जे आम्ही पैले छूटलाच म्हणालो होतो तेच झाले. मोदी आणि केजरीवाल यांनी बैलजोडीसारखे काम करावे असे आता खुद्द घनसंघिष्ट गोविंदाचार्यच म्हणाले आहेत. स्वत: गोविंदाचार्य जयप्रकाश नारायणांच्या मुशीतून तयार झालेले आहेत. "संपूर्ण क्रांती"च्या नाऱ्यात त्यांनी महत्वाचा बदल सुचवून त्याला "समग्र क्रांति" केले. नुसताच भारत देश आणि हिंदुस्थान या दोहोंत जितका फरक आहे तेवढा फरक संपूर्ण आणि समग्र या दोन शब्दांत आहे. क्रांती म्हटलं की लोकांना क्रांती रेडकर आठवते, पण क्रांति म्हटलं की वासुदेव बळवंत फडके आठवतात. नुसत्या र्हस्व "ति" आणि दीर्घ "ती" मुळे एवढा फरक पडतो, तेव्हा "संपूर्ण क्रांती" चे "समग्र क्रांति" करणे ही छोटी गोष्ट नाही हे वाचकांनी ध्यानात घ्यावे. इतके दिवस ते आरममध्ये उभे राहून परिस्थितीचे विश्लेषण करत होते. आम्हीही उभे राहून असेच विश्लेषण करत असतो. पण लोकांना ते बघवत नाही. तुम्ही नुसतीच बघेगिरी करता अशी आमच्यावर टीका होते. असो. विश्लेषण खूपच असह्य झाल्यावर ते दक्ष झाले आहेत आणि त्यांनी आज्ञा केली आहे. आता स्वयंसेवकाने ती केवळ पाळावयाची आहे. ती पाळली जाईलच यात शंका नाही. संघाची शिस्तच तशी आहे. आम्ही बोंबलून हेच सांगत होतो तर "स्वयंसेवकाने प्रथम आपला गणवेष, दंड आणि टोपी याकडे लक्ष दिले पाहिजे. तुझ्या चड्डीला पुरेशी खळ नाही, दंड कानापेक्षा उंच झाला आहे, टोपीचा कोन प्रजासमाजवादी झाला असून राष्ट्र सेवादलाकडे झुकला आहे. स्वयंसेवकाने संपत म्हटल्यावर संपत आणि विकीर म्हटल्यावर विकीर करावे, बौद्धिकाच्या वेळेस केवळ ऐकण्याचे काम करावे. " असे आम्हाला सांगण्यात आले. त्यानुसार मग आम्ही चूप बसलो. दोन्ही बैलांकडे सध्या नुसते पाहतो आहोत. एक बैल सुलक्षणी असून त्याची चाल डौलदार आहे, डेरेदार वशिंड आहे, काठेवाडी वळणदार शिंगे आहेत, किनखापी झूल ल्यायली आहे, मुद्रा कनवाळू असून ओझे ओढायला वाघ आहे. दावणीतून मोकळा सोडला तरी तडक शेताशिवाय कुठेही जात नाही. नाव ढवळ्या ठेवले आहे. बैल असूनही रोज दहा शेर दूध देत असल्याची वदंता निर्माण झाली आहे. दुसरा अवखळ असून, प्रकृतीने अंमळ तोळामासा आहे, दावणीला अजिबात बांधून चालत नाही, तत्काळ भुईवर अंग लोटून देतो, पाय ताठ करतो, पाहणाऱ्यास वाटते आटोपला कारभार. पण सोडताक्षणी टुणकन उडी मारून उठतो आणि पळत सुटतो. कामास बरा आहे, पण भारी तुडतुड्या. सरळ रेषेत काही नांगर चालत नाही. मुलाने भुईवर रेघोट्या माराव्यात तशी नांगरणी होते. पुन्हा कामास लावावे तर जोखड झुगारून पळत तडक गोठ्यात जाऊन उभा राहतो. जोरात हाकावे म्हणून शेपटी पिरगळावयास जावे तर जागेवर थांबून मूत्रविसर्जनाचे कार्य सुरू होते.
बैलांच्या अनेक जोड्या आपल्या भारतवर्षाने पाहिल्या आहेत. महाराष्ट्रातच गेली अनेक वर्षे खिल्लारी बैलांची जोडी होतीच. त्यातील एक बैल तर खास वंशाचा वारसा घेऊन आलेला. पूर्वीचे ते गायवासरू आठवा जरा. पक्षातील अनेक बैलांच्या धक्काबुक्कीने खंगलेली ती गाय, तिच्या आचळांना ढुशा देणारे ते वासरू. तेच मोठे झाले. खंगलेली गाय मरण केव्हाच पावली. मग पक्षाच्या इतर बैलांनी परदेशातून जर्सी गाय आयात केली म्हणून एका कावेबाज बैलाने तो गोठा सोडून त्याने स्वत:चा पिळवणूकीचा (पक्षी:पिळून दूध काढणे) धंदा सुरू केला. एव्हाना ते वासरू आता मोठे झाले होते, पंचक्रोशीत त्याच्या खुरांना आव्हान देणारे कुणी नव्हते. हा फुटून निघालेला बैल काही ताकदवान नव्हता, पण इतर बैलांना झुंजवत ठेवून आपल्याला हवी ती गाय आणि गवत मिळवणारा होता. साहजिकच दोघेही एकत्र येणे अटळ होते. धंदा एकच असल्याने ही जोडी जमली. शेजारी शेजारी चालत असताना शिंगे एकमेकांत अडकत, जखमा होत, पण तरीही एकाच ध्येयाच्या ध्यासाने ही जोडी बरीच वर्षे टिकली. पुढे अवर्षणाचा काळ आला. जोडी फुटली.
आणखी एक गोssssड जोडी महाराष्ट्राने पाहिली. पण ही जोडी सामान्य नव्हती. एक कमळा नावाची म्हैस आणि दुसरा चक्क चट्टेरी पट्टेरी वाघ! म्हैस अस्सल कोकणस्थ असल्यामुळे शिंगे आणि जीभ तीक्ष्ण होती. आणि वाघ डरकाळ्या फोडण्यात, प्रसंगी चावण्यात पटाईत होता. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा मोकाट वावर होता. पण म्हणतात ना देवाची करणी आणि नारळात पाणी. दोघांचं चक्क प्रेम जमलं. मग प्रेमात पडलेले पुरुष बुद्धी गहाण टाकतात तसंच काहीसं वाघाचं झालं. वाघानं धडपडत जाऊन शिकार करावी, म्हशीनं गोठ्यात बसून थंडपणे रवंथ करावा. असं पंचवीस वर्षं चाललं. वाघाची चाळीशी आली. म्हशीला चाळशी लागली. आयडेण्टिटी क्रायसिस निर्माण झाला. धुसफूस वाढली. वाघ म्हणाला,"मी आहे म्हणून तू आहेस. एक क्षण एकटी टिकायची नाहीस या जंगलात.". म्हैस फणकाऱ्यानं म्हणाली,"आहा! तोंड बघा! लग्नाला उभी राहिले तर पन्नास जण रांग लावतील." यानं डरकाळी फोडली, तिनं भ्यां केलं. त्यानं दात विचकले, हिनं शिंगं दाखवली. झालं, जोडी फुटली.
आता बरेच दिवसांनी आमच्या ढवळ्याला शोभेलसा पवळ्या सांगून आला आहे. उत्तम स्थळ आहे. गोविन्दाचार्यांनी दोघांच्या पत्रिका पाहिल्या आहेत. छत्तीस काही नाही, पण बरेचसे गुण जमताहेत. कामे खूप पडली होतीच. शेतात नांगरणी होती, भाजणी होती, मळणी होती. घरातही काही कामे कमी नव्हती. बागेला पाणी देण्यासाठी विहिरीला पोहरा लावला होता, तो ओढायचे काम होते, शिवाय नुकताच गोबरग्यासचा प्लांट टाकला होता, त्यात मोलाची "भर" टाकायची होती. पण चालले होते भलतेच. ढवळ्याने घरचीही कामे करावीत, शेतात नांगरायलाही जावे आणि पवळ्याने गावभर कोंडाळी धुंडाळत हिंडावे, रात्री वस्तीला गोठ्यात यावे असे चालले होते.म्हणूनच आम्ही म्हणत होतो. ढवळ्यास आपले शेतात काम करू द्या, या पवळ्याला घरच्या आवाठ्यात फिरू द्या. गोबरग्यासच्या टाकीला उत्तम शेण तरी देईल. निदान घरास फुकट ग्यासपुरवठा तरी होईल. शिवाय त्यावर ओसरीतील दिवा तरी चालेल निदान वर्षभर. वीजबिल तेवढेच कमी. कसे? बरे झाले घरच्याच व्हेटरनरी डॉक्टरने सांगितले. न्हाव्याने काख भादरण्यास आणि व्हेटरनरी डॉक्टरने एनिमा देण्यास कचरू नये. डॉक्टरला पुढे चार दिवस जेवणे कठीण जाते पण बैलाचे तरी पोट साफ होते.

No comments:
Post a Comment