इतके दिवस आम्ही चहाच्या पेल्यात वादळ होऊ शकते एवढ्याच समजुतीवर होतो. एकदा नुसते "चहा जरा फिक्कट झाला आहे" असे म्हणालो होतो तर त्यानंतर झालेल्या वादळाने आमच्या हातातील कप उडवून थेट सिंकमध्ये नेऊन टाकला होता. पण एका चहाच्या पेल्याने त्सुनामी आणली हे ऐकून काही क्षण स्तब्ध झालो. आमच्या हातातील चहाच्या कपाकडे निरखून पाहिले. एका ठिकाणी कपाचा टवका उडाला होता आणि आमचे लठ्ठ बोट कपाच्या कानात बसत नाही अशा काही आधी न लक्षात आलेल्या गोष्टींव्यतिरिक्त काही दिसले नाही. ही रोखून माझ्याकडे पाहत आहे हे लक्षात आल्यावर,"नाही, चहा उत्तम झाला आहे" असा घाईघाईने खुलासा करून वादळ टाळले. वास्तविक चहात साखर कमी होती. पण आम्ही शक्यतो संघर्ष टाळतो.
आमचे नेहेमीचे मित्रांबरोबर चहा घ्यायचे ठिकाण म्हणजे नर्मदेश्वर भुवन. नर्मदेचे आणि चहाचे हे काय नाते आहे कळत नाही. पण नर्मदेश्वर भुवनात चहा मात्र अमृततुल्यच असतो. इतकी वर्षे झाली पण तेथील चहाने तलफ भागवण्यापलीकडे काही चमत्कार घडवून आणले नव्हते. मग आम्हीच विचारले काय हो, तो त्सुनामी चहा मिळेल का? परेसभाईनी-मालकांनी उत्तरादाखल उकळलेल्या चहातील पावडर कळकट फडक्यात घालून पिळून उरलासुरला चहा काढून घेतला आणि म्हणाले,"ते सद्या फक्त तिकडे गुजरातमदी भेटते. आपला भाव हाय ने तिकडे तेचा चायपत्ती सप्लाय करेचा दुकान हाय. आपला वार्ता होते तेच्यासंगती फोनवर. ते म्हणते आजकाल नरेनभाईचा सुगरफ्री चाय लय फेमस हाय. मोटा मोटा बीजनेसवाला लोक पेयला येते तेच्याकडे. मोटा लोगान्ला सुगर असते, तेनला सुगरफ्री चाय लागते म्हणून नरेनभाईने स्पेशल दुकान काढला ने. एकदम जोरात चालते. जसा ज्याला पाहिजे तसा बनवून देते. तुला पन भेटेल. पन तू काय बीजनेसवाला नाय, तुला लायनमदी उभा राह्यला लागेल. आता भाई काय सोता चाय नाय बनवते. धापाच नोकर ठेवला ने त्याने. आपण गल्ल्यावर बसते केश घेयला. नरेनभाई आधी सोता त्या दुकानमदीच नोकर होता. पन लक बग, आता ओरीजीनल मालकला घरी बसवून दुकान ताब्यात घेतला भाईने. पैला मालक होते ना ते बीजनेसवाला लोगसाटी काय पेशल चाय करत नव्हते, ते नरेनभाय ने बराबर ओळखला. मी सोता दोन वर्सखाली आमचे गावमदी जाऊन आला. पैले गुजरातमदी एक ष्टाण्डर्ड बीजनेस मोडेल होता. मागे घर पुढे दुकान. आता गेला तर सगळा दुकानच दिसते चकाचक. चायचा भांडी, ष्टो, भिंतीवर जैकिशन भगवानचा पिक्चर, सगळा बहु सरस. पाह्यला तर भांड्यात चायच नाय. इचारला तर बोलले, ते फकत शो साटी ठेवला आहे. चाय घरून बनवून येते. घर कुटे म्हणून विचारला तर बोलते घर आता बेसमेंटमदी नेला. घर आनी गोडाऊन बेसमेंटमदे. वरचा सगळा कचरा होते ना ते बेसमेंटमदी ढकलला. वर तर चकाचक दिसते. गिऱ्हायक दुकान किती चकाचक हाये ते बगते, गोडाऊनमदे किती कचरा ते नाय बगत. आनी कचरा काढायला कोनाला टायम हाये. भाईला दाढी करालापन टायम नाय भेटत. आपल्यासाटीपन चा आला. आपला भाव नरेनभायला सप्लाय करते ने, बीजनेस रिलेशन असते. चाय एकदम कडक, दूध कमी घालते. दिसायला मग भगवा दिसते चाय. खरा सांगू, आमचा मसालानी चाय जास्त चांगला असते. पन तेचा दुकान एटला पॉश हाये ने, चायचा कोलिटी कोन बगते. काय बराबर ने?" आम्ही "चोक्कस" असे उत्तर दिले. या महानुभावाला का उगाच दुखवा?
मग आम्ही विचारले आमच्यासारख्या सामान्यांनी तो असामान्य चहा कसा मिळवायचा? परेसभाई उत्तरले,"तू काळजी नको करू. ते चाय सोताच येल तुज्याकडे. म्हणूनतर तेला त्सुनामी चाय बोलते लोक. तुला पायजे की नाय पायजे ते वार्ताच नको. काय काय लोक सोता बगायला जाते. तेला चाय नाय तर दुकान किती सरस ते बगायचा असते. तेला लायनमदे तर हुबा ऱ्हावे लागतेच, पन चाय भेटेल का नाय तेचा ग्यारंटी नाय. अरे ते वाराणसीचा मातीचा भांडयामदला एवढा सरस चाय, ते लोग पन बोलते नरेनभायचा चाय तो चाय. वारानसीचा चाय एकदम रबडी. सुगरवाले लोग नाय पिऊ शकत. आपण सांगतो तुला, आता ही त्सुनामी वाराणसीला जाएल मंग पूरा इंडियात फैलेल. ते मद्रासी लोग एवढा कॉफी कॉफी करते ना तेसुद्धा नरेनभायचा चाय पिएल. अरे एवढा इटालियन पास्ता फेमस, पण तेपण बोलून लागले मला, आपला धंदा एकदम बसला, अमे चायकी फ्रान्चाईज जोईने. तुझ्या भायला बोलून बग आतून कनेक्सन होते का आपला."
असो बापडी त्सुनामी. आम्हाला पोहता येत नाही. त्सुनामी सोडा आम्ही समुद्र शांत असतानाही घोटाभर पाण्याच्या आत जात नाही. आम्ही काही दिवस उंच ठिकाणी जाऊन राहायचे ठरवले आहे. बरोबर ट्रकची इनर आणि झाडू घेतला आहे. त्सुनामीचे पाणी आले की गावातील गटारे सर्व दडवलेली घाण बाहेर टाकत वाहतील. त्सुनामीचे पाणी ओसरले की, पाणी परत जाईल पण ही बाहेर आलेली घाण तशीच राहील. डास होतील, रोगराई वाढेल. ती चिंता करत ब्याग भरत असताना सौ म्हणाली, काही कुठे जायची गरज नाही. वाणियाभाई नवीन दुकान टाकल्यावर कधी पैसे टाकून जाहिरात करत नाही, फक्त सेल लावतो आणि दुप्पट पैशाचे लेबल लावून दहा टक्के सूट देतो. मग लोकच फुकट जाहिरात करतात. आणि आलीच जर ही त्सुनामी तर फारतर चहा पेल्यातून बाहेर सांडेल, फडक्याने पुसून घेतलं म्हणजे झालं. आणि जळ्ळा मेला तो झाडू कशाला इथे? सांडलेला चहा पुसून घ्यायला झाडू काय करायचाय? परत मोरीत नेऊन ठेवा आधी! आम्ही झाडू निमूटपणे परत नेऊन जागच्या जागी ठेवला. वास्तवाचे भान माझ्यापेक्षा हिलाच जास्त आहे.

No comments:
Post a Comment