श्री छगनबाप्पा भाहूबली यानला आपला जय भीम! या दिवसाचा किती रोज आपन
इंतजार करत होतो हे आपल्याला म्हाईत नसन. दोनतीन म्हईन्याखाली आपन
मिटीण्गमदे लई गर्जला होता. कुनी इद्यापिठाचं नाव बदला म्हनून आरडला की
आपल्याला बरं वाटतं. मायला आपन चार सालं बारावीत काडली, येवढ्या प्रचंढ
आणभवावरून इद्यापिठात प्रवेश भेटायला पायजे हुता. पन भ्येटला न्हाई, म्हने
परशेण्टेज कमी हाये. तवापासनं इद्यापिठाच्या समोरून जरी ग्येलो तरी ध्येईचा
निस्ता भडका हुतो. तवा तुमचा ष्ट्यांड आपल्याला येकदम पटल्याला हुता. मी
तर म्हन्तो दर दोनपाच वर्सानं जसं गवरमेंट बदलतं तसंच इद्यापिठाची नावंपन
दर पाच वर्सांनी बदलली पायजेत. पन थितं मंडळी मराठा आरक्षणाचं ज्येवान
जेऊन दात कोरत बसलेली, आपल्या हातावर बडीशेप ठेवून पसार झाली. त्या
सर्वांचे आप्राध तुमी पोटात घालून पक्षाशी येकनिष्ठ ऱ्हायलात. लोकान्ला
वाटतं छगनबाप्पा न्हाई न्हाई ते खातात म्हनून लंबोदर झाले हायेत, पन
वस्तुस्थिती आपल्याला म्हाईत आहे. आपल्या पक्षाला भऊजन चेहरा पायजे आसं
जेव्हा सायब बोलले तेवा, गणपतीच्या उंदराशप्पत, आपलाच मुखडा डोळ्यासमोर
आला. आपल्या हॅप्पी बर्थडेला, चौकात लावलेला आपला ह्यांडसम फोटो बगीटला की
वाटतं, शिन्मात गेला आसता तर सगळ्या हिरविणी आपल्याच मागं लागल्या आसत्या.
आपल्याला खात्री हाये थितं पन तुमी पिच्चरची नावं बदलायला लावली आसती. हम
आपके है कोण पिच्चरमदी सफारी सूट घालून आपली वेण्ट्रि झाली आसती तर माधुरी
दीक्षित तेरा का छब्बीस गाण्यांत तुमच्याभवती नाचली आसती. तवा आपला चेहरा
पक्षाला येकदम फिट बसनार हेची खात्री. आपल्या त्या जब्बरी मिशीखालून जे
शब्द भायेर येतात ते भऊजन समाजाच्या हिताचेच आसतात. आपन येकदम सही बोलला,
कमळाबाईच्या पक्षात भौजन म्हनून आमाला कायच इज्जत भेटली नाही. येकदा आपला
येक बिगाडलेला दोस्त शाखेवर घेऊन ग्येला आपल्याला. तर थितं गोल करून सगळे
येकत्र बसलेले. आरे भऊजन म्हनून आमाला काय शेपरेट इज्जत बिज्जत काय द्याल
की न्हाई? शाखेत गोलाला मंडल म्हनतात आसंही कळलं. वाटलं या मंडल आयोगात
आपल्याला काय तरी येगळा माण भेटणार. आपला दोस्त म्हनला हितं तसलं काय
नसतंय. हितं एकच गोष्ट, देशप्रेम. जात कुनी इचारत न्हाई आन मानतबी न्हाई.
मी बोललो, आयला मग आपल्या जातीचा काय उपयोग? त्यापरीस आपला पक्ष बरा. हातात
काय पडू देत न्हाई, पण निदान इलेक्शनच्या टायमाला आपला गनपती म्हनून
मखरात बसवतात. यंदाच्या इलेक्शनला पक्षाच्या गनपतीचा मान आपल्याला लाभला
ह्ये पाहून दुपारच्या टायमाला ठंडी बियर लावल्यासारखं गारीगार वाटलं. आपले
वाहण म्हनून आमची नेमनूक करता आली तर पाहावे ही विणंती. आपल्या हातात मोदक
पडल्यास आमच्या तोंडात निदान खोबऱ्याचा तुकडा पडेल अशी आमची धारणा हाये.
आपल्या मापाचा दनकट पाट बनवायला टाकला आसल्याची बातमी आली हाये. पाटावर बसवून, डोक्यावरून रेशमी कापाड टाकून तुमाला वाजत गाजत मांडवात आननार हायेत. दादा, सायेब आन जितेंदरभाऊ सोता पाट उचलूण आपला हा भऊजन गनपती वाहनार हायेत. सायेबांनी जितेंदरभाऊंना गाझा बचाव शर्ट घालून मिरवणुकीला येऊ नका असा दम दिला हाये आसे ऐकतो. रोजे आले की ट्रंकेतून भायेर काडा, तोवर डांबराच्या गोळ्या घालून ठेऊन द्या आसा सल्ला दिला हाये. काय पन आसो, आपन सौ टका थितं नाचायला आसनार. आपली मूर्ती घ्येऊन सायेब अख्ख्या म्हाराष्ट्रात फिरणार हायेत. प्रत्येक सभेच्या सुरुवातीला आपल्यासमोर नारळ वाढवणार. आपल्या पक्षानं भऊजन समाजाचा कसा आदर केला हाये त्याचं उधारण म्हंजे पक्षानं केलेला छगनबाप्पांचा आदर. काडीमोड होऊन सायेबांच्या पक्षात आले तवापासून त्यांना पूर्वीच्या दादल्याची जराबी आटवन होऊ धिली न्हाई, सोताच्या लगनाच्या बायकोपरमानं नांदवलं, मिटिंगमदे सोताच्या मांडीला त्यांची मांडी लावून बसवलं ह्ये सगळं सगळं लोकांच्यापर्यंत पोचायला पायजे. कमळाबाईनं मात्र आपला रंग दाखवला. निवडणुकीपुरते रामदास आठवले, निवडणुकीनंतर रामदास विसरले. निवडणुकीनंतर संघ संपत झाल्यालं रामभौंना काय सुदरलं न्हाई, ते आपले संघं शरणं गच्छामि आसं म्हणत वाट बगत राह्यले. रामभाऊना प्रेमभंगाचं दु:ख झाल्यालं आपन सोता बघिटलेलं हाये. आपन आय लव यू आशी चिट्टी टाकल्यावर दुसऱ्या बाजूनं चिट्टीतून निस्ती राखी यावी यासारखं दु:ख न्हाई. रात्री दोन दोन वाजेपर्यंत हॉटेल किनारा (बार अँड रेस्टाॅरंट)मदे त्यांच्यासमोर बसून त्यांच्या दुखभऱ्या गजला ऐकल्या हायेत आन नंतर रिक्षेत घालूण त्यांना घरीबी सोडलं हाये. हॉटेल तसं चांगलं हाये, भायेरून क्वाट्टर आनायला परवाणगी हाये. तुमाला कदी फुडं गरज पडली अडीनडीला तर आपल्याला सांगा, मालक आपल्या दोस्तीत हाये. तर त्या प्रेमभंगानंतर रामभाऊ घसारले ते घसारलेच. नंतर येकदा तेंना राखी सावंतबरोबर ष्टेजवर नाचताना पाह्यलं आन म्हटलं कमलने निकम्मा कर दिया वर्णा आदमी भी कूच कूच काम का था. पन छगनबाप्पा, आपलं नशीब लै चांगलं निगालं. आपल्या छप्परी भरघोस भऊजन मिशा नाकात जाऊन शिंक येत आसतानाबी सायबांनी आपल्याला ठिवून घेटलं, आपल्याला माया लावली. ठिवलं आन ठिवून घेटलं यात लै फरक आसतो हे मी सोताच्या आणभवावरूण सांगतो. ठेवल्याली आसंल तर ठेवणारा गुमान सगळं लाड करतो, ठेवून घेतल्याली आसंल तर तिला सगळ्यांची जेवणं झाल्यावर खरकटी काढण्याचा मान भेटतो. ज्येनं त्येनं आपला माण राखला पायजे, आपापल्या कवड्या मोजून घेटल्या पायजेत.
येक आपली लघुशंका, म्हंजे छोटी शंका बर का, न्हायतर दादा मला हानत्याल, म्हंजे येक विचारतो, सायबांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घ्येतला तेवा तुमाला किती कवड्या भेटल्या हो?

No comments:
Post a Comment