स्थळ- पूर्ण प्राथमिक शाळा, शिवाजी पार्क, दादर
वेळ - भीषण, निकाल लागल्यानंतरची
पात्रे - हेडमास्तरांच्या प्रमुख भूमिकेत सोता हेडमास्तर, विद्यार्थी - सध्या शाळेत असलेले, दुसऱ्या शाळेतून ट्रान्स्फर घेतलेले, काही मुर्दाडपणे टिकलेले तर काही नाईलाज म्हणून अडकलेले.
हेडमास्तर : पोरानहो, आपल्या शाळेची लई शाळा होऊन ऱ्हायली आहे. हे आमाला आजाबात पसंद न्हाई. आत्ताच्या परीक्षेत आपला निक्काल पन्नास टक्केबी लागला न्हाई. णवीन शासकीय नियमाप्रमाणे पन्नास टक्के निकाल लागल्याशिवाय अनुदान भेटणार न्हाई. अनुदान न्हाई म्हंजे आमचा पगार बोंबलला का? वास्तविक तुमचा शाळेची माण्यता काढून का घेन्यात येऊ नये असा जी आर शाळेला भेटला आहे. त्यामुळे आमच्या स्वाभिमाणाला डायरेक ढका पोचला आहे. जरी आम्ही "तो जीआर तुमच्या जीत घाला" आसा उलट रिप्लाय पाटवला आसला तरी आपला प्रॉब्लेम आमी आमच्या धेणात घेटला आहे. म्हनून आमी आता आमची फोटूग्राफीची हौस बाजूला ठीऊन शाळेच्या हितासाठी सोताला झोकून देणार हाहोत.
विद्यार्थी १ - मास्तर, आमाला पन झोकायला आवडेल. माजा बा रोज झोकून येतो आनि लय भारीच्या श्या देतो. शुद्धीत आसला की माय बोलून बोलून त्याचं भुस्काट पाडती, पन झोकून आला की गुमान जेवायला देती.
विद्यार्थी २ - मास्तर, आमचा बा कदी कदी झोकांड्या खात येतो तवा माय लई धुरळा उठवती. म्हंती आला तुमचा बा झोकून. हितं दातावर मारायला आमास्नी कवडी न्हाई आन ह्यो म्हाराज येक मुसुम्बी लावली की छत्रपती झाल्यागत तरंगत येतोय. मी पन मोठ्ठा झालो की छत्रपती होयाचं ठरवलं हाये. निदान शाखाप्रमुख तरी नक्कीच होणार है.
विद्यार्थी ३ - अरं जा रं! मोठा व्हतोय शाखापरमुख. धा वर्स माजा बा सैनिक म्हनून ऱ्हायला. समद्या चा टपऱ्या, भेळ वडापाव, भाजीपाला गाड्याच्या वसुलीचं काम हुतं त्याकडं. आन ह्ये फक्त दिवसाचं काम. रातच्याला कुटं डूटी लागत व्हती ते आमच्या मायलाबी ठावं नसायचं. इक्ती वर्सं काम ठेपशीर क्येल्यावर कुटं आता शीनीयर सैणिक झाला हाये. हाताखाली चार ज्युनिअर सैणिक आले हायेत. आता फक्त स्कूटरवर जाऊन नाक्यावर हुबा ऱ्हातो. हाताखालचे सैनिक वसुली आणून देतात. पूर्वी ती शिवाजीपार्कच्या मेण ऑफिसमदी जाऊन देयाला लागत हुती आता बांद्रयापत्तूर जावं लागतंया.
विद्यार्थी २ (हळूच) - आपलं मास्तर तरी कुटं शिकून काम करून हेडमास्तर झालंय?
हेडमास्तर - चूप! हेच आमाला बदलायचं हाहे. तुमाला झोकून देन्याचा येकच आर्थ म्हाईत असावा हा आमच्या शाळेचा पराभव आहे आसं मानणाऱ्यापैकी मी एक हाहे. आपल्या शाळेला धापाच रुपायांची वसुली करणारे सैणिक निर्मान करायचे न्हाईत. आपलं ध्येय कसं उच आसलं पायजे. आपली नदर नाक्यागल्ली परेंत ठीवणारे नकोत, पार दिल्लीपरेंत आपले सैणिक जायाला हवेत. आपल्या शाळेनं आसे तीन सैणिक आदुगरच दिल्याले हैत. आसं आसताना आपला निक्काल आसा कसा लागतो? तीन सैणिक हुच्चपदावर जावेत आन बाकीचे झेडपीत पट्टेवाले व्हावेत?
विद्यार्थी २ - गुर्जी, हुच्च म्हंजे काय? माझी माय मला न्हेमी हुच्च हुडगा म्हणती.
विद्यार्थी १ (कुजबुजत) - ए गप ए. आधीच ढापण कावली हाये. न्हाई ते प्रश्न इचारू नगंस. उगाच नाऱ्या हुईल तुजा.
हुशार विद्यार्थी - सर, माझी एक सूचना आहे. मी दर वर्षी निकालानंतर सूचना करतो. त्यावर कधीच गांभीर्याने विचार होत नाही.
हे. मा. - बोला, तुम्ही आमच्या शाळेचे सिनियर विद्यार्थी. आधीचे हेडमास्तर रिटायर झाले तरी तुम्ही अजून इथंच. बोला.
हु. वि. - मी मधून मधून इतर शाळांना भेट देऊन येतो. माझ्या असं लक्षात आलं आहे की, आपल्या शाळेत आणि इतर शाळेत फारसा काहीच फरक नाही. फक्त एकच किरकोळ उणीव जाणवली. आपल्या शाळेत तुम्ही एकच गुर्जी. तुम्हीच हेडमास्तर. तुम्हीच शिपाई. तुम्ही नेहमी बिझी असता, मग तास घ्यायला कुणीच नाही. तेव्हा एकांदा जास्तीचा शिक्षक नेमावा.
हे. मा. (काही क्षण त्याच्याकडे पाहत राहतात)- कदी कदी आसं वाटतं तुलाच मास्तर म्हून नेमावा. कदम, राऊत, जरा शिका. कुठं गेले?
हु. वि. - कदम चौपाटीवर गेला आहे. ओरडून ओरडून भाषणाची प्रॅक्टिस करायला चौपाटी बरी पडते त्याला. भाषणात १९९३ च्या दंगलीचा उल्लेख करायचा असल्यामुळे चौपाटीच चांगली. सक्काळी धावणारे कानाला हेडफोन लावून धावत असतात. कुणाच्या अध्यात न मध्यात. बरं पडतं. आणि मास्तर, राऊत हजर नाही. तो वर्गात कधीच बसत नाही. तो तुम्ही नसताना तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या खुर्चीवर बसतो. आणि समोर टेबलावर तंगड्या ठेवतो. कितीदा सांगितलं तरी ऐकत नाही. तुमची परमिशन आहे म्हणतो.
हे. मा. - असू द्या असू द्या. स्पेशल कोट्यातला इद्यार्थी हाये तो. परीक्षेला बसवायचा इद्यार्थी न्हाई. मुद्धा लक्षात घ्या. पन्नास टक्केपेक्षा कमी निकाल. त्यातले पाच जणांना काठावर स्कॉलरशिप भेटली. बाकीचे नुसतेच पास. मार्केट बदलत चाललं. दिल्ली अभ्यासकर्म लागला. आता वसुलीचे जॉब कमी होनार. आपल्या शाळेचा उज्वळ इतिहास आसलेला येकमेव इषय म्हंजे कुस्ती, हानामारी. तो क्लास बंद आता करावा लागनार. पूर्वी हानामारीचे पाच टक्के जास्त भेटत होते. दिल्ली प्याटर्णमदी ते आता बसनार न्हाईत. शिवाय ते शिकवणाऱ्या मास्तरांनी राजीनामा देऊन सोताचीच शाळा काडली. ती बुडीत ग्येली ती गोष्ट येगळी. आन म्हनूनच मी आता येक घोष्णा करनार हाये. जे विध्यार्थी हुबे आसतील त्यांनी खाली बसून घ्यावं. ज्यांच्या चड्ड्या नाडीच्या हायेत त्यांणी दोनी हातानी चड्डी धरुण ठेवावी. व्हय, घोष्णाच तशी हाये.
हु.वि. - गुर्जी, धोतारवाल्यांनी काय करायचं?
हे. मा. - कासोटा घट्ट धरून ठेवायचा.
विद्यार्थी २ - म्हंजे तुमी धरुण ठेवल्यालं हाय तसं?
हे. मा. (दुर्लक्ष करत) - पोरानहो, आजपासून मी तुमच्या परत्येकाचं प्रगतीपुस्तक ठेवनार हाये.
(पाच मिनिटं प्रचंड गोंधळ, आरडाओरडा)
हे. मा. - आरे आरे गपा! गपा म्हन्तो ना! तर हां! प्रगतीपुस्तक! (खूष होत) खूप इचार क्येला. घरी इचार करता येत न्हवता म्हणून मग महाबळेश्वरला गेलो. तिथली थंड हवा डोक्याला लागल्यावर मंग आसल्या कल्पणेच्या आयडिया सुचायला लागल्या. आमचं युवराज म्हंजे हेडमास्तर-इन-ट्रेनिंग हायेत. त्येंना बोललो, युवराज, हे आसं डायरेक्षण करावं लागतं. युवराज म्हणाले, फादर, तुम्ही फोटो बिटो कसं काय काढता हो? मंग आमाला आमचं शालेय जीवण आठवलं. धावीचं प्रगतीपुस्तक पघून वडील मनात ढासळले होते. त्या टायमाला हॉटशॉटचा क्यामेरा लय फेमस होता. त्यानं दिसेल त्याचे फोटू काडत फिरत होतो. वडील म्हनले, बारं, फोटूग्राफी तर फोटूग्राफी. आन येकदम ट्यूबच पेटली. त्या प्रगतीपुस्तकानं वडलांना येकदम आमचा वकूब कळला तर आमाला पण तुमचा कळंलच की. ठरलं थितंच मग, आपल्या शाळेतबी ह्यो कार्यक्रम लावायचा. प्रत्येक इद्यार्थ्याचं प्रगतीपुस्तक ठेवायचं.
(पुन्हा पाच मिनिटं गोंधळ)
विद्यार्थी १ - प्रगतीपुस्तकात काय लिवणार मास्तर?
विद्यार्थी २ - आमाला प्रगतीपुस्तक वाचायला लागनार का? जोडाक्षरं वाचनं अजून सुदारलेलं न्हाई. म्हंजे आमी आदीच नापास हुणार का?
विद्यार्थी ३ - आजी सैणिकाचा पाल्य म्हनून मला सवलत घावंल का?
विद्यार्थी १,२ आणि ३ (एकसुरात) - आनि आमच्या सोताच्या पर्सणल प्रगतीचं आमी काय करावं?
विद्यार्थी ३ - ही प्रगतीपुस्तक बिस्तक भांजगड आसेल तर मी शाळा सोडनार.
हु. वि. - मास्तर, एक प्रश्न विचारायचा आहे.
हे. मा. - तरीच म्हनलं तुमी कसं काय बोलला न्हाई आजून? हं बोला! काय शंका हाये?
हु.वि. - प्रगतीपुस्तकात कशाची प्रगती लिहिणार? आम्हाला विषयसुद्धा माहीत नाहीत.
हे. मा. - शाबास! ही शंका आल्याबद्दल बक्शिश म्हनून तुला पाच मार्क जास्त भेटतील. पन आमी इषय देनार हाहोत. शाळेच्या इकासाची ब्ल्यू प्रिंट छापायला धाडली आहे. ती आली की लगेच इद्यार्थ्यांनी कामाला लागायचं.
हु. वि. - अजून एक प्रश्न.
हे. मा. (कपाळावर आठ्या घालत) - इचार. पन आता या शंकेबद्दल मार्क बिर्क काय भेटनार न्हाईत.
हु. वि. - तुमचं पण प्रगतीपुस्तक ठेवणार का? ठेवलं तर ते तपासायला दिल्लीला पाठवणार का?
हे. मा. (काही क्षण स्तब्ध राहून) - तुला आदीच्या शंकेबद्दल दिलेले पाच मार्क कट!

No comments:
Post a Comment