हे मुख्यमंत्रीपद म्हंजे निस्ता वैताग झाला हाहे. तीन चार वर्षांपूर्वी सहीसाठी पेन उचललं की हात थरथरायला लागायला सुरुवात झाली. हातपाय थरथरणे तसे नवीन नव्हते. दिल्लीच्या हवेनं तसं होतं आम्हाला. मुंबईत आलो की गाडी येकदम पैल्या किकला ष्टार्ट. पन हे नवीन होतं. मुंबईतल्या मुंबईत हात थरथरला आन आमी चपापलो. च्या बायली, ह्ये काय आणि नवीन दुखणं? कधी कधी न्हेमीप्रमाणे निमूटपणे खुर्चीत चीप बसलो आसताना येकदम मानेवरचे केस हुबे ऱ्हातात. घाम फुटतो. आपल्याकडे कुणीतरी रोखून बघतं आहे आसं वाटू लागतं. आयला वास्तूत काय दोषबिष हाय का काय आसं वाटू लागलं. आमचे शेक्रेटरी साहेब म्हणू लागले, वास्तूतच बिघाड हाहे. त्यांनीच मग कोणी फेंगशुई एक्सपर्ट शोधून आणला. त्याने नीट पाहणी केली. आमच्या टेबलाखाली जाऊन पाहिले, खिडकीतून बाहेर काय काय दिसते ते पाहिले. खोलीतील फ्यानची आणि आमची उंची मोजली, टेबलावरील पाण्याच्या तांब्याभांड्याचे आमच्यापासूनचे अंतर, खुर्चीची आणि आमच्या तदनुषंगिक भूभागाची रुंदी इत्यादि असे सर्व मोजले. सगळे "वारा-पाणी" शास्त्रात फिट्ट बसत होते. तरीही तुमची "ची" खिडकीतून बाहेर वाहून जात आहे, टेबलावरचा तांब्याऐवजी त्यावर मोठा माठ ठेवा. पाणी "ची"ला धरून ठेवते. असं काहीबाही सांगून फुक्कट माझ्या खिशातून धाहजार रुपये काढून घेऊन गेला. त्याचीच काय, त्याच्या ह्याची आणि त्याची "ची" भायेर काढावीशी वाटत होती. पुन्हा खुर्चीवर बसलो आणि विचार करू लागलो. फुड्यात फायली पडलेल्या. आपल्याला ओसीडी हाहे, त्यामुळे येकपण इकडची तिकडे झालेली चालत नाही आपल्याला. रामू शिपायालापण सांगून ठेवलं हाहे, येकदम हलक्या हातानं फडकं मारत जा म्हणून. रामू निर्विकारपणे काम करतो. खोलीत जे जे अचल म्हणून हाहे त्या सर्वांवर त्याचं फडकं सारख्याच प्रेमानं फिरतं. येकदा दोनदा तर मी टेबलावर डोकं ठेवून चिंतन करत बसलो होतो तर माझ्यावरनंपण फिरलं. मी डचकून उठलो तर मला म्हन्तो,"सायेब, माफ करा, काखेत कोळीष्टकं दिसली म्हणून फडकं मारलं. मधनं मधनं हालत चला, मंत्रालयातले कोळी मंत्र्यांपेक्षा जास्त काम करत्यात. जणू काही बिल्डरच. जरा जागा खाली पडलेली दिसली की घ्येतलाच ताबा. आपण सोच्चतेचे भोक्ते का काय आहात म्हनून म्हनतो." आगाऊ लेकाचा. असाच खिन्न बसलो होतो. धीर करून समोरच्या फायलींच्या ढिगावर नजर टाकली. हातातून बारीक कळ गेली. त्याकडे दुर्लक्ष करून वरची फाईल उचलली मात्र, मानेवरचे केस हुबे ऱ्हायले. घाम फुटला. तरी जोर करून फाईल उघडली. पांडुरंग हरी! वासुदेव हरी! पयल्याच पानावर हुंच बिल्डींगचं चित्र. आता आमी काय बिल्डिंगा पाह्यला न्हाईत का? याच बिल्डींगचं एवढं भ्या का वाटावं? उठून खुर्चीच्या मागल्या भिंतीवर आमच्या दैवताचे फोटो लावले होते त्यासमोर उदबत्ती लावली, नमस्कार केला. दैवत लई कडक. एक दिवस उदबत्ती लावली न्हाई तर दुसऱ्या दिवसाला त्याचा वाईट अनुभव येतो. दिवसभर कंबर धरल्यासारखं होतं, वाकून चालावं लागतं. त्यामुळं ठरवून टाकलं हाहे, प्रत्येक फायलीला एक उदबत्ती लावायची. उदबत्त्यासाठी सीलबंद निविदा सूचनाच मागवल्या मग. एकदम दोन टन घेऊन ठेवल्या आहेत. त्या टेंडरची फाईलपण इथंच पडली आहे. एखाद दिवस त्यावरही सही करावी म्हणतो.
तेवढ्यात रामू आत आला. मी चटशिरी उठलो. एक नजर त्याच्या हातातील फडक्यावर ठेवून हात पाय ताणून अंग मोकळं करू लागलो. रामू म्हणाला,"सायेब, येक सांगतो, आपल्या अदुगर ते चव्हाणसायेब होते. त्यांना आसला तुमच्यासारका त्रास होत न्हवता. ते सकाळी केबिनमध्ये गेल्या गेल्या सह्या करत सुटायचे. मदी एकदा मी टेबलावर फडका मारत हुतो तर फडक्यावरबी सही मारून टाकली. त्यांचा आदर्श आपन सर्व्यांनी ठेवला पायजे. साहेब, ते फडकं मी जपून ठेवलं आहे." मी म्हणालो,"राम्या लेका, चोरून ऐकतोस वाटतं आतली बोलणी! आणि तुझे सल्ले तुझ्याजवळ ठेव, आगाऊ कुठला!". तडकलोच होतो. पुन्ना नजर त्या फायलीवर पडली. कसली उच बिल्डींग बांधली हो या लोकांनी! जरा नियमबियम पाळले आस्ते तर काय बिघडत हुतं का? म्हटलं न्हेमीप्रमाणे येक कमिटी बसवावी. जरा धुरळा खाली बसला की कमिटी कुणाच्या लक्षात राहतीय. कमिटीतली मेंबरं पन जरा सरकारी भत्ते खाऊन निवांत बसतील. झालं उलटंच. मायला भलतीच काम करणारी कमिटी निघाली. अशोकाला शोक करायला लावणारा रिपोर्ट देऊन बसली. तरी मी तो रिपोर्ट नाकारला. भिंतीच्या भेगा बुजवायला गवंडी बोलवावा आन त्यानं भेगा तर बुजवणं लांबच, पण पायाच कसा बिघाडलेला हाये ते सांगायचं त्यातली गत झाली. आता भेगा बुजवायच्या का पाया खणायचा? दिल्लीहून मालकांचा फोन, म्हणले पायाच दुरुस्त करून घ्या. आता पाया दुरुस्त करायचा म्हणजे आक्खं घर उतरवावं लागणार. हे आसं चालू आसताना दुसरी फाईल उरावर पडली. त्यात आमच्या धरणवाल्यांचा फोटो. पयले वाटलं चुकून येरवड्याची फाईल चुकून आमच्याकडं आली का काय? काळा गॉगल, काळापांढरा आडव्या पट्ट्यांचा टीशर्ट घातलेला फोटो, जणू काय दरोड्याच्या तयारीत असलेला एखादा "बाळ्या पारधी"च. क्षणभर वळाखलंच नाही. मग रिपोर्टमध्ये घपल्याची रकम पाह्यली आन म्हटलं हे गरिबीनं गांजलेल्या साध्या दरोडेखोराचं काम न्हाई. आन वळाखच पटली. आमच्या अवतीभवतीचीच मंडळी ही! आला का तिडा? कारवाई करावी तर पार्श्वभाग चिकटलेले जुळे भाऊ आमी. त्यांना हितं थितं येकी करायची लई घान सवय. पन आमी पडलो सोच्चतेवाले. त्यांनी तंगडी वर केली की पानी वतायला आमी तांब्या घिऊन न्हेमी तयार. न्हाई तर हे फुडं जानार आणि आमी आमचा पाय त्यांच्या "संचितात" भरून घेणार. वर यांचे साहेब आमाला सांगणार, तुमाला कुणी सांगितलं पाणी वता म्हणून, तुमी पन मारा धार. तुमाला नसंल इच्छा तर आमी आमच्या "स्वबळा"वर कुटं पण धार मारू. म्हाराष्ट्रातल्या सगळ्या भिंती पडल्या आहेत त्यासाठी. फक्त ती पर्वाची गारपीट तेवढी नैसर्गिक होती, त्यात आमचा काही "हातभार" नव्हता. शिवाय किंगफिशर कृपेने आमी रेग्युलर किडनी ओवरहॉल करतो, आमाला "खड्याचा" त्रास न्हाई. सही करायला हात उचललेला खाली ठेवला. पुन्ना तो भास झाला. कुणीतरी मागून पाहतं आहे. मान वळवून पाह्यलं तर, भिंतीवर न्हेमीचे तीन गांधी लटकलेले होते. महात्मा गांधींच्या फोटोकडं पाह्यलं की सही करावीशी वाटायची. पन हात उचलला की म्याडम फोटोतून भायेर येताहेत आसा भास व्हायचा. मग खुर्चीवर चढून म्याडमच्या फोटोवरचे हार काढून महात्मा गांधींच्या फोटोवर चढवले. इतके की सगळा फोटोच झाकला गेला. येकदम जिवाला बरं वाटलं. उगाच सदसदविवेकबुद्धीचे अवेळी झटके आता बंद होतील असं वाटलं. तडक दोनी फायली उचलल्या आणि "विचाराधीन" असा शेरा मारून ढिगाऱ्याच्या तळाशी टाकून दिल्या. आजून दोन-तीनच दिवस ऱ्हायले आहेत आमचे हितं. साताऱ्याला फोन करून आमी एकोणीसलाच रात्री धाच्या यष्टीनं येतो आहोत, आमची खोली सोच्च करून ठेवा, असा निरोप दिला आहे. हो, आपल्याला सोच्चतेचं लैच वेड आहे.

No comments:
Post a Comment