वळूंनी आता कुणाच्या तोंडाकडे पहायचं? गुबगुबीत वशिंड, फुरफुरणारे कान, वटारलेले डोळे, माती उकरणारे खूर, उष्ण नि:श्वास सोडणाऱ्या फेंदारलेल्या नाकपुड्या हे वर्णन जरी एखाद्या राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसच्या (आणि काही निवडक भाजपच्याही) कार्यकर्त्याचे वाटले तरी प्रत्यक्षात ते एका केविलवाण्या वळूचे आहे हो. आणि या वळूला नुकतेच सरकारने पुन्हा वाऱ्यावर सोडले आहे. गायीला रक्षण आणि वळूचे मात्र ताडन. गाईचे ते गोमय आणि वळूचे ते मात्र शेण? गाईला छान गोठ्यात ठेवून तिच्यापुढे चारा टाकणार आणि वळूला मात्र शर्यतीच्या गाड्याला जुंपणार? वळू हा आपला राष्ट्रीय पशू जरी नसला तरी त्याचे सर्व आविष्कार आपण दैनंदिन व्यवहारात पाहत असतो. निमूटपणाने काम करणाऱ्याला, सांगितलेले ऐकणाऱ्याला बैलोबा तर अंगावर आलं तर शिंगावर घेणाऱ्याला वळू, मठ्ठ दांडगटाला सांड तर गळ्यात मंजुळ घंटा बांधून शेतात नांगरणाऱ्याला छानपैकी वृषभ. नाही, विनोदी नाही लिहिता येत यावर. आणि मी लिहिणारही नाही. मुक्या प्राण्यांना शर्यतीसारख्या केवळ अघोरी प्रकाराला जुंपावं हे पटत नाही. त्याचं कसलंही समर्थन करता येत नाही. हा कसला आनंद म्हणायचा? ही तर विकृती. आपल्या विकृत आनंदासाठी प्राण्यांचा अघोरी छळ करणे हा गुन्हाच ठरायला हवा. अरब लोक लहान मुलांना उंटांवर बांधून शर्यती लावतात. पार कळवळा आणून आपण रडत असतो. आखाती प्रदेश आणि तिथले लोक हे अश्मयुगीन आहेत, त्यांच्याकडून बुद्धी, कणव, सहिष्णुता, भूतदया असल्या शब्दांचीही अपेक्षा करता येत नाही. आपण भारतीय तर स्वत:ला उत्क्रांत पावलेले, थोर वैचारिक, भूतदयावादी मानतो ना? मग इथे कुठे गेली ती अक्कल? मानव एक गोष्ट विसरतो. आपण जे कुणी आज आहोत ते केवळ योगायोगाने. कोट्यवधी वर्षांच्या उत्क्रांतीप्रक्रियेत योगायोगाने घडलेली एक घटना. ज्या घटनेने डायनासोर क्षणार्धात संपले, ती घटना पुन्हा केव्हाही घडू शकते. केवळ योगायोगाने प्राप्त झालेल्या बौद्धिक श्रेष्ठत्वाचा इतका माज आपण करू नये. प्रत्येक जिवाला जगण्याचा हक्क आहे. त्यांना तो बजावता येत नाही इतकंच.
केवळ राजकीय फायदा आणि हेतू डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय आहे हे उघड आहे. मोदी सरकारने विरोध पत्करून गाईला संरक्षण दिले पण इकडे हा असला अनाकलनीय निर्णय घेतला. सगळेच जीव "माता" का नाही मानत? हिंदु धर्मात जीवहत्या हे पाप आहे ना? मग अनन्वित छळ करणारे हे खेळ सरकारमान्य का करता? त्यासाठी भाजपच्या बैलाला होssss! त्रिवार निषेध! अर्थात राजकारण, सरकार वगैरेंना दोषी ठरवणं सोपं आहे. इथे दोष आहे आपल्यातीलच या मनोविकृतीचा. शर्यतीसारखा अघोरी प्रकार खेळ मानण्याच्या आपल्या मनोवृत्तीचा. प्राण्याला वेदना चेहऱ्यावर दाखवता येत नाही, भावना व्यक्त करता येत नाहीत. म्हणून बैलांच्या वतीने मीच त्या व्यक्त करायचं ठरवलं आहे. मला बैल म्हटलंत तरी चालेल. मुर्दाड, बेमुर्वतखोर, क्रूर मानवापेक्षा बैल बरा.
शेतात राबलो मी
गोठ्यात रवंथलो मी
कधी पाहून सुबक शेपटी
अंगांग थरारलो मी
चौखूर उधळावे वनी
भरून वाऱ्यास दो कानी
वदावे सर्व जनी
हा वळू किती गुणी
थबकले खूर माझे
आता त्या घरापाशी
टेकले गुडघे धडधडे अंतरी
करतो वंदन मान्नीय पशूमंत्री
पाहता तो मंत्री वदनी
सूख जाहले हो साजणी
मुख मजसम, तशीच वाणी
माझेच रूप भासले त्या क्षणी
थबकला मंत्री भिडली दिठी
स्मित ओळखीचे झळकले ओठी
हंबरूनी म्हणे कृपा झाली मोठी
मिळाला वळू आयता शर्यतीसाठी
जळो जिणे हे लाजिरवाणे
ऊर फुटी पळणे अन् आसूड खाणे
ईश्वरे योजिले सर्व जीव जगणे
ईश्वरच गहाण कसले जिणे अन् मरणे…

No comments:
Post a Comment