आता सर्व विषयांचा अभ्यास करून त्यावर दिवे लावून झाले आहेत. काही जण
इतिहासात
नापास होणार आहेत, काही जण पीटी सारख्या विषयात काठावर पास होणार आहेत तर
काही श्रीमंत बापांची नालायक पोरं कसलीच फिकीर नसल्यासारखी कॉलेजच्या
आवारात धूर सोडत मोठा आवाज करत त्यांच्या विदेशी बनावटीच्या मोटारसायकली
उडवणार आहेत. त्यांना आपण पास होऊ याची खात्री आहे. कॉपी करून, पेपर
तपासणाऱ्याला पैसे देऊन, धमकावून ही श्रीमंत बापांची पोरे पास होणार आहेत.
डॉक्टर होणार आहेत. स्वत:च्या चड्डीची नाडीही न बांधता येणारी ही पोरे,
गोरगरिबांच्या नाड्या पाहणार आहेत. त्यांचे प्राण पणाला लावणार आहेत,
त्यावर स्वत:च्या तुंबड्या भरणार आहेत. काही जण परीक्षेला न बसता, या सर्वांची मज्जा बघणार आहेत. याउलट, खेडेगावातून शहरात येऊन वार
लावून जेवणारी पण कसोशीने अभ्यास
करणारी काही मंडळी पास झालो तरी पुढे काय अशा विचारात चिंतातुर होऊन बसणार
आहेत. इतिहासात नापास होणारी मंडळी स्वत:ला शिवाजीमहाराज समजत आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांना जसा इतिहास समजला किंवा असावा असा वाटतो तसा पेपरात लिहिला आहे. आणि तो तसाच बरोबर आहे असा आग्रह ते परीक्षकांपुढे धरणार आहेत.
"शिवाजीमहाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून…", "छत्रपतिंच्या महाराष्ट्रात आम्ही असा अत्याचार होऊ देणार नाही…" ही असली वाक्ये आता "अमुक तमुक यांच्या निधनामुळे देशाची न भरून येणारी हानी झाली आहे…" या टायपातल्या बुळबुळीतपणावर आणून ठेवण्याचे काम शिवसेनेने करून ठेवले आहे. सेनेच्याच ष्टाईलनं विचारायचं झालं तर, शिवाजीमहाराज हे तुमची जहागीर आहेत काय? आम्ही त्यांच्या थराला जाणार नाही. पण एवढे नक्की विचारू की, कोणते काम तुम्ही शिवाजीमहाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केले आहे? तुम्ही तेवढे छत्रपती, आणि बाकीचे काय छत्रीपती? ज्या लोकांना अफजलखान कोण आणि जिवाला जीव देणारे मावळे कोण हे समजत नाही त्यांना शिवाजीमहाराज काय कप्पाळ समजणार? हेलिकॉप्टरमध्ये बसून किल्ल्यांचे फोटो काढल्याने शिवाजीमहाराज कळत असतील तर किंगफिशर एअरलाईन्सचे वैमानिकसुद्धा शिवाजीमहाराज-क्वालिफाईड म्हणायचे. दंडशक्तिचे महत्व समजू शकते. दंडशक्ति आणि गुंडशक्ती यात खूप फरक असतो. महाराजांनी स्वत: स्वैर दंडशक्ति संघटित करून स्वराज्य स्थापनेचे त्या काळातील अशक्य कोटीतील कार्य केले. महाराजांनी अफजलखानाच्या कपटकुटिल कारस्थानावर वरचढ ठरून त्याचा खात्मा केला. परंतु अफजलखान कोण आणि बाजीप्रभू देशपांडे कोण हे ओळखण्याची सारासार बुद्धी महाराजांकडे होती. त्यांनी अफजलखान समजून बाजीप्रभूचा कोथळा काढला नाही अथवा अफजलखान गडाखाली आल्यावर तोफांचे बार काढले नाहीत. आणि त्या प्रसंगानंतर "ओ अफजलखान, लढाईकडे लक्ष द्या जरा. आम्ही तोफा करेपर्यंत खिंड सोडू नका. जरा आमच्या दृष्टीआड झाले की लागले चिलीम फुंकायला." असे उपहासाने आपल्याच सेनेतील कुणाला म्हटल्याचा इतिहास ज्ञात नाही. नात्यांचे पावित्र्य पाळणे हा तर महाराजांचा ऐतिहासिक गुण आहे. आपल्या सावत्र बंधूंना भेटायला, दिलजमाई करायला ते हजारो कोस दूर तंजावरला गेले होते. इथे महाराजांचे हे स्वयंघोषित बडवे भावाला भेटायला एक चौक ओलांडून बांद्रयापर्यंतही गेले नाहीत. पेशवाई शौर्य कमी भाऊबंदकीच जास्त. इतिहासात जितके महापुरुष आढळतात तितकेच तोतयेसुद्धा. सदाशिवरावभाऊ उत्तरेत मोहिमेवर गेले. अटकेपार मराठ्यांचे झेंडे लागले. मग झाली ती पानिपतची लढाई. त्यात भाऊंचे काय झाले हे इतिहासाला ज्ञात नाही. पण त्यानंतर सुरू झाले ते सदाशिवरावभाऊंच्या तोतयांचे येणे. हे तोतये अनेक गोष्टी खोटं बोलायचे, कहाण्या सांगायचे. त्यांना वाटायचं हा भावनिक विषय आहे, आपल्याला कुणी आव्हान देणार नाही. पण दिव्य करायची वेळ आली की लगोलग परागंदा व्हायचे. प्रजेच्या दृष्टीला दृष्ट देता यायची नाही त्यांना. आज असेच सदाशिवभाऊंचे तोतये भावनिक साद घालून पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करीत आहेत. पूर्वीचे तोतये जनतेच्या सात्विकतेला भ्यायले तरी होते. त्यांना थोडी तरी चाड असावी. आताचे तोतये त्याहूनही निलाजरे आहेत. ते "तुम्हीच खरी प्रजा नाही" असा आरोप करण्याइतपत घसरलेले आहेत. एकदा नैतिकतेचे अध:पतन झाले की त्यानंतर कितीही खाली गेले की लाज वाटत नाही. शिवाजीमहाराजांनी आपल्या फौजेला जरब दिली होती, प्रजेच्या पानातील एका दाण्यालाही ढका लागता कामा नये. इथे तोतयाच्या फौजेने प्रजेलाच दम दिला आहे. तोतया होऊन स्वत:ला लाज आणायची की आपण शिवाजीमहाराज नाही पण त्यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्वांचा स्वीकार करायला हवा हे ओळखायचे? निदान स्वराज्याचे पाईक असलेले स्वाभिमानी देशप्रेमी मावळेतरी होऊ. शिवाजीमहाराज तरी अशा मावळ्यांपेक्षा वेगळे कुठे होते? ते काही शहाजीराजांचे आणि जिजाऊबाईसाहेबांचे पुत्र म्हणून आपोआप शिवाजीराजे झाले नाहीत. ते महालातील गाद्यागिरद्यापेक्षा आपल्या सवंगड्यांबरोबर भीमथडीच्या तट्टांवर मांड टाकून या राकट, कणखर देशात जास्त रमले. मावळ्यांबरोबर जातीने जुझं लढले, अंगावर जखमा घेतल्या, त्यावर तूप-मध आपल्या सवंगड्यासोबत लावले. तेव्हा ते सर्वांचे झाले, शिवाजीचे महाराज झाले. असाच आमच्यात रमणारा, आमच्यासारखा वागणारा, दिसणारा एक राजा आम्हाला अनेक वर्षांनी मिळाला आहे. कुणीही कितीही त्याला अफजलखान म्हटले तरी त्याचे कार्य लपत नाही किंवा संपतही नाही. ज्यांना प्रजेची भीती वाटते, आपण काही कार्य केले नाही याची खंत वाटते, आपल्यात काही कर्तृत्व नाही पण दुसऱ्यात ते आहे याची असूया वाटते त्यांनाच असला कर्मदरिद्रीपणा सुचतो. त्याने दुसऱ्याचे नुकसान होत नाही तर स्वत:चा कोतेपणा आणि मर्यादित कर्तृत्व दिसून येते.

No comments:
Post a Comment