जय साई! जय मंत्रालय! हे वेगळं मंत्रालय बरं काय. सद्या हे एकच गाव पावतंय म्हणा आमाला. आमचं कुठलं पण काम असलं तरी जय साईनं सुरवात करायचं असं पायंडा घालून घेतलं की हो. चालू रोजी आमचं साई आमाला पावत नसलं तरी त्यांचं लातसूध्धा पवित्र माणून घेतोय. ओम साई! ते कदी कृपा करंल कुणी सांगावं. चाळीस वर्षपूर्वी असंच कृपा केलं की हो. आमच्या हाटेलमदी असंच बसलो हुतो. दुपारच्याला गिऱ्हाईक जरा कमीच असतंय. टेबलावर माशा लई बसल्या आणि आमचं फडकंवालं पोरगं कुटं गायब झालं होतं काय की, म्हणून सोता उठून फडका फिरवत होतो तर एकदम गलका झालं. काय म्हणून बगितलं तर साक्षात परमेश्वरच उभं की हो दारात! साईssss असं मनात ओरडून साष्टांग नमस्कारच घातलं. साक्षात संजय गांधी की हो! काय छान फडकं फिरवतो रे म्हणून मला उटीवले आणि जवळ बशिवले. मग मी हात आन पाय दोनी जोडून विचारलं हितं कुटं वाट वाकडी केली सरकार? म्हणले काय हो तुमचं गाव. एवढं डेक्कन डेक्कन म्हणून प्रशिध्ध, पण एकदोन इराण्याचं दुकान सोडलं तर चा मिळत नाही कुटं. गाव पण आसं दोनपारच्याला इराणीबी दुकान बंद ठिवतोय. मग म्हणाले हे तुमचं तेवढं उघडं दिसलं. म्हंजे हॉटेल हो! खी खी खी! बोर्ड पण बरा वाटला - पूना कॉफी हाऊस. हे तुमचं हौस की हाऊस हो? मी हे हे हे करून हसलो. इनोदबुध्दीच फार सायबांना. सायबांनी भिंतीवर फोटो पाह्यला. आं? तुमी पन पायलट होते का? म्हनलो हां. एकदोन वर्स होतो, मग ढेरी फुडं इमानाच्या स्टेरिंगला चिटकायला लागल्यावर म्हटलं का उगाच नशिबाची परीक्षा घ्या, सोडून टाकलो आर्मी. म्हणले अरे वा वा! आमी पण कदी कदी उडवते. आरे पण तू इथे फडका काय मारते. आमच्या पक्षात येऊन जा. मनात म्हणलं, का? तिथं पन घान पुसायला फडके मारणारे लागतात म्हणून? पन म्हणलं आरे पहिले फडकं मारू, नंतर हात मारू. हाहाहाहा! हात मारू! नुसत्या कल्पनेनंच गुदगुल्या झाल्या. सायबांनी मग तिथल्या तिथं आपल्याला युथ कॉंग्रेसचा प्रेशिडेंटच करून टाकलं आणि आता निघतो म्हणाले. सायबांनी चपला बाहेर काडल्या होत्या त्या आणायला गेलो. सहज गेटाबाहेर नजर बाहेर गेली तर बारामतीचा बबलू बाहेर उभा राहून काय चाललंय बगत होता. माझी नजर गेल्यावर एकदम चालू पडला. हा बबलू पुन्यात जितं जितं मोक्याची जागा असंल थितं आपल्या शारदेचा विकास करतो. नजर ठेवली पायजे याच्यावर. लय कोम्पिटिशन करणार हा.
हाय कमांड म्हणले जा ऑलिम्पिक मेरेथॉन सिलेक्शन कमिटीवर. आता पळण्याचा आमाला लई आनभव. लहानपणी डोशाच्या पिठात हात बुडवले म्हणून आई उलथनं घेऊन मागे लागली की कधीच सापडायचो नाही. दिवाळीत लक्ष्मी सुतळी बॉम्बची वात लावून पळताना सगळ्यांच्या पुढं मी असायचो. हा आनभव हाय कमांडच्या नजरेत भरला आसणार. मंग नंतर आपन मागे वळून बगितलंच नाही. आन मग थितुन पुढं मी पुन्याचा विकासच विकास करून सोडला. आता गावाचा विकास झाला तर रहाणाऱ्याचा होणारच. आपला पन झाला त्याला मी काय करणार. लोक म्हणाले पेट्रोल पंप काय काडला, रीपेरीचं दुकान काय काडलं. पुण्यातले लोक पन आसे आहेत ना, आन्ना म्हटलं की पमचरचंच दुकान काडणार आसं वाटतं तेंना. आता आमच्या हितं पमचरपन काडून मिळतं म्हणा. पन लोक आपन गनपतीउत्शाव पन चालू केला, बगायला फॉरीनरं आणली एवढी आसं म्हणत नाहीत. आरे पूर्वी फक्त उत्सव होता, आता एवढा बीजणेस करून दिला तेचा काय? लोकमान्य टिळक मला शाबासकीच देल. पन लोकान्ला दूसऱ्याचा विकास पाहवत नाही. तसा मला पण पाहवत नाही दुसऱ्याचा म्हणा, पन तो मुध्धा वेगळा. लोक म्हणतात सगळं हितंच करतोय. पेट्रोल पंप, रिपेर शॉप. आपण तर हाटेलवाले. हाटेलच्या गल्ल्यावर बसून सगळीकडं नजर ठेवता येते.
सद्या दिवस वाईट आलेत. आपला कायपन दोष नसताना "आत" टाकलं मला. मी पन कदीतरी बगून घेईल त्या बबलूला. तेचाच काम हे. आरोप काय तर आपण स्कोरिंग मशीनमध्ये गडबड केला. आता उद्या म्हणाल पुण्यातल्या रिक्षांचा मीटर पन आपणच बशिवला. बाकी तिहारजेलचा म्यानेजमेंट एकदम बेकार हाये. एसी नाय, टीव्ही नाय, बेड नाय, सकाळी ब्रेकफास्ट बेडमदी तर नायच उलटा लाईनमदे हुबा ऱ्हायला सांगायचे. मी तेनला बोललो मला चालवायला द्या, आपल्याला हाटेलचा लय आणभव आहे. तर मला बोलले हे काय ऑलिम्पिकचा होटेल वाटला काय तुला, चल जा लायनमदी उभा ऱ्हा. पुन्ना हे शीबीआय वाले येऊन डोकं खायचे. मग आपण पण काय कमी नाय, बोलून चालून कॉंग्रेसवालेच. मी तेंना आपल्याला आता कायच आठवत नाय असं दाखवायचो. साईनी वाचवला मला. आता भायेर आलो आहे. पन तिहारच्या सवयी अजून जात नाहीत. रात्री झोपेत शेजारी कोणीतरी झोपलंय असं वाटलं तर झटका आल्यागत बेडमदून उठतो. बगतो तर आमचंच बायको असतं. सकाळी हातात मग घेऊन किचनमदे उभा राहतो. बायकोनं काफी घातली की मगच टेबलावर जाऊन बसतो. टॉवेल गुंडाळूनच आंघोळ करतो. आंघोळ करताना साबण खाली पडला तर अजाबात उचलायला जात नाही. तिहारमदे एकदा ती चूक केली होती…आठवणीनं अंगावर शहारा येतो. जाऊदे.
आज जरा जास्तच उदास हाये. कॉंग्रेसमदे सर्वेच चोरांची इज्जत होते. भुरट्या चोरांचीपन होते, इथे आपण तर "रेस २" मदल्या जॉन अब्राहमसारका. चोरी करेल पण ष्टाईलमदे, ते पन पार्टीसाटी, सोतासाठी थोडेच करेल. आपल्याला हाये ना इथे आपला हाटेल, पंप आणि रिपेर शॉप. आपल्या इमानाची कदर नाय. ते चव्हाण एवढा घपला केला आदर्शचा, तेला तिकीट! आनि आमी इथे गल्ल्यावर परत! खऱ्याची दुनियाच नाय ऱ्हायली. हाल्ली भाजपमदे पन आपल्यासारक्यांना लय डिमांड आहे असं ऐकतो. रेझ्यूमे पाठवावा काय? पन कॉंग्रेसमदे म्हंजे कसं सोताच्या घरी असल्यासारखं वाटतं. आपन पुन्यात जलमलो. (आमचं आप्पा म्हणतं पुन्यात, आई म्हणतं मद्रास, तेंनाच म्हायती काय ते) आपन पुण्याचं कर्ज फेडणार म्हणून हे एवढं करायचं. तर आता सद्यातरी पुन्ना गल्ल्यावर बसलो आहे. "नोकर पाहिजेत" अशी पाटी लावून चार दिवस झालेत, आजून एक पन आर्ज आला नाही. आज आता खुलासा लिहितो खाली - "सिलेक्शन कमिटीवर मी नाही!". बगूया मग तरी येतात का. ओम साई!

No comments:
Post a Comment