मरावे परि फेसबूकरूपी उरावे
भिकार पोस्ट तरी लाईक मारावे
आपणही उलट टुकार पोस्ट करावे
घटिका पळे दिन मास झणी सरावे
सदोदित वॉलवर पडीक राहावे
जीना यहां मरना यहां घोकत असावे ।।
व्याकरणाची चिंता करणे सोडोन द्यावे
शुद्धलेखनाला तुज्या आयचो घो म्हणावे
"खुप छान, खुप छान" कॉमेंट वाचून रडावे
मनी "खू दीर्घ रे सोट्या!' असे ओरडावे
चडफडून ओठांवर दात रुतवावे
खुनातला खू र्हस्व की दीर्घ ते आठवावे।।
वाया गेलास तू असे थोरांनी ऐकवावे
बाबा तू यूसलेस असे पोरांनी म्हणावे
फोन अथवा मी असे बायकोने चॅलेंजावे
इथले वायफाय प्रिय असे बॉसने हिणवावे
हाच तो सर्वसंगपरित्याग असे स्वत:स समजवावे
साधूस जशी चिलीम तसे हे फेसबूक बरवे।।
परि वृथा न हा त्याग असे ऐकण्यात यावे
थेट यूएस मधून सनई चौघडे वाजावे
वाजावे कसले खरे तर कानी बोंबलावे
पाहून ती भरतभेट आनंदाश्रू ओघळावे
मारा पासे सवा कोट यूजर छे नमोंनी वदावे
चोक्कस असे फेसबूकस्वामींनी चीत्कारावे
अन सवासो कोट डोलर नमोचरणी अर्पावे।।
सवा कोटीतील म्यां एक म्हणोन हरखावे
भरास येऊन स्टेटस अपडेटावे
झालाच आता भारत महासत्ता म्हणावे
पाहोन ते ट्रेंडिंग ते दोन बनिये सुखवावे
बीजनेस आणि राजकारण भरून पावावे
आपण तेवढे आपले ब्रीद सांभाळावे
मरावे परि फेसबूकरूपे उरावे ।।
मरावे परी फेसबुक रुपी उरावे …क़्या बात है!
ReplyDeleteअरे मंदार पण,.......
ह्या फेसबुक मुळेच झाली पेहेचान
आनंद देते मज हे मस्त लिखाण
त्यामुळे मारावे परि फेसबुक रुपी उरावे
यापेक्षा,
मारावे परि बहुत जनांच्या उरी वसावे
हे तुझ्या साठी मी म्हणेन ....
विद्याताई, तेही खरेच आहे. फेसबुकमुळे चांगल्या लोकांची, कलाकारांचीही पहचान झाली. :-)
DeleteWell written Mandar bhau !!!
ReplyDeleteधन्यवाद मुकुंदजी
DeleteWell written Mandar bhau !!!
ReplyDelete