Tuesday, September 30, 2014

सांबारमें पनीर

अम्माsssss! अईसा अमको चोडके जेल में मत जाओ अम्माsssss! तुम जेल जायगा तो अम किदर जायगा? मंदिरमें भगवान नै तो भक्त मंदिर में क्या सिर्फ घंटा बजाएगा क्या अम्मा!! तुम जाता तो वो पनीर आता. अम इतना दिन रसमलाई काया, अब ये फटा हुआ दूध काना पडेगा अम्मा! अमको सांबारमें बैंगन अच्चा लगता अम्मा, ये पनीरको सांबार में देका तो मेरे दिमाग का मेदूवडा हो गया अम्माssss! द्राविड कल्चरमें ये पनीर कैसे आऊर किदर से आया? अम पूरा कोशिश किया, साऊथ इंडियन रेसिपी सिर्फ तामीलमें रखा, सांबारमेंसे नॉर्थ इंडिया को बाहर रखा, यहां तक की पूरा गांवमें सब बोर्ड तमिलमें किया. होटलमें मेनूकार्डभी तमिल रक्खा. टूरिस्ट लोग कन्फ्यूज हुआ तोबी पर्वा नै किया. मेरे होटल का मेनू पूरा तमिलमें इसका मेरेको बहोत गर्व म्हैसुस हुआ, मैने नीचे मेरे वाइफ़ का नाम डाला था - प्रोप्रायटर यम्म. लथा. मै गवरमेंट एमप्लॉई, मेरे नाम से कैसे रकेगा. एकबार येक भय्या टूरिस्ट आया. वो पंजाबसे था. पगडीवाला. दाढीवाला. उसने कबी डोसा इडली देका नै था. मैने उसको मेनूकार्ड दिया. मनमें हस रहा था, साले, पढ तमिल अब. ओ गधा क्या किया मालूम? पढनेकी कोशिशभी नै किया. सालेने "प्रोप्रायटर यम्म. लथा" पर उंगली रखकर बोला,"ये दे दो एक प्लेट. सांबार अच्चा उसपेही डालके लाव. और सुनो, ठंडा है तो गरम करके लाव."  मई उसको बोलनेवाला था,"साले, ये क्या तुमको टेस्टी आयटम लगा क्या? इतना बाकी अच्चा आयटम छोडके येही मिला तुमको?" लेकिन मै भौत इज्जतसे उसको बोला,"साब, ये अपना बिवी का नाम ऐ. आजतक मुझेबी हजम नही हुआ तो आपको कैसा होगा. आप अमारा फेमस इडलीसांबार ले लो." बाद में उससे बात करते पता चला, ये भय्या, सरदारजी है. अम्माकी सौगंध, जिंदगीमें पहलीबार दाढीवाले भय्येको इडली सांबार खाते देखा. सांबारमेंसे मुरुंगाक्काई निकालके ऐसा चूस रहा था जैसा मुर्गी की तंगडी. मैने इडलीपे सांबार डालके उपर चेरीके माफिक कददू रखा था, उसको निकाल के बाहर टेबलपे फेक दिया. मेरा माथा सनक गया. इत्तना इन्सल्ट अम कैसे बर्दाश्त करेगा? मई बोला,"सार, चेन्नईमे धिस इज कन्सिडर्ड अॅज फाऊल. सांबार में कददू ए कानून ऐ. ओ अम नै डालेगा तो अमारा फाऊल, तुम नै खायेगा तो अम दोनो का फाऊल. अम दो साल पैले दिल्ली गया. तब हमे मालूम पडा भय्ये अलग अलग टाईपके होते है. वो बात अलग, मै ये बोल रहा था, चांदनी चौकमें किसीने मुझे बताया मिनीमम तीन पराठा काना पडेगा, कानून ऐ. मै जिंदगीमें जितना आटा नै काया उतना वो एक दिनमें काया. उपरसे लस्सीबी जबरदस्ती पिलाया. मै कुतुबमिनार देकने जानेवाला था, वो क्यान्सल करके डायरेक्ट होटलपे जाके बेडपे लेट गया. तबीच मैने कसम काया, मद्रासमें अम्माको बोलके ऐसाच कानून सांबार का बनानेका. तबी सांबार-कददू कानून बना. अपने थलैविने बनाया." मै ऐसा उसको बोल रहा था. सरदार बोला,"कददू वददू छोडो, इसमे बकायदा पनीर डाल दो, ऐसा मस्त लगेगा."ओ सुनके मैने उसको बिल लाके दे दिया. सांबार में पनीर? ऐसा सोचनाबी फाऊल लगता ऐ. सांबार में कददू  जैसी तामिळनाडू में अम्मा. उसके बिना अम सोचबी नै सकता.

और आज ए मै क्या सुन रहा हूँ. अम्मा जेल में? मेरे लाईफमें इतना एम्प्टीनेस कब्बी फील नै किया. वैसे एकबार किया था, वोही दिल्लीके टूरपे. ऐसेही घूम रहा था कही, किसीने गुंडेने आके चाकू दिखाकर मेरेको पूरा एम्प्टी किया था. जब चक्कू गर्दनपे लगता है तो जेब तो एम्प्टी होता हैही, पेटबी इनव्हॉलंटरी एम्प्टी होता ऐ. लेकिन अम्मा जेलमें? ए मै कबी बर्दाश्त नै कर सकता. जबसे न्यूज मिला ऐ, रो रो के बुरा हाल हुआ ऐ. होटलबी नै खोला आज. ए होटल का उद्घाटनबी अम्माके हाथसे हुआ था. मैने तीन फूट बाय तीन फूट वायर का स्पेशल चेअर बनवाके लिया था सिर्फ अम्माके लिए. उसपर बैठकर अम्माने मुझे "तंबी, भौत अच्छा इडली था" ऐसा आशीर्वाद दिया था. आजबी वो कुर्सी अमारे होटलमें ऐ. उसके उपर मैने मंदिर बनाया ऐ. सुब्बे पैले नहाधोके मै पैले उस कुर्सीकी पूजा करके अम्माका आशीश लेता और उसके बादही होटल खोलता हूँ.  मै सोचही नै सकता अम्मा आपका जेलमें कैसा चल रहा है. कोई मुझे बताया, आपको पुलाव खानेको मजबूर किया जा रहा है. अम्मा, आप की सौगंध खाके कहता हूँ, दुनिया की कोई शक्ती आपको पुलाव नही खिला सकती. लेकिन अम्मा, इस भक्तको इतना तो बोलो, आपको काने के थालीमेंबी पुलाव, पनीर ऐसा कूच बी अच्चा नै लगता, तब सीएम के खोलीमें ए पनीर कैसे आया? मै ओथ सेरेमनी देख नही पा रहा था. मुझे लगा अचानक बरसात शुरू हो गई, लेकिन पता चला की मै रो रहा हूँ. पैले मेरेको लगा अंदर किचनमें बिवीने सूखे मिरचीका तडका लगाया उससे ऐसा हो रहा है. लेकिन मैहीच नै, टीव्हीपे सब मिनिस्टर रो रहे थे. अम्माSSSS, कैसे आउर किसके लिये जियेंगे हम? पेहले सीना तानकर बताते थे, अमारी नेता कौन, अमारी पुरात्ची थलैवि! उनका सारी सीलेक्शन, सँडल कलेक्शन, असेम्ब्ली इलेक्शन सबकूच क्रांतीकारी था. नै अम्माSSSS नै अमको पनीरबुर्जी अच्चा नै लगता!

अब हमको ये जीवनसे नफरत हो गई है. अम आउर अमारा बिवी दो दिनसे रो रहा है. दो दिन पैले छे इडली आउर सिर्फ दो दोसा (पेपर नै, सादा) खाया था, उसके बादमें कॉफी तक नै पिया. मेरा वजन दो किलो कम हुआ ऐ. पेट के नीचे लुंगी का गाठ पैले दिकता नै था, अब दिकने लगा ऐ. कल पूरी रात होटल में आपके मंदिरमें आपके कुर्सीके सामने बैठके निकाला. सोचा मेरी तपश्चर्यासे आपका वनवास खतम हो जाये और मुझे दिव्यग्यान प्राप्त हो जाय. सुबहको देका तो आप अभीभी जेल में है. ये देखके मै और डिप्रेस हो गया. लेकिन कमसे कम रात को चूहे होटलमें अंदर कैसे आते है उसका दिव्यग्यान हो गया. आप के कुर्सीके पीछे कोई नै जाता, उदरहीच ये चूहे लोगने आर्रामसे बिल बना डाला है. जब आपने उन्हे बनाने दिया ऐ तो अम कैसा हाथ लगायेगा. अम उनको आपका आशीर्वाद समझके बिलके सामने खाना आउर दक्षिणा रख दिया ऐ. अब लाईफमें कूच करने का जी नै करता. कही मन नै लाग रहा ऐ. बदनमें ताकत है ऐसा लगता नै है. डॉक्टरको दिखाया, तो उसने विजयकांथ के फाईट सीन्स प्रीस्क्राईब किया. बोला दो सीनमें फुर्ती आयेगी. लेकिन अम्माSSSS माफ करना मुझेSSSS. जब मैने सीन देखना चालू किया तब विजयकांथ जजकेही ड्रेसमें दिखने लगा. आउर वो जिसे मार रहा था, वो आप थी अम्माSSS. अब मुझे इस दुनिया में नै रहना. कलियुग है ये! जहा मेरे देवता का सम्मान नै उस जगतमें मैं नै रहूंगा! मै आ रहा हूँ अम्मा! आप के पास जेल में! आपके चरणोमें.

Sunday, September 28, 2014

मेडीसनमां मोडीफिकेशन

"हमारे नौजवान माउस को घुमाते है और पूरी दुनिया को डुलाते है" असे शब्द वडाप्रधानांनी काढले आणि इंटरव्हयूमध्ये "व्हॉट इज युवर हॉबी?" या प्रश्नाला "जावा, सी-शार्प सार!" असे उत्तर देणाऱ्या संपूर्ण जमातीला अगदी धन्य धन्य झाले. रात्री अपरात्री ऑफशोअर कॉल्स अटेंड करणे, प्रोजेक्ट मॅनेजरने तोंडाला येईल असे शेड्यूल कबूल केल्याने वीकएंडला ऑफिसमध्ये जाऊन कोड डी-बग करत बसणे, कलीग्जशी बोलताना "च्यायला पुढच्या वेळेला मी सालं डायरेक्ट बोलणार आहे, असल्या शेड्यूलवर आपण काम नाही करणार" वगैरे बोलणे आणि सकाळी स्क्रममध्ये बोलताना,"येस, शुअर, नो प्रॉब्लेम" असं सांगणे यात आपण दुनियेला डुलवतो आहे हे लक्षातच आलं नव्हतं. नाही म्हणायला कंपनीच्या "सोशल" गेट-टुगेदरमध्ये माझ्या गोऱ्या बॉसला माझ्यासमोर बसून डुलताना पाहिले होते. मला वाटले होते तो जॅक डॅनियल्सचा प्रभाव असावा. लेकाचा दोनमध्ये आऊट झाला असे अनुमान मी काढले होते. आता माझ्या लक्षात आलं, त्या गेट-टुगेदरमध्ये मी त्याच्यासमोर लॅपटाॅप उघडून बसलो होतो. त्याचं झालं असं की आमचा प्रोजेक्ट मॅनेजरही तिथे होता. मी बॉससमोर समोर डाएट कोक आणि डिशमध्ये फ्रूटस घेऊन बसलो होतो (हो, आमच्या पार्टीची परमावधी डाएट कोकवर होते). तर मला बघून आमच्या टेबलापाशी आला आणि म्हणाला,"आय नो धिस इज रियली शेमलेस ऑन माय पार्ट, बट वी रियली गेट धिस बग फिक्स्ड बाय टुडे, एल्स प्रोजेक्ट इज गोइंग इन रेड." साल्याला माहीत की मी कुठेही गेलो तरी लॅपटाॅपची बॅग गळ्यात अडकवून असतो. असा राग आला होता की समोरचं डाएट कोक उचलून त्याच्या थोबाडावर फेकावं. बॉसचा चेहरा असा, की, कस्टमर कम्स फर्स्ट, डू व्हॉटेव्हर यू कॅन. मग आमच्या अंगातला भारतीय सेवाभाव उचंबळला आणि लॅपटाॅप उघडला गेला. मान वर झाली तेव्हा प्रोजेक्ट मॅनेजर झुलत होता आणि बॉस डुलत होता. माझ्या कामावरच्या श्रद्धेनंच त्यांना डुलवलं हे आज वडाप्रधानांच्या भाषणामुळं कळलं.  खूप बरं वाटलं. इतके दिवस हे लोक मला नुसते ताबडून घेताहेत असंच वाटायचं. आता उद्यापासून यांना असं डुलवतो की बासच.

पण काय भाषण! एक तासाच्या भाषणावर एखादे पुस्तक लिहिता येईल इतके मुद्धे त्यांनी मांडले. सकाळी ब्लॅक कॉफीचे किमान दोन मग रिकामे होईपर्यंत एकही ज्ञानेन्द्रिय नीट काम करत नाही आमचं. परंतु हे भाषण ऐकताना दोन रेडबुल पोटात गेल्यासारखे वाटत होते. खुर्चीवर उभे राहून हात वर करून ओरडावे असे वाटत होते. हे भाषण एका नेत्याचे नव्हते, पंतप्रधानांचे नव्हते. हे भाषण हे आपल्यातीलच एकाचे वाटत होते. अभिनिवेश होता, पण तो सच्चा होता. अभिमान ओसंडून वाहत होता, पण गर्वाचा लवलेश नव्हता. निवडणूक जिंकणे ही एक जबाबदारी असते, खुर्ची भूषवण्याची संधी नव्हे हे शब्द संघाच्या मुशीतून बाहेर पडलेल्या स्वयंसेवकाचेच असू शकतात. शाखेचे कार्यकर्ते जसे कुणाच्याही घरी जाऊन खाली मांडी घालून बसतात, जे काही घरात बनले असेल ते त्याच कुटुंबाचा एक भाग होऊन खातात, त्यांच्या सुखदु:खात सहभागी होतात. नुसती कोरडी सहानुभूती देत नाहीत तर समस्या सोडवायला मदत करतात. कित्येकदा पदरमोड करून. संघात कुणाला कामासाठी पगार मिळत नाही, अनुदान मिळत नाही. हा सर्व सेवाभावीपणा, सच्चेपणा मोदींच्या भाषणातून दिसत होता. जणू काही आपल्या घरात आले आहेत, आपल्यासमवेत खाली सारवलेल्या जमिनीवर बसले आहेत. मला खात्री आहे, पंतप्रधान असोत वा नसोत ते असेच बोलणार, असेच वागणार. त्यांच्या भाषणात जे जे सर्वसामान्य माणसाला हवे असते ते सर्व आले.

भारताकडे काय नाही? खंडप्राय देश, सुपीक जमीन, महाकाय नद्या, खनिजे, हजारो किलोमीटर लाभलेला किनारा, घनदाट वने अशी नैसर्गिक संपत्ती, तर त्याबरोबर हजारो वर्षांची अभिमानास्पद संस्कृती, घट्ट अशी सामाजिक वीण, आईवडिलांचा आणि थोरांचा आदर करणारे संस्कार, तैलबुद्धी हे सर्व आपल्याला लाभले आहे. पण तरीही एक राष्ट्र म्हणून आपण एकसंघ नाही. "मला काय त्याचे, माझे मला मिळाले म्हणजे झाले" ही वृत्ती. घर चकचकीत ठेवणारे आपण रस्त्यावर बिनदिक्कत थुंकतो, कचरा टाकतो, दंगा झाला की सरकारी मालमत्तेची नासधूस करतो. एखादा जर थुंकू नका, कचरा करू नका असे सांगू लागलाच तर त्यालाच "शानपट्टी घरी बायकोसमोर कर" असे उद्दामपणे सांगितले जाते. स्वत:पुरती शिस्त, स्वच्छता पाळणारे असे आपण, रस्त्यावर आलो की अक्षरश: जनावरे होतो. असे का? सर्व जगात भारतीयांचा हात जोडून नमस्कार ओळखला जातो. हात जोडून नमस्कार करणे नम्रतेचे प्रतीक आहे, ती आपली संस्कृती आहे. पण आज आपण दुसऱ्याचा आदर करतो का? कसली तरी अदृश्य अशी एक शर्यत अथवा स्पर्धा करतो आहोत असे आपले जगणे झाले आहे. त्यात फक्त मी आणि मीच जिंकले पाहिजे, बाकीचे सर्व आडवे झाले पाहिजेत असा आपला आग्रह असतो. या स्पर्धात्मक जीवनामुळे आपण आदर करणे विसरलो. मी फक्त माझ्यासाठी जगणार अशी आपली जेव्हा धारणा झाली तेव्हाच आपण राष्ट्र म्हणून विस्कळीत होऊ लागलो. प्रादेशिक राजकारण वेगळे राष्ट्रीय राजकारण वेगळे हा जो प्रकार झाला आहे तो याचेच उदाहरण. राष्ट्रीय पातळीवरच्या समस्या या आपल्या नाहीत, मी माझ्या घरापुरते पाहतो. चीन तिकडे घुसखोरी करू दे, मला या आमच्या राष्ट्रवादीच्या टग्याने एफएसआय वाढवून दिला, मी त्याला मत देणार असे आपले झाले आहे. आपण कसले राष्ट्रप्रेमी? आपण धृतराष्ट्रप्रेमी. आंधळे असल्याचे भासवून सगळ्या राष्ट्रीय समस्यांकडे दुर्लक्ष करायचे. मोदींनी हे नेमके ओळखले आहे. राष्ट्र म्हणून आपण सर्वांनी एक झाले पाहिजे या भावनेतूनच त्यांनी गांधीजींच्या जनआंदोलनाचे उदाहरण देऊन सांगितले, जे जे काम आपण कराल ते राष्ट्राच्या उभारणीसाठी चालले आहे हे ध्यानात ठेवा. किती सोपे करून दिले आपल्याला! उगाच जडबम्बाल शब्द नाहीत, क्लिष्ट योजना नाहीत, मी असे करीन आणि तसे करीन अशा वल्गना नाहीत. हे सर्व सर्वांनी करायचे आहे, फार नाही, जे तुम्ही करता तेच पूर्ण मन लावून करा. एक एक गोष्ट ही आपल्यापुरता आंदोलनसहभाग झाला पाहिजे. आपण जे करतो आहे तो एक आंदोलनाचा भाग आहे असे वाटू लागल्यावर जो अभिमान मिळेल त्यानेच हे राष्ट्र एकसंघ होईल.

मोदी हे भारताला पडलेले एक स्वप्न आहे. केवळ सत्तेत येण्यासाठी या माणसाने निवडणूक लढवलेली नाही. निवडून दिल्यावरही "च्यायला, खरंच निवडून आलो, आता काय करायचे?" असे त्यांना वाटलेले नाही. काय करायचे हे त्यांनी अनेक वर्षांपूर्वी ठरवलेले आहे. त्यावेळी ते स्वयंसेवक होते. आता पंतप्रधान आहेत इतकेच. मला तर वाटतं मोदी ही एक एक्सप्रेस गाडी आहे, पंतप्रधानपद हे केवळ मार्गात आलेले जंक्शन आहे. जंक्शन मागे पडल्यानंतरही ही गाडी त्याच वेगाने पुढे जाणार, त्यात बरोबर आलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी पोचवणार यात शंका नाही. संधी मिळालेली आहे, आपण या गाडीत असायलाच हवं.

Wednesday, September 24, 2014

मंगळदशा

अवघा देश आज मंगळून गेला आहे. आजवर मंगळ म्हटलं की "हो का? फार त्रास होतो का हो? तरीच, तुमच्याकडे पाहिलं की वाटायचंच, बहुधा मंगळाची दशा चालू असावी." हे असे काहीसे उद्गार कानावर पडायचे. दररोज डब्यात दोडक्याची भाजी असणं, नेहमी कुणीतरी मागून चपलेवर पाय दिल्यामुळे तिचा एकलव्य होणं, विजेचं बिल भरायला दोन तास लायनीत उभं राहिल्यावर आपला नंबर आला की बारा वाजणं - म्हणजे आपले बारा आणि कर्मचाऱ्याचा पोबारा, नेहमीची फास्ट गाडी चुकल्याने कुर्डूवाडी एक्सप्रेसची गती उधार घेतलेल्या गाडीनं प्रवास करायला लागणे, कधी नव्हे ते आपण ऑफिसला लवकर पोचावं तर साहेब उशिरा, तर आपण उशिरा पोचावं तेव्हा आपलं स्वागत सायबांच्या चकचकीत टकलाच्या दर्शनानं होणं, कट्ट्यावर टीपी करत असताना एखादं सुरेख यंत्र दिसावं, त्यावर आपण एक सहजसुंदर नैसर्गिक प्रतिक्रिया व्यक्त करावी आणि नेमकं तेच त्या यंत्राच्या मेक्यानिकनं ऐकावं आणि त्यानं आपले स्क्रू टाईट करून सोडावे हे असले सगळे योग मंगळमहाराजांच्या कृपेने नशिबी आलेले असतात. दुर्दैवाचे मंगळावतार केवळ बाहेर थांबत नाहीत, घरातही मंगळ अगदी उजळून निघालेला असतो. कुटुंबाने गळ्यात घातलेले सूत्र, ते मंगळ का असते याचा उलगडा लग्नानंतर साधारण वर्षभरात होऊ लागतो. त्या मंगळाच्या सूत्रानेच पुढील आयुष्याची वाटचाल करावी लागेल, नजरेत राहील अशा कक्षेतच भ्रमण करावे लागेल असा गर्भित इशारा त्यात असतो. आणि ते तसेच होईल असे या मंगळाचे गुरुत्व असते. लग्नानंतर बहुतेक बायकांचे गुरुत्व वाढते असे आमचे निरीक्षण आहे. हल्लीसारखी वजन कमी करण्याची फ्याडे पूर्वी नव्हती. त्यामुळे गुरुत्व टिकून राही. असल्या जबरी गुरुत्वातून सुटका करून घेण्यासाठी जी एस्केप व्हेलॉसिटी लागते ती कुठल्याच भारतीय नवऱ्यात नसायची. सासुरवाडीला जास्त दिवस राहणाऱ्या जावयाला भले दशमग्रह म्हणोत, तो स्वत:च्या घरी केवळ एक उपग्रह असतो. स्वगृहीच्या मंगळाला प्रदक्षिणा घालत ब्रम्हांड फिरणे एवढेच त्याच्या हातात असते. असं सर्व असताना आपण तडक मंगळावर चढाई (शब्द वीररसात्मक आहे, उगाच भलते अर्थ शोधू नयेत) करणे धाडसाचे होते.

पण काही म्हणा, यानाने नेलेला भार फक्त पंधरा किलोचा असेल, पण तो असा अब्जावधी योजने दूर वाहून नेणे सोपे नाही. आजवर मला साधा दळणाचा डबा सायकलवर मागे लावून घरापर्यंत धड आणता आलेला नाही. सीतेने लंकेत जाताना वाटेत दागिने टाकले तसे आमच्या डब्यातून पीठ गळत गळत घरापर्यंत यायचे. इथे तर धरायला यानाला ह्यांडलपण नाही. पण या घटनेचं तसं आश्चर्य वाटायला नको. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी जे जे काही करायला लागणार होते त्याचे ज्ञान आपल्यात सुप्तपणे तयारच होते. ह्यांडल न धरता सायकल चालवणे, डब्बल शीट जाणे, ट्रकच्या मागील साखळी धरून आपण निवांत सायकलवर बसून घरंगळत जाणे, पेट्रोल वाचवण्यासाठी घाटात गाडी न्यूट्रलवर टाकून, दैवावर विश्वास ठेवून संपूर्ण घाट उतरणे, आणि खाली पोचले की गियर बदलून इंजिन ष्टार्ट मारणे या सर्व कला आपल्याला आत्मसात आहेत. कायम स्कूटर रिझर्व्हवर ठेवणाऱ्या माझ्या ओळखीच्या महाभागाने मला त्याचे कारण सांगितले होते. त्याच्या मते इंधनाचे वजनसुद्धा कार्यक्षमता कमी करते, म्हणून मी कमी पेट्रोल ठेवून वजन कमी करतो. माझी स्कूटर जास्त अॅव्हरेज देते. याच महाभागाने विमान ठराविक उंचीवर पोचले की खाली आणताना इंजिन बंद करून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेऊन उतरावे, त्याने इंधन वाचेल असा विचार व्यक्त केला होता. हे क्रांतिकारी विचार पुणे ३० (पावन मारुती चौक ते काळा हौद) या परिसरात अडकून पडले आहेत याचे मला दु:ख होते. दुसऱ्या एका थोर इसमाने इंजिन स्टार्ट करण्यापुरते पेट्रोल वापरून मग हळूच इंजिनाच्या नकळत रॉकेल सोडून इंजिनालाच फसवले होते. पुढे त्या इंजिनाने या सुपीक डोक्यासमोर हार मानून भंगारवाल्याच्या आश्रयाला जाण्याचा निर्णय घेतला असे ऐकू आले होते. पुण्यातील रिक्षेवाले नॅव्हिगेशन एक्सपर्ट आहेत. रस्त्यावर चालणारी माणसे हे केवळ दैवदत्त अडथळे आहेत असे मानून वेग मुळीच कमी न करता त्यातून लीलया मार्ग काढण्याची कला त्यांना आत्मसात आहेत. मार्गातील मायक्रोमीटियोराईट्स, चुकार अशनी चकवण्यासाठी हे ज्ञान उपयोगी नक्कीच पडेल. पुणेरी रिक्षावाला हात आणि पायाचा उपयोग पूर्ण कार्यक्षमतेने करतो. मीटर पळवून भाड्याला (पक्षी:पाशिंजरला) हात दाखवायचा आणि डावीउजवीकडे वळताना पाय बाहेर काढून आपला काय इरादा आहेत ते सांगायचे. ते सांगणेही "To whomsoever it may concern" या प्रकारातील असते. तात्पर्य एखाद्या रिक्षेवाल्याला मंगळयानातून पाठवले असते तर नॅव्हिगेशन हा प्रश्नच निकालात निघाला असता. कंट्रोल रूम, अनेक शास्त्रज्ञ, अभियंते यांची गरज राहिली नसती. इस्रोने हा विचार केला असेलच. पण रिक्षेचे मीटर यानावर बसवले असते तर ४७० कोटीत ही मोहीम झाली नसती. शिवाय या रिक्षेवाल्यानेही लांबच्या भ्रमणकक्षेतून नेले असते ते वेगळेच. "साहेब, गुरुवर सध्या वादळ सुरु आहे, आपण नवीन दिसता या भागात. मंगळावरून रिटर्न भाडं पण नाही. दुसरा कोणी आला नसता साहेब." हा ड्वायलॉक अशक्य नव्हता.

या मोहिमेला तर माणशी चार रुपये खर्च आला. वडापवालेसुद्धा यापेक्षा जास्त घेतात. ज्या देशात स्कूटर अथवा गाडी घेतल्यावर अभिनंदनाआधी पहिला प्रश्न "किती अॅव्हरेज देती?" असा येतो तिथं मंगळयानानं असलं जब्बरी अॅव्हरेज देऊन भारतीयांचा दीसू गोड केला यात शंका नाही. इस्रोचं कौतुक अशासाठी वाटतं की भ्रष्टाचारी राजकारणी आणि नतद्रष्ट गत सरकार यांच्या हातात फंडिंग असूनही आतापर्यंत कुणालाही पहिल्या झटक्यात नजमलेली  गोष्ट करून दाखवली. काही असो, भारतीयांचं डोकं सुपीक आहेच, गरज आता फक्त आहे समाज म्हणून सुधारण्याची, शिस्तबद्ध, भ्रष्टाचारमुक्त होण्याची. भ्रष्टाचाराची मंगळदशा संपून देशाचा उज्वल काल जवळ येतो आहे आहे अशी अपेक्षा करूया.

Saturday, September 13, 2014

मानाचा गनपती

श्री छगनबाप्पा भाहूबली यानला आपला जय भीम! या दिवसाचा किती रोज आपन इंतजार करत होतो हे आपल्याला म्हाईत नसन. दोनतीन म्हईन्याखाली आपन मिटीण्गमदे लई गर्जला होता. कुनी इद्यापिठाचं नाव बदला म्हनून आरडला की आपल्याला बरं वाटतं. मायला आपन चार सालं बारावीत काडली, येवढ्या प्रचंढ आणभवावरून इद्यापिठात प्रवेश भेटायला पायजे हुता. पन भ्येटला न्हाई, म्हने परशेण्टेज कमी हाये. तवापासनं इद्यापिठाच्या समोरून जरी ग्येलो तरी ध्येईचा निस्ता भडका हुतो. तवा तुमचा ष्ट्यांड आपल्याला येकदम पटल्याला हुता.  मी तर म्हन्तो दर दोनपाच वर्सानं जसं गवरमेंट बदलतं तसंच इद्यापिठाची नावंपन दर पाच वर्सांनी बदलली पायजेत. पन थितं मंडळी मराठा आरक्षणाचं ज्येवान जेऊन दात कोरत बसलेली, आपल्या हातावर बडीशेप ठेवून पसार झाली. त्या सर्वांचे आप्राध तुमी पोटात घालून पक्षाशी येकनिष्ठ ऱ्हायलात. लोकान्ला वाटतं छगनबाप्पा न्हाई न्हाई ते खातात म्हनून लंबोदर झाले हायेत, पन वस्तुस्थिती आपल्याला म्हाईत आहे. आपल्या पक्षाला भऊजन चेहरा पायजे आसं जेव्हा सायब बोलले तेवा, गणपतीच्या उंदराशप्पत, आपलाच मुखडा डोळ्यासमोर आला. आपल्या हॅप्पी बर्थडेला, चौकात लावलेला आपला ह्यांडसम फोटो बगीटला की वाटतं, शिन्मात गेला आसता तर सगळ्या हिरविणी आपल्याच मागं लागल्या आसत्या. आपल्याला खात्री हाये थितं पन तुमी पिच्चरची नावं बदलायला लावली आसती. हम आपके है कोण पिच्चरमदी सफारी सूट घालून आपली वेण्ट्रि झाली आसती तर माधुरी दीक्षित तेरा का छब्बीस गाण्यांत तुमच्याभवती नाचली आसती. तवा आपला चेहरा पक्षाला येकदम फिट बसनार हेची खात्री. आपल्या त्या जब्बरी मिशीखालून जे शब्द भायेर येतात ते भऊजन समाजाच्या हिताचेच आसतात. आपन येकदम सही बोलला, कमळाबाईच्या पक्षात भौजन म्हनून आमाला कायच इज्जत भेटली नाही. येकदा आपला येक बिगाडलेला दोस्त शाखेवर घेऊन ग्येला आपल्याला. तर थितं गोल करून सगळे येकत्र बसलेले. आरे भऊजन म्हनून आमाला काय शेपरेट इज्जत बिज्जत काय द्याल की न्हाई? शाखेत गोलाला मंडल म्हनतात आसंही कळलं. वाटलं या मंडल आयोगात आपल्याला काय तरी येगळा माण भेटणार. आपला दोस्त म्हनला हितं तसलं काय नसतंय. हितं एकच गोष्ट, देशप्रेम. जात कुनी इचारत न्हाई आन मानतबी न्हाई. मी बोललो, आयला मग आपल्या जातीचा काय उपयोग? त्यापरीस आपला पक्ष बरा. हातात काय पडू देत न्हाई, पण निदान इलेक्शनच्या टायमाला आपला गनपती म्हनून मखरात बसवतात. यंदाच्या इलेक्शनला पक्षाच्या गनपतीचा मान आपल्याला लाभला ह्ये पाहून दुपारच्या टायमाला ठंडी बियर लावल्यासारखं गारीगार वाटलं. आपले वाहण म्हनून आमची नेमनूक करता आली तर पाहावे ही विणंती. आपल्या हातात मोदक पडल्यास आमच्या तोंडात निदान खोबऱ्याचा तुकडा पडेल अशी आमची धारणा हाये.

आपल्या मापाचा दनकट पाट बनवायला टाकला आसल्याची बातमी आली हाये. पाटावर बसवून, डोक्यावरून रेशमी कापाड टाकून तुमाला वाजत गाजत मांडवात आननार हायेत. दादा, सायेब आन जितेंदरभाऊ सोता पाट उचलूण आपला हा भऊजन गनपती वाहनार हायेत. सायेबांनी जितेंदरभाऊंना गाझा बचाव शर्ट घालून मिरवणुकीला येऊ नका असा दम दिला हाये आसे ऐकतो. रोजे आले की ट्रंकेतून भायेर काडा, तोवर डांबराच्या गोळ्या घालून ठेऊन द्या आसा सल्ला दिला हाये. काय पन आसो, आपन सौ टका थितं नाचायला आसनार. आपली मूर्ती घ्येऊन सायेब अख्ख्या म्हाराष्ट्रात फिरणार हायेत. प्रत्येक सभेच्या सुरुवातीला आपल्यासमोर नारळ वाढवणार. आपल्या पक्षानं भऊजन समाजाचा कसा आदर केला हाये त्याचं उधारण म्हंजे पक्षानं केलेला छगनबाप्पांचा आदर. काडीमोड होऊन सायेबांच्या पक्षात आले तवापासून त्यांना पूर्वीच्या दादल्याची जराबी आटवन होऊ धिली न्हाई, सोताच्या लगनाच्या बायकोपरमानं नांदवलं, मिटिंगमदे सोताच्या मांडीला त्यांची मांडी लावून बसवलं ह्ये सगळं सगळं लोकांच्यापर्यंत पोचायला पायजे. कमळाबाईनं मात्र आपला रंग दाखवला. निवडणुकीपुरते रामदास आठवले, निवडणुकीनंतर रामदास विसरले. निवडणुकीनंतर संघ संपत झाल्यालं रामभौंना काय सुदरलं न्हाई, ते आपले संघं शरणं गच्छामि आसं म्हणत वाट बगत राह्यले. रामभाऊना प्रेमभंगाचं दु:ख झाल्यालं आपन सोता बघिटलेलं हाये. आपन आय लव यू आशी चिट्टी टाकल्यावर दुसऱ्या बाजूनं चिट्टीतून निस्ती राखी यावी यासारखं दु:ख न्हाई. रात्री दोन दोन वाजेपर्यंत हॉटेल किनारा (बार अँड रेस्टाॅरंट)मदे त्यांच्यासमोर बसून त्यांच्या दुखभऱ्या गजला ऐकल्या हायेत आन नंतर रिक्षेत घालूण त्यांना घरीबी सोडलं हाये. हॉटेल तसं चांगलं हाये, भायेरून क्वाट्टर आनायला परवाणगी हाये. तुमाला कदी फुडं गरज पडली अडीनडीला तर आपल्याला सांगा, मालक आपल्या दोस्तीत हाये. तर त्या प्रेमभंगानंतर रामभाऊ घसारले ते घसारलेच. नंतर येकदा तेंना राखी सावंतबरोबर ष्टेजवर नाचताना पाह्यलं आन म्हटलं कमलने निकम्मा कर दिया वर्णा आदमी भी कूच कूच काम का था. पन छगनबाप्पा, आपलं नशीब लै चांगलं निगालं. आपल्या छप्परी भरघोस भऊजन मिशा नाकात जाऊन शिंक येत आसतानाबी सायबांनी आपल्याला ठिवून घेटलं, आपल्याला माया लावली. ठिवलं आन ठिवून घेटलं यात लै फरक आसतो हे मी सोताच्या आणभवावरूण सांगतो. ठेवल्याली आसंल तर ठेवणारा गुमान सगळं लाड करतो, ठेवून घेतल्याली आसंल तर तिला सगळ्यांची जेवणं झाल्यावर खरकटी काढण्याचा मान भेटतो. ज्येनं त्येनं आपला माण राखला पायजे, आपापल्या कवड्या मोजून घेटल्या पायजेत.

येक आपली लघुशंका, म्हंजे छोटी शंका बर का, न्हायतर दादा मला हानत्याल, म्हंजे येक विचारतो, सायबांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घ्येतला तेवा तुमाला किती कवड्या भेटल्या हो?

Wednesday, September 10, 2014

सीडी प्लेअर

जुन्या वस्तूंच्या बाजारात कधी काय मिळेल सांगता येत नाही. असाच एक टेपरेकॉर्डर आम्हाला नुकताच आढळून आला. प्ले, स्टॉप, रीवाइंड, इजेक्ट, रेकॉर्ड एवंगुणविशिष्ट सुविधांनी युक्त अशी त्याची जाहिरात करण्यात आली होती. दर बुधवारी हा बाजार भरतो. मी आणि मोरू उगाचच असल्या बाजारात फिरतो. नशीब असेल तर कोहिनूर हिरासुद्धा सापडेल अशी दोन खात्रीलायक ठिकाणे आहेत. एक बुधवारी भरणारा हा चोरबाजार किंवा आमच्या हिची पर्स. मी आणि मोरू चोरबाजारात लीलया संचार करतो, पण आपापल्या बायकांची पर्स या भूभागापासून आम्ही लांब राहतो. एकदा माझ्या बायकोने घर शाकारणीला काढावे तसे आपली पर्स उलटीपालटी करून आतला खजिना सार्वजनिक प्रदर्शनासाठी खुला केला होता. "अशी कशी मिळत नाहीत? अगदी परवाच तर काढली होती." अशा प्रास्तविकाने सुरुवात झाली की ओळखायचं, हरवलं म्हणून मला दोष देण्यासारखी वस्तू नाहीये. त्याने जरा अंगी बळ देऊन मी विचारलं,"अच्छा, काय नेमकं मिळत नाहीय?" "इअररिंग्ज. अगदी पर्वाच सुमीच्या लग्नात घातले होते मी." मी चाचरत म्हणालो,"अगं, परवा? आठवड्यापूर्वी सुमी बाळंतीण झाली ना? तेव्हा डिंकाचे लाडू घेऊन तूच तर गेली होतीस बाळाला बघायला!" तर त्यावर,"उगाच कटकट करू नका हो! इथं शोधायच्या कामी उपयोग शून्य आणि नको त्या गोष्टी लक्षात ठेवून मला सांगता." असे उत्तर मिळाले. आणि एकदम,"अय्या!" असा आनंद आणि आश्चर्यमिश्रित असा चीत्कार ऐकू आला. मला वाटलं मिळाल्या इअररिंग्ज. पण हा आनंद कुठली तरी जुनी परंतु बहुमूल्य अशी हेअरपिन मिळाल्याचा असल्याचे निदर्शनास आले. असेच उत्खनन चालू ठेव, मोहेंजोदारो हडप्पा संस्कृतीचा शोध असाच लागला होता असे मी तिला प्रामाणिकपणे सांगितले तर तिने नेहमीप्रमाणे त्याचा उलटाच अर्थ घेतला आणि मला खोलीबाहेर हाकलले. पण गोष्ट सत्य आहे. तिथे उत्खननात सापडलेले बहुतांशी पुरावशेष हे बायकांचे दागिने आहेत. यावरून त्याकाळीही पुरुषांच्या वस्तूंना किमत नव्हती असे दिसते. बायकांच्या या दागिन्यांच्या सोसापायी एक महान संस्कृती लय पावली असे माझे नम्र मत आहे. इतिहासातून शिकण्यासारखे खूप असते.

मी आणि मोरूने बारकाईने त्या टेपरेकॉर्डरचे निरीक्षण केले. तो जुनाट तर दिसत होताच. त्यात कॅसेट आणि सीडी दोन्ही वाजवायची सोय दिसत होती. कॅसेटप्लेअर विभागातील प्ले, रीवाइंड आणि पॉज् ही तीन बटने अपार झिजून त्यावरची संकेतचित्रे धूसर झाली होती. सीडी प्लेअर भाग मात्र वापरलेला दिसत नव्हता. एकूण बांधणी अगदीच कचकड्याची, एकदम चायनामेड दिसत होती. आम्ही विकणाऱ्या इसमास विचारले,"काय हो, कुठल्या कंपनीचं म्हणायचं हे यंत्र?" आता चोरबाजारात वस्तूचे मूळ आणि कूळ दोन्ही विचारणे हा फाऊल आहे. त्या इसमाने तिरसटपणे आमच्याकडे पाहिले आणि म्हणाला,"ओ भाऊ! घ्यायचा तर घ्या नाय तर चालू पडा! खालीपिली भोनीच्या टायमाला वेळ नका खाऊ!" मोरूने चष्मा काढला होता आणि कमरेत नव्वद अंशात वाकून तो टेपरेकॉर्डरचे साधारण सहा इंचावरून निरीक्षण करत होता. "चिंत्या! इथे काही तरी लिहिले आहे रे! साला किती जुना आहे हा ऐवज कुणास ठाऊक. ब्रँडसुद्धा धूसर संदिग्ध!" मग पूर्ण एकाग्रतेने काही क्षण पाहिल्यावर मोरू म्हणाला,"च्यायला! अपानासोनिक? हे कसलं नाव रे?" मी बारकाईने पाहिले आणि म्हणालो,"मला पहिली तीन अक्षरे लागताहेत ए ए पी. खी:खी:खी:! मोऱ्या, अपान काय रे? जपान असेल." मोरू म्हणाला," नाही रे, क्यापिटल ए, क्यापिटल ए , क्यापिटल पी, आणि पुढे ए, एन, ए, एस, ओ, एन, आय, सी. अपानासोनिकच. आणि योग्यच नाव आहे रे! हे बघ. पुढून क्यासेट लावायची, पण स्पीकर मागे. आवाज मागून येणार. क्यासेट अथवा सीडी पडता पानीं  येई आवाज अपानी!" त्या यंत्राचे खालून वरून निरीक्षण करत मोरू म्हणाला,"अरे, बहुतेक मला हा ब्रँड माहीत आहे. ही कंपनी काही फार जुनी नाही. एक दोन वर्षापूर्वी निघालेली. दिल्लीतल्या पहाडगंजबिंज भागातील उत्पादने जशी असायची तसेच हेही उत्पादन. जास्तीतजास्त वर्षभर टिकायचे, मग भंगारवाल्याकडे जमा करायचे. हे बघ! त्या मर्फीच्या बाळाप्रमाणे या कंपनीनेही एक गोंडस चेहरा आपला लोगो म्हणून टाकला होता, तोही अंधुक दिसतो आहे." मोरूने बोटाने धूळ साफ करत मला दाखवले. गांधी टोपी घालून त्यावरून पोचवायला जाताना जशी टापशी गुंडाळतात त्याप्रमाणे गुंडाळलेला मफलर घातलेला चेहरा अंधुक दिसत होता. मर्फीचे बाळ गोंडस दिसायचे, पण हे बाळ खोंडस दिसत होते. कधीही चावेल असा भाव त्यावर होता. "काय हो, हे यंत्र चालू करून बघता येईल का?" मोरूने पुन्हा त्या इसमास विचारले. तो इसम विचारात पडला. "काय म्हाईत नाही, बघा बटन दाबून, झाला तर झाला. हे काय शोरूम नाही. सक्काळी दुकान लावत होतो तर एक जण अंधारातून बाहेर आला. मला म्हणाला, लै गरज आहे, काय दोन पाचशे मिळाले तर उपकार होतील. मी म्हणलो, माल तर दाखव अदुगर. तर पोत्यातून हे अठराशे सत्तावनच्या बंडातलं डबडं काढून माझ्या हातात ठेवलं. मी म्हणलो काय चेष्टा करता काय राव? आपलं दुकान चोरबाजारातलं आहे कबूल, पण भंगारवाल्याचं नाही. मला म्हणतो, शपथ घेतली होती, आयुष्यात कधी चोरबाजारात येणार नाही, तिथे काही विकणार नाही, काही घेणार नाही. पण नाईलाज झाला. दिसण्यावरून जाऊ नका. कंपनीनं एकमेव बनवलेला पीस आहे हा. व्हिण्टेज पीस. एके काळी दिल्ली गाजवलीय या पीसनं. कुणी जाणकारानं पाहिला तर तुमची किंमत वसूल होईल. त्याच्या चेहऱ्यावर अजीजी दिसत होती. आपण चोरीच्या वस्तू इकतो, पण आपल्यालापण माणुसकी आहे. दिले थोडेफार पैसे त्याला. वस्तू चालू आहे की नाही ते पण पाहिलं नाही."

मोरू खटपट करून टेपरेकॉर्डर चालू होतो आहे का ते पाहत होताच. मध्येच तो उद्गारला,"अरे! यात सेलच नाहीत. आणि विजेची केबलही नाही म्हणजे फक्त सेलवर चालणारा दिसतो." हे ऐकल्यावर आमचा तो कनवाळू दुकानदार म्हणाला,"अरे हां! विसरलोच. त्या गूढ इसमाने एक पिशवीपण दिली आहे. त्यात सेल आहेत बहुधा. " त्याने ती काढून पाहिली तो काय, खरेच त्यात सेल होते. तेही दिल्लीतील कुठल्या तरी गूढ ठिकाणी बनवलेले दिसत होते. नाव मात्र अगदी मॉडर्न होते. सोनिया छाप सेल. ते सेल घातल्यावर, कॅसेटप्लेअर आपोआप चालू झाला. आणि वर्णन करता येणार नाही अशा आवाजातील खरखर सुरू झाली. बोलणाऱ्याला बहुधा डांग्या खोकल्याचा विकार असावा. "साथियो, आप सब लोगोंकी जानकारी के लिए बता दें, की अभी अभी हम, तीनसो सत्तर पेज का, सबूत, पुलिस थानेमें बाबा रामदेवजी के नेतृत्वमें देके आ रहे हैं, कॉमनवेल्थ खेलोंके भ्रष्टाचार के खिलाफ, पुलिसमें हम रिपोर्ट दर्ज कराके आ रहे हैं…" दचकून मोरूने आणि मी एकमेकाकडे पाहिले. वाटले, महत्वाचा पुरावा आपल्या हाती लागला आहे. हा टेपरेकॉर्डर दुसऱ्यातिसऱ्या कुणाचा नसून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गुप्तहेर, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह, राजकीय स्टिंग ऑपरेशनचे जनक, आ.आ. पा. (आपणच आपल्याला पाडू) प्रायव्हेट लिमिटेडचे मालक, श्री केजरी मस्तवाल (तिहार रिटर्न) यांचाच आहे अशी आमची खात्री पटली. आणि त्या डांग्या खोकल्याची खूणही पटली. आता काय जबरदस्त पुरावा मिळतो याची उत्सुकता लागून आम्ही ध्यान देऊन ऐकू लागलो. "साथियो, आप सब लोगोंकी जानकारी के लिए बता दें, की अभी अभी हम, तीनसो सत्तर पेज का, सबूत, पुलिस थानेमें बाबा रामदेवजी के नेतृत्वमें देके आ रहे हैं, कॉमनवेल्थ खेलोंके भ्रष्टाचार के खिलाफ, पुलिसमें हम रिपोर्ट दर्ज कराके आ रहे हैं…" अरेच्या? पुन्हा तेच? मोरूने टेप थोडी फ़ॉरवर्ड केली. "…कॉमनवेल्थ खेलोंके भ्रष्टाचार के खिलाफ, पुलिसमें हम रिपोर्ट दर्ज कराके आ रहे हैं…" मोरूने पुन्हा फ़ॉरवर्ड केली. यावेळेला पुन्हा तो डांग्या खोकला ऐकू आला. बदल म्हणून जरा बरेच वाटले. पण पुन्हा "…की अभी अभी हम, तीनसो सत्तर पेज का, सबूत, पुलिस थानेमें बाबा रामदेवजी के नेतृत्वमें देके आ रहे हैं, कॉमनवेल्थ खेलोंके भ्रष्टाचार के खिलाफ…" हेच ऐकू आले. मग कंटाळून मोरू म्हणाला,"चिंत्या, च्यायला सगळ्या कॅसेटभर तेच आहे असं दिसतंय." आमचे चेहऱ्यावरील भाव पाहून दुकानदार चिंतेत पडला असावा. आधीचा मगरूर भाव लोपून त्याठिकाणी थोडी अजिजी आली,"साहेब, काही पण द्या. भोनीला नुसकानी नको." मोरू म्हणाला, "काही म्हण चिंत्या, नग व्हिंटेज मात्र आहे. चालला नाही तरी, या लोगोसाठी कुणी म्युझिअम नक्कीच विकत घेईल." असं म्हणून त्यानं लोगोवरची धूळ पुन्हा पुसली. त्या दुकानदाराची दृष्टी त्या लोगोवर पडली. चमकून तो म्हणाला,"साहेब, हेच ते ध्यान, मला चुना लावून गेलं सक्काळी सक्काळी. मी दुकान काढलं पण माझ्याशीच सौदा करून गेला हा. मानलं याला. चोरबाजार कमिटीवर घेतला पाहिजे. साहेब, तुम्ही काही देऊ नका, मीच तुम्हाला देतो, पण हे डबडं घेऊन जा इथून." पण माझं आणि मोरूचं चोरबाजारातून हिंडायचं पण काही घ्यायचं नाही असं तत्व आहे.

Monday, September 8, 2014

शंभर दिवसात शंभर रुपये

"आमच्या दिवसात महाराजा, काय मज्जा होती म्हणून सांगू! शंभर दिवसात शंभर कोटींचा गल्ला येत होता. जेवणाची फुरसत नाही की आंघोळीची. एकदा बायकोनं लैच कडकड केली म्हणून आंघोळ केली, त्यात अर्धा तास गेला, तेवढ्यात धा लाखांची लुसकानी झाली पार्टीची. संध्याकाळी फोनवरून आमची बिनपाण्यानं झाली ती वेगळीच. तेव्हापासनं कानाला खडा लावला आहे." बाबासाहेब सातारकर गतकाळच्या आठवणीत गुंतले होते. बोलताना अधूनमधून गळ्यातल्या ताईताला स्पर्श होत होता. नवसाचा ताईत तो. खास दिल्लीत जाऊन हजरत-ए-दस-जनपथच्या दर्ग्यात जाऊन स्वत:ला गालीचा बनवून दर्ग्यात पसरायचं आणि हजरते आला सोनिया बेगम यांनी सपाद (गरजूंनी योग्य तो अर्थ घ्यावा) तुडवले की त्या ठिकाणची धूळ तावीजात बंद करून ठेवायची. परवरदिगार म्याडम यांच्या परवानगीने मग त्यांचाच छोटासा गोड फोटू त्यावर लावायचा. मग तो तावीज बेगमसाहिबांच्या पायावर ठेवायचा. बेगमसाहिबांनी स्वहस्ते जर तो गळ्यात घातला तर मग काय, उन्मनी अवस्थेत जाऊन तत्काळ निर्विकल्प समाधी लागायची. अशा समाधीचा भंगही तत्काळ व्हायचा. पृष्ठभाग चोळत स्वगृही परतायचे. दिल्लीत धुंदी तर गल्लीत अंदाधुंदी असायची. गल्लीबोळांतून हल्ला करायला टपलेले, गळ्यात चमकणारा तावीज बघून मागे सरायचे. ती चमक टिकेपर्यंत मग चिंता नसायची. "मग फक्त एकच काम. म्याडमनी दिलेला कोटा पूर्ण करणे. शंभर दिवसात शंभर कोटीचे उद्धिष्ट म्हणजे काही खायचे काम नाही महाराजा! नवीन नवीन टेन्डरं काढणं, फायलींवर सह्या न करणं हे तर नेहमीचे मार्ग. पण आदर्श घरकुल योजना, सिंचन योजना, कोळसा खरेदी, मुळा-मुठा सुधार, पुणे बीआरटी असली घबाडं काही सारखी सापडत नाहीत. ती शोधावी लागतात, कधी कधी निर्माण करावी लागतात. पण बेगमसाहेबांना कोण सांगणार? त्यात आमच्या आमच्यात स्पर्धा इथं. आम्ही सह्या न करून काही गल्ला येतोय का बघायचं तर ज्यांच्या फायली, त्यांच्या शेपटावर पाय पडून ते केकाटणार आणि ते तडक दिल्लीला जाऊन तक्रार करणार. पण तरीसुद्धा आम्ही कधी गल्ला कमी होऊ दिला नाही." बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता. "अरे ही असली घबाडं शोधून काढणारी संस्थाच बरखास्त करायची? नियोजन आयोगाची निर्मिती हा काही योगायोग नव्हता. मुळात ते कमिशन प्लानिंग आहे हे लक्षात घ्या. नावात जरा उलटापालट झालीय. कमिशनं कशी घ्यावीत, काढावीत, याचं नीट प्लानिंग केल्याशिवाय कमवायचं काय आणि कसं? महाकॉंक (पक्षी: महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटी) आता काय करणार?"

"तुम्हाला म्हणून सांगतो. शिंपी, डॉक्टर आणि पत्रकार यांच्यापासून काही लपवू नये म्हणतात. हे तिघेही आपल्याला कधीही नागवे करू शकतात. आमच्या सगळ्या नाड्या यांच्या ताब्यात. त्यांनी घट्ट धरून ठेवलेल्या  म्हणून आम्ही वाचतो. तेव्हा तुमच्यापासून काय लपवायचे? आत्ता काही महिन्यांपूर्वी सणसणीत कानफटीत खाल्लेल्या या नारबाला स्वत:ला लोकांशी कसा संपर्क करायचा हे ठाऊक नाही, आणि हा आता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतो आहे. प्रचारादरम्यान तलवारी, सुरे, कट्टा, घोडा वगैरे अंगावर ठेवू नका, हजाराच्या नोटा बाळगू नका, शंभरच्या ठेवा हे काय मार्गदर्शन झालं? मार्गदर्शनाची पुस्तिका काढली आहे म्हणे. म्हणजे पहिल्यांदा कार्यकर्त्यांचे प्रौढ साक्षरता वर्ग घ्यावे लागणार. तरी आम्ही सांगितलं होतं जोडाक्षरं फार ठेवू नका, र ट फ करण्यात निवडणुका उलटून जायच्या. एक बरं आहे, मार्गदर्शक पुस्तिकेत चित्रंसुद्धा आहेत. व्यंगचित्रं पाहून कार्यकर्ते उत्साहात येतील अशी आमची धारणा आहे. नारबांचे व्यंगचित्र म्हणजे "प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट" अशी परिस्थिती आहे. कधी ते प्रत्यक्षात व्यंगचित्र वाटतात तर कधी व्यंगचित्रात प्रत्यक्ष वाटतात. व्यंगचित्रकार आमच्या दोस्तीतले. त्यांना ब्ल्यूप्रिंटच्या नादानं जरा ग्रासलं होतं. एवढं की त्या छंदापायी त्यांनी स्टुडीओ विकला, रंग विकले, नुसते ब्रश राहिले होते. म्हटलं त्यांनाही जरा काम मिळेल. त्यामुळे आमचं चित्र जरा हलक्या ब्रशने काढा असं सांगितलं होतं त्यांना. तर त्यांनी एवढ्या हलक्या हाताने काढलंय की मागच्या पानावर काढलेल्या माणिकरावांच्या छबीची ठळक उंदीरछाप मिशी माझ्या नाकाखाली दिसते. पण माझे भरघोस केस माणिकरावांना मिळून माणिकराज चकरे हे नवीन व्यक्तिमत्व निर्माण झाल्याचा भास होतो. शेवटी, माझी मिशी तुमचे टक्कल अशीच तडजोड करून आमचा पक्ष सत्तेत राहिला आहे. असो. तर मुद्दा असा की कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी काही मुद्दाच राहिला नाही. मग कुणीतरी शंभर दिवसांचा मुद्दा सुचवला. प्रथम घाबरलोच. शंभर असा शब्द ऐकला की "दिवस सरले" किंवा "अपराध भरले" असलंच काही तरी डोक्यात येतं. लहानपणी कृष्णाच्या गोष्टी ऐकून ऐकून डोक्यावर फार परिणाम झाला आहे. त्या गोष्टी आता प्रत्यक्षात येताहेत असंच वाटायला लागलं आहे. गोष्टीतील कृष्ण तरी बरा. नेहमी मुरली वाजवून आयाबाया, गायीगुजी (दोन्ही शब्द केवळ योगायोगाने लागोपाठ सुचले, उगाच त्यात जास्त अर्थ शोधू नये ही विनंती) यांचे मनोरंजन करणारा, गवळणींच्या मडक्यातील लोणी लांबवून मुलांना मज्जा देणारा, असा तो गोवर्धनगिरीधारी. निरुपद्रवी असे त्याचे खेळ. अगदी स्नान करणाऱ्या गोपींची वस्त्रे लपवून ठेवली तरी थोरामोठ्यांना त्याचे कौतुकच वाटायचे (अर्रे लब्बाडांनो!). हा असला कन्हैय्या आम्हाला केव्हाही चालला असता. पण सध्याच्या या गुजरदेशीच्या कन्हैयाने गोपींची वस्त्रे तर राखलीच आहेत उलट आमचीच धोतरे पळवली आणि भलतेच विश्वरूपदर्शन जगाला घडवून आणले आहे."

"पण आम्हाला अगदी योग्य मुद्दा मिळाला आहे. शंभर दिवसात काही केले नाही. शंभर रुपयेसुद्धा आणले नाहीत. पस्तीस अब्ज डॉलर वगैरे नुसत्या गप्पा आहेत हो गप्पा! आम्ही काही ते पाहिले नाहीत आणि त्यांनीही दाखवले नाहीत. पस्तीस अब्ज डॉलरचं एवढं काय ते कौतुक! तेवढे तर एकट्या आमच्या स्विस…" बाबासाहेब इथे चपापून गप्प झाले. पलीकडे नारबा घसा खरवडून सांगत होते,"शंभर दिवसांत काळा पैसा परत भारतात आणणार अशा घोषणा यांनी केल्या! प्रत्यक्षात आणल्या काय? मग शंभर दिवस काय केले?" बाबामहाराजांनी त्यांना बाजूला खेचले आणि काहीतरी त्यांच्या कानात सांगितले. नारबा एकदम वरमून म्हणू लागले,"म्हंजे आमचा तसा काय्येक म्हणणां नाय हो. पैसो काय काळो किंवा गोरो असो काय नसतां. काय समाजल्यात? मी तर म्हणतंय पस्तीस अब्ज डॉलर हाडल्यात मां, ते स्विस ब्यांकेतच गुंतवन टाका असां मी म्हणां होतंय." नंतर रुमाल काढून पाच मिनिटं घाम पुसत उभे होते. आमची आणि त्यांची जरा घसटण. पण हल्ली मला पाहिल्यावर मालवणीत एक सणसणीत शिवी हाणत आणि विचारपूस करीत. आज त्यांना घाम पुसताना पकडलं त्यामुळे मला शिवी बसली नाही. पण, मालवणी भाषेत वाक्याची सुरुवातच शिवीने होते त्याला ते तरी काय करणार? "भैनीक xxx! कसो बरोबर येतंस नको त्या येळेस रे?" अशा नांदीने सुरुवात करून म्हणाले,"शंभर दिवसांत ह्यां एक काम करूक नाय या मोदीन, तां बरां झालां. पण दिल्लीतल्या आमच्या आवशीन आमका बोंब मारूक तर सांगल्यान. म्हणजे आमची बोंब करूक नाय म्हणान आमीच बोंब मारतलो अशी पंचाईत झालीहा. आमी आता शंभर दिवसांत कायेक करूक नाय म्हणान बोंब मारूची की काय्येक करूक नाय ही रवळनाथाची कृपा म्हणूची? श्या:! काय समाजना नाय. मी आपलो कणकवल्येक जातंय कसो. ओ बाबामहाराजानू, तुम्हीही जावा वांयच थोडे दिवस साताऱ्याक."

Friday, September 5, 2014

शेतीची नवी पद्धत

"खरीप हंगामासाठी लागणारी औजारे दुरुस्त करून ठेवावीत. कुळव, पाभर कोळपी, खुरपी, फवारणी यंत्र अशी सगळी हत्यारे नीट चालताहेत ना ते तपासून ठेवावे. खरीप हंगामासाठी आवश्यक त्या बियाण्यासाठी खते, कीटकनाशके यांचा साठा करून ठेवावा. जमिनीचे मगदूर पाहून बाष्पीभवन, तापमान हे सगळे पाहून पाण्याची तरतूद करून ठेवावी. सांगली कोल्हापूर भागात ऊस फार, मग पाणीही तसेच हवे. उसाला कोल्हा लागला तर ऊस लाल पडतो हे लक्षात ठेवा. सुदैवाने कृष्णा, पंचगंगा यांचे मुबलक पाणी असल्यामुळे आणि बारामतीचे शेतकरी तिथे नसल्यामुळे बरे आहे. इतर भागात गव्हाचे काड, उसाचे पाचट, भाताचा पेंढा, लाकडाचा भुसा, पॉलिथिन इत्यादींचे थर देऊन जमिनीवर आच्छादन करावे. त्याने पाणी जमिनीत टिकते. जागोजागी कॉंग्रेसगवत, तण माजले आहे त्याचा प्रथम निकाल लावावा. त्यासाठी वारा शांत असताना पाच पर्सेंट डीडीटी धुरळावी. कोल्हापूर सांगली भागात माजलेले कॉंग्रेसगवत हल्ली डीडीटीलाही दाद देत नाही, त्यासाठी प्रभावी उपायाची आवश्यकता आहे. ज्या ढेकळांवर कॉंग्रेसगवत माजले आहे ती ढेकळेच  फोडून टाका आणि त्यावर कॉंग्रेसगवतापेक्षा चिवट अशी आपलीच तणलागवड करा. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण ऊस लावला असेल तर ज्वारी लावली आहे असे सांगा, मका लावला असेल तर कापूस असे सांगा, काहीच लावले नसेल तर भुईमूग पेरले आहे, शंभर दिवसांनी पहा असे सांगा. मग तुमचे शेजारी गाफील राहून तुमच्यावर टीका करण्यात मश्गुल राहतील. " अमितभाई शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करीत होते. अमितभाई हे प्रगतीशील शेतकरी म्हणून नुकतेच प्रसिद्धीस आले होते. त्यांनी स्वत:च्या शेतात ऊस, भुईमूग आणि बांधावर हंगामानुसार भाजीपाला अशी पारंपारिक पद्धत तर अवलंबलीच, पण त्यावर न थांबता आपल्या हिरव्या हिरव्या प्रगतीचे फोटो प्रतिस्पर्धी शेतकऱ्यांच्या बांधावर लावून त्यांना चिंतित करण्याची आधुनिक पद्धत शोधून काढली. ते फोटो पाहून काही शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनी अमितभाईंना कसायला दिल्या आणि स्वत: हरिभजनात काळ व्यतीत करू लागले. उरलेले हे फोटो खोटे आहेत असे सांगून आपले सडके कांदेटमाटे लोकांना दाखवू लागले.

म्हाराष्ट्रातील शेती कशी फुलेल याचं मार्गदर्शण करून सोडा असा प्रचंड आग्रह होत असल्यामुळे हा दौरा निघाला होता. वांद्र्याचे एक प्रगतीशील शेतकरी बारमाही पीक घ्या म्हणत होते तर काही जण कमळाची शेती करू, लई मागणी आहे म्हणत होते. मेळाव्याला अनेक शेतकरी आले होते. काही पारंपारिक, काही नवशिके, काही प्रगतीशील. दोन तरणेबांड प्रसन्न चेहऱ्याचे वळू जोडलेल्या बैलगाडीवर अमितभाई सवार झाले होते. दोन्ही बैल पुढे जायला फुरफुरत होते. अमितभाईंनी एका बैलाच्या पुठ्ठ्यावर थाप मारली तर दुसऱ्याचे वशिंड कुरवाळले. पहिल्याची शेपटी थरथरली तर दुसऱ्याने अतिआनंदाने भ्यॉ केले. पहिला म्हणाला, "ठरलंच. औंदा शेतात औत ओढायचा मान माझाच." दुसरा म्हणाला,"छान विनोद करतोस. पाहिलं नाहीस माझं वशिंड कसं प्रेमानं कुरवाळलं ते? मीच फड मारणार." पहिला म्हणाला,"बेट्या, कोकणात जन्मलेला मी. चिवट, औत ओढायला माझ्याशिवाय कुणी नाही इथं. तुला बैलपोळ्याला वडाभात मिळतो तर मला पुरणपोळी. तू आपला संत्र्याबरोबर एरंडेल पी." दुसरा भडकला आणि म्हणाला,"होऱ्या! ठाऊक आहे मोठा आलाय पुरणपोळीवाला! तू ओढ औत. कारखान्यावर ऊस टाकायला मीच जातो की नाही बघ." पहिला त्यावर काही बोलणार तेवढ्यात दोघांच्या माना मागे खेचल्या गेल्या आणि "हैक, हुर्र, चक चक चक" असे आवाज ऐकू आले. दोघांच्या तोंडातून ,"फुर्र, फ्याश, ह्म्म्फफ्फ" असे काहीसे नाराजी, उत्साह आणि एकमेकांशी स्पर्धा करणारे आवाज आले आणि गाडी पुढे सरकू लागली. पहिला बैलगाडी वांद्र्याच्या दिशेने ओढू लागला तर दुसरा नरिमन पॉईंटच्या दिशेने. "हो हो! हैक हैक! काय बैलं ही! सुसाट पळत्यात. आवडली आपल्याला! फक्त एका दिशेने पळवली पायजेत. आरं आपल्याला वांद्र्याला जायाचं हाय." असं म्हणून अमितभाईनी कासरा वढला आणि बैलं काबूत आणली. अमितभाईना वाटलं होतं वांद्र्याला कुणी रांगडा, छपरी मिशावाला, औत ओढून हाताला घट्टे पडलेला शेतकरी भेटणार. पण ब्यांकेत टोकन घेऊन "पाचशेच्या चालतील का? नाही? च्यायला सगळ्यांना शंभरच्या कुठून आणायच्या?" असं म्हणत पिंजऱ्यात बसलेला असतो त्याछाप इसम पाहून ते जरा चमकले. मग कुणी तरी त्यांची ओळख करून दिली. हे नुसतेच शेतकरी नाहीत तर, उत्तम फोटोग्राफर, आर्किटेक्टसुद्धा आहेत. तब्येतीवर जाऊ नका, अक्ख्या म्हाराष्ट्राच्या सातबाराचा उतारा यांनी एका ब्ल्यूप्रिंटवर उतरवला आहे. उधोजींनी बरोबर दोन पुस्तके आणली होती. ती ते काखेत धरून उभे होते. त्यात त्यांनी काढलेले फोटो होते. ती पुस्तके अमितभाईंच्या हातात देऊन ते म्हणाले,"हेलिकॉप्टरमधून काढले आहेत हे फोटो! एका फोटोला तर पार पालथं पडावं लागलं होतं. पाऊसवाऱ्याला न जुमानता, लेन्सवर पाणी उडत असताना, चष्म्यावर वाफ धरली असताना, लेंग्यात वारं शिरून तो जहाजाच्या शिडाप्रमाणे फडफडत असताना, खिशातला मोबाईल सारखा वाजत असताना फोटो काढणं कठीण असतं म्हाराजा. "पहावा विठ्ठल" च्या वेळेला आमच्या हेलिकॉप्टरच्या आवाजाने खाली रिंगण घालणारा घोडा अचानक उधळला आणि सैरावैरा गर्दीत घुसला. तेव्हा त्यावर आरूढ असलेल्या पांडुरंगभक्ताने आणि ज्यांना घोड्याच्या लाथेचा प्रसाद मिळाला त्यांनी ज्या काही शब्दात आमचे नामस्मरण केले ते आम्हाला वर ऐकू आले. ते ऐकून आमच्या मस्तकात अनेक भावनांचा कल्लोळ उठला. पांडुरंग! पांडुरंग! असे स्वत:ला बजावून ते फोटो काढले आहेत. "येक तरी वारी अनुभवावी" असे आमचे मत आहे. बाsssर! आला आहात एवढं तर आमचा झुणका-भाकरी खाऊन जा." काचेच्या प्लेटमधून झुणकाभाकरी आणि कटग्लासमधून पाणी समोर आले. "हे काय? तुम्ही नाही घेणार?" अमितभाईंनी विचारले. तसे उधोजी म्हणाले,"नाही, आम्ही सकाळीच पावशेर मनुका आणि गाईचे दूध घेतले आहे. ते आम्हाला संध्याकाळपर्यंत पुरेल. फोटोग्राफरने कसे सडपातळ असावे. तुम्हीही जरा लक्ष द्या खाण्याकडे बरं! आरशात बघून बूट घालायला लागणे बरे नव्हे. मागे कोण हो तुमचे ते वडाभातवाले…नाव अगदी तोंडावर आहे. तर ते आले माझा फोटो काढा म्हणून. फोटोत मावतच नव्हते. शेवटी पॅनोरमिक सेटिंगवर काढावा लागला. चांगला आला नाही म्हणून तणतणत आमच्या चुलतबंधूंकडे गेले. त्यांनी फोटो कसला, व्यंगचित्रच काढलं त्यांचं. इथे आमच्या बांधाला लागूनच त्यांचं शेत आहे. चांगला ऊस लावायचा सोडून स्ट्रॉबेरी लावत बसले आमचे बंधू, आता ऊसही नाही आणि स्ट्रॉबेरीही नाही. कुक्कुट आणि शेळीपालन करणार असं म्हणताहेत आता." अमितभाईंनी उधोजींना आंब्याची झाडे लावायचा सल्ला दिला. सध्या रोख पीक आहे आंब्याचं.

तिथून बाहेर पडल्यावर अमितभाईंना कुणीतरी विचारलं,"अहो हे काय केलंत? आता हे सगळीकडे आंबे लावतील. रोख पीक घेतील. आणि आम्ही बसू ज्वारी बाजरी करत. नुकसानच नाही का आमचं?" अमितभाई म्हणाले,"हे बघा, तुमची शेती आधीच लहान. पारंपारिक शेतकऱ्याकडे जमीन भरपूर, अनुभव भरपूर. तेव्हा त्यांना काम करू द्या, पीक कापणीला आलं की तुम्ही आपले ट्र्याक्टर लावा कामाला. आणि एक सांगतो. बांधावर लावलेल्या आंब्याच्या झाडांचे आंबे नेहमी शेजाऱ्याच्याच आवारात पडतात. कळलं? द्या तर टाळी! लागा कामाला." चहूकडून "वाह! वाह!" असे उद्गार आले. एकाच्या तोंडून गाणे स्फुरले,"वाण्याचा पोर कसा अकली, बिन-बैलानं शेती कशी पिकली!".

Wednesday, September 3, 2014

मारा जापान ट्रावेल

एअर इंडियाचे विमान उतरले. आमचे प्रंपूज्य वडाप्रधान येणार म्हणून हातात हार घेऊन गेला तासभर उभे होतो. विमानाला जिना लावला गेला आणि द्वार उघडले. आतून "कोनिचिवा!" असा माफक भरड्या आवाजातील चिवचिवाट ऐकू आला आणि प्रथम पोट, मग दाढी आणि मग उरलेसुरले वडाप्रधान बाहेर आले. त्यावरून विमानाचा पृष्ठभाग गोल असतो असे अनुमान आम्ही काढले. चला, शाळेतील समुद्र-क्षितीज-जहाजशीड दृष्टांताचा उपयोग असा का होईना झाला. तसे मी मोरूला म्हणालो तर मला म्हणतो, दोन्ही वस्तू गोल असतील तर? हा मोऱ्या म्हणजे… मोरू आणि मी इयत्ता तिसरीपासूनचे मित्र. एकाच सायंशाखेत गेलो, प्रत्येक शिबिरात गेलो, प्रत्येक अभ्यासवर्गात मांडीला मांडी लावून बसलो. बौद्धिक ऐकून झोप आली की एकमेकांची पाठ वापरून बसल्याबसल्या झोपायचो. रात्रीच्या भोजनानंतर बौद्धिक का असा प्रश्न मला आजही पडतो. आठ वाजता भोजन, नऊ वाजता बौद्धिक आणि दहा वाजता दीपनिर्वाण. बहुतेकांचे निर्वाण सव्वानऊपर्यंत झालेले असायचे. त्यातून नंतर रक्षकाची डयुटी लागली असेल तर कल्याणच. अशा वेळी कुणी खोडी काढली की निर्वाणीची भाषा यायची. अगदी टगे म्हणून ओळखले गेलेलेही बौद्धिकाच्या वेळी 'जळाहूनही शीतळू' होऊन बापुडवाणे बसलेले असायचे. वक्त्याच्या तोंडतोफेतून 'समग्र हिंदुराष्ट्र', 'राष्ट्राला समर्पित जीवन', 'राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या व्यापक संदर्भात' असले भारी भारी गोळे सुटायचे आणि आम्ही बळेच उभे केलेले एकाग्रतेचे बुरूज ढासळायचे.  शिबिराच्या दुसऱ्या दिवशी बौद्धिकाच्या धाकाने रात्रीचे जेवण जायचे नाही. मला आणि मोरूला बौद्धिक घेणाऱ्याच्या डोळ्यांत आसुरी आनंद दिसल्याचा भास व्हायचा.

वडाप्रधान दारात निवांत उभे राहिले, त्यांनी अत्यंत समाधानाने पोटावरून हात फिरवत सर्वत्र दृष्टी फिरवली. त्यांच्या चेहऱ्यावरील ते समाधान पाहून आम्हाला वाटले आता टूथपिकने दात कोरत डोळे मिटून घेणार. कदाचित ढेकरसुद्धा देतील. पण  'मुझे पता है, क्या करना है, कब करना है और कैसे करना है' असे त्यांचे धोरण असल्याने जांभईसुद्धा देतील. कुणी सांगावं. त्यांच्या या धोरणामुळे बारामतीचे जाणते राजेसुद्धा हैराण झाले असल्याचे कळले. वास्तविक हे त्यांचे कुरण. पण कुणालाही कुठल्याही कुरणात फार काळ चरता येत नाही हेच खरे. तूर्तास वडाप्रधान विमानाच्या शिडीवरून खाली उतरले. उतरता उतरता मध्येच थबकले आणि त्यांनी मागे वळून पाहिले. "वाह! याला म्हणतात यशस्वी दौऱ्याचे सिंहावलोकन!" इति मोरू. तेवढ्यात त्यांनी स्वीय सहाय्यकाच्या कानात काहीतरी सांगितले. तो धावत परत वर गेला आणि काही मिनिटात परत आला. येताना त्याच्या हातात एक डायरी आणि पेन होते. त्याने ते वडाप्रधानांच्या हातात दिले. मग ते समाधानाने परत शिडी उतरू लागले. वडाप्रधानांचे कैसे ते चालणे, कैसे ते बोलणे. आम्हांस अगदी भरते येऊन हार आणि हात उंचावून आम्ही पुढे जाऊ लागलो तो मागून प्रचंड वेगात कुणीतरी आले आणि पुढे गेले. मी आणि मोरू दोघेही त्या वेगाने बाजूला धडपडलो. पाहतो तो एक सुबकठेंगणी साडी अवगुंठित मूर्ती वडाप्रधानांना बोका देत होती. फुलांचा. वडाप्रधानांनी स्मित हास्य केले आणि पटकन कमरेत झुकून "कोनीचिवा! हाजीमेमाश्ते! ओगेन्की देस-का?" असे उद्गार काढले. त्यावर "अरेवा! मी छान दिसते? हो! देसी म्हणून काय विचारता? अस्सल देसीच साडी हो!" असे सलज्ज उद्गार त्या मूर्तीने काढले. "अरे! या तर आमच्या मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स!" असे मी मोरूस म्हटले. मोरू म्हणाला, "होय. या आल्यापासून सगळ्यांची एक्सटर्नल अफेअर्स बंद झाली आहेत. आधी कितीतरी जण या पदासाठी धडपडत होते. त्यात त्या पर्रिकरांनी हे 'भायेल्ल्या भानगडीचो मंत्री" असे पद असल्याचे सांगितले. मग तर काय ते शशी थरूर आणि दिग्गीराजे धावत आले, मी मी करत. त्यांना कामाचे खरे स्वरूप कळल्यावर ते परत फिरकले नाहीत.

वडाप्रधान आता मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या कानाशी लागून काहीतरी विचारत होते. सवयीनुसार मी आणि मोरूने जवळ जाऊन ऐकण्याचा प्रयत्न केला. पण "दादामुनी, भडकू, तब्येत, त्रागा" असे काही मोजके शब्द वगळले तर फारसे ऐकू आले नाही. वडाप्रधानांचे आमच्याकडे लक्ष गेले. आम्ही चपापून आमचे डोके मागे आणि हातातला हार पुढे केला. त्याकडे दुर्लक्ष करून ते निघाले. तेवढ्यात मोरूने धाडस करून त्यांना विचारलेच, "जपानवारी कशी झाली? काही सांगाल का?" वडाप्रधान थबकले,"चोक्कस! पैणत्रिस अबज डोलर घेऊन आला ने. आणि काय पायजे रे तुला?" "तुम्ही ढोल बडवत आहात असा फोटो आमी पाह्यला. त्याबद्दल सांगा ना. आपल्या संस्कृतीचेच ढोल ना?" मोरूला पोच म्हणून नाही. वडाप्रधान जरासे क्षुब्ध झालेले दिसले. तत्काळ आज्ञा दिली," संघ! दक्ष! अग्रेसर!" त्यासरशी, कुणीही न सांगता अमितभाई जाऊन त्यांच्यापुढे उभे राहिले. "संघ सम्यक!" अमितभाईंनी डावीकडे उजवीकडे पाहिले, कुणीच नव्हते. त्यांनीच आधीच्या जुन्या अग्रेसरांना रिटायर्ड करून टाकले होते आणि आता स्वत: एकटेच उभे होते. मग वडाप्रधानांनी आज्ञा दिली,"अग्रेसर, आरम!" अमितभाई पहिल्यापासून आरममध्येच होते, ते पाय पसरून आणखीच आराममध्ये गेले. वडाप्रधानांनी त्यांचा नाद सोडून मग "संघ! संपत!" अशी आज्ञा दिली. मग मी आणि मोरू पुढे जाऊन अमितभाईंच्या मागे उभे राहिलो. आता पुढचे काहीच दिसत नव्हते. सुदैवाने,"उपविश!" अशी आज्ञा मिळाली आणि आम्ही सर्व खाली बसलो. मी मोऱ्याला म्हणालो,"काही गरज होती का विचारायची? घे आता सगळ्यांना बौद्धिक मिळणार." मोरू चूप बसला.

वडाप्रधान बोलू लागले. "उपस्थित स्वयंसेवक, माननीय परराष्ट्र मंत्री, आदरणीय ध्वज, पूजनीय सरसंघचालक, आणि आसेतुहिमाचल असा खंडप्राय आपला देश, ज्याला पाच हजार वर्षांचा इतिहास लाभला आहे, अभिमानास्पद अशी परंपरा लाभली आहे, यांना मी वंदन करतो. आजवर या भूमीवर अनेक परकीय चक्रे आली, आक्रमणे झाली, घोड्यांच्या टापांनी धुळीचे लोट उठले त्यांनी अनेक वर्षे आपल्या देशाचे आकाश झाकोळून गेले. या टापांखाली हिंदुधर्म तुडवला गेला, सर्वांना सामावून घेणाऱ्या सहिष्णुतेचा अंत पाहिला गेला. परंतु या सर्वांना तोंड देत हा हिंदुधर्म टिकून राहिला, आपली परंपरा अबाधित राहिली. पण आपल्या या भारतमातेचे लचके तोडले गेले. मस्तकावरील जणू आभूषण असा गांधार, जिथून साक्षात गांधारीने जन्म घेतला, ते आभूषण हिसकावून घेतले गेले. आपल्या लेकरांना जणू कवेत घेणारा असा सक्षम उजवा स्कंध, तो तोडला गेला. तिथे अभद्र असे पापस्तान निर्माण झाले आहे. डाव्या काखेमध्ये त्याच पापस्तानाने खरूज निर्माण करून ठेवली आहे. हिमालय, काश्मीर हे आपले मस्तिष्क, ते छिन्न करणाऱ्या कारवाया आजही चालू आहेत. हे झाले परकीय आक्रमण आणि त्याचे परिणाम. याहीपेक्षा भयानक असे आक्रमण आवाज न करता आपल्यामध्येच गेली कित्येक वर्षे होते आहे, ते आक्रमण आपल्या मातेच्या हृदयाचेच लचके तोडत आहे. इंग्रजी सत्तेविरुद्ध असलेला लढा एका वळणावर येऊन पोचला होता. स्वातंत्र्य आधी की समाजप्रबोधन आधी? समाजप्रबोधन होण्याआधीच स्वातंत्र्य मिळाले तर ते पचवता येईल का? इंग्रजांनी नुसता देश जिंकला नव्हता, तर संस्कृतीही जितली होती. पराभूत संस्कृतीचा तेजोभंग करणे सोपे असते. इंग्रजांनी तो बरोबर केला आणि कारकुंड्यांची प्रजा निर्माण केली. या प्रजेकडून उठावाची भीती नव्हती, क्रांतीचीही नव्हती. तरीसुद्धा काही क्रांतिवीर निर्माण झाले, त्यांनी आपल्या प्राणाची आहुति देऊन स्वातंत्र्याची पहाट घडवून आणली. परंतु देशाला जोडून ठेवणारा एक धागा लागतो तो धागा आपल्याला अद्यपि सापडलेला नाही. वस्त्र एकसंध नसेल तर लज्जारक्षण कसे होईल? म्हणूनच प्रखर राष्ट्रप्रेम हेच ते सूत्र….".

मी बहुधा भाषणाच्या सुरुवातीला वासलेला आ मिटला नसावा. मध्येच त्यांचे माझ्याकडे लक्ष गेले आणि त्यांच्या वाणीचा ओघ थांबला. मी वरमून तोंड मिटले. वडाप्रधान अजूनही माझ्याकडे रोखून पाहत होते. मी अस्वस्थ झालो. तोंड तर मिटले, अजून काय उघडे राहिले आहे असा विचार करू लागलो. मग ते म्हणाले,"ते तुजा दोस्त बग, झोपा काढते, तेला उठव." मी दचकून मोऱ्याकडे पाहिले तर लेकाचा खाली मान घालून छान झोपला होता. त्याला ढोसून जागे केले. खडबडून जागे होत मला म्हणतो कसा,"आं! संपलं बौद्धिक?" मी शरमेने वडाप्र्धानांकडे पाहिले. ते हसत होते. ते म्हणाले,"तुला काय वाटते, बौद्धिकचा कायच उपयोग नाय होत? ते जपानचा वडाप्रधान आपल्याला चायपे चर्चाला बोलवते तर आपण काय फकत चायच पिऊन येल काय रे? आपणपन खास मसालावाली चाय घेऊन गेले तेच्यासाठी. तेंचा कसला तो चा. नुसता पानी. तेला बोललो हे बग अस्सल चाय. पिऊन सुपडा साफ होएल. तेंच्या सगळ्याला आपला उत्तर तयार होता. ते केंडो घेवन आला, तर आपण आपला संघाचा दंड दाखवला. सामुराईची तलवार काढला तर आपण खड्ग तयार ठेवला. बुद्धाची मूर्ती दाखवला तर आपण तेला लालूप्रसादचा फोटो दाखवला. बोललो, हे बग हा आयटम पण त्याच मातीतला आहे जिथे बुद्ध जन्माला आला. तुला सांगतो, लालूचा फोटो बगून रडला रे येवढा मोठा माणस. बोलला, बुद्धाने भारत सोडून लय नुकसान केला रे भारताचा. मग मी पुढले चाळीस मिनिट त्याचा बौद्धिक घेतला. एक्केचाळीसाव्या मिनिटाला जपानचा वडामिनिस्टर फुटला. बोलतो, कृपा करून थांब रे, आपण इन्वेस्टमेंटला तैय्यार हाय. पैणत्रिस अबज डोलरचा एमओयू साईन केला ताबडतोब." मी आणि मोरूने तत्काळ वडाप्रधानांना साष्टांग नमस्कार घातला. नमो! नमो!

Tuesday, September 2, 2014

आमची एक छोटीशी 'कायकू'

('तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो' च्या चालीवर म्हणावे)

तुम्ही हो हार्डवेअर, सॉफ्टवेअर आम्ही हो
तुम्ही हो नटखट, 'बोल'ट आम्ही हो
तुम्ही हो पाना, इस्क्रू आम्ही हो 
तुम्ही हो बीस, तर उन्नीस आम्ही हो

तुम्ही हो पंखा, वायर आम्ही हो
तुम्ही हो पाऊस, पाईप आम्ही हो
तुम्ही हो गाडी, टायर आम्ही हो
तुम्ही हो होंडा, पंक्चर आम्ही हो

तुम्ही हो कॅसिओ, 'कैसे हो' आम्ही हो
तुम्ही हो नॅशनल, नेसनल आम्ही हो
तुम्ही हो साकुरा, धत्तुरा आम्ही हो
तुम्ही हो याशिका, नवशिका आम्ही हो

तुम्ही हो ब्याटरी, मेणबत्ती आम्ही हो
तुम्ही हो विलेक्ट्रिक, इन्व्हर्टर आम्ही हो
तुम्ही हो बुलेट ट्रेन, लोकल आम्ही हो
तुम्ही हो अणुभट्टी, तंदूर आम्ही हो

तुम्ही हो शिंगल, डब्बल आम्ही हो
तुम्ही हो किमोनो, धोतरबंद आम्ही हो
तुम्ही हो साके, मोसंबी आम्ही हो
तुम्ही हो साशिमी, ढोकळा आम्ही हो

तुम्ही हो कामगार, बनिया आम्ही हो
तुम्ही हो चाय, उसपे चर्चा आम्ही हो
तुम्ही हो हाईकू, कायकू आम्ही हो
तुम्ही हो बुद्ध, बोधिवृक्ष आम्ही हो 

गोष्ट मराठी बाण्याची

एक बाणा होता. मध्यमवर्गीय, सुशिक्षित बाणा. अभिमानानं सांगायचा, मी मराठी. "मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी ती टरफले उचलणार नाही" असं स्वाभिमानानं सांगणारा मी, "जिथं फुलं वेचली तिथं गवऱ्या का वेचीन?" यातला भावनाशील मी अन, "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' यातला खुशालचेंडूही मीच. शिवाजी जन्माला यायला हवा, पण तो शेजारी ही उक्ती वापरात आणणारा तो मी , आणि खरंच शेजारी शिवाजी जन्माला आलाच तर स्वत: सूर्याजी पिसाळ बनणारा तोही मीच. मोडेन पण वाकणार नाही ही माझी व्याख्या, पण वेळ आल्यास लव्हाळे होऊन प्रपात सोसावा हा माझा खरा खाक्या. देवळात सत्राणे उड्डाणेला टिपेचा स्वर लावणारा मी, आणि आरतीची थाळी आली की नुसताच निरांजनावरून हात फिरवून दक्षिणा वाचवणारा मीच. जुन्या दिवसांच्या आठवणी काढून वाडे, चाळी होते तेव्हा कसे सगळे भाडेकरू एकत्र कुटुंब होते असं म्हणून टिपं गाळणारा मी, आणि अज्जिबात प्रायव्हसी नाही हो इथं असं म्हणून थंडगार भावनाशून्य फरशी बसवलेल्या सदैव बंद दार असलेल्या ब्लॉकमध्ये जाणाराही मीच. सदैव विरोधाभासात जगणं किती कठीण आहे, पण मराठी माणसानं ते सहज आत्मसात केलं आहे, नव्हे, जणू काही त्याची कलाच केली आहे. समाज मानसशास्त्र, गर्दीचे अथवा समूहाचे मानसशास्त्र असे विषय आहेत त्यात मराठी मानसशास्त्र हाही एक स्वतंत्र विषय व्हावा. कारण मराठी माणूस हा गर्दी असेल पण समूह नाही. गर्दीत उभा राहील, पण नाईलाजाने. डोक्यात "सगळे लेकाचे मरायला आजच इथे तडफडले आहेत" हे विचार. एरवी गर्दीत आनंदात उभा असेल तर ती डोंबाऱ्याने जमवलेली गर्दी किंवा जिथे प्रवेशासाठी दाम मोजावे लागत नाहीत असल्या सभा-भाषणांची असायची. असा मी मराठी बाणा, सचिन तेंडुलकरचा अभिमान बाळगणारा, पण आपण आऊट झालो की जळफळाट करून आपली ब्याटबॉल घेऊन घरी जाणारा.

मराठी माणसाला नेमकं काय हवं असतं? मुंबईतील भय्ये पुण्यात येऊ लागले तेव्हा नाराजी व्यक्त झाली. पण मराठी व्यावसायिकांनी हेच भय्ये कष्टाळू आणि कमी दरात काम करणारे म्हणून कामावर ठेवले. पानवाले, जे फायनल फ्रंटियर होते, मराठी माणसाने शेवटी तिथेही नांगी टाकली आणि ते व्यवसाय भय्यांना चालवायला दिले. गुजराती, मारवाडी धंदे करायला वस्ताद, गोड बोलतील आणि कसलाही माल गळ्यात मारतील अशी टीका होते, पण त्यांची दुकाने सतत उघडी असतात, ते अकरा ते चार वामकुक्षीसाठी दुकाने बंद ठेवत नाहीत, "घेणार असाल तर काढून दाखवतो" अशी बडबडही करत नाहीत. एकदा पुण्यात लक्ष्मी रस्त्यावरील एका प्रसिद्ध दुकानात प्लास्टिकच्या पिशवीसाठी पंचवीस पैसे सुट्टे नाहीत असे म्हटल्यावर माझ्या हातात ठेवलेला ब्रेड मालकांनी काढून घेतला होता. पदार्थ दुकानात येण्याआधी तो "संपल्या" ची पाटी तयार ठेवणारे गजाभाऊ आपण गुणवत्तेत तडजोड करीत नाही तर नियमात का करावी असा काहीसा विचार करीत. अलीकडेच गजाभाऊंचे देहावसान झाले. आता त्यांनीच घालून दिलेल्या तत्वानुसार "गजाभाऊ संपले" अशी पाटी दुकानाबाहेर लावली असेल का असा एक विचार माझ्या मनात येऊन गेला. फाळणी झाली, पाकिस्तानातून निर्वासितांचे लोंढे भारतात आले. त्यांना निर्वासित तरी का म्हणायचं? आपल्याच देशात परके होऊन स्थलांतर करायला लागण्याइतके दु:ख नाही. पण मराठी माणसांनी त्यावर फुंकर मारणे तर सोडा, त्यांना निर्वासित अशी छान पदवी दिली. पण हे निर्वासित कष्टाळू होते. त्यांनी या पदवीकडे दुर्लक्ष करून आपापले व्यवसाय उभे केले. डोक्यावर छप्पर नसलेल्या या लोकांनी आज बहुमजली इमारती उठवल्या आहेत, पण आजही "जा रे, जरा त्या निर्वाशिताच्या दुकानातून गूळ घेऊन ये पावशेर" असली वाक्ये ऐकू येणारी घरे मराठीच.

संकोच, लाज, भिडस्तपणा, दु:स्वास ही सर्व विशेषणे फक्त आपल्या बाण्याला लागू होतात. द्वेष फारसा कधी नसतो. द्वेष करायला जरा धाडस लागते. अंगावर आले तर शिंगावर घ्यायची तयारी लागते. तरीही यांच्या जोडीला जाज्वल्य अभिमान नावाचे विशेषणही कधीतरी उभे राहते ते केवळ प्रासंगिक. आपला गणपती, शाळा, कट्टा, खेळ यापासून हा अभिमान पार आपले आवडते भेळेचे दुकान इथवर पोचतो. खेळावरून आठवलं, आपल्या मरहट्ट बाण्याने खेळसुद्धा साजेसे काढले आहेत. कबड्डी, खो खो, आट्या-पाट्या. सर्वात एक गोष्ट सारखी - कुणाला पुढे जाऊ द्यायचं नाही. खो घालायचा, तंगडी ओढायची, अडवणूक करायची यासारखी मज्जा नाही. कुस्ती हा एक मर्दानी खेळ, पण सुशिक्षित मराठी बाणा त्यापासून लांब राहतो. पण कुस्तीतील काही डाव वापरण्यासारखे आहेत हे तो विसरलेला नाही. पट काढणे, खडाखडी करणे, अचानक धोबीपछाड घालणे असले काही अप्रतिम डाव आपल्या बाण्याने आत्मसात केले आहेत. अर्थात हे सगळं खरं असलं तरी मराठी मनुष्य सर्वांचा हेवा समप्रमाणात करतो, हाही त्याचा गुण समजायला हवा. आपली माणसे म्हणून काही कौतुक करणे, त्याला उत्तेजन देणे असला अप्पलपोटेपणा त्याच्याकडे नसतो. तंगडीत पाय घालून पाडताना मग तो मराठी आहे का दाक्षिणात्य अथवा पंजाबी असा दुजाभाव नसतो. केळीच्या सालीवरून पाय घसरून पडताना सगळेच विनोदी दिसतात.

प्रश्न असा पडतो की मराठी मध्यमवर्गीय सुशिक्षित बाण्याची गोष्ट अशी का झाली? बुद्धीची कमतरता नाही, कलेची कमी नाही. दिगंत कीर्तीचे शास्त्रज्ञ, खेळाडू, संगीतकार, गायक, नट आपल्यात होऊन गेले, अजून आहेत आणि पुढेही होतील. प्रत्येकाला स्वतंत्र ओळख असेल अशी गुणवत्ता आपल्यात असते. लहानपण काही हलाखीत वगैरे गेलेले नसते. उगाच रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास वगैरे करावा लागलेला नसतो. आईबापेही काही मुलांना वाऱ्यावर सोडून क्लबपार्ट्या वगैरे करत फिरलेले नसतात. रोज संध्याकाळी हातपाय धुवायला लावून, शुभंकरोति कल्याणं, पाढे, परवचा असे सगळे साग्रसंगीत झालेले असते. प्रभाते मनी राम चिंतून सायंकाळी मना सज्जना भक्तिपंथेचि जावे लागलेले असते. पण 'सदाचार हा थोर सांडू नये तो' हे म्हणताना 'सदाचार हा थोर सांडून ये तो' असे म्हटले गेले आणि इथे घोळ झाला. जो सदा चार ठिकाणी सांडून येतो तोच मानव जनी धन्य होतो. समर्थांचीच थेट आज्ञा ती. पाळणे भागच होते. त्यामुळे भक्तिपंथावर फिरतानाही पदोपदी अनेकांचे सांडलेले सदाचार दिसायचे. ज्ञानेश्वरांनी एवढे विश्वाचे गूढ उकलून दाखवले, पण संन्याशाला मुले होणे अलाऊड नाही या नियमावर बोट ठेवून तत्कालीन मराठी बाण्याने त्यांना तुमचे साहित्य आम्हांस दाखल करून घेता येत नाही असे सांगितले. संपादकाकडून परत आलेले साहित्य पाहून साहित्यिकाला किती वेदना होतात याची जाणीव आम्हांस आहे त्यामुळे ज्ञानेश्वरांचे अकाली समाधी घेणे समजण्यासारखे आहे. आम्हीही एकदा आमची एक कविता साभार परत आल्यावर स्वत:ला खोलीत कोंडून घेतले होते. नेमके त्याच दिवशी आमच्या हिला भरल्या वांग्याची भाजी करायचे सुचले. ज्ञानेश्वरांचे बरे होते, समाधीसाठी गुहा अशी करवून घेतली होती की मुक्ताबाईनी मांडे वगैरे केले असते तर त्याचा वास त्यांच्यापर्यंत पोचून मन विचलित झाले नसते. मुक्ताबाईंचे मांडे मनातच राहिले. तो योग आमच्या नशिबी नव्हता. भरल्या वांग्याचा घमघमाट आमच्या खोलीतच काय अख्ख्या चाळीत पसरला होता. मग समाधी काय कधीही घेता येईल असा विचार करून भरल्या वांग्याचा यथेच्छ समाचार घेतला. त्यानंतर जी झोप लागली ती समाधीसम होती. तिकडे एकनाथ महाराजांना एक पैशाच्या तुटीवरून लोकांनी फार छळले. त्यांनी रामायण लिहिले, भागवत पुराण लिहिले, भारुडे लिहिली, पदे लिहिली. या सर्व साहित्यनिर्मितीकडे पूर्ण दुर्लक्ष करून लोकांनी एक पैशावर बोट ठेवले. एकनाथ महाराजांना झोप लागेना, तळमळत दिवस जाऊ लागले. अशा अवस्थेत त्यांना साक्षात्कार झाला. गोदावरीच्या वाळवंटात त्यांना गाढवात ब्राम्हण दिसले. पण ब्राम्हणांस ते रुचले नाही. त्यांनी गाढवात आणि आमच्यात फरक कळत नाही होय रे असे म्हणून एकनाथांवर यथेच्छ लत्ताप्रहार केले. गाढवांनीही संप वगैरे करून कुंभार मंडळींची पंचाईत केली. गाढवांची समजूत काढता आली परंतु ब्राम्हण अडून बसले. मदत करणाऱ्याला लाथ मारण्याची प्रथा आजही मराठी बाण्यात रूढ आहे. असो. थोड्याअधिक फरकाने सर्व संत मंडळींस मराठी बाण्याचा झटका बसला. आपल्या स्वाभाविक संतप्रवृत्तीमुळे या संतांनी मराठी बाण्याला विरोध केला नाही. अपवाद फक्त रामदास स्वामी आणि तुकाराम यांचा. लोकांनी प्रथम या दोघांनाही त्रास देऊन पाहिला. समर्थांचा संयम फार काळ टिकला नाही. त्यांनी तत्काळ व्यायामाला सुरुवात करून विरोध संपवला. तुकारामांनी प्रथम फारच थंड घेतले आणि खूप त्रास सहन केला. पण लोकांनी त्यांची गाथाच पाण्यात टाकून त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला. हे म्हणजे अतीच झाले. कितीही उर्मट संपादक असो, साहित्य निदान उलटटपाली परत पाठवतो. मग या दोघांनीही कासेला लंगोटी बांधली खरी, पण नाठाळ लोकांच्या माथी मारायला काठी आणि पाठीत हाणायला कुबडी हाताशी ठेवली. आज मराठी बाणा या दोघांचेही नाव आदराने घेतो. मनाचे श्लोक मनात का होईना म्हणतो तरी. तस्मात, मराठी बाण्याला उत्तरही मराठी बाण्याचेच लागते. इत्यलम.