"हमारे नौजवान माउस को घुमाते है और पूरी दुनिया को डुलाते है" असे शब्द वडाप्रधानांनी काढले आणि इंटरव्हयूमध्ये "व्हॉट इज युवर हॉबी?" या प्रश्नाला "जावा, सी-शार्प सार!" असे उत्तर देणाऱ्या संपूर्ण जमातीला अगदी धन्य धन्य झाले. रात्री अपरात्री ऑफशोअर कॉल्स अटेंड करणे, प्रोजेक्ट मॅनेजरने तोंडाला येईल असे शेड्यूल कबूल केल्याने वीकएंडला ऑफिसमध्ये जाऊन कोड डी-बग करत बसणे, कलीग्जशी बोलताना "च्यायला पुढच्या वेळेला मी सालं डायरेक्ट बोलणार आहे, असल्या शेड्यूलवर आपण काम नाही करणार" वगैरे बोलणे आणि सकाळी स्क्रममध्ये बोलताना,"येस, शुअर, नो प्रॉब्लेम" असं सांगणे यात आपण दुनियेला डुलवतो आहे हे लक्षातच आलं नव्हतं. नाही म्हणायला कंपनीच्या "सोशल" गेट-टुगेदरमध्ये माझ्या गोऱ्या बॉसला माझ्यासमोर बसून डुलताना पाहिले होते. मला वाटले होते तो जॅक डॅनियल्सचा प्रभाव असावा. लेकाचा दोनमध्ये आऊट झाला असे अनुमान मी काढले होते. आता माझ्या लक्षात आलं, त्या गेट-टुगेदरमध्ये मी त्याच्यासमोर लॅपटाॅप उघडून बसलो होतो. त्याचं झालं असं की आमचा प्रोजेक्ट मॅनेजरही तिथे होता. मी बॉससमोर समोर डाएट कोक आणि डिशमध्ये फ्रूटस घेऊन बसलो होतो (हो, आमच्या पार्टीची परमावधी डाएट कोकवर होते). तर मला बघून आमच्या टेबलापाशी आला आणि म्हणाला,"आय नो धिस इज रियली शेमलेस ऑन माय पार्ट, बट वी रियली गेट धिस बग फिक्स्ड बाय टुडे, एल्स प्रोजेक्ट इज गोइंग इन रेड." साल्याला माहीत की मी कुठेही गेलो तरी लॅपटाॅपची बॅग गळ्यात अडकवून असतो. असा राग आला होता की समोरचं डाएट कोक उचलून त्याच्या थोबाडावर फेकावं. बॉसचा चेहरा असा, की, कस्टमर कम्स फर्स्ट, डू व्हॉटेव्हर यू कॅन. मग आमच्या अंगातला भारतीय सेवाभाव उचंबळला आणि लॅपटाॅप उघडला गेला. मान वर झाली तेव्हा प्रोजेक्ट मॅनेजर झुलत होता आणि बॉस डुलत होता. माझ्या कामावरच्या श्रद्धेनंच त्यांना डुलवलं हे आज वडाप्रधानांच्या भाषणामुळं कळलं. खूप बरं वाटलं. इतके दिवस हे लोक मला नुसते ताबडून घेताहेत असंच वाटायचं. आता उद्यापासून यांना असं डुलवतो की बासच.
पण काय भाषण! एक तासाच्या भाषणावर एखादे पुस्तक लिहिता येईल इतके मुद्धे त्यांनी मांडले. सकाळी ब्लॅक कॉफीचे किमान दोन मग रिकामे होईपर्यंत एकही ज्ञानेन्द्रिय नीट काम करत नाही आमचं. परंतु हे भाषण ऐकताना दोन रेडबुल पोटात गेल्यासारखे वाटत होते. खुर्चीवर उभे राहून हात वर करून ओरडावे असे वाटत होते. हे भाषण एका नेत्याचे नव्हते, पंतप्रधानांचे नव्हते. हे भाषण हे आपल्यातीलच एकाचे वाटत होते. अभिनिवेश होता, पण तो सच्चा होता. अभिमान ओसंडून वाहत होता, पण गर्वाचा लवलेश नव्हता. निवडणूक जिंकणे ही एक जबाबदारी असते, खुर्ची भूषवण्याची संधी नव्हे हे शब्द संघाच्या मुशीतून बाहेर पडलेल्या स्वयंसेवकाचेच असू शकतात. शाखेचे कार्यकर्ते जसे कुणाच्याही घरी जाऊन खाली मांडी घालून बसतात, जे काही घरात बनले असेल ते त्याच कुटुंबाचा एक भाग होऊन खातात, त्यांच्या सुखदु:खात सहभागी होतात. नुसती कोरडी सहानुभूती देत नाहीत तर समस्या सोडवायला मदत करतात. कित्येकदा पदरमोड करून. संघात कुणाला कामासाठी पगार मिळत नाही, अनुदान मिळत नाही. हा सर्व सेवाभावीपणा, सच्चेपणा मोदींच्या भाषणातून दिसत होता. जणू काही आपल्या घरात आले आहेत, आपल्यासमवेत खाली सारवलेल्या जमिनीवर बसले आहेत. मला खात्री आहे, पंतप्रधान असोत वा नसोत ते असेच बोलणार, असेच वागणार. त्यांच्या भाषणात जे जे सर्वसामान्य माणसाला हवे असते ते सर्व आले.
भारताकडे काय नाही? खंडप्राय देश, सुपीक जमीन, महाकाय नद्या, खनिजे, हजारो किलोमीटर लाभलेला किनारा, घनदाट वने अशी नैसर्गिक संपत्ती, तर त्याबरोबर हजारो वर्षांची अभिमानास्पद संस्कृती, घट्ट अशी सामाजिक वीण, आईवडिलांचा आणि थोरांचा आदर करणारे संस्कार, तैलबुद्धी हे सर्व आपल्याला लाभले आहे. पण तरीही एक राष्ट्र म्हणून आपण एकसंघ नाही. "मला काय त्याचे, माझे मला मिळाले म्हणजे झाले" ही वृत्ती. घर चकचकीत ठेवणारे आपण रस्त्यावर बिनदिक्कत थुंकतो, कचरा टाकतो, दंगा झाला की सरकारी मालमत्तेची नासधूस करतो. एखादा जर थुंकू नका, कचरा करू नका असे सांगू लागलाच तर त्यालाच "शानपट्टी घरी बायकोसमोर कर" असे उद्दामपणे सांगितले जाते. स्वत:पुरती शिस्त, स्वच्छता पाळणारे असे आपण, रस्त्यावर आलो की अक्षरश: जनावरे होतो. असे का? सर्व जगात भारतीयांचा हात जोडून नमस्कार ओळखला जातो. हात जोडून नमस्कार करणे नम्रतेचे प्रतीक आहे, ती आपली संस्कृती आहे. पण आज आपण दुसऱ्याचा आदर करतो का? कसली तरी अदृश्य अशी एक शर्यत अथवा स्पर्धा करतो आहोत असे आपले जगणे झाले आहे. त्यात फक्त मी आणि मीच जिंकले पाहिजे, बाकीचे सर्व आडवे झाले पाहिजेत असा आपला आग्रह असतो. या स्पर्धात्मक जीवनामुळे आपण आदर करणे विसरलो. मी फक्त माझ्यासाठी जगणार अशी आपली जेव्हा धारणा झाली तेव्हाच आपण राष्ट्र म्हणून विस्कळीत होऊ लागलो. प्रादेशिक राजकारण वेगळे राष्ट्रीय राजकारण वेगळे हा जो प्रकार झाला आहे तो याचेच उदाहरण. राष्ट्रीय पातळीवरच्या समस्या या आपल्या नाहीत, मी माझ्या घरापुरते पाहतो. चीन तिकडे घुसखोरी करू दे, मला या आमच्या राष्ट्रवादीच्या टग्याने एफएसआय वाढवून दिला, मी त्याला मत देणार असे आपले झाले आहे. आपण कसले राष्ट्रप्रेमी? आपण धृतराष्ट्रप्रेमी. आंधळे असल्याचे भासवून सगळ्या राष्ट्रीय समस्यांकडे दुर्लक्ष करायचे. मोदींनी हे नेमके ओळखले आहे. राष्ट्र म्हणून आपण सर्वांनी एक झाले पाहिजे या भावनेतूनच त्यांनी गांधीजींच्या जनआंदोलनाचे उदाहरण देऊन सांगितले, जे जे काम आपण कराल ते राष्ट्राच्या उभारणीसाठी चालले आहे हे ध्यानात ठेवा. किती सोपे करून दिले आपल्याला! उगाच जडबम्बाल शब्द नाहीत, क्लिष्ट योजना नाहीत, मी असे करीन आणि तसे करीन अशा वल्गना नाहीत. हे सर्व सर्वांनी करायचे आहे, फार नाही, जे तुम्ही करता तेच पूर्ण मन लावून करा. एक एक गोष्ट ही आपल्यापुरता आंदोलनसहभाग झाला पाहिजे. आपण जे करतो आहे तो एक आंदोलनाचा भाग आहे असे वाटू लागल्यावर जो अभिमान मिळेल त्यानेच हे राष्ट्र एकसंघ होईल.
मोदी हे भारताला पडलेले एक स्वप्न आहे. केवळ सत्तेत येण्यासाठी या माणसाने निवडणूक लढवलेली नाही. निवडून दिल्यावरही "च्यायला, खरंच निवडून आलो, आता काय करायचे?" असे त्यांना वाटलेले नाही. काय करायचे हे त्यांनी अनेक वर्षांपूर्वी ठरवलेले आहे. त्यावेळी ते स्वयंसेवक होते. आता पंतप्रधान आहेत इतकेच. मला तर वाटतं मोदी ही एक एक्सप्रेस गाडी आहे, पंतप्रधानपद हे केवळ मार्गात आलेले जंक्शन आहे. जंक्शन मागे पडल्यानंतरही ही गाडी त्याच वेगाने पुढे जाणार, त्यात बरोबर आलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी पोचवणार यात शंका नाही. संधी मिळालेली आहे, आपण या गाडीत असायलाच हवं.

No comments:
Post a Comment