विज्ञानकथा कशासाठी? निखळ विज्ञानच का नाही? सर्वसाधारणपणे विज्ञानाचा तिटकारा होतो किंवा किमानपक्षी त्याकडे दुर्लक्ष तरी केले जाते. आपण विज्ञानकथा मात्र आवडीने वाचतो. पण कथेतून तरी ज्ञान होते का? तसे पाहिले गेले तर विज्ञानाला कल्पनाविश्वाचे वावडे आहे. प्रत्येक गोष्ट ही निरीक्षणाच्या आणि सिद्धांताच्या चौकटीत बसली तरच ती विज्ञानात बसते.
या सर्व जगत मंडळाच्या वयाचा विचार केला तर मानव जातीचे वय नगण्य आहे. एवढ्या कमी वयात आपण बऱ्यापैकी प्रगती केली आहे असे म्हणावे लागेल. परंतु आपले ज्ञान हे अगदी तोकडे आहे. विश्व एवढे प्रचंड आहे, अंतरे मनातीत आहेत. आपल्या सर्वात जवळच्या ताऱ्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचायला सुमारे चार वर्षे लागतात! आपल्या आकाशगंगेचा व्यास आहे 30,000 प्रकाशवर्षे! आपण इतक्या अवकाश प्रवासाचा अजून विचारसुद्धा करू शकत नाही. पण आपले कुतूहल आपल्याला स्वस्थ बसू देणार नाही. आपली जडणघडणच अशी आहे की आपण सतत "का?" असे विचारत असतो. एखादी गोष्ट गूढ असेल, आकलनापलीकडे असेल, तर त्याची आपल्याला भीती वाटते, आणि मग जे काही तोकडे ज्ञान आपल्याला आहे त्यात आपण त्याचे उत्तर शोधू लागतो. संशोधक नेहेमी म्हणतात की विज्ञानाला पुरावे आवश्यक आहेत. निरीक्षणात्मक कसोटीवर घासून पुसून घेतल्याशिवाय विज्ञान कोणतीही गोष्ट स्वीकारत नाही. जिथे आपले ज्ञान तोकडे पडते, जिथे पुरेसा निरीक्षणात्मक डेटा उपलब्ध नाही तिथे मग कल्पनाशक्ती वापरावी लागेल. त्यातूनच विज्ञानकथेचा उगम झाला असावा.
मराठीमध्ये विज्ञानकथा हा विषय तसा नवा नाही. मला पूर्वीपासून विज्ञानकथा किंवा त्याहीपेक्षा गूढकथांचे आकर्षण होते, अजूनही आहे. नारायण धारपांपासून रत्नाकर मतकरींच्या कथेपर्यंत सर्व साहित्य मी वाचायचो. जयंत नारळीकर उत्तम विज्ञानकथा लिहायचे, लिहितात. पण तुलनाच जर करायची झाली तर पाश्चात्त्य संशोधक लेखकांनी ज्या पद्धतीच्या कथा लिहिल्या तशा मराठीमध्ये आढळल्या नाहीत. आर्थर क्लार्क, कार्ल सागान, स्टीफन बॅक्स्टर किंवा आयझॅक अॅसिमोव्ह यांनी अप्रतिम विज्ञान कथा, कादंबऱ्या लिहिल्या. आर्थर क्लार्क यांनी लिहिलेल्या "रामा" कादंबरीमालिका वाचताना मी अक्षरश: थरारून गेलो होतो. या विश्वाच्या प्रचंड पसाऱ्यातून कुठून तरी आपल्या सौरमालिकेच्या दिशेने येणारे ते गूढ अवकाशयान, त्याचे नुसते असणेच संपूर्ण मानवजातीला "आपण एकटे नाही आहोत" याची जाणीव करून देते. मग तिथून सुरु होतो तो वाचकाचा अंतराळप्रवास, प्रत्यक्ष त्या अंतराळयानात आपण राहू लागतो. थोडीथोडकी नव्हे तब्बल १०० वर्षांचा काळ या कादंबरीत आला आहे. संपूर्ण कादंबरीत कुठेही ज्ञात विज्ञानाला सोडून क्लार्क भरकटलेला नाही. अर्थात काही ठिकाणी कल्पनाशक्तीचा वापर अपरिहार्य ठरतो. उदाहरणार्थ - विश्वात कुठेतरी एखाद्या सौरमालिकेतील ग्रहावर जीवसृष्टी कशी असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. पृथ्वीवरील जीवसृष्टी ज्या मूलभूत तत्वांपासून निर्माण झाली, विश्वात दुसरीकडे कदाचित (किंवा नक्कीच) दुसऱ्या पदार्थांपासून निर्माण झालेली असू शकते. शिवाय पृथ्वीवर इव्होल्युशन ज्या प्रकारे झाली (नॅचरल सिलेक्शन), ती पद्धत विश्वात सगळीकडे असेल याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे अशा जीवसृष्टीचे वर्णन करताना कल्पनाशक्तीच वापरावी लागेल. अंतराळप्रवास पुढे कधी तरी सोपा नक्की होईल, पण आज तरी तो नाही. अशा वेळेस क्लार्कची ही कादंबरीमालिका मला अंतराळप्रवासाला घेऊन जाते. असा अनुभव मायमराठीतील एखादी विज्ञानकथा किंवा कादंबरी मला देईल का? बाकी कार्ल सागान वर एक वेगळा लेख लिहावा लागेल. ते पुन्हा कधीतरी. इत्यलम.

No comments:
Post a Comment