अवघा देश आज मंगळून गेला आहे. आजवर मंगळ म्हटलं की "हो का? फार त्रास होतो का हो? तरीच, तुमच्याकडे पाहिलं की वाटायचंच, बहुधा मंगळाची दशा चालू असावी." हे असे काहीसे उद्गार कानावर पडायचे. दररोज डब्यात दोडक्याची भाजी असणं, नेहमी कुणीतरी मागून चपलेवर पाय दिल्यामुळे तिचा एकलव्य होणं, विजेचं बिल भरायला दोन तास लायनीत उभं राहिल्यावर आपला नंबर आला की बारा वाजणं - म्हणजे आपले बारा आणि कर्मचाऱ्याचा पोबारा, नेहमीची फास्ट गाडी चुकल्याने कुर्डूवाडी एक्सप्रेसची गती उधार घेतलेल्या गाडीनं प्रवास करायला लागणे, कधी नव्हे ते आपण ऑफिसला लवकर पोचावं तर साहेब उशिरा, तर आपण उशिरा पोचावं तेव्हा आपलं स्वागत सायबांच्या चकचकीत टकलाच्या दर्शनानं होणं, कट्ट्यावर टीपी करत असताना एखादं सुरेख यंत्र दिसावं, त्यावर आपण एक सहजसुंदर नैसर्गिक प्रतिक्रिया व्यक्त करावी आणि नेमकं तेच त्या यंत्राच्या मेक्यानिकनं ऐकावं आणि त्यानं आपले स्क्रू टाईट करून सोडावे हे असले सगळे योग मंगळमहाराजांच्या कृपेने नशिबी आलेले असतात. दुर्दैवाचे मंगळावतार केवळ बाहेर थांबत नाहीत, घरातही मंगळ अगदी उजळून निघालेला असतो. कुटुंबाने गळ्यात घातलेले सूत्र, ते मंगळ का असते याचा उलगडा लग्नानंतर साधारण वर्षभरात होऊ लागतो. त्या मंगळाच्या सूत्रानेच पुढील आयुष्याची वाटचाल करावी लागेल, नजरेत राहील अशा कक्षेतच भ्रमण करावे लागेल असा गर्भित इशारा त्यात असतो. आणि ते तसेच होईल असे या मंगळाचे गुरुत्व असते. लग्नानंतर बहुतेक बायकांचे गुरुत्व वाढते असे आमचे निरीक्षण आहे. हल्लीसारखी वजन कमी करण्याची फ्याडे पूर्वी नव्हती. त्यामुळे गुरुत्व टिकून राही. असल्या जबरी गुरुत्वातून सुटका करून घेण्यासाठी जी एस्केप व्हेलॉसिटी लागते ती कुठल्याच भारतीय नवऱ्यात नसायची. सासुरवाडीला जास्त दिवस राहणाऱ्या जावयाला भले दशमग्रह म्हणोत, तो स्वत:च्या घरी केवळ एक उपग्रह असतो. स्वगृहीच्या मंगळाला प्रदक्षिणा घालत ब्रम्हांड फिरणे एवढेच त्याच्या हातात असते. असं सर्व असताना आपण तडक मंगळावर चढाई (शब्द वीररसात्मक आहे, उगाच भलते अर्थ शोधू नयेत) करणे धाडसाचे होते.
पण काही म्हणा, यानाने नेलेला भार फक्त पंधरा किलोचा असेल, पण तो असा अब्जावधी योजने दूर वाहून नेणे सोपे नाही. आजवर मला साधा दळणाचा डबा सायकलवर मागे लावून घरापर्यंत धड आणता आलेला नाही. सीतेने लंकेत जाताना वाटेत दागिने टाकले तसे आमच्या डब्यातून पीठ गळत गळत घरापर्यंत यायचे. इथे तर धरायला यानाला ह्यांडलपण नाही. पण या घटनेचं तसं आश्चर्य वाटायला नको. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी जे जे काही करायला लागणार होते त्याचे ज्ञान आपल्यात सुप्तपणे तयारच होते. ह्यांडल न धरता सायकल चालवणे, डब्बल शीट जाणे, ट्रकच्या मागील साखळी धरून आपण निवांत सायकलवर बसून घरंगळत जाणे, पेट्रोल वाचवण्यासाठी घाटात गाडी न्यूट्रलवर टाकून, दैवावर विश्वास ठेवून संपूर्ण घाट उतरणे, आणि खाली पोचले की गियर बदलून इंजिन ष्टार्ट मारणे या सर्व कला आपल्याला आत्मसात आहेत. कायम स्कूटर रिझर्व्हवर ठेवणाऱ्या माझ्या ओळखीच्या महाभागाने मला त्याचे कारण सांगितले होते. त्याच्या मते इंधनाचे वजनसुद्धा कार्यक्षमता कमी करते, म्हणून मी कमी पेट्रोल ठेवून वजन कमी करतो. माझी स्कूटर जास्त अॅव्हरेज देते. याच महाभागाने विमान ठराविक उंचीवर पोचले की खाली आणताना इंजिन बंद करून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेऊन उतरावे, त्याने इंधन वाचेल असा विचार व्यक्त केला होता. हे क्रांतिकारी विचार पुणे ३० (पावन मारुती चौक ते काळा हौद) या परिसरात अडकून पडले आहेत याचे मला दु:ख होते. दुसऱ्या एका थोर इसमाने इंजिन स्टार्ट करण्यापुरते पेट्रोल वापरून मग हळूच इंजिनाच्या नकळत रॉकेल सोडून इंजिनालाच फसवले होते. पुढे त्या इंजिनाने या सुपीक डोक्यासमोर हार मानून भंगारवाल्याच्या आश्रयाला जाण्याचा निर्णय घेतला असे ऐकू आले होते. पुण्यातील रिक्षेवाले नॅव्हिगेशन एक्सपर्ट आहेत. रस्त्यावर चालणारी माणसे हे केवळ दैवदत्त अडथळे आहेत असे मानून वेग मुळीच कमी न करता त्यातून लीलया मार्ग काढण्याची कला त्यांना आत्मसात आहेत. मार्गातील मायक्रोमीटियोराईट्स, चुकार अशनी चकवण्यासाठी हे ज्ञान उपयोगी नक्कीच पडेल. पुणेरी रिक्षावाला हात आणि पायाचा उपयोग पूर्ण कार्यक्षमतेने करतो. मीटर पळवून भाड्याला (पक्षी:पाशिंजरला) हात दाखवायचा आणि डावीउजवीकडे वळताना पाय बाहेर काढून आपला काय इरादा आहेत ते सांगायचे. ते सांगणेही "To whomsoever it may concern" या प्रकारातील असते. तात्पर्य एखाद्या रिक्षेवाल्याला मंगळयानातून पाठवले असते तर नॅव्हिगेशन हा प्रश्नच निकालात निघाला असता. कंट्रोल रूम, अनेक शास्त्रज्ञ, अभियंते यांची गरज राहिली नसती. इस्रोने हा विचार केला असेलच. पण रिक्षेचे मीटर यानावर बसवले असते तर ४७० कोटीत ही मोहीम झाली नसती. शिवाय या रिक्षेवाल्यानेही लांबच्या भ्रमणकक्षेतून नेले असते ते वेगळेच. "साहेब, गुरुवर सध्या वादळ सुरु आहे, आपण नवीन दिसता या भागात. मंगळावरून रिटर्न भाडं पण नाही. दुसरा कोणी आला नसता साहेब." हा ड्वायलॉक अशक्य नव्हता.
या मोहिमेला तर माणशी चार रुपये खर्च आला. वडापवालेसुद्धा यापेक्षा जास्त घेतात. ज्या देशात स्कूटर अथवा गाडी घेतल्यावर अभिनंदनाआधी पहिला प्रश्न "किती अॅव्हरेज देती?" असा येतो तिथं मंगळयानानं असलं जब्बरी अॅव्हरेज देऊन भारतीयांचा दीसू गोड केला यात शंका नाही. इस्रोचं कौतुक अशासाठी वाटतं की भ्रष्टाचारी राजकारणी आणि नतद्रष्ट गत सरकार यांच्या हातात फंडिंग असूनही आतापर्यंत कुणालाही पहिल्या झटक्यात नजमलेली गोष्ट करून दाखवली. काही असो, भारतीयांचं डोकं सुपीक आहेच, गरज आता फक्त आहे समाज म्हणून सुधारण्याची, शिस्तबद्ध, भ्रष्टाचारमुक्त होण्याची. भ्रष्टाचाराची मंगळदशा संपून देशाचा उज्वल काल जवळ येतो आहे आहे अशी अपेक्षा करूया.

No comments:
Post a Comment