(निवेदक)
नमस्कार, हे आकाशवाणीचं जळगांव स्टेशन आहे. उसंतवाणी सादर करीत आहोत. सादर करताहेत आपल्या जगण्यातून उसंत मिळाल्यावर इतरांना विश्वाचे रहस्य रसाळ ओव्यांतून उलगडून सांगणारे १००८ श्री श्री ओवीशंकर. गेली वर्षभर आम्ही श्री श्री ओवीशंकर यांना रेडिओ जळगांव स्टेशनवर कार्यक्रम करण्यासाठी गळ घालत होतो, पण त्यांना उसंत मिळत नव्हती. तो योग अखेर जुळून आला आहे.
———(ओवीशंकर)———
श्रोते म्हणती कोण संत
काय म्हणोनी नाचतो येथ
केलियाने याची साथ
काय प्राप्त होतसे ॥
निरूपण - आपल्याला प्रश्न पडला असेल हा कोण संत? इथे काय म्हणून नाचतो आहे? याच्याबरोबर आपणही नाचल्याने आम्हांस काय बरे मिळणार आहे? प्रश्न नैसर्गिक आहे, साहजिक आहे. येथे शून्याची साधना होत आहे, शून्याचे निरूपण केले जाणार आहे.
जयांचे अंगी भलते तर्कट
वर लीळा अपार मर्कट
नसत्या शंका काथ्याकूट
तयांसि शांती मिळतसे ॥
निरूपण - या जगात अपानी कीटक प्राप्त झालेले जिवाणू बरेच आहेत. ते तर्कट लढवण्यात मग्न असतात. शंकाकुशंका काढून मनात संदेह उत्पन्न करून पळून जातात. त्यांची शांती, पर्यायाने आपली शांती करण्याचे प्रयोजन आहे.
हे विश्व कसे नि आले कोठून
त्यांत कशास आमचे प्रतिष्ठान
जन्मजात आम्हा चौकश्या महान
मनी दुष्ट शंका येतसे ॥
निरूपण - हे सर्व काय आहे? येथे आमचे काय काम आहे? असल्या चांभारचौकशा करण्याचे भाग्य आम्हांस जन्मजात लाभले आहे. मनात येणाऱ्या शंका दुष्टच असतात, कारण त्या अस्वस्थ करून सोडतात.
जगात सर्वत्र असे शून्य
बाहेर शून्य आतही शून्य
शून्य कर्माचे फळही शून्य
शून्यात ब्रह्मांड होतसे ॥
निरूपण - शून्यच सर्वव्यापी आहे, निर्विवाद सत्य आहे. अंतर्बाह्य शून्यच आहे. शून्य कर्म करावे, त्याचे फळ शून्यच घ्यावे. शून्य म्हणजेच ब्रह्माण्ड आहे, ब्रह्माण्ड हेच शून्य आहे.
जगीं न अभ्यास न अज्ञान
न तेथ पांडित्य नचही ज्ञान
न प्राविण्य न कसलीही जाण
अंध:कार प्रकाश एक जाणिजे ॥
निरूपण - येथे अभ्यासही नाही, अज्ञानही नाही. पांडित्याने कसलेही ज्ञान मिळत नाही. शिक्षणाने कसलीहीजाण येत नाही. अंधार ही प्रकाशाचीच दुसरी बाजू आहे. सर्व गोष्टींचा अभाव म्हणजेच शून्य, आणि म्हणून हे भौतिक जगही अस्तित्वविहीन आहे.
मूळ व्याधि असे आपले मन
फुकाचे मनन आणि चिंतन
तत्वज्ञान जसे जणू विचारधन
बंदिस्त मक्षिका श्लेष्मग्रासे ॥
निरूपण - सगळ्या शंका कुशंकांचं मूळ म्हणजे आपले मन. फुकट कामधंदा सोडून मनन, चिंतन करणारे, भलतीकडे पळणारे हे मन. त्याला तत्वज्ञान म्हणजे जणू काही धनच वाटते. शेम्बडात अडकलेल्या माशीप्रमाणे मन त्याच त्याच तत्वज्ञानात फिरत असते म्हणून त्याला उत्तरं मिळत नाहीत.
ओवी म्हणे जो मनी मुक्त
तयां न प्रश्न वा होई शंकांकित
राही उदासीन शुंभ अव्यक्त
अंतरी त्याचे सत्य वसे॥
निरूपण - जो मनापासून मुक्त पावला त्याला कसलीही शंका येत नाही. शुंभाप्रमाणे उदासीन राहणे, कशावरही मत व्यक्त न करणे हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण असते. सत्य त्याला उमगलेले असते.
श्रोता म्हणे हा साक्षात्कार
स्वामीकृपे दिसला चमत्कार
शून्य अभ्यासे मार्क गोलाकार
गुह्य शाळेचे लख्ख उलगडे ॥
निरूपण - आता तुम्हाला लक्षात आले असेलच, शाळेत परीक्षेत मिळणारा भोपळा बक्षीसाप्रमाणे घेतला असता तर अंतिम सत्यापर्यंत जाण्याचा मार्ग नक्कीच सुकर झाला असता.
मंडळी, विचार न करण्याची सवय लावून घ्या. अविचारी व्हा. तेच सत्य आहे, तेच असत्य आहे. सत्याला जाणून घ्यायचा जितका प्रयत्न कराल तितके ते तुमच्यापासून दूर पळेल. अविचाराने त्यावर मात करा. तुम्हाला गुरूची गरज नाही. ज्ञानाची गरज नाही. तुम्ही अस्तित्वातच नाही तर गरज कशी काय असू शकेल? जळगांव रेडिओ स्टेशन मला पूर्वी बोलावत होते पण मी आलो नव्हतो कारण ते मानधनाविषयी काहीच बोलत नसत. मी केवळ मानधनाविषयी विचार करत असल्याने माझे मन गढूळ झाले होते. पण मी विचार करणे सोडल्यावर मला माझी चूक जाणवली. या विचारसरणीचा प्रभाव पहा. आज मी काही विचार न करता वाट्टेल ते बोलू शकतो. मानधनाची मला गरजच वाटत नाही. श्रोतेहो, तुम्हाला अविचारी कसे व्हायचे ते जाणून घ्यायचे असेल तर कृपया थेट माझाशी संपर्क करा.
आता आपण मूर्खांचे प्रकार पाहू.
जगीं म्हणे मीच तो ज्ञानी
बोल इतरांचे ठेवी अपानीं
दाखवी टिऱ्या...
(निवेदक)
माफ करा, प्रक्षेपणात काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे १००८ श्री श्री ओवीशंकर यांचे भाषण मध्येच थांबवत आहोत. हे सदर आपल्यास आवडले असल्यास आम्हाला जरूर कळवा, आम्ही हे दर गुरुवारी प्रक्षेपित करू. शिवाय, काही श्लोक अर्धवट राहिले याबद्दल क्षमस्व. गरजूंनी आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही ते समग्र श्लोक विनामूल्य पाठवून देऊ. धन्यवाद!

No comments:
Post a Comment