परमार्थाचा अत्युच्च बिंदू म्हणजे संपूर्ण ज्ञान, मोक्षप्राप्ती हा होय. परमार्थमार्गावर चालणाऱ्याला साधक असे म्हणतात. साधनेचे अनेक मार्ग आहेत. ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे आणि इच्छेनुसार साधक मार्ग निवडत असतो. कर्म, भक्ति, ज्ञान आणि योग असे साधनेचे काही मार्ग आहेत. योगाभ्यासाने मोक्ष मिळतो असे म्हणतात. शरीराला अनेक ठिकाणी गाठी मारून त्या परत सोडवण्याने संपूर्ण ज्ञान कसे प्राप्त होते याचे ज्ञान आम्हाला नाही. परंतु कुणाचा तळिराम कसा गार होईल ते सांगता येत नाही. काही लोकांना आत्मक्लेशाची आवडच असते. मागे एकदा पर्वतीवर काही पेन्शनरांना सक्काळी सक्काळी व्याघ्रासनात आणि त्यानंतर जीभ बाहेर काढून भीषण नाद करीत सिंहासन करताना जेव्हा पाहिले तेव्हा आम्हाला अचानक दीर्घहास्यासनावस्था प्राप्त झाली होती. आमच्या त्या आसनाच्या आवाजाने त्या वृद्ध केसरींच्या क्रुद्ध माना आमच्या दिशेने वळल्या होत्या. यातीलच काही शुभ्रआयाळसिंह नंतर हॉटेल विश्वमध्ये उप्पीट खाताना आपापल्या सुनांच्या तक्रारी एकमेकांकडे करताना आढळले होते. त्यावरून व्याघ्र अथवा सिंहासनाने पूर्ण मोक्ष जरी मिळत नसला तरी निदान भूक तरी चांगली लागत असावी अशा निष्कर्षाप्रत आम्ही येऊन पोचलो होतो.
परमार्थप्राप्तीसाठी योग्य मार्ग हवा. योग्य मार्ग दाखवण्यासाठी मग गुरु हवा. गुरूच्या अनुग्रहाशिवाय काही प्राप्त होणार नाही असे गुरूंनीच सांगून ठेवले आहे. मग असा गुरु शोधत होतो. आपल्या राष्ट्रीय क्षितिजावर अनेक दिव्य तारे आहेत. त्यात सध्या दोन तारे ठळकपणे चमकत आहेत. पपू रामदेवबाबा आणि दुसरे पुण्यश्लोक आमदेवबाबा. हे दोन्ही सत्पुरुष थोर देशभक्तसुद्धा आहेत. आम्ही त्यांचे एकेक चमत्कार पाहिले आणि कोण थोर हे ठरवणे आम्हाला कठीण जाऊ लागले. एकदा वाटावे रामदेवबाबाना शरण जावे, तेवढ्यात आमदेवबाबांनी हठयोगाचे असे काही प्रदर्शन घडवावे की वाटले कुंडलिनी जागृत करावी ती फक्त त्यांनीच. कधी वाटावे आमदेवबाबांच्या खराट्यास हृदयी धरोन उजवी तर्जनी डाव्या नाकपुडीवर ठेवून कुंभक करावे, तो रामदेवबाबांनी चतुर मधुर वचन करीत अवघा देश गदगदा हलवून सोडावा, आपला शत्रु करून सोडावा. दोघेही "प्रौढत्वी निज शैशवास" जपणारे पण शालेय विचार वेगळे (पक्षी:स्कूल ऑफ थॉट) असलेले. आम्ही एकूणच मग दोन्ही बाबांचे त्यांच्या सर्व बाबींसहित (पक्षी:बाबतीत) निरीक्षण केले. त्या निरीक्षणाचे काही ठळक मुद्दे आणि तक्ता पुढीलप्रमाणे -
रामदेवबाबा विचार करण्यासाठी कोणत्या शाळेत गेले याची कल्पना नाही, पण साधे मांडी घालून बस असे सांगितल्यावर बाबांनी शरीराचे जे काही कडबोळे केले असेल ते पाहून शाळेने तरी नक्कीच विचार केला असेल. श्वासउच्छ्वास नियंत्रित करून शक्य असेल तिथून तिथून तो उत्सर्जित करणे आणि त्यायोगे परमानंदप्राप्ति हा रामदेवबाबांचा जगप्रसिद्ध कपालभांति योग. रामदेवबाबांच्या पोटात काही म्हणजे काही राहत नाही. कपालभांति करताना पोटाची जी हालचाल होते तिने कुठलेही गुपितच कशाला, जो काही घनद्रववायु संचय असेल त्यालाही ठेवले जात नाही. त्याने सुपडा नेहमी साफ राहून चित्तवृत्ती अत्यंत तरल राहतात. बाबांची योगधारणा एवढी प्रभावी आहे की दिवसेंदिवस त्यांचे वय कमीच होत चालले आहे. त्यांची वक्तव्ये निरागस होत चालली आहेत. बाल्यत्व गमावलेल्या निबर माणसांना त्या वक्तव्यांमागील भाबडा मूलस्वभाव कळत नाही. एखाद्या मुग्ध बालकाप्रमाणे बाबांचा हसरा आनंदी चेहरा येणेप्रमाणे आमच्यासमोर टीव्हीवर आला की उल्हसित वाटते. आम्ही भेटावयास गेलो तर आम्हांस पाहून बाबा पायाची निरगाठ सोडत एकदम टुणकन उठून उभे राहिले आणि प्रणाम करत म्हणाले,"संघ! विकीर!" आणि स्वत: खी खी करत पळूनच गेले. नंतर आले आणि म्हणाले "मला जर अग्रेसर करणार असशील तरच येईन मी शाखेत." मी त्यांच्या या लोभस लीला पाहत राहिलो.
याउलट आमदेवबाबांना सदैव चिंता लागून राहिलेली असते. त्यांच्या नुसत्या दर्शनमात्रे नाक गच्च होते, पाय बहिष्कार टाकून धरणे धरतात, आजूबाजूची सर्व माणसे भ्रष्टाचारी वाटून आपण अंतर्बाह्य स्वच्छ झालो असे वाटू लागते. हा मार्ग आम्हांस बरा वाटतो. शिवाय शवासन हे एकच आसन आम्हांस जमते. आमदेवबाबांनी धरणीवर अंग टाकून केलेल्या शवासनाने भल्याभल्यांची झोप उडते. मोठे मोठे राष्ट्रीय प्रश्न बाबांनी नुसत्या शवासनाने सोडवले आहेत. आम्हाला हे बाबा जास्त जवळचे वाटले. अनेक सिद्धपुरुषांप्रमाणे कधी कोप होऊन बाबा आपल्या हातातील खराटा फेकून मारतील त्याची शाश्वती नसते. अर्थात त्यांच्या चरणी अमृतांजनाचा प्रसाद अर्पण करणारे भक्त अशा झाडूघाताला प्रसाद मानतात. बाबावाक्यं प्रमाणं असल्यामुळे किंवा "चाय से जादा किटली गरम" या न्यायाने म्हणा असे भक्त साखळी तोडून बाबावाक्यं नप्रमाणं म्हणणाऱ्या नास्तिकाच्या मागे लागतात. विशेषत: काळी टोपी आणि अर्धी चड्डी असा वेष केला असल्यास धोका दुपटीने वाढतो असा अनुभव आहे. आमदेवबाबा आम्हास जवळचे वाटले म्हणून त्यांच्या जवळ गेलो तर आमची अर्धी चड्डी आणि खोचलेला पांढरा सदरा पाहून बाबा संतापले. त्यांनी तात्काळ धरणीवर पडून आत्मक्लेश सुरु केला. त्यांचे शिष्य चवताळून आमच्या दिशेने येऊ लागले. आश्रमात दंड काय करायचाय म्हणून सोबत आणला नव्हता. उगाच बेंबीत इंजेक्शने घ्यावी लागतील या भीतीने आम्ही तिथून सटकलो. काही म्हणा, पळताना अर्धी चड्डी फार सोयीची पडते. आता नागरिकांनी आश्रमाच्या बाहेर स्वखर्चाने "बाबा (सध्या) शांत आहेत, पण भक्तांपासून सावध राहा, आपले धोतर चड्डी सांभाळा" अशी पाटी लावली आहे.
"आमदेवबाबा की रामदेवबाबा" निरीक्षण निर्णयतक्ता:
अजूनही आम्ही निर्णय घेतलेला नाही. परंतु एक गोष्ट ध्यानी आली, रामदेवबाबांनी जर मौनव्रत घेऊन शवासन करण्यास सुरुवात केली तर त्यांचे शत्रु कमी होतील आणि आमदेवबाबांनी जर कपालभांति करण्यास सुरुवात केली तर त्यांचा कोठा साफ राहून चित्तवृत्ती आनंदी राहील. पण शेवटी "जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात" असे ज्ञानेश्वरांनी म्हणून ठेवले आहे. त्याचा "ज्या प्राण्याला जिथे जायचे असेल तिकडे जाऊदे" असा आम्ही शाळेत असताना काढलेला अर्थच बरा वाटतो.

| विषय | रामदेवबाबा | आमदेवबाबा |
|---|---|---|
| १.वेषभूषा | सर्व अवयवांस मोकळीक देणारे आखूड धोतर, दाढी, आंघोळ वगैरेची कोणतीही अट नाही | मफलर, टोपी, खराटा, अमृतांजन (व्हिक्स चालेल), आंघोळीची सक्ती नाही पण दाढी कोणत्याही सबबीवर चालणार नाही |
| २.आवश्यक सामग्री | धोतर, बसण्यासाठी सतरंजी | मोबाईल, डाटा आणि फेसबुक अकाउण्ट अनिवार्य |
| ३.मुख्य आसन | कपालभांति | कपालआंठी |
| ४.घोषवाक्य | आयुर्वृद्धी, पोटशुद्धी, विनोदबुद्धी यांतून देशभक्ती | वायुवृद्धी, कफवृद्धी, तापवृद्धी, संतापवृद्धी यांतून भ्रष्टाचारमुक्ती |
| ५.पुढील ५ वर्षातील उद्दिष्ट | परदेशातील वाममार्गाने मिळवलेले धन देशात आणून रामकारणी लावणे | परदेशातील काममार्गाने (पक्षी: कर्म, गैरसमज नसावा) मिळवलेले धन देशात आणून आमकारणी लावणे |
| ६.पुढील १० वर्षातील उद्दिष्ट | क्र.५ पाहावे.(शिवाय वर्षातून २०० शिबिरे असेही सांगण्यात आले) | हा प्रश्न विचारल्यावर बाबांनी आम्हांस हाकलून लावले |
| ७.मोक्षप्राप्ती | ग्यारंटीड | प्रथम वर्गणी भरा, मग पाहू असे आम्हांस सांगण्यात आले |
अजूनही आम्ही निर्णय घेतलेला नाही. परंतु एक गोष्ट ध्यानी आली, रामदेवबाबांनी जर मौनव्रत घेऊन शवासन करण्यास सुरुवात केली तर त्यांचे शत्रु कमी होतील आणि आमदेवबाबांनी जर कपालभांति करण्यास सुरुवात केली तर त्यांचा कोठा साफ राहून चित्तवृत्ती आनंदी राहील. पण शेवटी "जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात" असे ज्ञानेश्वरांनी म्हणून ठेवले आहे. त्याचा "ज्या प्राण्याला जिथे जायचे असेल तिकडे जाऊदे" असा आम्ही शाळेत असताना काढलेला अर्थच बरा वाटतो.
No comments:
Post a Comment