त्यांना भले केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र मिळो, आम्हाला मात्र केंद्रात सुपारी आणि राज्यात नारळ मिळाल्याची भावना बळावत चालली आहे. पण आजून धीर सोडलेला नाही. सतत काहीतरी धरून ठेवणे हे आमच्या रक्तात आहे. तलवार उचलताना धोतराची कनवटी किंवा सोगा धरून ठेवायचा आणि धोतर सावरताना तलवारीचं म्यान धरून ठेवायचं हे आमच्या उण्यापुऱ्या बाविशीत आणि नऊदहा महिन्यांच्या भरघोस राजकीय अनुभवावरून शिकलो आहे. जेव्हा आमच्या डाडूने (म्हंजे डॅड हो माझे! मराठीत बापाला डॅड म्हणतात असं सेंट झेवियरमध्ये शिकवलं होतं) मला "जा, कमळाबाईला नडून ये!" असं सांगितलं तेव्हा कृष्णानं पांडवांच्या वतीनं शिष्टाई केली अगदी तस्सं फीलिंग आलं होतं. बरोबर पेंद्या होताच. मीही कमालीचा बाणेदारपणा दाखवत "जागाच काय, सुईच्या अग्रावर राहील एवढीसुद्धा जमीन देणार नाही. अगदी जिथे आम्ही पारंपारिकरीत्या पडत आलो तीसुद्धा जागा मिळणार नाही. आम्हाला आमच्या परंपरांचा अभिमान आहे. स्वाभिमानाला धक्का लागेल असं आम्ही काही मान्य करणार नाही!" असं सांगून आलो होतो. फुगलेली छाती थोडी खाली आल्यावर विचित्र वाटलं. तेवढ्यात "रें, हो डायलॉक दुर्योधनाचो नाय?" असा सानुनासिक प्रश्न आमच्या कोकणातील एका कार्यकर्त्याने विचारलाच. त्याला "तुझा नारू करू काय रे?" असं विचारून झापलं. "शंका गाळा, नारू टाळा" ही नवीन घोषणा करायला हवी. डाडूला विचारतो आजच. वास्तविक मी डाडूला म्हणालो होतो, "फादर, तुम्ही मी जसा अभ्यास करतो तसं करा. जे आपल्याला जन्मात कळणार नाहीत ते टॉपिक मी सरळ ऑप्शनलाच टाकतो. उरलेल्यापैकी साठ टक्के हिट, चाळीस टक्के मिस असं धरतो. मला बरोबर पन्नास मार्क पडतात. आपण साधारण शंभर जागा लढवू." पण ऐकलं तर डाडू कसले. आत्मविश्वास गेला खड्डयात, स्वाभिमान महत्वाचा असं त्यांचं म्हणणं होतं. पण नारूचा झकास मोरू झाला बाकी. स्वाभिमान काय? ही:ही:ही:! वर्ल्ड कप मध्ये भारत हरला तरी चालतो, पण पापस्तान हरलं की सर्वात जास्त आनंद होतो तसं झालं आहे.
या सगळ्यात माझं इतिहासाचं ज्ञान मात्र उलटंपालटं होऊन बसलं आहे. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची साडीचोळी देऊन रवानगी केली की शाहिस्तेखानाची? अफजलखानाचा कोथळा काढला की जिऊ महाल्याचा? दिल्लीहून भेटायला आले होते ते जयसिंग मिर्झा की दिया मिर्झा? आग्र्याहून सुटका कुणाची झाली होती? औरंगझेबाची की संभाजीराजांची? आग्र्याहून सुटका करून घेताना महाराज स्वत: कुठे होते? आमच्या स्वत:च्या डाडूंची दिल्लीहून सुटका कधी होणार? नजरकैदेत आम्ही आहोत की औरंगझेब? मुळात आम्ही राजे तरी आहोत की नाही? दिल्लीहून सुटका करून घेतली तर आम्ही पुन्हा दिल्लीकडे का धावतो आहोत? असे अनेक प्रश्न पडले आहेत. दस हजारी सरदारावरून पंच हजारी सरदार झालो. शिलेदारी गेली, बुडाखालचा घोडा गेला. बाजारबुणगे म्हणून पायदळात आलो. पूर्वी तलवार बाळगून होतो तिथे आता मुदपकातील भांडी वाहणे आले. पण म्हणून आम्ही आमचा सन्मान सोडणार नाही. जरूर मुदपाकातील खरकटी भांडी वाहायला सांगा, पण ज्यात मोतीचुराचे लाडू केले होते तीच कढई घासू, अळवाच्या फतफत्याचे भांडे मुळीच घासणार नाही. असा सांगावा घेऊन आमचे दोन विश्वासू सरदार दिल्लीस गेले होते. त्यांना तीन तास ताटकळत उभे राहायला लागले, पण "बघू" असा श्वास रोखणारे पण विश्वास वाढवणारे खात्रीलायक उत्तर घेऊनच ते परत आले. खरं तर आमच्या डाडूंना अळवाचे फतफते आवडते. त्यात असलेला पाचक मुळा, पित्तवर्धक शेंगदाणे आणि पोट साफ करणारा अळू हे सर्व त्यांच्या प्रकृतीला साजेसेच. पण अळूने घसा खवखवतो म्हणून खात नाहीत. घसा खवखवला की मग खूप ओरडत बसतात.
अजूनही दिल्लीहून उत्तर आलेले नाही. आमच्या सहनशीलतेच अंत पाहू नका म्हणावे. आमचा सन्मान राखला गेलाच पाहिजे. घासण्यासाठी का होईना, मोतीचुराची कढई नसेल तर निदान साखरभाताची परात तरी हवी. गेलाबाजार मसालेभाताची तरी हवीच हवी. हो. मला वाटते ते सन्मानाचे होईल. या सैनिकाला आव्हान देऊ नका. आमचा अख्खा जन्म नाक्यावरच्या हॉटेल सन्मानमध्ये एक चाय पानी कम, एक गिलास पानी आणि माचिस या ऑर्डरवर गेला. ते सन्मान पण आपण अजून सोडलं नाही. आजही आपण तिथे गेलो की न सांगता पाणी आणि माचिस टेबलावर येते. आपण बिल न देता बाहेर पडलो तरी कुणी थांबवत नाही. "लिहून ठेव" असं आधीच फर्मावलेलं आहे. तर याला म्हणतात इज्जत. आत्ता काही नाही दिलंत तरी हरकत नाही पण सन्मानाने "लिहून" तरी ठेवा वहीत. जै महाराष्ट्र!

जियो! कातील.
ReplyDelete