हे पत्रकार म्हणजे नुसती गिधाडं आहेत. जरा कुठं टंग ऑफ स्लिप, आपलं, स्लिप ऑफ टंग झाली माझ्याकडून की झालं. मागे संसदेत जरा कुठं डुलकी काढली तर पुढले पंधरा दिवस माझी झोप उडवली. स्त्रीशक्ती म्हणजे काय चीज आहे ते लोकांना माहीत नाही. मी लहानपणापासून पाहतोय. आज्जी तर कसली भारी होती. भल्या भल्यांना नाकीनऊ आणायची. आजोबापण बहुधा फार हुषार असावेत. आज्जीनं घरात आणीबाणी लागू केल्यावर पळूनच गेले म्हणे. आज्जीलासुद्धा सापडले नाहीत. पुढं तिनं अख्ख्या देशात आणीबाणी आणल्यावर चड्डीवाल्यांचीसुद्धा पळापळ झाली होती म्हणे. मी लहान होतो तेव्हा. दीदीही लहानच होती. पण जेव्हा मी ममा, ममा एवढंच बोलायला शिकलो होतो तेव्हाच ती "मेरी रायबरेली मैं नही दूंगी" असं म्हणायला शिकली होती. आज्जीचं ऐकून ऐकून. पुढं आज्जीच रायबरेलीतून हरली तेव्हा मग ही नुसतंच ,"मेरी राय नही दूंगी" म्हणायला लागली होती. तेही आज्जीचंच ऐकून. माझी सगळी टॉईज तिच्या ताब्यात असायची. खेळायचं असेल तर तिला विनवणी करायची, मग ती कुलुप लावलेल्या कपाटातून माझी खेळणी काढून देणार. त्यावेळी ममाची शक्तीही काही कमी नव्हती. मी हट्ट केला की ढुंगणावर असा काही रट्टा ठेवून द्यायची की यंव रे यंव. नेहमी मला आमच्या घराण्याची थोरवी सांगायची. आपलं घराणं किती थोर, नाव किती उच्च, ते मी कसं राखलं पाहिजे वगैरे वगैरे. मला कंटाळा यायचा. नावात काय आहे असं शेक्सपियर उगाच म्हणालाय का? एकदा शाळेत मी नाव लिहिताना बेफिकिरीनं गांधीत एच घालायचा विसरलो. आता यात चिडण्यासारखं काय आहे? पण ममानं "गधड्या, तू काय लिहिलंस, त्याचा अर्थ काय झाला हे तरी कळलं का तुला?" असं म्हणून अर्थ समजावून देण्यासाठी जे काही फटके दिले, ते आजही सही करताना आठवतात. शाळेतला अनुभवही काही फारसा वेगळा नसायचा. माझे गाल सफरचंदी म्हणून मुलं चिडवायची, तर मुली गालाचे चिमटे काढायच्या. दिसायला नाजूक पण चिमटे कसले अशक्य काढायच्या. टीचर तर अशा सगळ्या एकापेक्षा एक खडूस बाया होत्या. वर्गात एवढी मुलं, पण प्रश्नाचं उत्तर मीच द्यायला हवं का? पाचवीतील मुलास शंभरपर्यंत आकडे आलेच पाहिजेत हा हट्ट का? इतिहासाच्या म्याडम तर अतीच. भारताचे पहिले पंतप्रधान कोण म्हणे. आता मला काय ठाऊक? मी त्यावेळेला जन्मालासुद्धा आलो नव्हतो. तसं म्हणालो तर बाईंनी थेट माझे पणजोबाच काढले. मी तडकून म्हणालो, तुम्ही मला काय शिक्षा करायची ती करा, माझ्या पणजोबांना मध्ये का आणता? घरी आज्जी, ममा आणि दीदी तर शाळेत या सर्व साळकाया माळकाया. माझं बालपण असं सगळं स्त्रीशक्तीचा अनुभव घेण्यात गेलं.
आता मी मोठ्ठा झालो आहे असं म्हटलं तर ममा आणि दीदी दोघी खूप हसतात. मी चिडलो की मग म्हणतात,"होय रे बाबा, तू मोठ्ठा झाला आहेस. झालं?" असं म्हणून एकमेकींना टाळी देतात. बरं घरात असं, बाहेर तरी मला शांती मिळावी? तेही नाही. पर्वा संसदेत डुलकी काढली म्हणून मीरा कुमारांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेऊन झापलं. ममताआंटीशी मी कधीच पंगा घेत नाही. प्रथम प्रथम मी त्यांना "नोमोश्कार, की खोबोर? हाऊ इज त्रीणमूल?" घालायचो. तर "की???" असं म्हणून माझ्याकडे रोखून बघत राहायच्या. नंतर लालूअंकलकडून कळलं, की त्रीणमूल म्हणजे काही त्यांच्या मुलाचं नाव नाही. मुळात ते त्रीणमूलही नाही तर तृणमूल आहे म्हणे. लालूअंकल जेव्हा तृणमूल म्हणतात तेव्हा त्यांच्या तोंडातून छान थुंकी उडते आणि कानावरचे केस रोमांच आल्याप्रमाणे उभे राहतात. त्यानंतर संपूर्ण सेशनमध्ये ममताआंटी मला डेथ स्टेअर देत होत्या. त्यादिवशी घरी जाताना "टाटा" म्हणालो तर फुटाण्यासारख्या फुटल्या. "आप बोल दो टाटाबाबूसे, किसानोंकी जमीन उनकीही रहेगी. बडा आया टाटा का चेला!" मला काहीच कळलं नाही. टाटाही म्हणायचं नाही? ठीक आहे. आता त्या समोर आल्या की मी सोज्वळ घरंदाज मुलीसारखी दृष्टी खाली वळवतो. खरं तर समोरासमोर येणंच टाळतो आता. मी ममाला म्हणालो मला जायचंच नाही परत संसदेत. तर म्हणाली ते काही नाही, नुसता घरी बसून टीव्ही बघायचा त्यापेक्षा तिथं जा. दिग्गीअंकलना विचारलं स्त्री शक्तीचा सामना कसा करायचा हो? तर म्हणाले सामना करायचाच नाही. लव्हाळं व्हायचं. गवत व्हायचं. गवतावरून बुलडोझर गेला तर गवताला काही होतं का? नाही होत. उलट ताठ उभी राहणारी झाडं मात्र भुईसपाट होतात. हे मात्र खरं हं. ममाबरोबर तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा स्वत: पाहिलंय मी. तिथे सगळीकडे देवळंच देवळं. दिसलं देऊळ की घाल प्रदक्षिणा. मध्येच एक प्रशस्त देऊळ दिसलं म्हणून प्रदक्षिणा घालायला गेलो तर ममानं जोरात मागे खेचलं. म्हणाली, प्रदक्षिणा कसली घालतोस? हे काही देऊळ नव्हे. या अम्मा. इथल्या देवी. लोटांगण घाल साष्टांग. त्या आम्हाला भेटायला बंगल्यासमोरील हिरवळीवरून चालत आल्या होत्या. हिरवळीला काहीसुद्धा झालं नाही. ममानं ,"हे आमचे चिरंजीव. हल्लीच शाळा सोडून पणजोबा-आज्जी-वडिलोपार्जित धंदा बघायला लागला आहे. आशीर्वाद द्या." अशी माझी ओळख करून दिली. मला नीट न्याहाळून अम्मा म्हणाल्या,"अच्चा, कुन्जुम हल्लू दिकता ऐ. कोई बात नै." असं म्हणून अम्मानी मला कापूर घातलेला पेढा खायला दिला होता. कुन्जुम हल्लू म्हणजे काय? आणि मिठाईत कापूर का घालतात हे लोक? सर्वत्र स्त्रीशक्तीचा प्रादुर्भाव दिसला. तिथून निसटून पलीकडे केरळमध्ये गेलो तर तिथं मातृसत्ताक व्यवस्था असल्याचं कळलं. फार बरं वाटलं. हाहाहा, लेको, मला हसता काय? के करुणाकरन, ए के अँटनी वगैरे लोक रोज आपापल्या मातोश्रींची आज्ञा घेऊनच सगळे कारभार करतात असं कळलं. अँटनी यांची आई कडक होती. लहानपणी त्यांच्या हातावर छदामपण ठेवत नसे. त्यातूनच मग "ओरू आणा समरम", अर्थात "एक तरी आणा द्या हो" चळवळ सुरू झाली असे ऐकण्यात आले. थोडक्यात इथेही स्त्रीशक्ती. वाटलं होतं इथे तरी ममाच्या तावडीतून सुटण्याच्या काही टिप्स मिळतील. कसचं काय. असो. मग आमचे माणकोजी म्हणाले तुम्ही आमच्या म्हाराष्ट्रात या. राकट, कणखर, मर्दांचा, दगडांचा देश तो. पण पूर्वी बाबांकडून लाटणेवाल्या बाईंच्या गोष्टी ऐकल्या होत्या. म्हणालो नको हो, उगाच लाटणं बसायचं पाठीत. तर म्हणाले नाही हो, गेल्या त्या देवाघरी. आता तसं कुणी राहिलं नाही. निश्चिंत मनाने या. झालं. गेलो मग मुंबईला. पहिलाच झटका सकाळी सकाळी मिळाला. माणकोजी म्हणाले चला जरा समुद्रकिनाऱ्यावर फिरून येऊ. वाटेत ताजी म्हावरं घेऊन कोळणी बसल्या होत्या. मी कुतूहलाने न्याहाळत उभा राहिलो तर एका कोळणीने,"मेल्या काय बगतोस रे डोळं फाडून? वाटा पायजे असेल तर बोल, नायतर फुट इथून." असा दम दिला. आधीच मुंबयच्या हवेनं घाम फुटलेला, त्यात तिच्या हातातली कोयती पाहून सगळीकडून धारा फुटल्या. माणकोजी दात काढून हसत होते. नंतर सहकुटुंब भेटायला आलेले यच्चयावत सगळे नेते आपापल्या बायकोची ओळख "हे आमचं गृहमंत्रालय" अशी करून देत होते. याचा अर्थ बाहेर "अण्णा, दादा आणि तात्या" असलेले हे नेते घरात आले की शेजारपाजारी गेलेल्या यांच्या बायका "घ्या, आलं आमचं पात्र घरी, जाते बाई घरी मी. मी नसले तर धड पायजमासुद्धा मिळत नाही यांना." अशा शब्दात त्यांची संभावना करत असणार. या सर्व बायकांनी कवतिकाने माझ्याकडे पाहून,"मग? यंदा कर्तव्य आहे की नाही? आम्हाला बोलवा हं लग्नाला!" अशा अर्थाचे उद्गार काढले. म्हणजे मी घरात आहे त्या स्त्रीशक्तीला तोंड देत कसाबसा टिकून आहे तर या बायका ममाला नव्या दमाचं सैन्य पुरवण्याच्या मागे. "अहो एवढ्यात काय घाई आहे? आत्ता कुठं चाळीशी ओलांडलीय." असं सलज्ज उत्तर मी दिलं. विधानसभेत, लोकसभेत गदारोळ करणारे आमचे हे लोक, या सगळ्या बायकांसमोर चूपचाप बसून होते. काही बायकांनी,"महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळायलाच हवं. आम्ही बायकांनी काय फक्त डीबीएमएस करून गप्प राहावं?" अशी मागणी केली. त्यावर सर्व पत्नीव्रतांनी माना खाली घातल्या. त्याने चिडून त्या आपापल्या नवऱ्यांना ढोसून म्हणाल्या,"काय हो? बरोबर आहे की नाही? तोंड उघडून बोला घडघडीत." तसं गडबडीनं नवरे मंडळींनी एकसुरात उत्तर दिलं,"हो हो, म्हणजे काय. ३३ टक्केच का १३३ टक्के आरक्षण पाहिजे. " मी माणकोजींना विचारलं, "डीबीएमएस ही काय भानगड आहे? ही कुठली पदवी?" ते म्हणाले,"धुणी भांडी म्यानेजमेंट सायन्स. खोलात शिरू नका, बायका तापतील.".
एक नवी दिशा घेऊन मी मुंबईतून निघालो. स्त्रीशक्तीपासून लांब पळण्यात अर्थ नाही हे लक्षात आले आहे. सृजनाची ताकद असलेली स्त्री ही एखाद्याला घडवू शकते आणि बिघडवू शकते. सृजनासाठी संहाराचीही आवश्यकता असते. पक्ष चांगला घडायचा असेल तर आत्ता असलेली घाण संपली पाहिजे, तिचा संहार झाला पाहिजे. कॉंग्रेस वाचायची असेल तर ती आधी संपली पाहिजे. पुरुषांपेक्षा स्त्रीला नीतीमत्तेची चाड जास्त असते, भ्रष्टाचारची चीड असते, त्याचबरोबर नैसर्गिक ममताही असते. स्त्रिया राजकारणात आल्या, अधिकारावर आल्या तर त्यांचे निर्णय स्वार्थाऐवजी समाजाभिमुख जास्त असतील. याचाच अर्थ, स्त्रीशक्तीची त्सुनामीच देशाला वाचवेल. कॉंग्रेसपासून, भ्रष्टाचारापासून. ममा, दीदी काय वाट्टेल ते म्हणोत, मी अस्संच म्हणणार.

No comments:
Post a Comment