नुकतंच अमेरिकेच्या फाॅरेनमधलं मतदान करून आलो. काहीच मजा नाही. मुळात इलेक्शन होती की नाही असं वाटावं असं वातावरण, म्हणजे मुळीच वातावरण नाही. टीव्हीवर फुटकळ जाहिराती आणि रस्त्यालगतच्या गवतात खोवलेल्या झेंडावजा जाहिराती. जाहिराती म्हणजे फक्त उमेदवाराचं नाव, बाकी काही नाही. आमचं नेतृत्व म्हणून वर अण्णा, दादा आणि तात्यांचे सत्तेने सुजलेले फोटो, खाली खच्चून सोन्याने मढलेला गेंडासदृश उमेदवार हे असलं काही नाही. सभा नाहीत, मोर्चे नाहीत, घोषणा नाहीत, उपोषणं नाहीत, मागण्या नाहीत, धमक्या नाहीत, पेपरमध्ये व्यंगचित्रं नाहीत, पक्षापक्षांमधलं जुगाड नाही, अण्णा तात्यांना भेटले, भाऊ तात्यांना भेटले, अण्णा भाऊंना भेटले, तात्या रुसले, दादा भडाकले असलं काही म्हणजे काही नाही. सामान्य माणसानं मत द्यावं तरी कुणाला आणि कशाच्या आधारावर? बरं चिन्ह शोधू लागलो तर ते कुठं दिसत नव्हतं. आयुष्यभर पाहिलेला अवलक्षणी "हात" आणि त्याची "ताई माई अक्का, विचार करा पक्का, हातावर मारा शिक्का" ही घोषणा अजून कानात घुमते आहे. जनसंघाची पणती आली आणि गेली, तिच्या मागोमाग आमच्या घराण्याचं वळण कसं सरळ ते ठसवत कमळाबाई आली, दहा वाजल्याचं दाखवून गुपचूप सगळ्यांचे बारा वाजवणारे घड्याळ आले, इलेक्शनआधीच स्वैर बाण मारून सुटलेले बाण मागे घेता येत नाहीत हे लक्षात आल्यावर प्रतिस्पर्ध्यालाच दोष देणारे धनुष्यबाण आले, गाजावाजा करून उद्घाटन झालेले परंतु त्यानंतर यार्डातच गंजत पडलेले रेल्वे इंजिन आले, तसाच गाजावाजा करून उद्घाटन झालेला आणि तेवढाच गाजावाजा करून तातडीने कचऱ्याच्या डब्यात गेलेला खराटा आला. काही असलं तरी चिन्ह हे त्या त्या पक्षाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. चिन्ह पाहून मतदाराला पक्षाची एकूण मानसिकता कळते. तसा कुठलाच आधार इथे मिळत नाही. नाही म्हणायला डेमोक्रॅटिक म्हणजे गाढव आणि रिपब्लिकन म्हणजे हत्ती अशी चिन्हे आहेत पण ती मतदानपत्रिकेवर दिसत नाही, त्यामुळे डेमोक्रॅट असूनही गाढवपणावर शिक्का मारता येत नाही.
आपल्याकडं कसा इलेक्शनचा शीजन असतो. शिशिर ऋतूत जशी झाडे रंग बदलतात तसे हे एरवी स्कोडाफिडातून फिरणारे आपला रंग बदलतात. कधीही न दिसलेले वॉर्डातले "कार्यकर्ते" रस्त्यावर दिसू लागले आणि आपल्याकडे पाहून आकंठ हस्तिदंती करू लागले की ओळखावं शीजन सुरू झाला. त्यांच्या ओठावर नाईलाजाचे हसू असले तरी आतून "मायला, सालं एका मतासाठी आता भाव खाणार" हे विचार असतात. हे भाव दिसू नयेत म्हणून ही सगळी कार्यावळ रेबॅनचे गॉगल परिधान करून असते. "शुभ्र कपडे + रेबॅन = अशक्य उन्मत्तपणा" हे समीकरण पूर्वीपासून आहे. मला पूर्वीपासून एक प्रश्न पडायचा की ही कार्यकर्ते मंडळी नक्की काय कार्य करतात? म्हणजे दिवसा नोकरी रात्री कार्य की दिवसा कार्य रात्री कर्ते? कुठलीही नोकरी न करणारे पण पक्षाचे कार्यकर्ते म्हणवणारे अनेकजण मी पाहिले आहेत. हे प्राणी सहजासहजी रस्त्यावर दिसत नाहीत. प्रतिष्ठित नेत्याच्या घरी अथवा कार्यालयात जावे, तेथे हे मोठ्या संख्येने आढळून येतात. या नेते मंडळींनाही लोकांना सहजासहजी भेटता येऊ नये म्हणून स्वत:भोवती असल्या प्राण्यांचा चक्रव्यूह लागत असावा. तिथली कार्यकर्त्यांची गर्दी पाहिली की मला नेहमी गुळाच्या खड्याला लागलेल्या मुंगळ्यांची आठवण येते. एरवी रस्त्यावर पान खाऊन पचापचा थुंकणारी ही जनता, तिथे मात्र शिस्तीचा रुबाब पाहून घ्यावा. एखाद्या देवळात गेल्याप्रमाणे चपला बाहेर काढा म्हणून सांगतील, कुणी खेड्यातून काही कैफियत घेऊन आलेला आलेला बापडा त्याला "अपाइण्टमेण्ट न्हाई व्हय? आन्ना आत्ता काय भ्येटनार न्हाईत, माघारून या सांजच्याला." असं परस्परच सांगतील. तोही बिचारा "आसं कसं दादा, लै लांबून आलोया, पघा काय तरी तोड निघतीया का" असं म्हणून त्याचा भाव वाढवणार. मग पुढं निवडणुकांचा धुरळा उडाला की मग काय विचारावं. रिक्षेतून कंठशोष करत जाणारे लाऊडस्पीकर्स काय, उमेदवारांची लाईफसाईझ होर्डिंग्ज काय. होर्डिंग्ज आणि त्यावर त्यांचे अशक्य निर्बुद्ध स्मितहास्य असलेले फोटो तर काहींचे अगम्य अवकाशात पाहून हात उंचावणारे फोटो पाहणे हा माझा विरंगुळा होता, आजही आहे. जेवढा उमेदवार छोटा तेवढे त्याच्या होर्डिंगवर बाकीच्या नेत्यांचे फोटो अधिक. त्यावर आमचे राष्ट्रीय नेते, आमचे आधारस्थान, आमचे शक्ती/प्रेरणास्थान, आमचे युवा नेतृत्व अशी पहिल्या फळीतील मोठे फोटो झाले की त्या खाली स्थानिक बाजारसमिती अध्यक्ष, झेडपी अध्यक्ष, सहकारी पत संस्था अध्यक्ष यांचे थोड्या कमी साईझचे फोटो. अशा स्थानिक देवचारांना मान देऊन झाला की मग या उमेदवाराचा प्रसन्नोन्मत्त फोटो. आमच्या गावातील एका स्थानिक नेतृत्वाने सगळ्या ठिकाणी एकच फोटो वापरायचे ठरवले आहे. त्यामुळे होर्डिंगवर त्यांचा जो फोटो आहे तोच गावातील वळू संवर्धन केंद्रातही लावला आहे. दोन्हीकडे तेवढाच समाधानी दिसतो. वळू संवर्धन क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केलं आहे त्यामुळे समस्त गाई त्यांना खास मान देतात असं ऐकून आहे. वळू काय मतदार काय, नीट हाकले म्हणजे वठणीवर येतात असं मत ते खाजगीत व्यक्त करतात.
होर्डिंग्जच्या पाठोपाठ मग सुरू होतो प्रचाराचा धुरळा. सभा लागतात. जिपा, टाटा ४०७, ट्रॅक्समधून कार्यकर्ते गावागावाकडे सुटतात. ऊसतोडणी कामगार, गावातील हातावर पोट असणारे कामकरी, पोटच्या पोराला अक्षरश: पोटावर बांधून हजेरी मिळवणाऱ्या बायका आणि क्वार्टर हाफवर कुठंही जाणारी गावातील रिकामटेकडी पोरं यांना ट्र्कात घालून शहरात सभेला घेऊन यायचं. त्यांनी सभेच्या ठिकाणी उन्हांतान्हात बसून राहायचं. हजेरी सभेनंतर मिळणार असते. पत्रकारांनी गर्दीचे फोटो काढल्यावर. क्वार्टरवाल्यांनी केव्हाच स्वत:चं जुगाड करून ब्रह्मानंदी टाळी लावून घेतेलेली असते. भाषण करणाऱ्या नेत्याने "आम्ही सगळे टोल नाके उध्वस्त करू" म्हटलं काय किंवा "परदेशातील काळा पैसा परत या देशात आणूच आणू" म्हटलं काय दोन्हीला टाळ्या वाजवायच्या असतात. "दांडगे पाटील साहेबांचा !" अशी घोषणा आल्यावर काही जण "विजय असो" म्हणतात काही जण नुसतंच "जय!" म्हणतात. पाटील दांडगे होत जातात. रोजावरचे कामकरी पुन्हा गावाकडे जाऊन उद्याच्या चिंतेला लागतात. प्रत्यक्ष निवडणुकांच्या दिवशी रणधुमाळी असते. आपलं नाव मतदार यादीत असेल की नाही याची धाकधूक घेऊन रांगेत उभं राहायचं. नाव असेल तर लॉटरी लागल्याचा आनंद घेऊन लोकशाही जिवंत ठेवल्याचा आनंद घेऊन परत यायचं. नाव नसेल तर पेपर चांगला जाऊनही नापास झाल्याचं दु:ख घेऊन रिपीटरसारखं परत यायचं. आपल्या नावावर कुणी "कार्यकर्त्यानं" मतदान केल्याची खात्री बाळगायची. माझं स्वत:चं नाव रेल्वेच्या डब्यावर लावलेली रिझर्वेशनची लिस्ट आणि मतदारयादी या दोन ठिकाणी कधीही आलेलं नाही. पुण्याहून पंढरपूरला वारीत चालत जाऊन विठोबाचं दर्शन न करताच परत आल्यासारखं माझं होत आलं आहे.
या असल्या अस्सल भारतीय "विलेक्षणी"वर पोसलेला हा पिंड आज इथे अमेरिकेत मतदान करून बाहेर पडला तेव्हा अस्वस्थ झाला. कैच्या कैच. मतदान केंद्रावर गर्दी नव्हती, बाहेर कार्यकर्त्यांचं मोहोळ उठलेलं नव्हतं. माझं नाव चक्क मतदार यादीत होतं. ते पाहून मला गहिवरून आलं. माझं नाव तपासणाऱ्या त्या बाईपुढे शोभा नको म्हणून मी माझ्या भावना आवरल्या. केंद्रावर गेल्यापासून मोजून पाचव्या मिनिटाला मतदान करून मी बाहेर आलो. काय लोकशाही म्हणायची का काय ही? या लोकांना इलेक्शन कशाशी खातात ते माहीत नसावं. मोदींनी आल्यासरशी त्यांच्या मेडिसनच्या भाषणात थोड्या टिप्स द्यायला हव्या होत्या. शेवटी आपल्या गावाकल्डीच इलेक्षण लै टेक्सास, असं वाटू लागलंय.

No comments:
Post a Comment