Saturday, February 29, 2020

रावणाचे रहस्य

काय काय गोष्टी असतंत नाय ते मालवणीतच कशे बरें रवतंत. तशीच ही एक गजाली. 

सूत्रधार: काळाचां काय ता रहस्य म्हणतंत ना ता सांगतंय. रे! तुमच्यासाठी म्हणान सांगतंय, ऐकल्यात? सोरटी खाली ठेवा दोन मिण्टां. बाईल बाजारा गेली की मेल्यांचा सुरू जाता. रे बाबल्या! हंय बस कसो.

हां, तर काय सांगा होतंय, राम आणि रावणाचा युद्ध. रामान शेवटी रावणाचो टाको ढिलो केल्यान. ठेवणीतलो बाण काढल्यान खंयसून तरी आणि बोच्यार मारल्यानं ह्याच्या. हो मराक लागलो. इकडे हे लक्ष्मण बिक्ष्मण केव्हाच छावणीत गेल्ले. राम करवादता. हो मरूच्या आत गेले कशे हे? राम काय ता बघून घेतलो, चल आपण जांवया, म्हणान लक्ष्मणान दोन चार वांदरा बरोबर घेवन थंयसून कलटी मारलेल्यान. लहानपणापासून असोच हो असा म्हणान राम छावणीत येता. तर लक्ष्मण आणि त्याच्याबरोबरच ती वांदरा  सोरटी खेळत बसलेले. वशाडी इली कशी त्यांच्यार ती!

“रे! लक्ष्मणा! “


रामाची हाक ऐकून हो गडबाडता. सोरट्ये पलंगाखाली लोटून वराडता, “काय ओ!”

“मेल्या तू हंयसर? तुका येवक कोणी सांगितला? काम सांगा होतंय तर तू गायब.”

“मापी करा दादानू. काय काम आसा?”

“रे! तो रावण मरतलो लवकर! तेच्याकडे ता काळाचा की कसला रहस्य आसा म्हणान सगळे सांगतंत. ता काढून घेवक होया नाय? तू पयलो जा आणि बघ तुका सांगता काय.”

“दादानूं तुमीच इचारा.”

“अक्कल खंय गेली रे तुझी? मेल्या तेच्या नको तिकडे बाण मारून इलंय मी. तो माका सांगतलो?”

“माका तरी कसो सांगीत? मी रामाचो भाव, माहीत आसा तेका. “

“ऐक तर. तू जांवन सांग तेका, म्हण, भावाचा आणि माझा काय बरा नाय हल्ली. मालवणच्या कोर्टात केस करतलंय मी तेच्यार. तुमच्याकडे कसलां ता रहस्य आसा ता माका सांगितल्यात अयोध्येच्या प्लाॅटच्या केसमध्ये जिंकण्याचो माका जरा तरी चान्स आसा. तू असा सांग तेका. तो बघ, रहस्य गेला तरी चालात पण राम केस हरूक होयो म्हणान तुका सगळी मदत करतलो तो.”

“होय रे होय! जातंय.”

रावणानही काय आढेवेढे घेवक नाय. ये मरे तू, मी खंय जातलंय? असा म्हणान लक्ष्मणाक येवक सांगितल्यान.

लक्ष्मण गेलो. जाताना पाखातल्या कोंबडीन घातलेली चार पाच कवटा, एक फणस, पाव किलो झांट्येचे काजी असा काय काय घेवन गेलो. रावणान तेका बघल्यान आणि म्हणता,”कापो की बरको रे?”
“कापो!” लक्ष्मण म्हणता
“हां, मगे बरा. या इंद्रजिताच्या पोरांका खूप आवडता. मी नाय खानंय. माझो उपवास आसा. आता हो शेवटचोच उपास रे माझो सदाशिवा!” पडूनच आकाशाकडे बघत नमस्कार करून रावण म्हणता.
“बोल काय काढलंस माझ्याकडे आता? भाव येवन बाण मारून गेलो, तू काय डेळकी घेवन दगड मारूक इलंस की काय? हाहाहाहा. रे! विनोद रे माझो. हसूक हरकत नाय”
लक्ष्मण हसता.
“नाय ओ! आजारी आसत म्हणान रामान सांगितल्यान म्हणान भेटाक इलंय. माणसाचा केवा काय होईत सांगूक येता?”
रावण बगत रवता. “रे, तू कामाशिवाय येवचो नाय माका माहीत आसा. बोल तू”
मगे लक्ष्मण जसा सांगूचा ठरला होता तसा सांगता.
रावण म्हणता,” रे उठ. थंयसर ती पिपळ आसा नाय, त्याची तीन पाना बरीशी बघून घेवन ये. एक काडीही घेवन ये.”

लक्ष्मणाक काय कळा नाय. “ओ! पिपळाची पाना? विड्याची की काय? मी काय पानबिन खाणंय नाय”

“नाय रे, पिपळाचीच. जा घेवन ये. टायम नाय रे रवाक माझ्याकडे. लवकर जा.”

लक्ष्मण पाना आणि काडी घेवन येता.
रावण सांगता,” आता असा कर, ती पाना एकत्र करून ती काडी त्यातून टोच बरी”

लक्ष्मण पाना विड्यासारखी वळता आणि काडी टोचून रावणासमोर धरतां.

रावण-”मेल्या पानाचो ठेलो असा काय रे तुझो? तुका काय मसाला पान करूक सांगलंय? सोड ती. सरळ एकावर एक ठेव आणि काडी आरपार जांवदे त्यांच्या.”

लक्ष्मण तसा करता. आणि काय आश्चर्य काडी लक्ष्मणाच्या बोटात घुसता आणि रक्त येता. काय्येक केल्या रक्त थांबना नाय. पाना होती तशीच रंवतत.

“आवशीक झंव! ह्या काय सांगितलंस माका करूक? ता रहस्याचा काय?” लक्ष्मण गाळी देवक लागता.

रावण हसता आणि म्हणता,”हाच ता रहस्य. जास्त काड्या करशीत तर रक्त येतलां. मी काड्ये करून सीतेक पळवन हाडलंय, आज माझ्या बोच्यात बाण आसा आणि मी आता मरतलंय. रामाक जांवन सांग. बायलेक घेवन घराकडे जा, ज्याच्यासाठी ईलंय ता काम झाला मा? मगे या रहस्याच्या मागे आणि आता कशाक?”

लक्ष्मण रक्ताळलेलो हात घट्ट धरून जांवक लागता.
रावण आरडता, “रे लक्ष्मणा, ती पिपळाची पाना असत ना, ती चुरून त्याचो रस जखमेवर लाव, रक्त थांबतला. रे देवा म्हाराजा! मी वर येतंय रे शंभूदेवा. थोडी भांग माझ्यासाठी ठेय.”
ऐकल्यात रे तुम्ही सगळ्यांनी? रावणाचा ह्या रहस्य लक्षात ठेवा. काडी नको तिकडे घालू नकात.
(समाप्त)
-मंदार वाडेकर

No comments:

Post a Comment