चिरंजीव माझ्यासमोर कागद फडफडवत उभे होते. बाबा, टॅक्स भरायचाय, मदत करा. मी पाहतच राहिलो. काय?? काही दिवसांपूर्वीच त्याचा तीन वर्षाचा असतानाचा काढलेला फोटो पाहिला होता. मन भूतकाळात गेले होते. कितीतरी प्रसंग दिवसभर आठवत होते. त्याने उच्चारलेला पहिला शब्द, टाकलेले पहिले पाऊल, शाळेतील पहिला दिवस, काहीसा गंभीर झालेला आजार, उशाशी त्याच्या आईने आणि मी आलटून पालटून केलेली जागरणे, हट्ट, लाघव, खट्याळपणा, हूडपणा. अरेच्च्या, आणि हा आता हा एवढा धिप्पाड होऊन माझ्यासमोर उभा आहे. ४०० मीटर रिले रेस मध्ये आपले शंभर मीटर पूर्ण झालेल्या धावपटूसारखे वाटले. आपली खेळी संपली, पुढची रसरसती पिढी तयार झाली आहे. आता बॅटन पुढे नेणाऱ्या खेळाडूला प्रोत्साहन द्यायचे.
खरंच आपण आयुष्याच्या धावपळीत इतके बुडून गेलेलो असतो? इतका बदल आपल्या समोर होत असताना इतके कसे समजत नाही? बोबडी बोलणी, खेळणी, शाळा, परीक्षा, सुट्ट्या, वाढदिवस, परत शाळा, असे करत करत कधी, नवीन शूज, नवीन कार, मित्रमैत्रिणी, कॉलेज हे सुरु झाले हे कळलंच नाही. आणि वाटलं आपल्या करियरच्या धावपळीत ज्यांच्यासाठी करियर करायची ते थोडेसे बाजूलाच राहून गेले. ही जाणीवही अशा वेळी झालीय की मला भले मुलांबरोबर संवाद साधायचा असेल, त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा असेल, पण आता तीच मुलं त्यांच्या त्यांच्या व्यापात गढून गेली. शेवटी आयुष्य म्हणजे वाळूतील चित्रं. काळ नावाच्या समुद्राच्या लाटेनिशी बदलत जाणारी. आपण फक्त कधी काळी ती काढली होती, स्मृतीच्या कप्प्यात ठेऊन द्यायची. कधीतरी मग तो कप्पा उघडायचा, आतून ती चित्रं भरजरी पैठणी काढल्यासारखी हळुवारपणे बाहेर काढायची. त्यांना मंद अत्तराचा सुवास असतो, रेशमी आठवणींचा सुखावणारा स्पर्श असतो. संतूरच्या तारांची नाजूक किणकिण असते. हे असं पिढ्यानपिढ्या चालू आलेलं. माझ्या पणजोबांना, आजोबांना असंच वाटलं असेल, माझ्या बाबांनासुद्धा आणि पुढे आपल्या मुलांना. प्रत्येक पिढीची आव्हाने वेगळी असतील, जगण्याची पद्धत बदलली असेल, पण हा जगन्नाथाचा रथ असाच चालू राहील.

No comments:
Post a Comment