आत्ता कुठे म्याडमचा दूरदर्शीपणा लक्षात येतो आहे. धाकले धनी "ममा, ममा,
मी! मी!" अशी मची बाराखडी म्हणत होते तेव्हा आम्ही पण "म्याडम, म्याडम,
तुमी तुमी!" अशी म्याड बाराखडी म्हणत होतो. पण म्याडम हुशार निघाल्या.
आम्ही सगळे पक्षानं दिलेला कित्ता गिरवत बसलो होतो तेव्हा मौनी सिंग बाबा
डोळे मिटून खुरमांडी घालून बसले होते. लोकसभा नव्हे, जणू काही गुरुद्वारातच
बसले आहेत. गुरु ग्रंथसाहिबांचं दर्शन घेऊन झालं आहे. हातावर तुपानं
माखलेला शिरा प्रसाद पडला होता तो खाऊन झाला आहे. तूर्तास तरी भूक थोडी
शमली आहे. समोर दोन सरदारजी अगम्य भाषेत सर्दी झालेल्या आवाजात भजन म्हणत आहेत. त्यांच्या बाजूला
अजून दोन डिट्टो तसेच दिसणारे सरदार तबला आणि पेटी कुटत आहेत. लंगरात
आज काय असावं बरं, तो नेहमीचा सरसोदा साग नको बुवा, लसणाच्या ढेकरा येत
राहतात, म्याडमच्या शेजारी बसायचं असतं. बैंगन का भरता वातुळ, सभागृहात
दिवस काढायचा आहे, कारण नसता इतरांचा सभात्याग नको व्हायला, त्यापेक्षा
राजमा बरा, इत्यादी सुखद विचारात ते पडले असावेत असं वाटत होतं. आम्हाला
ते स्पष्ट कळतं. विरोधक मात्र सगळ्याला विरोध करायचा म्हणून कायच्या काहीच
समजत असतात. म्हणे मौन हे बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. एवढा ऑक्सफर्डला
शिकलेला माणूस काय साधा विचार करत असणार काय? नक्कीच जीडीपी, ग्रोथरेट ऑफ
इकॉनॉमी, परकीय चलन गंगाजळी असलंच कायबाय सारखं डोक्यात असणार. आपल्याला तर
हे शब्द ऐकून म्हायती. सालं धावीनंतर कोणी पुस्तक हातात धरलंय? वाटलं होतं
धाकले धनीपण ऑक्सफर्ड का केम्ब्रिज कुठं तरी मोठ्ठ्या शाळेत जाऊन आले आहेत
म्हणे, त्यांना म्हायती असेल. त्यांना जीडीपी म्हणजे काय असं एकदा विचारलं होतं. तेव्हा त्यांनी
"देशाचे मैल्याचे वट्ट उत्पादन" असे उत्तर दिले होते. च्यायला आपल्याला तर
धक्काच बसला होता. मी सरळ म्हणालो, ओ, काय पन फेकू नका ओ, म्हाईत नाही तर
तसं सांगा. तर ते पेटलेच. तडक जाऊन ऑक्सफर्डचीच डिक्शनरी घेऊन आले. म्हणाले
हे बघा "ग्रोस" या शब्दाचा अर्थ बघा त्यात. अनेक अर्थ आहेत, पण त्यातला एक
अर्थ गलिच्छ, अनप्लेझंट असा आहे. आता "देशाचे रोजचे गलिच्छ उत्पादन" दुसरे काय असणार? मी अत्यंत आदराने त्यांच्याकडे पाहिले. काही म्हणा, माणूस आहे हुशार. नापास का असेना, ते काय आपण पण आहोत. पण आज इथं लोकसभेत आलोच की नाही? त्यावेळी पैल्या बाकावर बसणारे देशपांडे जोशी आज बसलेत अमेरिकेत जाऊन कॉम्प्युटर कुटत. पण काही असो, आपल्याला लई अभिमान वाटला. च्यायला इतके दिवस आपण जीडीपी ला हातभार लावत होतो आणि आपल्याला त्याचा पत्ता पण नव्हता! तरीच सगळे जीडीपी वाढायला पायजे जीडीपी वाढायला पायजे म्हणत असतात. मी आपला पक्षाचा आदेश मानून मान डोलवत असायचो. तसं भाजपमध्ये तरी किती शाने लोक आहेत? त्यांनाही हे शब्द घंटा कळत नसणार. परकीय गंगाजळी म्हटलं की बरेच जण आदरानं नमस्कार करतात आणि "परकीय" या शब्दाला आक्षेप घेतात. गंगा आणि जळ हे दोन शब्द एकत्र आले की झालं, भाजप खासदार साष्टांग नमस्कार घालतात. फक्त ती गंगाजळी स्वदेशी असावी असा त्यांचा आग्रह असतो. तेव्हा आपल्याला एवढं काही वाईट नको वाटायला.
तेव्हा म्याडमच्या दूरदर्शीपणाबद्दल बोलत होतो. पंतप्रधान पदाला आगदी योग्य माणूस शोधून काढला. पद दुर्मिळ, तसंच कॉंग्रेसमध्ये शिक्षणवालेही दुर्मिळच. म्याडम स्वत: काय शिकल्या आहेत ते त्या आकाशातील प्रेमळ बापासच ठाऊक. तो येणार, शुभ वर्तमान घेऊन येणार असं बरीच वर्षं ऐकतो आहे. ते जे काही शुभ वर्तमान असेल त्याबरोबर म्याडमच्या शिक्षणाचे शुभ नसले तरी वर्तमान तरी घेऊन यायला काय हरकत आहे म्हणतो मी? शिकल्यालं सवरल्यालं म्हटले की शशी थरूर हे एक प्रात:स्मरणीय नाव नजरेसमोर येते. पण त्यांचे अलीकडील वर्तमान पाहिले की एकूण गडी नुसताच शिकलेला आहे सवरलेला काय वाटत नाही. गड्यानं बायकोच्या हत्येचं प्रकरण असं काही हाताळलंन की वाटावं हा इसम खरंच कॉंग्रेसचा आहे की आप पार्टीचा? म्हणे तपासात पूर्ण सहकार्य करीन! अरे खरा कॉंग्रेसचा असतास तर ती आपली बायको असल्याचाच मुळात नकार दिला असतास! बसा मग करत तपास बिपास. या बाबतीत भाजपवाले कॉंग्रेसपेक्षाही चालू. बायको बियको भानगड येऊच नये याची व्यवस्था तीसतीस वर्षांपूर्वीच करून ठेवतात. मग एका दगडात दोन पक्षी. रोज घरी आल्यावर "झाल्या लष्कराच्या भाकऱ्या भाजून? घरात मेलं जोंधळ्याचं पीठ संपलंय ते आणून टाकता येत नाही!" ही कटकट करायला कुणी नाही आणि जनांत ब्रम्हचर्याचा दबदबा! अहो "पूर्णवेळ" आहेत ते, देशकार्याला वाहून घेतलं आहे, स्वत:ची आई आणि राष्ट्रदेवता यांशिवाय कुणालाही वंदन करत नाहीत ते इत्यादि वाक्ये अशीच तयार होतात मग त्यांच्याबद्दल. हुषार लेकाचे. आम्ही एकदा त्यांचे स्खलन करण्याचा प्रयत्न केला होता. बाजार समितीची निवडणूक झाली होती. अर्थातच कॉंग्रेसचेच सगळे लागून आले होते. मग पार्टी घातली होती मळ्यावरच्या बंगल्यात. आपलेच खास लोक होते. गम्मत म्हणून बोलावलं एका संघिष्ट भाजपवाल्याला. तेवढीच आपलीपण करमणूक. तर लेकाचा उपवास आहे म्हणून घरून साबुदाण्याची खिचडी बांधून घेऊन आला होता. आम्ही सोडा उघडला तेव्हा याने उपवास सोडला. एवढी खास आयटम आणली होती डान्सला तर "परस्त्री मातेसमान" असं म्हणून हा अक्खा टाईम सावरकरांची "सोनेरी पाने" वाचत बसला होता. पुन्हा काय बोलावलं नाही त्याला. असो. तर हा थरूर काही कामाचा नाही. आम्ही घोटाळे करायचे आणि हा त्यांच्या तपासात सहकार्य करत बसणार. दुसरं थोर व्यक्तिमत्व म्हणजे आमचे दिग्गीराजे. राजा माणूस. राजारजवाड्यांसारखेच वागणे. भानगडी करायच्या त्या मान ताठ ठेवून. अगदी अंगवस्त्राबरोबर पकडलं गेलं तरी लाज न वाटू देता उलट "कोण आहे रे तिकडे! आमचा असा एकांतभंग? हत्तीच्या पायी देईन एकेकाला!" अशी आरोळी ठोकायची. पण हेही पक्षधोरणात बसत नाही. अळीमिळी गूपचिळी हे पक्षाचं ब्रीदवाक्य! इथं दिग्गीराजे स्वत:च ट्वीटरवर चौवीस तास पडीक. म्हणजे आम्ही घोटाळा करून घरी जाऊन पडायच्या आत ब्रम्हांडात झेंडे लागून त्याला हजारो लाईक्स भेटणार. शिवाय ते क्यागवाले आमच्या आधी घरी जाऊन आमची वाट बघत बसलेले असणार. नकोच ते. चिदंबरम हे आणखी लुंगीवेष्टित शिकल्यालं व्यक्तिमत्व. चेट्टीनाड प्रांतातून आलेलं आणखी एक तिखट रसायन. पार हार्वर्डमधून शिकून आलेलं. पण टूजी स्पेक्ट्रममुळं घोळ झाला. काय पण माणसाला हव्यास असतो. स्वत: एक नाही दोन दोन ब्यांका काढलेल्या. म्हणजे दुसऱ्याचा पैसा घेऊन परत त्यालाच फी लावायचा सरकारमान्य धंदा. कशाला पायजे हो राजकारण आणि घोटाळ्यांची भानगड?
पदावर माणूस पण असा पायजे की स्वत: स्वच्छ पायजे. लोकान्ला विश्वास बसला पायजे. आगदी पार चौकशी बिवकशी झाली तर उत्तर देणारा आसा पायजे की लोकान्लाच उलट वाटलं पायजे की काय मोगलाई लावली आहे? माणूस कसा वारकरी दिसतो आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, मुखानं पांडुरंग हारी म्हणतो आहे, वाटेत भाकरतुकडा मिळाला न मिळाला, मिळेल त्याला पांडुरंगाचा प्रसाद मानून ग्रहण करतो आहे. वारीतल्याच कुणी दुसऱ्याचं पाकीट मारताना पाहिलं तरी त्याला "ही सारी ईश्वरची करणी" मानून मुखानं चकार शब्द न काढता चालतो आहे. आसा माणूस पाहिजे! मग आपले मौनी बाबा आयतेच सापडले म्याडमना. "तुम्हाला पंतप्रधान करू का" असं विचारलं तरी "जशी आपली इच्छा" एवढंच म्हणाले होते म्हणे त्यांना. तेही नुसती मान हलवून. आता आम्हीही कधी कधी नुसती मान हलवून होकार देतो बैठकीत. पण तेव्हा आमच्या तोंडात गुळणी असते. एकशेवीस तीनशेची छान किक बसलेली असते. शिवाय नकार द्यायची अथवा तोंड उघडून बोलायची पक्षात पद्धत नाही आमच्या. या सगळ्या अर्हतेत मौनी बाबा फिट्ट बसत होते. आम्हाला खात्री आहे "पंतप्रधान" ऐवजी "दत्तकविधान" असं जरी म्हटलं असतं तरी ते "जशी आपली इच्छा" असंच म्हणाले असते. आज म्याडम किती धोरणी आणि दूरदर्शी ते लक्षात येतं आहे. साधा कोळसा तो काय. तो द्यायला काय कुणाची परवानगी लागते? आम्ही कित्येक वेळेला आमच्या शेजारच्या घरी बंब पेटवायला हवेत म्हणून फुकट कोळसे दिले आहेत. काही पेटवायचं असेल तर कुठलाही कॉंग्रेसवाला मागे हटणार नाही. पण आम्हाला न विचारता का दिलेत म्हणून आमच्या गल्लीतील लोक कधी भांडायला आले नाहीत. हे भाजपवाले काहीही काळं दिसलं की ते कॉंग्रेसचंच समजतात. आपल्या स्वत:च्या तोंडाला मिश्री लावून दात काळे झाले तरी आमची कोलगेट वाईट दिसते त्यांना. आता मौनी बाबा चौकशीला तोंड देतील. तशी आम्हाला खात्री आहे इतक्या वर्षात ते न उघडलेलं तोंड आताही उघडणार नाही. पण न जाणो, म्हातारपणात तोंडावर आणि मूत्रपिंडावर नियंत्रण राहत नाही म्हणतात. सोसले नाही तरी नको ते खावेसे वाटते आणि इच्छा नसली तरी कुठेही घंपतीबाप्पा होऊन जातो. म्हणून आम्ही सक्काळी ते घरातून बाहेर पडायच्या आधी त्यांना गाठणार आहोत. उगाच त्यांच्या समोर जाऊन "ह्या: ह्या: ह्या: काय आपलं तसं काय नाय बरं का. आपण न्हेमीच तुम्हाला पाठिंबा देत आलोय. तुम्ही काय भिऊ नका, हे चौकशी बिवकशी म्हंजे नुसता भाजपचा कावा हाये बरं का. म्हंजे उगाच भ्या दावून नावं काढून घ्यायची आन पुढच्या इलेक्शनला वापरायची. ह्ये: ह्ये: तुमाला तसं सगळं म्हाईतच हाये म्हणा. तेवा तेवढं आपलं नाव जरा दोन चार दिवस इसरून जावा म्हंजे झालं. काय? ह्ये: ह्ये: ह्ये: बाकी आमाला तुमच्याबद्दल आदरच हाये हो. तो दावण्यासाठीच आमी आलोय." असं म्हणून यायचं आणि पुढील सर्व परमेश्वराच्या इच्छेवर सोडून द्यायचं. देव करो आणि त्यांना खोटं बोलण्याची ताकद मिळो. च्यायला पंतप्रधान असताना कधी भ्यालो नाही त्यांना, आता ते पंतप्रधान नसताना आमची फाटली आहे. स्वच्छ, शिकलेला माणूस पदावर बसवला की कार्यकर्त्यांची पंचाईत होते. म्याडम तुम्ही दूरदर्शीच.

No comments:
Post a Comment