आमच्या जिंदगीची कहाणी येका शब्दात सांगायची झाली तर तो शब्द म्हंजे "स्वाभिमान!". कद्दी कद्दी कुणासमोर झुकू नये असे बाळकडू आम्हांस ल्हानपणापासूनच मिळालेले. तोंडावर मुका मिळाला नाही तरी चालेल पण ढुंगणावर टोला पडता कामा नये अशी आम्हाला घरातून ताकीद होती. शाळेत बऱ्याच वेळा ओणवे उभे राहायची शिक्षा मिळायची पण आम्ही न्हेमी भिंतीकडे पृष्ठभाग ठेवूनच झुकायचो. बऱ्याच वेळेला भिंतीचा चुना चड्डीला लागून ती पांढरी व्हायची, पण ती पिवळी झाली नाही याचा रास्त अभिमान वाटायचा. डरकाळी फोडणारा वाघ झाला नाहीस तरी हरकत नाही पण कुणाच्या ताटाखालचे मांजर होऊ नकोस असं आमचे पिताश्री म्हणायचे. स्वाभिमानाच्या बरोबर असावी लागते ती डरकाळी. मी एकदा त्यांना वाघासारखी डरकाळी फोडून दाखवली होती. ते क्षणभर स्तब्ध झाले होते आणि त्यानंतर त्यांनी ते विधान केले होते. वाघासारखी डरकाळी फोडायला डायरेक्ट पोटातून ताकद लावावी लागते याचा अनुभव मी घेतला होता. त्याचकाळी वर्गात न्यूटनचा तिसरा नियम शिकवत होते तोही या दुर्दैवी प्रात्यक्षिकातून अचानक समजला. मग मी स्वत: गपचूप चड्डी धुवून गच्चीवर वाळत घातली होती आणि तिथेच वाळत टाकलेला पंचा कमरेला गुंडाळून तापलेल्या सिमेंटवर शेक घेत बसून राहिलो होतो. पुढे मग काही वर्षे वाघाच्या पिंजऱ्यासमोर बसवून त्याची डरकाळी कशी, दिसणे कसे, चालणे कसे हे पाहण्याची तपश्चर्या करण्याची आज्ञा मिळाली. आमच्या घरात वाघाचा मोठा फोटो होता. तो मी न्हेमी पाहत असे, त्यामुळे वाघाची भीती वाटायचे कारण नाही असं मी स्वत:ला समजावत होतो. आता मुंबईत खरा वाघ कुठून आणणार? आम्ही मग भायखळ्याला राणीच्या बागेत गेलो. तिथे वाघ होता. पण तो आमच्यापेक्षा स्वाभिमानी निघाला. आम्ही दोन तास त्याला डरकाळी फोडायला लावण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न केले. सुरुवातीची काही मिनिटे त्याने कुतूहलाने आमच्याकडे पाहिले. आम्ही लांबून वेडीवाकडी तोंडे करणे, आवाज करणे, त्याला अपशब्द बोलणे इत्यादी चेष्टा केल्या. पण तो अमराठी वाघ असावा. आमच्या अस्सल मराठी शिव्या त्याला कळल्या नसाव्यात. त्याने एक भली मोठी जांभई दिली आणि आपले पुढचे पंजे चाटण्याचे महत्वाचे काम चालू ठेवले. मोठे झालो की उत्तरेतील पट्टेरी वाघ नकोत, आमच्या सह्याद्रितीलच हवेत अशी मागणी करायची याची मानसिक नोंद करून ठेवली. चूप बसणारा कसला आलाय वाघ? वाघाला कसं सारख्या डरकाळ्या फोडता आल्या पायजेत. दिवसा, रात्री कधीही तोंड तयार पायजे. शिमग्यातल्या वाघासारखं नको.
हळूहळू आमच्यातील वाघ जागा होतोय याची जाणीव आम्हाला वयाच्या पंधराव्या वर्षीच आली. इयत्ता तिसरीपासून आमच्याबरोबर एकत्र कॉपी, आपलं, अभ्यास करणारा आमचा परम मित्र व्यंकू, गुपचूप परस्पर २१ अपेक्षित आणून वाचतो आहे याची खबर आम्हांस लागली. आमच्यातील वाघ गप्प कसा बसणार? स्वाभिमान फुरफुरू लागला, चष्मा रागाने वाफाळला. चष्मा वाफाळला की आम्हाला पुढचे काही दिसत नाही. आणि चष्मा काढला की पाच फुटाच्या पलीकडले दिसत नाही. "व्यंक्या, समजतोस काय तू स्वत:ला?" अशी आम्ही डरकाळी फोडली. आवाज थोडासा चिरकला, पण हरकत नाही, भावना नक्कीच पोचल्या. सकाळी पाच वाजता उठून डरकाळीचा रियाज करायला हवा असे मनाशी ठरवले. आमचे चुलतबंधू पलीकडच्या खोलीत रियाज करत असायचे. पण त्यांच्या डरकाळ्या नसायच्या. ते खर्जात गुरगुरण्याचा अभ्यास करायचे. अधूनमधून लाकडावर काहीतरी खरवडल्याचाही आवाज यायचा. बहुधा आवाजाबरोबर नख्यांना धार लावायचा सराव करत असावेत. करूदे. आमची डरकाळी उद्या ऐकू आली की पाचावर धारण बसेल त्याची. मग दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे पाच वाजता उठून आम्ही डरकाळीचा तीव्र स्वर लावला तर आमचा कुत्रा बाहेर दिवाणखान्यात भुंकू लागला. आमच्याकडे पाच मांजरे आहेत. ती मानेवरील केस पिंजारून पाठीची कमान करून आमच्या अंगावर चाल करून येऊ लागली. पाळीव प्राणी ते. त्यांनी आयुष्यात कधी खरा वाघ बघितलेला नसल्याने त्याची भीती वाटत नाही. त्यामुळे त्यांना आम्ही माफ केले. पण मातोश्री, पिताश्री दोघेही खोलीत आले आणि आमची हजेरी घेऊ लागले. मांसाहेबांना आमच्या प्रकृतीची फार चिंता. त्यामुळे आम्ही जेवल्यानंतर एक ढेकर जरी जास्त दिली तर दोन हवाबाण हरडे हातावर ठेवत असत. आमच्या अवेळी रियाजाच्या आवाजामुळे ते दोघे घाबरून गेले होते. त्यांना मी रियाजाचे कारण सांगितले. त्यांच्या नजरेत कौतुक होते की कीव ते समजले नाही. "ठीक आहे, करा रियाज. आवाज फुटायचे वयच आहे तुमचे. सध्या रेकण्यासारखे वाटत असले तरी हळूहळू होईल तयार. आपला बाणा आणि स्वाभिमान त्यातून व्यक्त झाला पाहिजे एवढे पहा." असे पिताश्री म्हणाले. मी त्यांच्याकडे पलीकडून गुरगुरण्याचा आवाज येतो त्याची तक्रार केली. त्याने माझे चित्त विचलित होते. तेव्हा ते म्हणाले,"इतरांच्या डरकाळ्यात, गुरगुरण्यात आपली डरकाळी उठून ऐकू आली पाहिजे. तेव्हा तक्रार न करता रियाज कर." मग मी हेडफोन लावून रियाज करू लागलो. इतरांनी कितीही बोंबलले तरी मला ऐकू येत नसे.
पिताश्रींचे एक मित्र आहेत. त्यांना शिकारीची आवड आहे. मलाही शिकारीला जायचं होतं. मी म्हणालो, आता मला डरकाळी छान फोडता येते. पूर्वी आमचा कुत्रा पण भीत नसे, आता तोही घाबरू लागला आहे. मी डरकाळी फोडली की दिवाणखान्यातून उठून चक्क बाहेर जाऊन बसतो. भित्रा लेकाचा. मला तुमच्याबरोबर शिकारीला यायचं आहे. त्यांनी मला सांगितले वाघ होऊन स्वत: शिकार करायची, डरकाळ्या फोडायच्या, जखमी झालं की स्वत:च्या जखमा चाटत बसायचं हे काही खरं नाही. त्यापेक्षा तरस व्हावं. वाघाला, सिंहाला शिकार करू द्यावी. मग आपण हळूच कडेकडेने तिरकं तिरकं चालत यायचं. आपलं एकूण खोकड ध्यान, दिसणारे सुळे असं सगळं अमंगळ अभद्र दर्शन झालं की वाघ सिंहांसारखे प्राणीसुद्धा किळसयुक्त भीतीने बाजूला होतात. मग आपण हॅः हॅः हॅः असं निर्लज्ज हास्य करायचं आणि ती शिकार लांबवायची. इंटरेस्टिंग. पिताश्रींना हे कधीच पटलं नसतं. म्हणून त्यांना विचारायला गेलोच नाही. पण, इंटरेस्टिंग आहे, व्हेरी इंटरेस्टिंग. पण मला ओरडायला, म्हंजे, मला म्हणायचं होतं डरकाळ्या फोडायला पण आवडतं. काकांना विचारलं तरस डरकाळ्या फोडतं का? तर म्हणाले, तरसाला आयती शिकार महत्वाची असते. आधीच डरकाळ्या फोडल्या तर गपचूप डल्ला कसा मारता येईल? ह्या:! पुचाट तरस! ते काही नाही, मला ओरडायला आवडतं आणि आयती शिकारपण आवडते. काकांना मी खूप आवडतो. ते म्हणाले काही हरकत नाही. तुला डरकाळ्या फोडायला आवडतं ना? खुशाल घसा साफ करून घे. सावज सापडलं की मी तरसासारखा बरोबर येतो तिथे. आपण दोघं शिकार वाटून घेऊ. इंटरेस्टिंग. व्हेरी इंटरेस्टिंग. काका भारीच आहेत. मला खूप आवडतात ते. कित्ती ज्ञान आहे त्यांच्या डोक्यात. आमच्या पिताश्रींनी त्यांना इतके दिवस घरात का येऊ दिलं नाही बरं?

No comments:
Post a Comment