परवा असंच कुठंतरी कुमार गंधर्वांची मुलाखत सापडली. त्यात ते तराण्याचं उदाहरण घेऊन गाण्यातील सौंदर्यस्थळांचं मर्म उकलून सांगत होते. तानेसरशी हातवारे होत होते, बोटे हलत होती. मध्येच थांबून ते म्हणाले,"हे बोट असं काय उगीच जात नाही. तिथं काही तरी सौंदर्य दिसलेलं असतं म्हणून ते आपोआप तसं जातं." कलाकाराचं हृद्गतच होतं ते. मनस्वी कलाकार असेच असावेत. एक धून सापडलेली असते त्यात सतत धुंद. गाणं जेव्हा अशा उंचीवर पोचतं तेव्हा मला वाटतं कलाकाराचा एकदम साधक होऊन जातो. त्या अज्ञात गूढतत्वाचा शोध घेणारा. गाणं गाणं राहत नाही. ते पंच तत्वांचाच एक भाग आहे हे जाणवू लागतं. विश्वाच्या उगमाचा ध्वनी म्हणजे ओंकार, तो ओंकार सतत गाण्यात जाणवत राहतो. मग अशा कलाकाराचं सर्वसामान्य जगणं हे या जगातील नसतं. माणसांमध्ये उठबस चालू असते, शरीरधर्म चालू असतात, लौकिकार्थानं जगणं चालू असतं. पण हे सगळं होत असताना मस्तकात तो अनाहत ध्वनी, चराचर सृष्टीचा मूल नाद जो ओंकार, तो अखंड चालू असतो असं मला वाटतं. अशा वेळी कुमार गंधर्व हे गायक वाटत नाहीत. ते गायनाच्या पलीकडे जाऊन गूढाचा शोध घेणारे तपस्वी वाटतात. साधकाची जशी समाधी लागते तशीच गायकाची लागू शकते. एकदा कुमार गंधर्वांच्याच संदर्भात एक गोष्ट ऐकली होती. ते म्हणाले होते, "शुद्ध सूर लागणे कठीण असते, पण जर तो लागला तर अंत:करणात झगझगीत पण शीतल असा प्रकाश पडतो. मी एकदा असा अनुभव घेतला आहे." निर्विकल्प समाधी लागणे आणि हा अनुभव एकच असावा. पण सौंदर्य "दिसणे" म्हणजे काय?
संगीतच काय, कोणतीही कला अशी हृदयाला कशी काय भिडते? त्यात आपण समाधी कशी काय अनुभवू शकतो? हे काय नाते आहे? संगीताच्या सूरमेळ्यात एखादा विसंवादी सूर लागला की आपल्या कपाळावर आठ्या कशा येतात? त्यात नेमके काय आवडलेले नसते? अमूर्त चित्रकलेतील जाणकारांना शब्दांपलीकडील काय दिसत असते? अनेक वर्षांपूर्वी, जुगलबंदीचा एक नवीन प्रयोग केला गेला होता. मला वाटतं दिवाळीचे दिवस असावेत. गाणे आणि चित्रकला यांचा एक अदभुत असा संगम केला गेला होता. दोन्ही क्षेत्रातील दिग्गज त्यात होते. पं. भीमसेन जोशी गात होते आणि त्या गाण्याशी संवाद साधत होते चित्रकार एम एफ हुसेन. गाण्याला रंग भरणे काय ते त्यादिवशी अनुभवले. अरे? खरंच, खर्जातला षड्ज लागला अन डोळ्यासमोर मंदिरच आले. गजबजलेले नव्हे. प्रात:काळचे. अजून येजा चालू न झालेले. भल्या पहाटे, स्नान करून ओलेत्याने शंकराच्या पिंडीवर अभिषेक करावा, गाभाऱ्यात फक्त गंभीर मंत्रोच्चाराचा आवाज घुमतो आहे, गाभारा पाण्याने भरला आहे. प्रदक्षिणा घालून कळसावर नजर टाकली तर तिथे भगवा फडकतो आहे, तसे. होय, या षड्जाचा रंग भगवाच. धीरगंभीर भगवा. पाहिलं तर तिथे कॅनव्हासवरही भगव्या रंगाचे फटकारे उमटले होते. मला वाटतं पुढे मग हुसेन यांच्या रंगांना प्रतिसाद म्हणूनही भीमसेन जोशींच्या गळ्यातून सूर उमटत होते. गायक, चित्रकार आणि श्रोते/प्रेक्षक एक झाले होते. कोणत्या नाळेने या तिघांना एकत्र बांधून ठेवले होते? प्रसिद्ध रशियन चित्रपट दिग्दर्शक तारकोव्स्की याच्या "सॅक्रिफाईस" चित्रपटाची सुरुवात बाखच्या सुरावटीने (सेंट मॅथ्यूज पॅशन) होते. ते सूर आपल्याला पिळवटून सोडतात. कॅमेरा मग लिओनार्डो दा व्हिन्सीच्या "अडोरेशन ऑफ मॅगी" या पेंटिगवर येतो. आणि सुरु होते दृकश्राव्य मैफल. ते पेंटिंग आणि बाखचे सूर एकाच प्रकारचे आकृतिबंध मनात निर्माण करतात. हे नाते कुठून येते?
मानवी मन आकृतिबंध शोधण्यासाठी उत्क्रांत पावले आहे. एखाद्या गोष्टीचे आकलन होणे म्हणजे ज्ञात अशा आकृतिबंधाशी त्या गोष्टीचे साम्य आढळणे. जिथे असे साम्य आढळते तिथे आपला प्रतिसादसुद्धा आपोआप ठरलेला असतो. जिथे असा आकृतिबंध शोधता येत नाही तिथे आपण हे आपल्या आकलनापलीकडील आहे असे आपण म्हणतो. पण हे झाले जड विश्वाबद्दल. अमूर्त विश्वाबद्दल कसं ठरवायचं? जिथे सर्वसाधारण आकृतिबंध लागू पडत नाहीत अशा रंग/संगीत विश्वातील कोणते हे आकृतिबंध आहेत जे संस्कृती, भाषा, प्रांत अशा सर्व चौकटीच्या पलीकडे जाऊन आपल्याला अमूर्ताशी जोडतात? बाखच्या त्या सुरावटींनी हृदयात जसे गलबलून येते तसेच ठुमरी ऐकतानाही का होते? आपल्या कानाला मर्यादित आवाक्यातील स्वर ऐकू येतात, मर्यादित वर्णपटातील रंग दिसतात. तरीही या मर्यादित स्वररंगातून असे कोणते आकृतिबंध निर्माण होतात जे सर्वांशी एकाच प्रकारचे नाते जोडतात? आपण सर्व या विश्वाचे भाग आहोत, ज्या अणुरेणूंनी ही चराचर सृष्टी बनली आहे त्यांच अणुरेणूंची आपली शरीरे, ज्ञानेंद्रिये आहेत. संगीतात रममाण होताना आपण त्या विश्वाशी एकरूप होऊन जातो, ते अद्वैत अनुभवतो म्हणून आपल्याला तो अनुभव दिव्य, आनंददायक असा वाटत असावा. म्हणूनच पं. जसराजांचा खर्ज ऐकला की विश्वाच्या सुरुवातीची आदिपहाट अनुभवतो आहोत असे वाटते. आपल्या ज्ञानेंद्रियांना मर्यादा आहेत. विश्वाचे खरे स्वरूप कदाचित आपल्याला पूर्णपणे कधीच समजू शकणार नाही. पण काही अंशी का होईना, त्याचे स्वरूप कळू शकेल, त्याचे कारण समजू शकेल, त्याची अनुभूती देऊ शकेल असे माध्यमतरी आपल्यापाशी आहे हे काय कमी आहे?

This comment has been removed by the author.
ReplyDeleteवाह... क्या बात ✨👌
ReplyDelete