां. मागच्या इलेक्शनीत तुम्ही धनुष्यावर शिक्को मारलो. शिरां पडली त्या धनुष्यार. मोडलेलां धनुष्य तां. बाण लावूचो पण वांधो. आमच्या सोनुर्लीच्या जत्रेतपण चांगला धनुष्य मिळतां. ज्याचे स्वत:चेच वांधे तो दुसऱ्याची प्रगती काय करतलो? दुसऱ्याची म्हणजे माझी. माजी प्रगती झाली तरच तुमची होतली. खरां मां? म्हणान मी कॉंग्रेसात इलय. तसो काय्येक फरक पडाक नाय. तिकडे धुमशान घालूचा ता आता हंयसर घालतंय. कणकवलीचो देवचार म्हणतत माका. वाडीपासून खाडीपर्यंत माझो संचार. खंय खनिजखाण आसा, खंय प्रगतीक वाव आसा, खंय बिल्डरचो भाव आसा, अशी सर्वत्र माझी नजर आसा. सिंधुदुर्गाचो विकास माज्यासारको कोण्येक करूक नाय. काय काय लोक आसंत, तेंका विकास दिसणा नाय. माझां आश्वासन होता, ओरोशीक आयटीआय पार्क करून देतंय म्हणान. हेंका कोणी सांगितलां आयटी पार्क म्हणान? सगळीकडे बोंब मारीत सुटले, आयटी पार्क काय होऊक नाय. अरे तुमका ह्यां सांगितला कोणी आधी? सगळ्यांनी मिळून माजो पाडाव केल्यानी. आता मीपण बगतंय पुढचां. तेंका सांगून बघलंय एकदोन वेळेक. आता नीट सांगूची वेळ आलेली आसा. तां मी बघतंय काय तां. चिंता करू नकात. हंयसर हॉस्पिटलपण काढूक लागतला. ह्यां एनसीपीवाल्यांकडेपण बगूची आता गरज आसा. मिटिंगमध्ये रीतसर ठरला होता, जे काय तुमचे मतभेद आसत ते बाजूला ठेवन आमचो प्रचार करा असो साहेबांनी सगळ्याक दम देवन ठेवलेलो. ह्येनी काय ऐकाक नाय. राजकारणात मतभेद असतलेच. आता एनसीपी मुळात तयार कशाक झाली? म्याडम पंतप्रधान नकोत या एकच मुद्द्यावर हे भायेर पडले आणि स्वताचो पक्ष स्थापन केलो. तो मुद्दो काय सहा म्हैने पण रवाक नाय. सत्ता कोणाक नको असता? परत कॉंग्रेसची काष्टी धरून उभे रवले. कोण विकासासाठी राजकारण करता? त्येंका तुम्ही काय्येक बोलूचे नाय आणि माका मात्र धारेवर धरतल्यात?
कोंकणचे स्वयंघोषित राजे फारच व्यथित दिसत होते. नुकत्याच झालेल्या घनघोर युद्धा त राजे त्यांच्या युवराजांसकट धराशाय झाले होते. युवराजांच्या कर्तृत्वाने प्रजा गांजली होती. आधी सैन्य पाठवून शिकार जखमी करायची आणि मग हे युवराज मृगया करणार असा पायंडा पडला होता. हाका मारून जनावरे उठवायची तसेच प्रजेला सळो की पळो करून सोडायचे, नेम धरून हाकत हाकत तिला असे कोंडीत पकडायचे की एका बाजूला उंच पहाड आणि दुसऱ्या बाजूला डोळ्यात रक्त चढून बेभान झालेले युवराजांचे सैन्य. अशी मृगया झाली की काठीला पाय बांधून उलटे लटकवलेले ते लोकशाहीचे मढे वाजतगाजत नगरीत आणायचे. मग सुरु व्हायचा तो उन्मत्त जल्लोष. या कानापासून त्या कानापर्यंत असे फाटलेले निर्लज्ज हास्य घेऊन राजे आणि युवराज वारुणीचे चषकावर चषक रिते करीत बसायचे. राजवाड्यात असा लखलखाट, उन्मादाचे फवारे असायचे तर बाहेर नगरीत फक्त अंधार आणि कानठळ्या बसवणारी शांतता पसरलेली असे. प्रजा सहन करते आणि गप्प बसते याचा अर्थ ती आंधळी आहे असा समज राजे आणि युवराज या दोघांनी करून घेतला होता. त्यात पदरी ठेवलेले लाचार भाट नित्य नवी काव्ये रचून या युवराजांचा मोरपिसारा कसा तेजस्वी आणि मनमोहक आहे याचे वर्णन करीत. प्रजा हा मोरपिसारा फुलवून केलेले नृत्य पाहून वाहवा वाहवा म्हणत आहे याचे सालंकृत रसभरीत वर्णन त्या काव्यांत असे. मोराने पिसारा फुलवला की त्याचे बूड उघडे पडते याचे भान युवराजांना नव्हते आणि राजांनाही नव्हते. मुळात ते मोरही नव्हते. चोरावर मोर जरूर होते. प्रजेने काबाडकष्ट करावे आणि राजाने त्याचे फळ लुबाडावे, नंतर त्याची जमीनही काबीज करावी या प्रकाराचा कळस होऊन त्याचा परिणाम अखेर दिसला. जनतेच्या हातातील मशाली, कुदळी फावडी पाहून नेसत्या कपड्यानिशी राजे आणि युवराज राजवाड्यातून पळत सुटले. या वेळी धमक्या चालणार नव्हत्या, शिवीगाळ चालणार नव्हती, अचानक अपघात घडवून आणता येणार नव्हते. स्वत:चा जीव वाचवणे एवढेच हातात होते.
माका काय समाजल्यात तुम्ही? चार कोंबड्यें आणि धा कवटां घेवन इतको धन्दो उभो केलंय, पुन्हा करुक नाय येवचो? कोंबडी-कवटांचो धंदो आणि राजकारण यात काय्येक फरक नाय. एका कोंबडीन अंडी नाय देऊक तर दुसरी देतली. मी धंद्यात इलंय तो पट्टेरी कोंबडी घेवन. त्या कोंबडीन माका सगळां दिल्यान. मी फक्त बसून खाल्लंय. पण वांधो असो झालो, माका इतक्या वेळ बसून खाल्लेलां बघून या कोंबडीनच माका अंडी घालूक बसयल्यान. मगे मी म्हटलां आवशीक xx! होया कोणांक ही कोंबडी? तसोच जावन ब्रॉयलर कोंबी आणलंय. तसो धंदो बरो होतो असां वाटलेलां. पण कोंबेच जास्त आणि अंडी कमी. खाऊक काय कमी नाय, अंडी देवच्या वेळेक लक्षात येवचां, अरे माज्या कर्मा, हो तर कोंबो आसा. सगळो धंदो बुडीत निघालो. सगळां विकून बसलंय. आता बगतंय उधार म्हणून खंय कवटां मिळतंत काय ती. सध्या गुजरात ब्रांड एकदम तेजीत आसां. बगतंय तेंका विचारून. वैश्य वाणी ते, धंद्याक नाय म्हणूचे नायत. पन माकापूर्वीसारकी शानपट्टी पण करूक येवची नाय. माका काय, मी थोडां तोंड रंगवन घेतंय आणि जावन उभो रवतंय, "शबय!" म्हणान. काय एक दोन रुपये दिल्यानी तर दिल्यानी.

No comments:
Post a Comment