पर्वा श्रीसमर्थ केजरूस्वामी यांची निर्गुण निराकारी शाकाहारी सालस करुण मूर्ती टीव्हीवर पाहिली. प्रथम उठलो आणि टीव्हीला साष्टांग दंडवत घातला. यापूर्वी फक्त रामायण लागत असे तेव्हाच आम्ही असा दंडवत घालत असू. व्हिक्स आणि बाम यांचा दोहोंचा संमिश्र परिमळ आसमंतात दरवळला असा भास झाला. ही नक्कीच स्वामीची कृपा ! प्रसाद झाला आपल्याला! पुन:श्च पालथा पडलो. सौ म्हणाली अहो असं काय करता? साधा निरलस माणूस तो. मी म्हणालो, खामोश! प्रत्यक्ष आम आदमी आहेत ते, साधा काय म्हणतेस? मनात आणलं तर टीव्हीवरल्या सगळ्या दोनशे च्यानेलवर एकदम एकाच वेळी दिसतील! सौ गप्प बसली. हीसुद्धा स्वामींचीच करणी याची खात्री पटली. एरवी आमचे कलत्र असे चूप बसणे शक्य नाही. आणि आम्हालाही तिला असे खामोश म्हणणे शक्य नाही.
पुण्यकोटी स्वामींवरची आमची श्रद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्वामींच्या चर्येत साम्य नसले तरी त्यांची दिनचर्या पाहून आम्हाला रामदास स्वामींची आठवण होते. स्वामींनीही सर्कारी नोकरीच्या बोहोल्यावर चढल्यावर "सावधान! आगे करप्शन हय" असे शब्द कानी पडल्यावर तडक पलायन केले आणि दिल्लीच्या तख्तावर पोचले. पुढील उणेपुरे एकोणपन्नास दिवस दिल्लीमध्ये पुरश्चरण केले आणि तिथूनही पलायन केले. प्रन्तु या तपश्चर्येच्या जोरावर त्यांना प्रसिद्धीसिद्धी तर प्राप्त झालीच, वरती संचारसिद्धीही प्राप्त होऊन स्वामी दिल्लीत अंतर्धान पावून गुजरातमध्ये अवतीर्ण होऊ लागले. तिथून एकदम अमेठीत. संचारसिद्धीची ब्याटरी डाऊन झाल्यास अवकाशयानाची प्राप्ती होऊ लागली. पण स्वामी नाममहात्म्याचे महत्व मानतात. आजही स्वामी रात्रंदिन नमो नमो असा जप करत अस्तात.
सकल विद्याभूषित नटराज जेकि परफेक्शनिस्ट खान वल्द हुसेन खान, यांनी सध्या टीव्हीवरून निरलसपणे प्रचंड देशभक्ती कशी करावी याचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. कसलीही अपेक्षा न ठेवता हे सगळे कसे करावे हेही ते सांगतात. तेसुद्धा स्वत: अत्यंत कमी मोबदला घेऊन. दोन दोन लग्ने, वर्षातून दोन तीन सिनेमे, मधूनच भूमिगत होऊन भलतीकडे अवतीर्ण होणे असे चमत्कार स्वत: नटराजांनी करून दाखवले आहेत. तेव्हा हा नटराज "दिसतो कसा आननी" असे कुतूहल केजरुस्वामींस झाले, आणि स्वत: स्टुडिओत अवतीर्ण झाले. योगायोगाने तेथे पपू (पक्षी: परम पूज्य ) मठाचे अधिकारी प्रात:स्मरणीय कपिलकुमार आणि श्रीराम वानर सेनेचे अधिपती पुण्यश्लोक सुधांशुमहाराज यांचेही आगमन झाले होते. हा अमृतयोगच म्हणायला हवा. नटराजांनी या तिघांस थेट प्रश्न केले. प्रश्न विचारताना नटराजांच्या चेहऱ्यावर आम व्याकुळता होती, आम धाडस होते आणि आम संताप. प्रश्नांची उत्तरे ऐकताना ज्या काही कोलांट्या उड्या पाहायला मिळाल्या त्या आम्हास थेट आमच्या बालपणात घेऊन गेल्या. सर्कशीत काय तुफान उड्या मारायचे त्याकाळी. त्या उड्या आणि भुभु:कार पाहून वाटले, ज्या प्रमाणे वानराची शेपूट जाऊन त्याचा नर झाला, तसेच या कपिलमधील "ल" चा विलय होऊन कपि होईल. सुधांशुमहाराजांनी ध्यान लावले. आज आपले मौनव्रत आहे असे पाटीवर लिहिले. हा कपि जे म्हणेल तेच आमचे म्हणणे असेही लिहिले. सुधांशु महाराज प्रेमाने कपिलकुमारांस कपि असे संबोधतात असा खुलासाही केला. मग, पुच्छ ते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरी, अशा सकल संपूर्ण रूपात, साक्षात श्रीसमर्थ केजरूस्वामी आम्हास दर्शन देत्साते झाले. आमची ब्रह्मानंदी टाळी लागली. मग सुरु झाला श्रीसमर्थ केजरूस्वामींच्या वाणीचा प्रपात. धबाबा ओघ चालिला. स्वामींनी लोकांस बजावले, मी निमित्तमात्र, करते करविते तुम्ही. तुम्हीच जर नामस्मरण केले नाहीत तर हा स्वामीही काही करू शकणार नाही. मग हळूच वदले, नमोचे नको, "आम"चे करा. असे बोलून अत्यंत प्रेमाने कॅमेऱ्याकडे पाहू लागले. आम्ही स्वामींच्या त्या प्रेमकटाक्षाने सद्गदित झालो, पवित्र झालो. अष्टसात्विक भाव जागृत झाले. कुंडलिनी जागृत झाली. आमच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. स्वामी! धन्य! तुम बिन कौन बतावे बाट! स्वामीशिवाय वाट कोण लावणार?
हल्ली व्हिक्स किंवा बाम, आम्ही घरात दोन्ही ठेवत नाही. स्वामींचा नटराजांसोबत (नटराजांच्या नकळत काढलेला, हो, त्यांचा रेट "आम" जनतेला कुठला परवडायला!) काढलेला आम फोटो भिंतीवर लावला आहे. देव्हाऱ्यात आम टोपी ठेवली आहे. त्याकडे नुसते पाहिले तरी डोकेदुखीबरोबर कळिकाळाचाही विसर पडतो. पण अभिषेकाच्या दृष्टीने अजून गजाननाची मूर्तीच बरी पडते. आम टोपीवर अभिषेक झाला तर ती आमच्या तळातून फाटलेल्या भाजीच्या पिशवीसारखी दिसते. तेव्हा, सतत आमस्मरण सुरु आहे. हिने चांगली चिंच गूळ घातलेली आमटी जरी केली तरी त्यात स्वामींची धूतवस्त्रयुत मफलरमंडित चतुराक्ष आम छबी दिसते. पण हल्ली ही तक्रार करू लागली आहे, झोपेत नेहमी आम आम असे करत आवंढे गिळत असता. मेलं सोसत नाही तर खायचं कशाला म्हणते मी अरबट चरबट? मी खुदाई खिन्नतेने तिच्याकडे पाहतो. स्वामी, कधी हिला साक्षात्कार देणार?

No comments:
Post a Comment