हात्त्याच्या, इतके दिवस किरण राव हा कुणी बाप्या माणूस आहे अशीच माझी समजूत होती. अमीर खाननं एका बाप्याशी लग्न केलं याचं आश्चर्य वाटलं होतं. पण म्हटलं होतं जाऊद्या, ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न. नट हा नेहमी प्रयोगशील असावा असं आमचे स्थानिक नटसम्राट शंकरअण्णा (प्रोप्रा - धी न्यू बाॅम्बे हेअर कटिंग सलून) नेहमी म्हणत असत. त्याप्रमाणे त्यांनी स्वत:चेही शील सतत प्रयोगात ठेवले होते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. गावातील बऱ्याच आळ्या त्यांना वर्ज्य झाल्या तरी त्यांची प्रयोगशीलता थांबली नव्हती. अमीर खान आमच्या शंकरअण्णांसारखाच पर्रर्रफेक्शनिस्ट असल्यामुळे त्याने प्रयोगासाठी हे लग्न केले असावे अशा समजुतीत आम्ही होतो. "तसले"ही काही लोक असतात असे आम्ही ऐकले होते. त्यांच्या सुरस आणि रम्य कथाही आमच्या कंपूत कधीतरी कुणी सांगत असे. आम्ही ऐकावं ते नवलच असा चेहरा करून सर्व ते ऐकत असू. किती झालं तरी तीही माणसंच हो हेही मत व्यक्त होत असे. पण अशा लोकांना लाजिरवाणे होऊन, लपून छपून वावरावे लागते याचे वाईट वाटत असे. म्हणून मग अमीरने या लोकांना पाठिंबा म्हणून केले असेल लग्न असेच आम्हाला वाटले होते. एरवी सिनेमातील कुणाचे लग्न झाले की त्या जोडप्याचे फोटो आम्ही चवीने पाहतो पण अमीर खानच्या बाबतीत हा प्रश्नच उद्भवला नव्हता. दोन मिशीवाले बाप्ये एकाच कोकाकोलाच्या बाटलीत दोन स्ट्राॅ सोडून एकमेकांची नाके भिडवून ते चोखत असतील (पक्षी स्ट्राॅ, गैरसमज नसावा) हे दृश्य आमचा अपुरोगामी मेंदू ढवळून काढत असल्याने आम्ही "हा राव दिसतो कसा आननी" हे जाणून घेण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. पण त्याला विरोध करण्याइतकेही आम्ही असहिष्णु नव्हतो. पुढे यथावकाश संसाराच्या वेलीवर एक फूल उमलंलं. (खरंच यथावकाश, खरं तर लग्नानंतर सहा वर्षांनी म्हणजे व्यथावकाशच म्हणायचं. पण म्हटलं बाईस नऊ महिने तर बाप्यास लागत असतील थोडे जास्त असे त्रैराशिक मांडले. प्रयत्नांती परमेश्वर हो. पावायचा राहणार नाही.) म्हटलं रावसाहेब मुलाच्या संगोपनात गुंतले आता. अमीरही आपल्या इतर प्रयोगांत गुंतला. कुठे इडियट बनून तीन तासांत तीस कोटी लोकांना स्फूर्ती देण्याचा प्रयोग असो, कुठे दत्त दिगंबर दैवत माझे म्हणत दिगंबरावस्थेत गावभर हिंडण्याचा प्रयोग असो त्यात तो रमून गेला. आम्हीही आमच्या कर्मभूमीत कार्यरत होऊन गेलो. (बायको त्याला बॅंकेत पाट्या टाकणं म्हणते याबद्दल आमच्या भावना अंमळ तीव्र आहेत. एरवी जरी त्या भावनांना आवर घालत असलो तरी शनिवारी बायको रमीच्या क्लबला गेली की त्या आम्ही मुक्तपणे व्यक्त करतो. सोड्याच्या बाटलीपेक्षा त्या फेसाळून वर येतात आणि स्काॅचची धुंदी अधिक गडद होते असा आमचा अनुभव आहे.) आमची कार्यभूमी गेली वीस वर्षं तीच राहिली तरी अमीर अनेक प्रयोग करत राहिला. मध्येच त्यानं सत्यमेव जयते काढलं. आम्ही कौतुकानं ते पाहत असू. एपिसोडनिशी लाखो रूपये घेऊन ते देणाऱ्या समाजाला सज्जड दम कसा भरायचा हे मनोरंजन मनोहारी होतं. आमचे फॅमिली डाॅक्टर दाते रग्गड फी घ्यायचे आणि मागे रेलून बसत डोळे मिटून सिगारेटचा दमदार झुरका मारत "तुम्ही स्मोकिंग सोडा, फुफ्फुसाची पार मच्छरदाणी झालीय" असं आम्हाला सांगायचे. आम्ही खाली मान घालून ते ऐकायचो.
असो, तर या सगळ्या गडबडीत अमीर खानच्या जनानखान्यात उलथापालथ (शब्दाचा जास्त अर्थ काढायला जाऊ नका, ते अभिप्रेतही नाही) होतेय हे लक्षातच आलं नाही. बेगम रावसाहेब स्वकष्टाने प्रसवलेल्या बाळाच्या संगोपनात गुंतलेले आहेत, त्यांना दाढी करायलाही वेळ मिळत नसावा, एकच लेंगा चार चार दिवस घालायला लागत असावा अशाच समजुतीत होतो. अमीर बाहेर एवढे सर्जनशील प्रयोग करतो आहे, हिंदू धर्मातील विसंगतींची टिंगलटवाळी करत समाजप्रबोधन करतो आहे, या सेटवरून त्या सेटवर अशा हनुमान उड्या मारतो आहे पण त्याला समाजातील हळूहळू होणाऱ्या बदलाची चाहूल लागली नसावी. तिकडे रावसाहेबांना मात्र रोज समाजात वावरून ते जाणवत असेल. रेशनच्या रांगेत उभे असताना, पाण्याचा टॅंकर आला की त्या हाणामारीत आपली कळशी भरून घेताना, बसची गाडीची वाट पाहताना, वडापच्या रिक्षेत अंग चोरून बसताना, दळण आणायला गिरणीत जाताना अशा अनेक प्रसंगी समाजात वावरताना सूक्ष्म बदलांची जाणीव त्यांच्या अत्यंत तरल आणि मृदू मनाला होत असेल. अशा दैनंदिन रगाड्यात केवळ रावसाहेब रगडले गेले असतील, अमीरला पत्ताही नसेल.
आणि आता पाहतो तर किरण राव हा बाप्या नाही? वाईट आणि हायसं वाटणं दोन्ही एकदम झालं तर कसं वाटेल तसं वाटलं. वाईट अशासाठी की एका विशिष्ट समूहाला पाठिंबा म्हणून हे लग्न एका मैलाचा दगड वाटत होतं तो साधा दगड ठरला. आणि हायसं अशासाठी की अमीरच्या मुलाला आई मिळाली. तीही त्याची काळजी करणारी. खूप काळजी करणारी. रोज घरातून बाहेर पडताना बाहेर ऊन, थंडी तर पहायचीच पण किती डिग्री असहिष्णुता आहे, भीतीची तीव्रता किती आहे हेही पहायचं हे सगळं करायला आईच हवी. या माऊलीला भोवतालचे बदल लक्षात आले. वर्षानुवर्षं मुकाट्यानं खाली मान घालून चालणारे हिंदू शेजारी आपल्या धर्माची चेष्टा पाहिल्यावर नाराजी व्यक्त करू लागले हे पाहिल्यावर त्या माऊलीच्या डोक्यात धोक्याची घंटा ठणाणा वाजू लागली असणार. नेहमी ईदला शीरखुर्मा हक्काने मागणारे पीके सिनेमा आल्यानंतर ईद होऊन गेला तरी मागेनात हे पाहिल्यावर त्या मातेच्या डोक्यात संशयाचे भूत उभे राहिले असेल. नक्कीच ते आपल्या खुनाचा घाट घालत असणार ही तिची शंका केवळ वाजवीच होती. कुठल्याही आईच्या हृदयात याच भावना येतील. याखेरीजही अनेक गोष्टी तिला भेव घालीत होत्या. संजय दत्तला तुरूंगवास, दस्तुरखुद्द सलमानभाईला शिक्षा! केवळ मुसलमान म्हणूनच त्या शिक्षा झाल्या हे नक्की. गुन्हा काय तर बेकायदेशीरपणे शस्त्रे घरात ठेवली, ती दुबईतील मित्रांना वापरायला दिली, तर दुसऱ्याने काय दोन पाच फुटपाथवरची माणसे उडवली. काय मोगलाई लागून गेली आहे काय? ही असहिष्णुता असह्य झालेल्या त्या मातेला आपल्या बाळाच्या भवितव्याविषयी चिंता वाटणे साहजिक आहे. तो उद्या मोठा होऊन काय करायचे? त्याने काय सतत कायद्याची भीती बाळगत जगायचे? छे! छे! ते काही नाही, येऊदेत हे आज घरी, आता इथे राहणे नाही. सीताहट्टापुढे जिथे रामाचेही काही चालले नाही तिथे अमीरचा काय पाड?
पण भारतीयांनो, ही रत्ने देशातून बाहेर जाऊन देऊ नका. आधीच आपण आपला कोहिनूर गमावून बसलो आहोत. आता ही अल्लाघरची नूर बाहेर जाऊ देऊ नका. ही नुसती किरण नाही तर संपूर्ण देशाच्या सहिष्णुतेच्या आशेची किरण आहे. ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माझ्या मनातला का, तेथे असेल रावा असे गाणे ही म्हणते आहे, तिच्या मनातला तो पोपट इथेच बांद्र्यात (पश्चिम बरं का, पूर्वेला घाटी राहतात) आहे हा दिलासा तिला द्या. या रावावाचून हा देश रंक आहे हे ध्यानात ठेवा.

ha ha
ReplyDelete