डेन्मार्क या देशाची ओळख सभ्य, सुसंस्कृत अशी होती आजवर. परंतु सध्या अशा काही घटना या देशात घडल्या आहेत की या प्रतिमेला तडा जातो की काय असं वाटू लागलं आहे. अर्थात, एका मोजक्या समूहाच्या वर्तणूकीवरून सर्वांनाच धारेवर धरता येणार नसलं तरी देश म्हणून नैतिक जबाबदारी तरी नक्कीच येऊन पडते. तेव्हा, माणूस म्हणून सुसंस्कृतपणाचा उच्चतम स्तर जिथे गाठला गेला आहे असं म्हणतात अशा या देशातील एका प्राणिसंग्रहालयानं नुकत्याच काही सिंहाना कायमचं झोपवलं. आणि कारण काय म्हणे तर वांशिक शुद्धता टिकवण्यासाठी!
त्याचं असं झालं, या प्राणिसंग्रहालयात सिंहाचे एक चौकोनी कुटुंब होते. नर, मादी, आणि त्यांचे दोन बछडे. सर्व काही गुण्यागोविंदाने (माणसाच्या दृष्टीने, सिंहांच्या दृष्टीने ती कैदच) चालू होते. तितक्यात या संग्रहालयाच्या प्रशासनाने एक नवीन तरुण सिंह आणायचे ठरवले आणि तिथे सुरु झाली ही चित्तरकथा. या नरोत्तमांचा बुद्धिविहार सुरु झाला. तरुण सिंह बछड्यांवर डोळा ठेवतात आणि संधी मिळाली की त्यांना मारून टाकतात हा निरीक्षणात्मक अनुभव. मग या नरपुंगवांचे विचारमंथन असे की, प्रौढ सिंहाचा आपल्याच संततीबरोबर संकर होऊ शकतो, आणि नवीन आलेला तरुण सिंह बछड्यांना मारून टाकू शकतो. यावर या थोर महाभागांनी थोर उपाय शोधून काढला तो म्हणजे प्रौढ सिंह, सिंहीण आणि त्यांच्या बछड्यांना मारून टाकणे आणि तरुण सिंहाचा राज्याभिषेक करणे! चक्क गोळ्या घालून मारून टाकले त्यांना! हिटलरने जे काही घृणास्पद कर्म केलं तेसुद्धा असल्याच वांशिक शुद्धीसाठी ना? त्यातून काहीच शिकलो नाही आपण.
प्राणिसंग्रहालय ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. कोट्यवधी वर्षांच्या इव्होल्यूशन प्रक्रियेत केवळ एक अपघात म्हणून आपण निर्माण झालो. नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताप्रमाणे धडपडत इथवर येऊन पोचलो. प्रजनन ज्याचे होते तो जीव अशी व्याख्या विज्ञानानं जीवनाची केली, पण ज्याला आत्मजाणीव आणि चराचराची अंशत: का होईना पण जाणीव तो मानव अशी आपली ओळख निर्माण झाली. हे विश्वाचे पडलेले प्रचंड कोडे सोडवण्याचा प्रयत्न करणारा प्राणी असे आपण. त्या कोड्याचा अंशात्मकही उलगडा आपल्याला अजून झालेला नाही. असे असताना माणूस देव (पक्षी: निसर्ग किंवा जी काही चराचर नियंत्रित करणारी प्रणाली म्हणा) बनून या जीवसृष्टीच्या प्रक्रियेत ढवळाढवळ का करीत आहे? प्राणिसंग्रहालये ही ढवळाढवळ आहे. केवळ आपल्या करमणुकीसाठी अशी ढवळाढवळ करण्याचा आपल्याला हक्क नाही. किंबहुना आपण कशावरही हक्क सांगू शकत नाही. आपल्याला एक अतिशय दुर्मिळ अशी वस्तू मिळाली आहे ती म्हणजे आत्मजाणीव आणि कुतूहल. वैश्विक काळाच्या व्याप्तीशी तुलना करायची झाली तर आपले आयुष्य म्हणजे फुलपाखरासारखे. काही संवेदना नसलेल्या कोषातून बाहेर यायचे, तीन दिवस विस्फारलेल्या डोळ्यांनी या सुंदर विश्वात बागडायचे आणि शेवटी मातीत मिसळून जायचे. ज्या अणुरेणूनी शरीर बनले होते ते पुन्हा कधी एकत्र येऊन अशी आत्मजाणीव असलेला मी बनेन का? शक्यता अगदीच कमी किंवा नाहीच. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. शास्त्रीय दृष्ट्या ते शक्य नाही. जिथे जाणीव-नेणीव-आठवणींची सलगता नाही तिथे पुनर्जन्म असू शकत नाही. हा जन्म संपला की सगळे संपले. मग जोवर जाणीव आहे तोवर मी कुतूहलभरल्या अचंब्याने जग बघणार, त्याचा शोध घेणार, या सगळ्या पसाऱ्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणार की आत्ममग्न राहून जन्म वाया घालवणार?

No comments:
Post a Comment