"देवानं तोंड दिलं म्हणून काय पण बोलतो काय बे? भ्रष्ट, चोर म्हणे! अहवाल म्हटलं की लोकांना "ठपका" एवढाच शब्द आठवतो. हे कॉंग्रेसवाले स्वत: सत्तेत असताना अहवाल "फुटायचा" असला की मारून मुटकून सत्यनारायणाच्या कथेला बसवल्यासारखे बसायचे. भटजी कथा सांगताहेत तर यांचं लक्ष प्रसादाकडे. आणि आता अहवाल येणार म्हटल्यावर यांना अगदी "मेनके"चा दिवाळी अंक हातात पडल्यासारखा आनंद होतो आहे. त्यातही कथांपेक्षा कासव छाप अगरबत्तीच्या फोल्डअप जाहिरातींकडे ओढा जास्त. एक अहवाल तो काय, आणि लागले आरोप करायला. अहवालात आहे तरी काय? "सकृतदर्शनी शंका ठेवण्यास जागा आहे", "संस्थेच्या मूळ लाभार्थ्यांचा माग लागत नाही", "संस्था पंजीकृत असल्याचा पुरावा आढळत नाही", "संस्थेच्या नोंदणीकृत पत्त्यावर नोंदणीकृत लाभार्थी न आढळता मूळचे विदर्भातील परंतु सध्या सेंच्युरी मिलमध्ये कामाला असलेले आठ जण सापडले. तेही रात्रपाळी असल्याने झोपलेले आढळून आले. एकाला उठवून "पूर्ती"बद्दल विचारले असता "काहून त्रास देतो बे! उद्याला येऊन जा" असे उत्तर मिळाले. त्यावरून त्याची झोप पुरती झाली नसल्याचा निष्कर्ष काढून समिती परतली." ही असली वाक्ये! अरे पुराव्याने सिद्ध करून दाखवा पुराव्याने!" गडकऱ्यांचे ते काहीशे अश्वशक्तींचे वाफेचे इंजिन फुसफुसत होते. हे इंजिन काही शंटिंगला पडणारे नव्हे. शिंगल डाऊन असला तरी रेटून पुढे जाणारी नंदीग्राम एक्स्प्रेसच ती. येथे नंदी हे मनुष्यविशेषाचे विशेषण नाही हे नम्रपणे सांगू इच्छितो, उगाच शिंगे आमच्यावर यायला नको. "गेली कित्येक वर्षे आमच्या विदर्भाची अवहेलना होते आहे. कापूस आणि संत्रे ही मानवी जीवनासाठी अत्यावश्यक असलेली पिके देणारा विदर्भ, त्याची अशी किंमत? त्यातून पुलंनी "संत्रे हे एरंडेलाबरोबर खायचे फळ आहे" असलं काही तरी लिहून ठेवल्यापासून दुकानदारही एरंडेलाच्या बाटलीशेजारी संत्री लावून ठेवू लागले. पुण्यातील काही दुकानदार तर "एरंडेल संपले, नुसती संत्री चालतील का" असंही विचारतात. सरकार काही देत नाही म्हटल्यावर आम्ही सूत्रे हाती घेतली. आपला विकास आपल्याच हाती अशी आम्ही घोषणा केली. ल्हानपणापासून या घोष्णेचं आम्हाला आकर्षण आहे. ही घोष्णा आम्ही पहिल्यांदा शाळेच्या मूत्रालयाच्या भिंतीवर खरडलेली पाहिली आणि तिथेच ठरवून टाकलं. त्या पवित्र ठिकाणी लिहिलेले सर्व वाङ्ग्मयआम्हाला शिरोधार्य वाटत आलेलं आहे. फेसबुक ट्विटर नसलेल्या त्या काळात या ठिकाणच्या असल्या भिंतीच कामास येत. आजच्या अनेक थोर महात्म्यांचे हे स्फूर्तीस्थान होय. तर, तिथेच त्या भिंतीखाली आम्ही ठरवले, आपले भवितव्य आपणच हातात घ्यायचे, आपल्या स्वप्नांची पूर्ती करायची. आपल्याला रस्त्यात फार इंटरेस्ट. लहानपणी अक्खा टाईम आपण रस्त्यातच घालवला आहे. खेळण्यात. त्यामुळे रस्त्यांचे प्रश्न आपण जवळून पाह्यले आहेत. आमच्या नागपुरात रस्ते कमी. खड्डे कमी. रस्त्यांची कामे कमी. ठेकेदार बसून राहायचे. ठेकेदार बसून राहिल्यामुळे नगरपालिकेत आनंदीआनंदच असायचा. एकूण उलाढालच कमी. याला काय प्रगती म्हणतात? ते काही नाही. आता आम्हीच यातून वाट काढणार! "पंत, परिवारातील लोकांनी आता व्यवसायात पडले पाहिजे. काय समजलात? किती दिवस स्नानसंध्येत घालवणार? तेव्हा, उत्तिष्ठत! जागृत!" असा सानुनासिक आशीर्वादही त्याच दिवशी सायंशाखेत मिळाला." येथे ते इंजिन आठवणींनी थरथरले.
"मग काय, काढली कंपनी अन काय. कंपनी तर काढली. एक टेबल अन दोन खुर्च्या एवढी स्थावर मालमत्ता. आणि स्वत:च्या हातानं रंगवलेला बोर्ड. धी पूर्ती कॉर्पोरेशन - प्रोप्रा. गडकरी बंधू. आता बंधू बिंधू काय नाय ओ, एकटाच बसायचो गाळ्यात. पण त्यावेळी ष्टाईल होती, इतर दुकानावर प्रोप्रा अमुक बंधू तमुक बंधू असं दिसायचं. आपणही भक्कम होतो. दोन भावान्ला येकदम पुरेल एवढी चड्डी येकट्याला लागायची मला. मग लिहिलं झालं बंधू. शाखेच्या लोकान्ला एक बरं झालं. ध्वज, त्याचा स्टँड, दंड, वेतचर्म, संचलनात अचानक अनिर्बंध झालेले चड्ड्यांचे पट्टे, टोप्या, गंजलेली खड्गे अशी सगळी मालमत्ता ठेवायला आमचा गाळा मिळाला. म्हटलं गाळा रिकामा दिसण्यापेक्षा बरं. मग काही आमच्या भागात प्रवासावर असलेले "पूर्णवेळ" रात्री झोपायलाही येऊ लागले. असूद्या म्हटलं. मुद्दा आमच्या प्रगतीचा होता, विदर्भाच्या प्रगतीचा होता. विदर्भाच्या प्रगतीचा मार्ग शेवटी आमच्याच गाळ्यातून जाणार याची आम्हाला खात्री होती. पण प्रगती कुठून सुरू करावी याच्यावर खल सुरू होता. सुधारणा झाली पाहिजे सुधारणा झाली पाहिजे असं आम्ही घोकत राहिलो. आमच्या त्या सतत घोकण्याने काही कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला. एकदोघांनी आम्हाला आपादमस्तक न्याहाळत दररोज बारा सूर्यनमस्कार घाला, तेलकट खाणे कमी करा, सुधारणा होईल असे सुचवले. त्यांचाही दोष नव्हता. नको ती प्रगती कशी भराभर होते. आम्ही वायुभक्षण करून राहिलो तरी ती प्रगती थांबणारी नव्हती. असो. मग विचारमंथन बैठक झाली. नेहमीचे राष्ट्रीय पुनर्निर्माण, हिंदुराष्ट्रप्रेम, स्वातंत्र्यदेवीचे पूजन या विषयांवर तीसचाळीस मिनिटांचे चिंतन झाल्यावर मग प्रगतीचा मुद्दा चर्चेला घेतला गेला. बैठक धंतोलीत असल्यामुळे त्यातल्या त्यात प्रथम विदर्भाच्या प्रगतीचा विचार पुढे आला. कपाशी भावाच्या पुढे विषय जाईना. मग आपल्या सुपीक डोक्यात एक जबरदस्त विचार आला. उसाच्या जोरावर पश्चिम महाराष्ट्राचे लोक लैच भाव खाऊन राहिले आहेत. आमच्या नशिबाला मात्र ही कपाशी. भोत नाइंसाफी है. ही परिस्थिती बदलली पायजे. सहकार काय पश्चिम म्हाराष्ट्राचाच आहे काय? म्हटलंच आहे, व्हेन थिंग्ज गेट टफ, टफ ऑल्सो गेट्स अदर थिंग्ज (बहुतेक अशीच काहीशी म्हण आहे असं वाटतं). आपण तर टफ म्हणजे गेंडा छाप ताडपत्रीसारखे टफ. कितीही ढकललं तरी विदर्भ पश्चिमेकडे सरकणार नाही. मग आपण उसालाच इथं आणायचं. धी पूर्ती कॉर्पोरेशन साखर विकणार ही बातमी अख्ख्या विदर्भात पसरली. आपणही दोन चार साखरेची पोती आणून गाळ्यात लावली. लोक ते अप्रूप दाखवायला पोराबाळांना आणू लागले. पेपरमध्ये आपला साखरेच्या थप्प्यावर हात ठेवून उभा असल्याचा फोटो पण छापून आला. च्यायला ब्लॅक-व्हाईट फोटोचे दिवस ते. माझ्याऐवजी पोत्याच्याच खाली माझं नाव छापलं गेलं."
"हळूहळू सहकारातील मज्जा कळत गेली. साखरेच्या जोडीला मळी आल्यावर तर बहारच आली. रोजच्याला पाचहजार बाटली माल निघू लागला. एकदा कुणीतरी म्हणाले अहो एवढा बायोग्यास तयार करताहात, अख्ख्या विदर्भाला वीज मिळेल. पयले मी तडकलोच. लेका माझं मी कमवून खातो, तर तुला का त्याच्या ग्यासचा त्रास रे बाबा? पण कारखान्याच्या म्यानेजिंग डायरेक्टरनी समजावलं की हा तो ग्यास नव्हे. यापासून खरंच वीजनिर्मिती करता येईल. सरकारी सबसिडीपण मिळेल. कर्ज मिळेल. सबसिडी! किती गोड शब्द आहे. खुशाल करा म्हटलं. बायोग्यास नसला तर दुसरं काही तरी वापरा, पण ती सबसिडी घ्या. ग्यास हा शब्द उगाचच बदनाम झाला आहे. पण मनाशी म्हणालो बटाटेवडा जरा कमीच केला पाहिजे बरं. तिथं काय सरकारी सबसिडी नाही मिळायची. उगाच पोटाला तडस कशाला हवी?"
"पूर्तीचा कारभार मोठा होऊ लागला. आमचा एक गाळा कमी पडू लागला. साखर विदर्भात झाली तरी विकायला मुंबईत जायला लागायचं. मग मुंबईत ऑफिस काढायचा निर्णय झाला. म्हणजे मी घेतला. आता शाखेत जाऊन निर्णय घेणं, परिवारात चर्चा करणं हे जरा कमी झालं होतं. कमी म्हणजे बंद. पण म्हणजे मी स्वयंसेवक राहिलो नाही असं काही नाही. स्वयं सेवाच करत होतो मी. पर्यायाने विदर्भाची सेवा आपोआप होत होती. म्हणजे असावी. नक्कीच. शंकाच नाही. म्हणजे, नाहीतर हिवाळी चिंतन शिबिरात कुणी बोललं नसतं का मला? की बुवा विदर्भाची प्रगती होत नाहीये बरं का. कुणी काही बोललं नाही. तेव्हा नक्कीच होत असणार. मी तर म्हणतो विदर्भाचीच काय अख्ख्या देशाची प्रगती होते आहे. पूर्तीने देशाची पुरती प्रगती केली आहे. निदान माझी स्वप्नपूर्ती तरी केली आहे. या कॉंग्रेसवाल्यांचं बोंबलायला काय जातंय?" एवढं सगळं बोलून नंदीग्राम एक्स्प्रेस इंजिन यार्डात गेलं.

No comments:
Post a Comment