हल्ली घडणाऱ्या सगळ्या वाईट
गोष्टींना मोदी जबाबदार आहेत असे मानून "हेच का ते अच्छे दिन?" असे
उपहासाने विचारले जात आहे. त्या लोकांनी एवढे तरी मान्य करावे की असे
विचारण्यासाठी अडुसष्ट वर्षांत वाजपेयींचा अपवाद वगळता एकही पंतप्रधान
तुम्हाला मिळाला नव्हता. कॉंग्रेसच्या राजवटीत आला दिन गेला एवढेच समाधान
होते. भविष्याची चिंता करायचा प्रश्नच नव्हता. काही बदलेल असं वाटण्याची
परिस्थितीच नव्हती. मोदी प्रत्येकाची मानसिकता बदलू शकणार नाहीत. ते
तुम्हाला संधी देऊ शकतात आणि देतही आहेत. तरीही हिंदूंच्या सहिष्णुतेमुळे
माजलेले काही तथाकथित बुद्धिवंत राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन मोदींवर
चिखलफेक करीत आहेत.
बटाट्याची भाजी खाऊन तुंदिलतनूवर हात
फिरवत सोफ्यावर पहुडलेल्या तथाकथित बुद्धिवंतांनो, तुम्हाला
सर्वधर्मसमावेशकता या शब्दाचा अर्थ तरी कळतो आहे का? समावेश कशात करून
घ्यायचा? राष्ट्रीय प्रवाहात? राष्ट्रीय प्रवाह तरी काय आहे तुमचा?
भारताच्या घटनेत सामावून घेणे, त्यांना मतदानाचा अधिकार असणे, सरकारी
संस्थांवर खटला दाखल करण्याचा अधिकार असणे, हवा तो कायदेशीर व्यवसाय करणे,
स्वत:ला पटेल त्या धर्माचे पालन करणे, अभिव्यक्ति स्वातंत्र्य असणे हेच ना?
यातले कुणाला काय मिळाले नाही आहे? तुम्ही मारे त्यांना हे सगळे द्याल. पण
ते तुमचा राष्ट्रवाद मानत आहेत काय? धर्माने सांगितले तसे लग्न, धर्माने
सांगितले तसा एकतर्फी घटस्फोट आणि धर्माने सांगितले तसा "काफिर" लोकांचा वध
हेच शेवटी त्यांना जास्त प्रिय आहे ना? समान नागरी कायदा आणि धर्मनिरपेक्षता त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करा. तुमच्या धर्मनिरपेक्षतेच्या
कल्पनेला त्यांनी तुमच्या योग्य त्या ठिकाणी घातले आहे. एक दोन फुटकळ
उदाहरणे देऊन आमच्या तोंडाला पाने पुसू नका. काही राजकारणीच तसे करीत आहेत
वगैरे मूर्ख विधानेही करू नका. ठीक आहे एक वेळा मानू की काही राजकारणीच
फक्त तसे करीत आहेत. पण मग त्यांना खड्यासारखे बाजूला करण्याची क्षमताही
त्यांच्या मागे उभे असलेल्या निष्कलंक, पापभीरु, गरीब अशा त्या लोकांमध्ये
आहे. त्यांनी केले आहे का तसे? बरं, त्यांनी न करो, धर्मनिरपेक्षतेचा झेंडा
तुम्ही घेतला आहे, मग तुमची तरी थोबाडे त्यांच्या विरोधात उचकटत आहेत का?
तो अधमोत्तम ओवेसी आणि आझम खान जी काही वक्तव्ये करताहेत ती
देशद्रोहापेक्षा काही कमी नाहीत. त्यांना जोवर तुम्ही विरोध करीत नाही तोवर
तुमच्या सर्वधर्मसमभावाची किंमत शून्य आहे. तुम्हाला राष्ट्र प्रथम वाटत
नाही तर धर्म वाटतो आहे. असे जर असेल तर हे सूर्याजी पिसाळाच्या अवलादीचे
सर्वधर्मसमभावीसुद्धा देशद्रोही ठरतात. सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता ही
मंदिरांत, हिंदू लोकांच्या घरात जाऊन त्यांना शिकवण्याची गरज नाही. ती तिथे
गेली हजारो वर्षे आहे. किंबहुना ती अस्तित्वात आहे म्हणून तर अस्तनीतले
निखारे, पायातले साप, दुतोंडी किरडू आणि या सर्वांवर कडी करणारे हे खोटे
धर्मनिरपेक्षतावादी सुखाने जगत आहेत. माझे या बेगडी बुद्धिवंतांना आव्हान
आहे, एकदा हा तुमचा सर्वधर्मसमभाव महंमद अली रोडवर जाऊन शिकवा. तुमच्या
भेजाचा फ्राय त्याच दिवशी तिथल्या हॉटेलात विकायला ठेवलेला असेल याची
खात्री आहे.
आता अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणून कित्येक वर्षे
उपभोगलेले पुरस्कार परत करणे असेल, तर खुशाल करा. त्या परत करण्याला
काहीही अर्थ नाही. शिखांच्या कतली झाल्या, काश्मिरी पंडितांच्या हत्या
झाल्या त्यांना देशोधडीला लावले, केरळमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांच्या
हत्या झाल्या, तेव्हा हेच लोक बाप मेल्याप्रमाणे निपचीत पडले होते. जणू
त्या हत्या म्हणजे धर्मनिरपेक्षतेने दिलेल्या स्वातंत्र्याच्या अखत्यारीत
झाल्या होत्या. स्वच्छ जिहाद पुकारून दहशतवादी हल्ले झाले की म्हणायचं
दहशतवादाला धर्म नसतो. अरे मग दीड दमडीच्या लेखनकामाठ्यांनो, खोट्या
आरोपाखाली हिंदूना अडकवून त्याला मात्र भगवा दहशतवाद म्हणायचं? असली बेगडी
धर्मनिरपेक्षता काय कामाची? सत्तर टक्के जनतेच्या भावनांची किंमत जर होत
नसेल तर ती लोकशाही नाही हे या टिनपाट साहित्यिकांनी ध्यानात घ्यावे. आजवर
लोकशाहीचा अर्थ वाटेल ते भकणे, तोंडाला येतील ते आरोप करणे, अभिव्यक्ति
स्वातंत्र्य म्हणून काही वाट्टेल ते लिहिणे अथवा चितारणे असा लावला गेला
आहे. असल्या अमर्याद स्वातंत्र्याचा फायदा कुणी करून घेतला? युरोपमध्ये आज
आपण त्याची फळे पाहत आहोत. असल्याच सर्वधर्मसमभावाची आणि अभिव्यक्ति
स्वातंत्र्याची किंमत चार्ली हेब्दोवरील हल्ल्याच्या रूपात द्यावी लागली.
काही वाट चुकलेल्या लोकांच्या कर्माची फळे त्यांच्या समधर्मीयांनी का
भोगायची असा विचार सर्वांनी केला. पण हे लक्षात घ्या की काही मोजक्या
समधर्मीयांनी त्या घटनेचा निषेध केला. मग ज्यांनी निषेध केला नाही त्यांचा
हल्ल्याला छुपा पाठिंबाच होता असे म्हणायचे का? जिथे जिथे हे अतिसहिष्णू
वातावरण आहे तिथे आज ही समस्या आहे. भारत तर त्याचे नंदनवन आहे. शेजारी
केवळ आपल्या द्वेषावर निर्मिती झालेला देश आहे, तो सतत दहशतवादी हल्ले
घडवून आणतो आहे, तरीही आपण निर्लज्जपणे दहशतवादाला धर्म नसतो म्हणतो, त्या
देशाच्या कलाकारांना आलिंगन देतो. कलेला सीमारेषा नसतात अशी षंढ विधाने
करून त्याचे समर्थन करतो. त्याचेही राजकारण करतो. ती फशिवसेना तर अगदी आव
आणून त्याला विरोध करते आणि मागील गल्लीतून हळूच जाऊन तो राहत फतेह अली खान
की आणि कुणी मसण्याच्या मैफिलीला जाऊन बसते. फशिवसेनेला केवळ विरोधाला
विरोध म्हणून भाजप त्या कसुरीच्या पुस्तकाचे उद्घाटन घडवून आणते. सगळेच
नालायक.
तेव्हा खुशाल परत करा तुमचे पुरस्कार. पुरस्कार
तुमच्या लिखाणाला होता. लेखनाचा आणि वैयक्तिक शुचितेचा फारसा संबंध नसतो
हेच यावरून सिद्ध होते. आपण खूप बुद्धिवादी आहोत, बुद्धिजीवी आहोत,
अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणजे आपला श्वास आहे, मी हिंदू असलो वा नसलो तरी मला सर्व
धर्म सारखे, हे असं वाटण्याचीही एक झिंग असते. ती नशा दारू, गांजा, अफू
यांच्यापेक्षा प्रभावी असते. त्या नशेत केलेले हे कृत्य आहे असे मी समजतो.
पण मी म्हणतो नुसता पुरस्कारच परत करून का थांबता? भावना जर एवढ्याच तीव्र
असतील तर प्राणत्याग वगैरेही करायला काय हरकत आहे? सर्वधर्मसमभाव
दाखवण्याची ती एक संधी किंवा अंतिम किंमत असे समजा हवं तर. एरवी नारळ नासका
निघाला म्हणून दुकानदाराला परत करतो एवढेच त्याचे स्वरूप.
No comments:
Post a Comment