कोकणात भजनं ही गोष्ट अत्यावश्यक. सणासुदीला, कार्यक्रमांना, देवळातील
उत्सवानिमित्त भजनं होत असतात. ती मनोभावे ऐकणारे लोकही असतात. पूर्वी
सिनेमाच्या गाण्याची चाल देऊन भजनं म्हणणे वगैरे होत असे. त्यावर लोक हसतही
असत. पण तरीही त्यात बीभत्स प्रकार नव्हते. वेडेवाकडे अंगविक्षेप, हिडीस
गाण्यांची चाल हे प्रकार नव्हते. त्याच कोकणात आता हा नवा प्रकार बोकाळला
आहे. आणि तो गंभीर आहे. शांताबाय, जपून दांडा धर या असल्या देहांतशासनाच्या
लायकीच्या गाण्याच्या चालींवर भजनं? त्याबरोबर भजनीबुवा थेट रोंबाटात
नाचल्यासारखे नाचतात काय, गॉगल लावून लुंगी नेसून सिनेमातील हिडीस नृत्ये
काय करतात! सगळंच ओकारी आणणारं आहे.
संस्कृती अचानक मरत नाही. ती अशी कणाकणानं, हालहाल होऊन निजधामाला जाते. संस्कृती म्हणजे जीवनपद्धती, रिवाज, सणवार असं वरकरणी असलं तरी तिचं खरं स्वरूप "जे जे उत्तम उदात्त, जे करी आत्मा उन्नत" असं असायला हवं. पण कुठून तरी आपल्याला सस्त्यात मजा पाहिजे ही जी एक संस्कृती वाढीला लागली आहे त्याचा हा परिपाक आहे. आयोजकही मग "पब्लिककी डिमांड है बाॅस!" असं म्हणत किराणा मालाचं दुकान उघडून बसतात. (हो, अस्सल मराठी माणसाची हिंदी ही बोलीभाषा आहे.) डिमांडप्रमाणे विक्री हवीच. गंदा है पर धंदा है बाॅस! यातूनच शांताबाय, गढुळाचं पाणी, पोरी जरा जपून, यासारखी केवळ हिडीस विद्रूप गाणी जन्माला येतात. पण जोवर ती गाणी 'क्वाटर' लावून बेधुंद नाचणारे राजकीय गुंडांना, साॅरी, कार्यकर्ते किंवा पावसाळ्यातल्या अळंबीप्रमाणे उगवणाऱ्या गणेश मंडळांच्या अतिभाविक कार्यकर्त्यांपर्यंत मर्यादित होती तोवर ठीक होतं. पुराचं पाणी गावात शिरलं नव्हतं. जी काही राड, गदळ होतं ते गावाबाहेर नदीत फिरायचं आणि पूर सरला की पाणी निवळायचं. पण गावानं दुर्लक्ष करून वाटेल तशी बांधकामं केल्यावर जे होतं तेच झालं. पुराचं पाणी गावात शिरून घरं उध्वस्त करत चाललं. आपली भजनसंस्कृती हा एक अमूल्य ठेवा आहे. अध्यात्म हा एक क्लिष्ट विषय. जीवनाचा अर्थ सोप्या भाषेत गृहस्थ धर्म निमूटपणाने जगणाऱ्या सामान्य माणसाला समजावून सांगत धीर देण्याचं काम करणारी कीर्तनं, रूक्ष शब्दांनी कंटाळून जाऊ नये म्हणून त्यांत पदं, भजनं यांची योजना असायची. तीही रागदारीवर आधारित असायची. माझी आजी शिकलेली नव्हती पण रागदारीची उत्तम जाणकार होती. एखादं भजन अथवा पद कुठल्या रागात बसवलं आहे हे ती क्षणात सांगायची. कीर्तनाला अथवा भजनाला जाणं म्हणजे केवळ गवारीच्या शेंगा मोडायला किंवा वाती वळायला काढलेला मोकळा वेळ एवढ्यापुरतं त्याचं स्वरूप नव्हतं. एवढी अध्यात्मगंगा डोक्यावरून पाणी घेऊन गेली तर डोकं थोडं तरी ओलं होईलच ना? बरं बुवा भजनातून करामती करायचे. श्लेष, उपमा, दृष्टांत यातून रसनिष्पत्ती करायचे. पण जे हृदयाला भिडायचं ते मात्र भजन असायचं. भक्तिमार्ग सोपा आहे असं सांगणारे ते सूर असायचे. हरिनामात तल्लीन व्हा, ते नाम जपणाऱ्या सुरांत चिंब व्हा, त्या परमेश्वराचं एक प्रेमळ रूप तुम्हाला अनुभवता येईल असा त्या भजनांचा हेतू असायचा. खरंतर सुरांना शब्दांची गरज नसते. पण त्यातून नामस्मरण व्हावं म्हणून शब्द यायचे. परवा असंच भीमसेन जोशींचं "भाग्यदा लक्ष्मी बरम्मा" ऐकत होतो. मला कानडी भाषा कळत नाही. कर्नाटकातील प्रत्येक घरात किमान एक तरी नानू नावाचा इसम असतो अशी माझी परवा परवापर्यंत समजूत होती. पण हे भजन ऐकताना समजण्यात काहीच अडचण आली नव्हती. डोळे मिटून डोलणे एवढेच करायचे होते. त्या भजनाने जे सांगायचे ते लीलया सांगितले. भजन संपल्यानंतर अभ्यंगस्नान केल्यासारखे शुचिर्भूत वाटले होते. परमेश्वराच्या असंख्य रूपांपैकी एकाचं पुसटसं का होईना तृप्त दर्शन तरी झाल्यासारखं वाटलं होतं. असाच अनुभव कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनांनी दिला होता.

इथून पुढे भजनाची काय वाटचाल आहे माहीत नाही पण हा असाच जर सूर राहिला तर वैकुंठापर्यंत साथ करणाऱ्या या भजनप्रकाराचीच वैकुंठगमनाची तयारी सुरू झाली असं समजायला हरकत नाही. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा! जय जय रामकृष्ण हारी! यावे यो यो हनी सिंग, कीर्तनपीठ मोकळे आहे. समोर चार बोतल व्होडका घेऊन भक्त कीर्तनरंगी रंगण्या सज्ज आहेत.
No comments:
Post a Comment